तिचा खऱ्या प्रेमा पर्यंतचा प्रवास (भाग १९)

Gouri, Mavashi and Madhuri plans surprise for Vinay's Birthday

भाग- १८ https://www.irablogging.com/blog/her-journey-towards-true-love-chapter-18_3507

भाग- १९

आता २ दिवसावर विनयचा वाढदिवस होता. विनय, मावशी आणि गौरी यांनी एक प्लॅन बनवला.

त्या प्लॅन नुसार मावशी आणि गौरी, माधुरीला घेऊन त्याच्या वाढदिवसाचे नियोजन करतील अस ठरलं.

एकदा का माधुरी यासाठी तयार झाली की पुढचा प्लॅन विनय पूर्ण करणार होता.

जसं त्यांनी ठरलं होत तस गौरीने दुपारी मधुरिसमोर विषय काढला..

गौरी - " माधुरी , ऐक ना? 

माधुरी - "हा बोल"

गौरी - "तुला एक गोष्ट सांगायची आहे. पण ती फक्त तुझ्यात , माझ्यात आणि मावशी मध्ये राहील. विनयला कळात कामा नये."

माधुरीला कळेना अस काय आहे जे विनयला कळता कामा नये.

माधुरी - " हो ठीक आहे. सांग"

गौरी - " पर्वा विनयचा वाढदिवस आहे. आणि आपण त्याला सरप्राइज द्यायचं. माझ्याकडे एक छांन प्लॅन आहे. "

माधुरी - " काय सांगतेस काय? सांग सांग."

गौरी - " आपण दिवसभर त्याला कोणी शुभेच्छा द्यायच्या नाहीत. त्याचा जन्म संध्यकाळी ७.३० झाला होता. आपण त्याच वेळी समोर केक आणून त्याला सरप्राइज करायचं "

माधुरी - "अरे वाह छानच की, चालेल."

गौरी - " कसा वाटला प्लॅन "

गौरी मनात म्हणत होती, खरा प्लॅन तर तुझ्यासाठी बनवला आहे. 

माधुरी - " खूपच मस्त, पण आपण डेकोरेशन नाही करायचं का?"

गौरी - " करायला काही नाही. पण तो दिवसभर घरीच असणार मग कसं करणार ना?"

माधुरी - " मी काय म्हणते आपण संध्याकाळी थोडा वेळ त्याला त्याच्या रूम मध्येच काहीतरी करून बसवू. त्या आधी आपण आपल्या खोलीत तयारी करू आणि नंतर सगळं खाली नेऊ "

माधुरीच्या उत्साह बघून गौरीला छान वाटलं.

गौरी - " चालेल. ठरल तर . केक च मी बघते. "

दोघींनी एकमेकींना टाळी दिली. गौरीला हसू येत होत कारण माधुरीला पटवण हे त्यांच्या प्लॅनिंग चां एक भाग होता.

२ दिवसावर विनय च वाढदिवस आहे हे ऐक्यापासून माधुरीला काय करू आणि काय नको असं झालं.

तिच्या डोक्यात डेकारेशन च्या वेगवेगळ्या कल्पना येऊ लागल्या.

पण ती इतक्या उत्साहाने हे सर्व का करती आहे अस प्रश्न पण तिला पडला नाही इतकी ती विचार करण्यात गुंग होती.

माधुरीने विचार केला आपण विनयला एक गिफ्ट देऊयात . पण द्यायचं काय ? असा विचार करू लागली.

तो पूर्वी छान पेंटिंग करायचा अस तिने ऐकलं होतं. घरात त्याने पूर्वी काढलेली एक दोन पेंटिंग होती.

पण मध्यंतरी त्याने पेंटिंग बंद केले होते.

कामाच्या व्यापात त्याला त्याचा छंद जोपासायला वेळ मिळत नव्हता.

बस, माधुरीने विचार पक्का केला आपण त्याला पेंटिंग बोर्ड आणि कलर सेट द्यायचा.

 इकडे गौरीने मावशी आणि विनयला सगळं प्लॅन प्रमाणे चालू आहे असे कळवले.

तो दिवस संपला. आता फक्त आजचा दिवस हातात होत माधुरीच्या.. उद्या विनयचा वाढदिवस.

आज गौरी ऑफिस मधून लवकर गेली. जाताना माधुरीला सांगितलं मी केक ची ऑर्डर देते आज.

माधुरीने ऑफिस संपवून बाहेर पडली. जाताना तिने एका दुकानातून विनय साठी तिने जे गिफ्ट ठरवले होते ते घेतले. 

घराजवळ आली आणि तिला प्रश्न पडला हे गिफ्ट घरी न्यायचं कसं? विनय जर हॉल मध्ये बसला असेल तर?

त्याला तर आत्ताच कळलं.

काय करावं अस विचार करत होती.

तिने गौरीला फोन केला.

गौरी - " अग माधुरी, कुठ आहेस, अजुन घरी नाही आलीस. आम्ही जेवायला थांबलो आहे."

माधुरी - " हो हो घराबाहेरच आहे गौरी, आता शांतपणे ऐक, मी ना विनय साठी एक गिफ्ट आणलाय. पण ते घरी कसे घेऊन येऊ ते कळतं नाही आहे. तो तिथेच आहे का ?"

गौरी - " ग नाही. तो पण अजुन आला नाहीय. बाहेर गेला आहे . तू ये आत."

गौरीला हे सगळं खूप छान वाटत होत. ती पटकन खाली आली आणि माधुरीला ते गिफ्ट रूम मध्ये घेऊन जाण्यात मदत केली.

माधुरी -" हुश्श, कसं हे घेऊन आले माझं मलाच माहीत? मला वाटलं विनय घरी आहे की काय ? "

गौरी - " अरे वाह, विनय साठी गिफ्ट. काय घेतलं आहेस सांग ना "

माधुरी गौरी ची मज्जा घेत म्हणाली,

" नाही नाही, सरप्राइज आहे "

गौरी - " हे काय माधुरी, सरप्राइज तर विनय साठी आहे ना? मला सांगू शकतेस "

गौरीने तिला सांग सांग म्हणून खूप पिडले.

शेवटी माधुरी म्हणाली ," ग पेंटिंग बोर्ड आणि कलर आहेत "

गौरी - " माधुरी, तुला कसे माहीत तो पेंटिंग करायचं ते"

माधुरी - " अग, आपल्या घरात दोन पेंटिंग आहेत ना ते बघून मी मावशीला एकदा विचारल, कोठून आणली ही पेंटिंग तेव्हा मावशी म्हणाली की , ती पेंटिंग आणली नाही तर विनय ने काढलीत, पण हल्ली खूप दिवस त्याने काहीच काढलं नाही. त्याचा छंद जोपासायला त्याला वेळच मिळत नाही "

गौरी - " हो, खूप छान कडतो तो पेंटिंग "

माधुरी - " म्हणूनच त्याने पुन्हा त्याच्या छंदासाठी वेळ द्यावा म्हणून मी आणले."

गौरीने माधुरीला मिठी मारली. गौरीला पण आता खात्री पटली की विनयला माधुरी शिवाय दुसरी कोणतीही चांगली मुलगी मिळू शकत नाही. किती छान ओळकते आणि समजून घेते ती विनयला.

शेवटी तो दिवस उजाडला. सकाळी सकाळी माधुरीला वाटत होत की जाऊन विनयला वाढदिवसाच्या शभेच्छा द्याव्यात पण तिने स्वतः ला थांबवलं.

मावशी आणि गौरीने सकाळीच विनयला शुभेच्या दिल्या होत्या पण माधुरी समोर तस दाखवत न्हवात्या.

माधुरी आवरून खाली आली. गौरी ,मावशी खालीच होत्या. माधुरीची नजर मात्र विनयला शोधत होती.

इतक्यात विनय ही बाहेरून आला. सगळे नाश्ता करत होते.

विनयच्या मनात त्याचा प्लॅन चालू होता.मध्येच त्याची नजर माधुरी कडे जायची. तिच्या नजरेत त्याला स्पष्ट दिसायचे की तीला त्याला शुभेच्या द्यायच्या आहेत पण देऊ शकत नाही आहे.

नाश्ता झाला, जेवण ही झालं. माधुरी थोडा वेळ सोफ्यावर बसली होती इतक्यात विनय तिच्या शेजारी आला आणि म्हणाला,

विनय - " माधुरी, तुला काही सांगायचं आहे का मला?"

माधुरी - ( सावरत घेत म्हणाली ) " नाही, असे का विचारल?"

विनय - " नाही म्हणजे मी सकाळपासून बघतोय , मला तुझ्याकडे बघुन अस वाटत आहे की तुला मला काही सांगायचं आहे "

माधुरीला काही कळेना, हा आपली नजर वाचतो की काय अस तिला वाटू लागली. ती लगेच तिथून उठली आणि वर गेली.

ईकड विनयला तिला अस गोंधळून गेलेले बघून हसू येत होत.

दुपारी रूम मध्येच माधुरी आणि गौरीने थोडी तयारी केली. फुगे फुगवले. हॅपी बर्थ डे ची कार्ड ने डिजाइन तयार केली.

मावशीला विनयच्या रूम मध्ये पाठवून त्याला तिथंच बोलण्यात गुंतून ठेवायला सांगितलं आणि दोघींनी खाली येऊन सगळं साहित्य सोफ्याच्य मागे लपवलं.

आता तिघीही तयार व्हायला गेल्या. विनयला सांगितलं की ७.३० वाजता कोणीतरी भेटायला येणार आहे तू तयार रहा. हे असे मधूरिसमोर सांगणे हा विनयच्या प्लॅन चा भाग होता .

माधुरीला विनयला हे सगळं बघून किती आनंद होईल हा विचार करूनच खूप आनंद होत होता. आज ती तीच म्हवती. मन कोणतही शंका काढत न्हवत. सगळं एकदम व्यवस्थित चालू होत.

गौरी आणि माधुरी आवरत होत्या. आज गौरीने हट्टाने माधुरीला साडी नेसायला लावली. गौरीच्या हट्टापुढे माधुरीच काही चाललं नाही. 

आता प्लॅन प्रमाणे गौरी आणि मावशी बाहेर जात आहेत अस माधुरीला सांगणारं होत्या . 

गौरी - " माधुरी ७ वाजलेत, मी आणि मावशी पटकन जाऊन केक घेऊन येतो , साडे सात वाजता केक कापला पाहिजे "

माधुरी - " ग दोघी का जात आहात पण "

गौरी - " ग मावशीच पण काय तर काम आहे म्हणली. आम्ही पटकन जातो आणि पटकन येतो असे म्हणाली."

गौरी माधुरीला बाय म्हणून रूम मधून गेली.

माधुरीने पण पटकन आवरल. खाली आली. खाली कोणी दिसत नव्हत. तिला वाटल गौरी आणि मावशी गेल्या वाटत.

तिने पटकन सगळं डेकॉरेशन जे सोफ्यामागे लपवलं होत ते एकटीने लावायला चालू केली.

ती इतकी मग्न होऊन सजावट करत होती की तिला आजूबाजूची जाणीव ही न्हवती.

विनय आवरून खाली आला आणि त्याची नजर मधुरीवर अडकली.

माधुरी इतकी सुंदर दिसत होती साडीत की तो तिच्याकडे एकटक बघत बसला.

माधुरीच तर लक्ष पण न्हवत , विनय खाली आला आहे हे तिला कळलं ही नाही.

ती तल्लीन होऊन सजावट करत होती. एक फुगा वरती चिटकवायला म्हणून सोफ्यावर चाठली. साडी सावरत तो फुगा चीतकावताना तिचा तोल गेला.

विनय ते बघून धावत आला आणि त्याने तिला दोन्ही हातात पडकले.

तो तिच्याकडे एकटक बघत होता आणि ती त्याच्या डोळ्यात सगळं जग विसरून गेली होती.

दोन मिनिट तीला काय झालं हे कळलं नाही, पण लगेच स्वतः ला तिने सावरलं. विनय ने तीला सोफ्यावर ठेवलं.

आता पूर्ण शांतता. दोघे काहीच बोलत न्हवते.

शेवटी दोघं एकदम बोलले 

विनय - " सॉरी"

माधुरी - " थँक्यु"

ते असे एकदम सॉरी थँक्यू बोलल्याने दोघांना हसू आले.

तीन घड्याळाकडे बघितले.७.३० वाजायला आले होते. अजुन मावशी आणि गौरी आल्या न्हवत्या.

इतक्यात गौरीने फोन केला,

गौरी - " ग आम्हाला थोडा वेळ लागले "

माधुरी बाजूला गेली आणि म्हणाली,

" अग पण तूच म्हणली होतीस ना साडे सात ला केक कापून शुभेच्छा द्यायला हव्यात "

गौरी - " हो अग पण बघ ना आम्ही दोघी ईकद अडकलो. एक काम कर ना, केक नाही पण साडे सात ला त्याला शुभेच्छा तर देऊ शकतो ना "

माधुरी - " म्हणजे ?"

गौरी -"तू आता त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दे. आम्ही पण पोहोचतो तेव्हढ्यात"

माधुरीने बर म्हणून फोन ठेवला.

तिने माग वळून बघितलं, विनय तिच्याकडेच बघत होता.

तिला त्याला शुभेच्छा द्यायच्या होत्या पण त्याची नजर, त्याची नजर तिच्या आरपार जात होती.

मघाशी ज्या प्रकारे त्याने तिला झेललं ते आठवून तिला खूप लाज वाटत होती. 

शेवटी नजर चोरत ती त्याच्या समोर आली.

ती काही बोलणार तोच विनय म्हणाला,

" माधुरी, तशी तू सुंदर आहेसच पण आज तू खूपच सुंदर दिसत आहेस, कोणीही तुझ्या प्रेमात पडावे इतकी."

माधुरीने एक नजर विनय कडे बघितल. त्याच्या डोळ्यात तिला प्रेम दिसत होत पण तिला त्याच्या बोलण्यावर काय बोलावं हे सुचेना.

माधुरी - " थँक्यु"

माधुरी त्याच्या जवळ गेली आणि तिने हात पुढे केला. त्यानेही हात पुढे केला.

त्याच्या हाताशी हात मिळवत माधुरी म्हणाली, 

" विनय, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! देव तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करो."

विनय -" थँक्यु, होतील का सगळया इच्छा पूर्ण ?"

माधुरी - " हो, का नाही?"

विनय - " बघू, कळेलच थोड्या वेळात "

माधुरीला काही कळलं नाही तो अस का म्हणत आहे ते ,पण मग ती त्याच्यासाठी जे गिफ्ट आणले होते ते आणायला गेली.

तिने गिफ्ट त्याला दिलं.

माधुरी - " हे तुझ्यासाठी, बघ आवडत का?

विनय ने गिफ्ट ओपन केलं. गिफ्ट बघून त्याला खूप आनंद झाला. माधुरी आपल्याला किती छान ओळखते याची त्याला जाणीव झाली.

विनय - " खूप सुंदर आहे. थँक्यू"

असे म्हणत त्याने तिला एक स्मित हास्य दिलं.

त्याचा चेहऱ्यावरचं आनंद बघून माधुरीला पण छान वाटलं.

हे तर झालं, पण अजुन बरच काही होण बाकी होत.

आता त्याची जी इच्छा होती ती पूर्ण होते का बघण्याची वेळ होती.

क्रमशः 

🎭 Series Post

View all