सतीश निघून गेला दिल्लीला . माधुरीला काय चाललंय काही कळायला मार्ग न्हवता. हे ७ दिवस गेले कि सगळं काय आहे हे विचारायचेच.
हे सात दिवस तिला खूप अवघड गेले. अधून मधून बाबांचा फोन यायचा. यातली काही न कळू देता आपण किती सुखी आहोत हे ती बाबाना सांगायची.
असेच दिवस निघून गेले. सतीश परत आला.
सतीश फ्रेश होऊन आवरून ऑफिसाला जायला निघणार होता कि माधुरी ने बोलायचं ठरवलं.
माधुरी -" मला जरा बोलायचं आहे. "
सतीश- " संद्याकाळी बोलू. मी ऑफिस ला जात आहे. "
माधुरी- " नाही. मी खूप दिवस विचारायचं म्हणत आहे. आणि मला आत्ताच बोलायचं आहे. "
सतीश- " बोल "
माधुरी- " तुम्हाला असं वाटत नाही आहे का कि नवीन लग्न झालेल्या जोडप्या सारखं आपल्यात काहीच नाही आहे. आपल्यात साधा संवाद हि झालेला नाही. "
सतीश-"आपल्यात काहीच होणार नाही. कधीच नाही "
माधुरी- "म्हणजे "
सतीश- "मुळात मला हे लग्नच करायचं न्हवत. त्यामुळे आपल्यात लग्न झालेल्या जोडप्यासारखं काही होईल असं समजू नकोस "
माधुरी- ( आता तिच्या डोळ्यात पाणी साचलं ) " पण का ? लग्न केलात ना माझ्याशी? तुमच्याच मर्जीने झालं ना? मग आता असं का म्हणत आहात "
सतीश- " स्पष्टच सांगतो. माझं एक मुलीवर प्रेम आहे. मला फक्त तिच्याशीच लग्न करायचं होत पण आईला ती मुलगी आवडली न्हवती. आईने मला तिची शप्पथ घालून हे लग्न करायला लावल होत. बाबा गेल्या वर मला आईशिवाय दुसरे कोणच नाही म्हणून मी तिला नाही म्हणू शकलो नाही. "
माधुरी- " अहो पण हे तुम्ही मला आधी सांगायला पाहिजे होत . मी नाही म्हणलं असत या लग्नाला "
सतीश- " मी आलो होतो तुला हेच सांगायला. पण त्यावेळी आईला हे कळलं म्हणून तिने मला फोने करून बोलावून घेतलं . तिने मला सांगून ठेवला काही झालं तरी मी माझ्याकडून हे लग्न तोडायचं नाही ते नाहीतर ती जीवाचं काही तरी बर वाईट करून घेईल "
माधुरी - " म्हणजे आता या नात्याला काहीच अर्थ नाही . "
सतीश- " हो नाही. तू हवं तर मला डिव्होर्स देऊ शकतेस. पण मी स्वतःहून तुला डिवोर्स देऊ शकत नाही आणि हे नातं स्वीकारूही शकत नाही. "
एव्हडं बोलून सतीश निघून गेला.
माधुरी मटकन खालीच बसली.केवढी मोठी फसवणूक झाली आपली. काय स्वप्न बघितली होती संसाराची आणि काय पदरी पडलं. खूप रडली. तिला सहनच होत न्हवत. आयुष्यात पहिल्यांदा तिने कोणावर प्रेम केलं होत. तिला खूप त्रास होऊ लागला या सगळ्याचा.
तिचा रडण्याचा आवाज ऐकून वीणाताई तिथे आल्या.
सासूबाई- "काय रडत आहेस "
माधुरी- " आई तुम्हाला माहित होत ना यांचं दुसऱ्या मुलीवर प्रेम आहे तर मग तुम्ही त्यांचं लग्न माझ्याशी का लावलात. ? आता मी काय करू ते मला स्वकारात नाही आहेत "
सासूबाई- "मला ती मुलगी पसंत न्हवती. आणि राहता राहिला प्रश्न स्वीकारण्याचं , तर प्रत्येक नात्याला थोडा वेळ द्यावा लागतो . आम्ही पण अशातूनच गेलो आहे ना. आमची लग्न कूठ आमच्या पसंतीने झाली होती. आणि नवरायचे मन कसे वळवायचे हे बायकोला कळायला हवे. रडू नकोस आता. "
त्यांचं बोलणं ऐकून तिला एक आशेचा किरण दिसला. नात्याला जरा वेळ दिला तर सगळं काही ठीक होऊ शकत. आपलं प्रेम आपल्याला परत मिळू शकत. तिने आपल्या प्रेमाला एक संधू द्यायची ठरवली . पण तिला वाटते तेवढ ते सोपं नव्हत. पुढे काय वाढून ठेवलं आहे याचा तिला
अंदाज हि न्हवता पण तिने एक प्रयत्न करायचं ठरवलं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा