Oct 28, 2020
सामाजिक

तिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग ८)

Read Later
तिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग ८)

रिक्षा गौरीच्या घरासमोर थांबली.  माधुरी सामान घेऊन गौरीच्या दारात उभी राहिली. बेल वाजवली. गौरीने दरवाजा उघडला  आणि तिला धक्काच बसला.  माधुरीची  अवस्था अगदीच वाईट होती.  गौरीने तिला पटकन आत  नेले.  बसवले आणि पाणी प्यायला दिले.  

गौरी- " काय झालं?"

माधुरी- " मला माफ कर . मी अशी  अचानक यावेळी तुझ्याकडे  निघून आले. पण  मला दुसरा कोणताच मार्ग दिसत न्हवता. " 

गौरी- " वेडी आहेस का तू . माफी काय मागत आहेस.  मैत्रीण ना मी तुझी . "

माधुरी- "अग  तस नाही पण .... " ( आणि रडायलाच चालू केली. )

गौरी- " शांत हो माधुरी. काय झालं आहे सांग मला. "

माधुरी- " गौरी तु म्हणात होतीस तेच बरोबर आहे. मी उगाच माझं आयुष्य थांबवून   ठेवला होत. आज मला कळलं कि ते माझा  एक  व्यक्ती म्हणून सुद्धा स्वीकार करू शकत नाही आहेत.  "

 असं म्हणत माधुरी ने गौरी ला सगळं घडलेला प्रकार सांगितलं. गौरी ला खूप राग आला. 

गौरी- " असा कसा ग तो . त्याने आईला काहीच  कस बोलल नाही.. आणि तुझ्या सासूबाई? त्यांना कोणी अधिकार दिला तुझ्या वर हात उचलायचा. "

माधुरी फक्त रडत होती. 

गौरी- " उठ. आत्ताच्या आत्ता  आपण पोलीच स्टेशन मध्ये जाऊ आणि त्याच्यावर घरगुती हिंसा ची केस करू  "

माधुरी- " नाही गौरी. मला आता त्याच्याशी केस पर्यन्तच सुद्धा संबन्ध  ठेव्याचा नाही . . मला त्या लोकांची आता तोंडचं  बघायची नाहीत. "

गौरी- "तरी मी तुला सांगत होते. कशाला ते नातं वागवत आहेस जिथे तुझं काही स्थानच नाही. "

माधुरी- " बरोबर आहे तुझं.  माझ्या डोळ्यावर मीच प्रेमाची पट्टी बांधली  होती . जी आज निघाली.  आणि आता  असं वाटतंय इतके दिवस मी हे का समजू शकले नाही. त्यांनी तर कितीदा मला तोंडावर सगळं सांगितलं पण मी मूर्ख. . "

गौरी माधुरीला शांत करत म्हणाली- " जाऊ दे . झालं ते झालं.  नको त्रास करूनघेऊ . "

माधुरी- "कसा त्रास होणार नाही सांग ना? आयुष्यात पहिल्यांदा प्रेम केलं आणि त्याची हि शिक्षा मिळाली. खरंच प्रेम वगरे सगळं साफ खोट असत. खर प्रेम या जगात नाहीच आहे. आणि जरी असाल तरी ते आपल्याला मिळावं एवढे नशीबवान मी नक्कीच नाही. "

गौरी- " तस नाही आहे माधुरी "

माधुरी- " तसेच आहे ते. आणि आपण कोणावर आपल्यावर प्रेम करा असं म्हणून नाही शकत. ते आतून यावं लागत. आणि मला हे आधीच कळायला पाहिजे होत कि  हे माझे  कधीच होऊ शकत नाहीत. "

गौरी- "ठीक आहे.  शांत हो "

थोडा वेळाने  माधुरी शांत झाली. गौरीने तिच्यासाठी जेवण वाढून आणले. पण ती जेवली नाही.  मग गौरीने बळेच   तिला दूध प्यायला लावले. 

माधुरी- " पण गौरी मी आता कुठे जाऊ ? कुठं राहू? इथलं घर बाबानी भाड्याने दिले आहे. तेव्हडीच बाबाना आर्थिक मदत होते. "

गौरी- " ग वेडी का तू? इथेच राहा. तुला मी एकटीला तिकडे राहायला सोडेन असं वाटत का?"

माधुरी- " ग पण हे तुझ्या मावशीच घर आहे ना? त्यांना चालेल का?"

गौरी- " ती काही म्हणणार नाही. तरी तुझ्या समाधानासाठी मी तिच्या शी बोलते. आता ती कार्यक्रमासाठी बाहेर गावी गेलीय. उद्या सकाळी येईल. तेव्हा बोलेन. "

 असं म्हणून गौरी माधुरीला घेऊन वरती आपल्या रूम मध्ये  गेली. ती शांत झोपली आहे ना याची खात्री करून मग ती झोपली. 

सकाळी लवकर मावशी आली. गौरी लवकरच उठली होती. गौरी मावशीकडे राहत होती. मावशीचे मिस्टर जाऊन ५ वर्ष झाली होती.  मावशीला एक मुलगा होता. विनय. तो अमेरिकेत जॉब करत होता. त्यामुळे इथे मावशी एकटीच होती.  गौरीला जेव्हा या शहरात जॉब लागलं तेव्हा मावशीनं  तिला इकडेच राहा म्हणून सांगितलं. मावशीला तेव्हडाच आधार होता.  मावशीच आणि गौरीचं खूप पटायचं .   दोघी अगदी मैत्रिणी सारख्या होत्या .  गौरी असून मधून मावशीला माधुरी बद्दल सांगत असे त्यामुळे माधुरी बद्दल मावशीला सर्व माहिती होती. मावशी फ्रेश होऊन येताच गौरीने मावशी आणि स्वतः  साठी चहा करून घेतला .  मावशीला चहा देत म्हणाली. 

गौरी- " मावशी, तूला  माधुरी माहिती ना.  "'

मावशी- " तीच काय ?"

गौरी-  " ती काल  रात्री इकडे आली आहे. तीच सामान घेऊन. "

मावशी- " का ग? काय झालं? ठीक आहे ना ती? "

गौरी- " ग काल  तिच्या सासूने तिला शुल्लक कारणावरून मारलं. शिवाय नवरा  हे सगळं बघत  होता  पण तो हि काही न बोलता निघून गेला.  तुला तर माहिती ना सगळी परिस्थिती तिच्या सासरची . म्हणून ती ते सोडून आली.  "

मावशी-" काय ग  बिचारी पोर ती. किती सहन करते. "

गौरी- " मावशी तीच आत्ता या शहरात कोणाचं नाही. तरी आपल्याकडे राहूदे का?"

मावशी- " ग राहूदे. तुझी मैत्रीण आहे ना ती. तिच्यासाठी आपण एव्हडं करू शकतो. पण उद्या तिच्या सासरचे इकडे येऊन दंगा   केले तर. "

गौरी- "तस काही व्हायचं नाही. मुळात तिच्या नवऱ्याला हि हे नातं नको आहे. "

इतक्यात  माधुरी पण खाली आली.  गौरीने माधुरीची आणि मावशीलाची ओळख करून दिली. तश्या त्या दोघी गौरीच्या तोंडून  एकमेकींना ऐकून होत्या पण प्रत्यक्ष  भेट आज झाली.   मधुराने मावशीला नमस्कार  केला. 

 मावशी तिला उठवत  म्हणाली.- " धीराची आहे  पोर तू.  घाबरू नकोस आम्ही आहोत तुझ्याबरोबर. "

गौरी- " माधुरी, मी म्हणाल होत ना मावशी काही म्हणणार नाही तू इथे राहण्याबद्दल. "

माधुरी- " मावशी , थँक यु.  पण मी तुमच्यावर ओझं नाही बनणार. मी तुम्हाला महिन्याला रेंट देत राहीन. "

मावशी- " ग  वेडी का तू? जशी  गौरी तशी तू . तुझ्याकडून का मी पैसे घेईन. ग तुम्ही दोघी असला कि तेव्हडाच मला आधार. "

माधुरी- " मावशी, प्लिझ . मी भले तुम्हाला आता लगेच देऊ शकत नाही पण माझा पगार झाला कि मी तुमाला देईन . पण नाही नका म्हणू. मला उगीच कसातरी वाटत राहील. "

तिचा स्वाभिमान नको दुखवायला म्हणून मावशी पण म्हणाली ," ठीक आहे. पण तू तुझ्या सासरच्यांना सांगितलं आहेस का तू इथे आहेस ते. "

माधुरी- " नाही मावशी, आता त्यांना काहीच सांगायची गरज नाही. ते नातं संपलं .  मी आज बेंगलोर  ला जाऊन बाबा नि भावाशी सर्व बोलून डिवोर्स घायचा म्हणत आहे. "

मावशी- " तुला जे योग्य वाटेल ते कर. " ते म्हणून मावशी तिच्या  रूम मध्ये गेली. 

माधुरी कडे आत्ता बेंगलोर ला जावे इतके पैसे न्हवते . गौरी ने  लगेच ऑनलाईन  तिकीट कढाले आणि मधुराला दाखवले. 

माधुरीच्या डोळ्यात पाणी आले. 

गौरी- " डोळे पूस. आवर आपण ११ वाजता निघत आहोत. "

माधुरी-  " तू कशाला त्रास घेतेस "

गौरी- " मैत्री मध्ये कधी त्रास नसतो.  आणि काल  तुझी अवस्था बघता मी तुला एकट  सोडू शकत नाही. आपण दोघी जात आहोत. "

माधुरी- "तुझी सुट्टी पडेल विनारकरण "

गौरी- " मॅडम , तुम्ही दिवस , वार, तारीख विसरत आहात का? आज शनिवार आहे आणि आपल्याला सुट्टी आहे.  उद्या संद्याकापर्यंत आपण परत येऊ. "

 चालेल म्हणत माधुरीने आवरायला घेतलं. मावशीला सांगूनदोघी बेंगलोर ला निघाल्या. 

इकडं  सासूला वाटलं माधुरी चिडून माहेरी गेली असेल. येईल २-४ दिवसात ,राग शांत झालं कि.  सतीशला तर याची काही कल्पना न्हवती. तो अजून घरी आलाच न्हवता. 

क्रमशः:

Circle Image

Nilambari D

Software Engineer

Professionally i am a software engineer. I utilize my free time in reading various types of books. I like to share my thoughts , my views that's why i started writing. Writing is the best way for me to express my thoughts, views and emotions.