Nov 23, 2020
मनोरंजन

तिचे पैंजण.... भाग २

Read Later
तिचे पैंजण.... भाग २

"रावसाहेब जाधव तालुक्यातले एक  नावाजलेले आणि पोहचलेले राजकारणी व्यक्तिमत्त्व."रावसाहेबांना दोन बायका एक सुंदर ची आई शोभा अन दुसरी विनय आणि विक्रम ची आई चंद्रा. रावसाहेबांना पहिल्या लग्नानंतर परत प्रेम झालं कारण चंद्रा होती तशीच चंद्रासारखी सुंदर पण गरीब घराण्यातली. रावसाहेबांची कृपादृष्टी पडली अन तीच सोनं झाल, पण त्यामुळे त्यांची पहिली पत्नी शोभा मात्र पूर्णपणे खचली. आईच हे रूप पाहून सुंदरचा खूप संताप झाला.चंद्राने बापाच्या पैशाकडे पाहून हे सगळं केलंय अस त्याला वाटायचं.शोभाचा सगळा मान आता चंद्रालाच मिळायला लागला होता."सुंदर जाधव" बापाचच राजकारणी रक्त त्याच्यात होत, म्हणूनच तोंडात साखर अन हृदयात तलवार घेऊन फिरायचा तो.सुंदर काय चीज आहे हे कोणाला कळायचं पण नाही इतका चांगलं आणि गोड वागायचा तो.सुंदर आणि विनय मध्ये ८वर्षांचं अंतर तर विनय अन विक्रम मध्ये २ वर्षांचं. विनय आणि विक्रमला खूप जीव लावायचं नाटक सुंदर अप्रतिमरीत्या निभवायचा.विनय १५ वर्षांचा असल्यापासून सुंदरने त्याला नकळत हळूहळू अंमली पदार्थ द्यायला सुरुवात केली होती हळू हळू विनय त्याच्या आहारी जायला लागला होता.त्याला सुंदरच कांड कळोपर्यंत खूप उशीर झाला होता. त्यातच त्याचा मृत्यू झाला. आपला आदर्श मुलगा अंमली पदार्थांचं अति प्रमाणात सेवन करून मृत्यू पावला याचा रावसाहेबांना धक्का बसला.
      विक्रम,चंद्रा आणि रावसाहेब खूप दुःखी झाले. विनय हा रावसाहेबांचा खूप लाडका होता. त्याच्या जन्मापासून त्यांना राजकारणात खूप यश मिळायला लागलं होतं ,म्हणून तो तिन्ही मुलांत त्यांचा जास्तच लाडका होता .राजकारणात त्यालाच वारस करायचं असेदेखील त्यांनी पक्क केलं होतं,म्हणूनच सुंदरचा त्याच्यावर जास्त राग होता.रावसाहेबांच्या अनेक चांगल्या सवयीसुद्धा विनयने घेतल्या होत्या.त्यांच्यासारखीच विनयलासुद्धा तो १० वर्षांचा असल्यापासून डायरी लिहायची सवय होती.त्या डायरीत तो रोज त्याच्या आयुष्यात जे घडतंय ते सगळं रोज लिहायचा. त्यांत त्यानं सुंदरदादा आपल्याला एक पावडर देतो आणि मग आपल्याला ती ओढली की खूपच भारी वाटत असल्याचं देखील लिहलं होत. त्या डायरीबद्दल कोणालाच काही माहीत नव्हतं अगदी विक्रमला सुद्धा, पण एके दिवशी ती डायरी विक्रमला काही वर्षांनी   विनयच्या आठवणीत तो त्यांच्या घरातल्या अडगळीच्या खोलीत विनयच्या वस्तू बघायला गेला तेव्हा सापडली. त्याने संपूर्ण डायरी वाचली आणि त्याच्या डोळ्यातून विनयच्या आठवणीत पाणी आलं आणि त्याला लगेच हेही समजलं की विनय दादाच्या मरण्यात सुंदरचाच हात आहे,त्याला सुंदरच खूप राग आला,आत्ता जाऊन त्याला जाब विचारला अस वाटलं पण सुंदर च वागण इतक गोड होत की कोणीच विक्रमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नसता,आणि तो विक्रमला जीव लावायचं नाटकही खूप छान करायचा. विक्रम आणि विनयचा एकमेकांत खूप जीव.विक्रमही बापाप्रमाणेच हुशार डोक्याचा.आपण आपल्या मोठया भावाच्या मृत्यूचा बदला घ्यायचा अस त्यानं ठरवलं. आपलीही वेळ येईल अशी आशा ठेऊन तो योग्य वेळेची वाट पाहू लागला.
        सुंदर हा त्याच शिक्षण पुर्ण करून आता विक्रमच्याच शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाला होता.शिक्षकी पेशा मुळे त्याला राजकारणात जाण्याचा मार्ग सोपा होणार होता.तितका मान तो लोकांकडून मिळवत पण होता.
       विक्रम आणि सारंगी एकाच वर्गात शिकत होते. ते एकमेकांचे चांगले मित्र देखील होते. १० वीला असताना विक्रमला सारंगी मनापासून आवडायला लागली होती.सारंगीला ही विक्रम एक मित्र म्हणून छान वाटायचा. अशातच त्यांची सहल राजस्थान ला गेली होती.दिवसभर धमाल करून ते मुक्कामाच्या खोल्यांवर आले होते.विक्रमने सारंगीला त्या रात्री मनातलं सांगायचं ठरवलं.अंताक्षरी खेळून सगळे थकून झोपी गेले.पण विक्रम मात्र जागा होता.सगळं शांत झाल्यावर तो हळूच उठून मुलींच्या खोलीकडे गेला, पण बघतो तर काय केतकी, सारंगीच्या पायातल पैंजण काढत होती. खूप थकल्यामुळे सारंगीला मुळीच शुद्ध नव्हती.केतकी सारंगीच ते एक पैंजण घेऊन हळूच मुलांच्या खोलीकडे आली आणि कडेला झोपलेल्या सुंदर सरांच्या अंथरुणात तिनं ते टाकलं,आणि जाऊन झोपली विक्रमने सगळं पाहिलं अन त्याच्या मनात धस्स झालं.बापरे केतकी या थराला जाऊ शकते.त्याला केतकी कशी आहे हे माहीत होतं पण ती अस पण वागू शकते हे मात्र त्याच्यासाठी नवीनच होत.
       दुसऱ्या दिवशी केतकी,सुंदर सरांच्या अंथरुणातून पडलेलं ते पैंजण पाहून दारातूनच " सारंगी तुझं पैंजण सापडलं"अस ओरडली,आणि जेव्हा त्या पैंजणां जवळ जाऊन तिने ते हातांत घेतलं, डोळे विस्फारून ती त्या पैंजणाकडे पाहू लागली, तेवढ्यात अलका मॅडम त्या खोलीत आलेल्या सारंगीला आवाज देत पुढं आल्या अन म्हणाल्या "अग सारंगी हे बघ तुझं पैंजण बाथरूम जवळ पडलं होतं,सापडलं बघ"आणि इकडे केतकी मात्र  डोळ्यात पाणी आणून तिच्या स्वतःच्या पैंजण नसलेल्या एका पायाकडे बघत होती. आणि सगळे मुलं मुली सुद्धा आश्चर्याने  केतकी अन सुंदर सरांकडे  बघत,एकमेकांत कुजबुजत होते.पण विक्रमच्या  डोळ्यातली चमक मात्र कोणाच्याही  लक्षात आली नव्हती.
(लिखाणात नवीन असल्याने वाचकमित्रांनी लिखाणातल्या चुका माफ़ कराव्या ही नम्र विनंती)