तिचा पगार तर हक्क ही तिचाच !!!!

Her Salary Her Right

रेशम पेढे दिलेस पण........ पगार .......त्याचं काय........ तो ....नाही का देणार........ माझ्या कडे......... अडखळत अडखळत सुधीर बोलला.. आणि सगळे जे हा आनंदाचा क्षण खोटे खोटे हसत दिखावा म्हणून साजरा करत होते..... ते सगळे आता .....स्थब्ध होऊन पुढे ह्या नवरा बायको मध्ये तिच्या पगारा वरून काय होईल ते कण लावून.... डोळे उघडे ठेवून.... एकमेकांना इशारे करून बघत होते.....

रेशम ने लगेच सगळे दीम lights विझवले आणि tubelight लावल्या तसे सगळ्यांचे खरे चेहरे समोर आले...... एकदम लक्ख प्रकाशात खोटे मुखोटे सामोरे यावे तसे ते सगळे अजून ही तिच्या पुढच्या चाली कडे बघत होते...... गहन शांतता पसरली होती...

आता वहिनी शांत आहे म्हणजे काही तरी खडा जंगी होणार याकडे सगळे टवकारून बघत होते.... सगळे मुद्दाम शांत होते... जे काही व्हायचे आहे ते दादा आणि वहिनीत एकदाचे होऊन जाऊ दे..... झाला तर वाईट दादा होईल..... आणि जे हे आमचं दोघांची छान tunning चे नाटक करतात ना ते ही आत्ता इथे सगळ्या समोर उघडकीस येईल....... आज हिच्या पगाराचा तो टीमका ती मिरवते ना घरभर ....तो आज मोडून काढण्याची वेळ आली आहे आणि ती हीच वेळ आहे...... आम्ही ही कमवत होतो पण आम्ही बाई स्वतःसाठी एक नवा पैसा कधी बरं खर्च केला नाही आणि ही बघा काल नाही आली तर ही माझा पगार माझा हक्क म्हणून नाकावर टिचून मिरवत असते....सासू बाई मनात म्हणाल्या...

रेशम सगळ्यांकडे बघते एक प्रश्नार्थक नजरेने...... खांदे उडवते ....अरे काय बघत आहात तुम्ही माझ्याकडे असे..... मी नवीन नाही मी तीच जुनी रेशम आहे .... आणि सुधीर मी जुनीचं रेशम आहे..... जुनी .....म्हणजे माझे decision... माझे निर्णय.... अगदी आज ही तसेच ठाम आहेत ठाम राहतील.....म्हणजे जर मी म्हणाले होते की माझा पगार हा फक्त माझाच आहे तर तो तसाच माझाच हक्क राहील..... आणि तो हक्क कायमस्वरूपी अबाधीत राहील हा शब्द मी कटाक्षाने पाळणार...... माझे शब्द मी पळणारी आहे.....

आणि पाणी प्यायला जातांना सुधीर ने तिचा हात धरला तिला खेचून सोफ्यावर बसवले.......

अरे हे काय आता तुझी माझा हात धरण्यापर्यंत मजल गेली.... मला सांगायचं ना की तू बस मी पाणी आणून देतो..... फक्त मी माझ्या हाताने पाणी घेऊ नाही यासाठी जर माझा हात पकडला असशील तर तुला माफ करेन .....पण जर तुला माझे  काही नुकसान करायचा हेतू असेल तर परिणाम वाईट होतील.....

सासरे बघत राहिले...... आणि मध्ये म्हणाले....... हे बघ रेशम तू कमवतेस म्हणजे तुझा पगार काय फक्त तुझाच असावा असा नियम नाही.... ह्या घरीच खाते ह्या घरात राहतेस.... एक स्वतंत्र खोली आहे.... त्यातील ac, fan ,light ....याचे जर bill लावले तर हे तू फुकट वापरतेस......मग निदान काही हिस्सा तर घरात देणं भाग आहे...

रेशम हळूच निघून जाते... तिला आता हे नेहमीच झालं होतं.. काही आनंदाचा क्षण असेल तेव्हा हे सगळे मिळून तिला कोंडीत पकडायचा प्रयत्न करत असतात.... आधी चांगले वागणारे तिच्या नौकरी नंतर तिच्यासोबत अंतर ठेवून वागू लागले... तुटक तुटक त्यांच्या वागण्यात व्यवहारात तीक्ष्ण धार जाणवू लागली.... ती गृहिणी होती तेव्हा घरचे सगळे काम निमूटपणे करत होती... तिच्याकडे degree होती पण तिला काही वर्षे तरी घरीच रहाणे होते अशी सासरची अट होती..... त्यांना वाटले की बरेच वर्ष घरी राहिली की मग नौकरी करण्याचे खूळ तिच्या डोक्यातून जाईल.. आणि घरी राहून confidence कमी होईल.... मग कशी करेन नौकरी..... शेवटी घर भल आणि घरातील काम भले असे वाटू लागेल.....

पण रेशम जिद्दी मुलगी होती ....ती जरी घरात बसून होती तरी तिचा अभ्यास मात्र चालू होता.... तिला घर कोंबडी व्हायचे मान्य नव्हते..... ती स्वस्थ बसणाऱ्यातली नव्हती..... छोटे मोठे उद्योग करून ती आपल्या हातात कशी महिन्याच्या शेवटी कमाई पडेल याकडे ती लक्ष देत होती..... तिला फुकट खाणे आणि पडेल ते काम करून आराशीर tv बघत बसण्यात काही अर्थ आहे जीवनाला असे वाटत नव्हते..... नवरा घरी आला की त्याची बॅग घेणे.... त्याला पाणी देणे.. चहा देणे..... बाहेर काही झाले असेल तर त्याने त्याचा राग बायको वर काढणे आणि तिने तो आदर्श बायको सारखा निमूटपणे ऐकून घे हे तिच्या तत्वात बसत नव्हते..

ह्या routine चा तिला कंटाळा आला होता ,मग काय सगळे सर्टिफिकेट काढले आणि नौकरीच्या शोधात बाहेर पडली.... ते ही सगळे नको नको म्हणत असताना.... तेव्हा ती म्हणाली... लग्नानंतर काहीच वर्ष मी घरी राहीन हे तुम्ही कबूल केले होते... मग ती अट आता मी पूर्ण केली आहे तुम्ही मला अडवू शकत नाही.... मी शिकलेली आहे हे माहीत असून ही तुम्ही मला नौकरी करण्यापासून अडवू शकत नाहीत.... आणि एका वकिलाला तर नक्कीच नाही...

रेशम ने law केले होते.... माहेरी असताना मोठ्या वकीलाकडे practice करत होती ...छान जम ही बसला होता तिचा.... दोन पैसे ह्याची हवं नव्हती फक्त अनुभव हवा होता... तो गाठीशी होता म्हणूनच ती आज 3 वर्षानंतर ही मोठ्या confidence ने परत बाहेर पडू शकली.... आज ही ती त्याच मोठ्या वकीलाकडे जॉईन झाली होती.... तिची त्याच्या ऑफिस मध्ये अजून ही वट निर्माण जी झाली होती ती तशीच होती.... तिने त्यांच्या under मोठी एक case ही जिंकली होती..... तिला ते तिच्या कामामुळे कितीदा तरी परत बोलवत होते...... पण तिने सासरीच ही अट पूर्ण करण्यात तिचे 3 वर्ष घालवले होते.....

रेशम तशी दमदार कडक,मानी स्वभावाची मुलगी होती, तिला जितके नम्र वागता येत तितकेच वाकड्यात ही घुसून सरळ करणे ही येत होते.....

सासरचे तिला नेहमीच पगार दे....पगार आला की ग खर्चाला दिला पाहिजे....तुझे कर्तव्य पार पाडत जा..... असे म्हणून त्रास देत ....तिला मानसिक कसा त्रास होईल हे ते प्रयत्न करत होते...

पण सुधीरला मात्र कात्री सारखी फरफट सहन करावी लागत... त्याला माहित होते की प्रकरण कठीण होऊ शकते.... एक तर बायको वकील...त्यात तिला त्रास झाला तर फार काळ ती सहन करणारी नाही.... आणि त्याला माहित होते की तिचा पगार तिचा हक्क ती ठरवणार तो द्यायचा की नाही तो...

सुधीर ने मधला मार्ग काढायचा ठरवला.... त्याने घरच्यांना रेशम चा पूर्ण पगार दिला पण दर महिन्याला जो त्याचा पगार येईल तो मात्रइथून पुढं घरी देणार नाही .....त्याने घरच्यांच्या समोर अट घातली की आमच्या दोघांच्या पैकी तुम्हाला कोणा एकाचाच पगार मिळेल... मग ठरवा ...जर तिचा हवा आहेच तर मी माझा पगार देणार नाही..... दुसरी अट  इथून पुढे जो घरात रहातो त्याने कमवण्यासाठी बाहेर पडणे आणि घरातील ज्या ज्या सुविधा रेशम नौकरी करून ...घर खर्च देऊन ही तिला त्याचे पैसे मागितले जाते...त्या त्या सगळ्या गोष्टी चा हिशोब त्याला ही देणे भाग आहे.... सुधीर आपल्या लहान भावा बद्दल बोलत होता..

त्याचा लहान भाऊ जो नेहमी वहिनीने घरात तिचा पगार द्यावा म्हणून आईचे कां भरत होता त्याला ही आता घेत महिना अखेर ला पगार देणे बंधनकारक केले होते...

एखादी स्त्री जेव्हा नौकरी करून घरात पगार आणते तेव्हा सर्वस्वी त्या पगारावर प्रथम तिचाच हक्क असतो, कारण ती त्या पगारासाठी स्वतः मर मर करत ,धावपळ करत, मानसिक सगळ्या गोष्टींचा त्रास सहन करत,ती कामाची जबाबदारी घेत, रिस्क घेत असते.... मग कुठे तिच्या हातात काही रक्कम पडत असते.... पण जर तुम्ही तिच्या वाटचे कोणतेच ताण तुम्ही तुमच्यावर घेत नसाल तर तिचा पगार ही घेण्याचा तुम्हाला काय हक्क आहे