तिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग २)

Its a story of girl , Madhuri and her journey towards true love

( चहा पोहेच कार्यक्रम झाला . आता निर्णयाची वाट बघत होते बाबा)

पुढे:

 एक दोन दिवस गेले. बाबानी विचार केला लेकीचं म्हणणं काय आहे यावर ते तर बघू. नंतर त्या लोकांनाच काय निर्णय होईल ते होईल. असं नको व्हायला ते पसंत करतील आणि आमची माधुरी नाही म्हणायची.  तशी ती बाबांच्या मता बाहेर नाही हे त्यांना माहित होताच.  बाबानी  संद्याकाळी माधुरी पाशी विषय काढला . 

बाबा- " माधुरी , तुझं काय मत आहे बाळ, या स्थळ बद्दल. "

माधुरी- " अजून विचार केला नाही . त्यांचा काही फोन आला का?"  असे जरी म्हणत असली तरी त्या कार्यक्रमानंतर दुसरा कोणातच विचार मॅडमनी केलं न्हवता . फक्त हे बोलायचं कस  म्हणून असं उत्तर दिली. 

बाबा- " अजून तरी  त्यांचा  काही फोन नाही आला. म्हणाल तुझं मत तरी विचारून ठेवू."

माधुरी- " तुम्हाला काय वाटत ते आधी सांगा."

इतक्यात फोन वाजला.  बाबानी फोन घेतला, तिकडून वीणाताई म्हणल्या. 

" नमस्कार.  मी वीणाताई बोलत आहे"

बाबा- " वीणाताई , नमस्कार. बोला. काय म्हणत आहात ?"
 ( असे म्हंणून बाबानी माधुरी ला खुणेने  सांगितलं कि वीणाताईंचा फोन आहे म्हणून.)

हे ऐकताच माधुरीचे ठोके वर खाली होऊ लागले. काय म्हणतील ? हो कि नाही. ?

वीणाताई- "फोन यासाठीच केला कि आम्हाला स्थळ पसंत आहे. हा तुमच काय म्हणण  आहे  ते सांगा. "

बाबा- " काय सांगता पसंत आहे स्थळ...  आम्हाला .....   "
  ( असे म्हणत त्यांनी माधुरी कडे बघून हातवारे  करून तिला विचारलं तुझं काय मत.)

या मॅडम एकडे  लाजून चूर झाल्या होत्या.  मन खाली घालून होकअरार्थी  हलवून आत  पळून गेल्या. 

बाबाना काय समजायचं ते समजलं. ते खुश झाले . 

बाबा- " आम्हाला हि पसंत आहे हो हे स्थळ "

वीणाताई- " फक्त आमचं म्हणणं एवढच आहे जेवढ लवकर करता येईल तेव्हडा लवकर  लग्न करून देऊयात. म्हणजे आपण जबाबरीतून मोकळं. काय म्हणता ? "

बाबा- " हो चालेल. फक्त तयारीसाठी वेळ मिळेल  असं बघून करू. "

वीणाताई- " हो ठीक आहे ,मग तस गुरुजीनींशी बोलून  मुहूर्त कळवेन. साखरपुडा लग्न एकत्र करू. "

बाबा-  " हो चालेल. कळवा मग. "
 
असे म्हणून फोन ठेवून आत माधुरी कडे गेले.  माधुरीला' म्हणाले. 

 बाबा- " माझं एवढेसे बाळ मोठे झाले. लग्नाला आले.  लग्न ठरलं तुमच. तुला खुश बघितला कि मला समाधान मिळाला बघ बाळा. "

माधुरी- " बाबा " असं म्हणत माधुरी बाबांच्या शेजारी जाऊन बसली. 
 
बाबा-  "बाळ तू खुश आहेस ना या लग्नसाठी "

माधुरी- " हो बाबा. " असं म्हणत लाजली. 

बाबा-  " मग असच लाजत बसणार कि छोट्या बंधू राजन कालावणारं हि या पसंतीचा. " ( असं म्हणत  हसू लागले. )

माधुरी- " काय हे बाबा, मी नाही तुम्हीच सांगा. " असे म्हणत जेवण वाढायला गेली. 

बाबांना मात्र आज समाधान वाटत होत. बाबानी नचिकेत ला  म्हणजे माधुरीच्या छोट्या भावाला फोन करून  सांगितलं.  तो हि  खुश झाला.  तारीख ठरली कि पहिला मला सांगा म्हणाला . त्या हिशोबाने मी सुट्ट्या टाकेन. शेवटी माझ्या दिंदीच  लग्न आहे  म्हणत होता.  फोन झाल्यावर बाबा विचार करत बसले.  माधुरीचा जन्मापासून ते आत्तापर्यँतचं सगळं प्रवास डोळ्यासमोर येत होता.  माधुरी ने जेवायला हाक मारली आणि त्याची विचारमाला तुटली.  ओले डोळे पुसत जेवायला गेले. 

लग्नाचा मुहूर्त २५ दिवसानंतरचा ठरला. सगळं घाईत होणार होत पण दुसरा पर्याय न्हवता कारण त्यानंतर फार लवकर मुहूर्त  न्हवता. 
दोन्ही कडे तयारी जोरदार चालू होती. नचिकेत हि आला होता सुट्टी कडून.  बहीण भावांचं चालू होत गुळपीठ .  दीदीला जिजुंवरून चिडवायची एक संधी सोडत न्हवता.  माधुरी पण खोटा खोटा राग वरून दाखवत होती पण तिला पण त्याच सतीशवरून चिडवणे  आवडत होत.  मुळात हा अनुभव तिच्या साठी पहिलाच होता त्यामुळे तिला हे सगळं आवडत होत. 

 हे सगळं चालू होत त्यातच सतीशचं फोन आला. नेमकं नचिकेत ने उचलाला .  सतीशने निरोप दिला कि मी उद्या माधुरीला भेटायला येत आहे. 
 झालं.  नचिकेत ला अजून एक  संधीच मिळाली . फोने ठेवून नचिकेत म्हणाला. 

नचिकेत - " बघा बाबा, कोणाला तरी फार आठवण येत आहे. उद्या भेटायला येत आहेत तुम्हाला. ... आमचे जीजू... "

माधुरी- "नची , तू आता खूप मार  खाणार हा "  असे म्हणता गाला तल्यागालात हसून त्याला मारू लागली. 

तो पळून गेला 

इथे माधुरीची अवस्था अशी होती काय करू काय नको असं झालं होत. फुलपाखरू सारखं तिचा मन स्वछंद हलकं होऊन उडत होता. कारण उद्या ते दोघे एकांतात भेटणार , बोलणार होते. या विचारानेच तिच्या अंगावर एक शहारा  आला आणि ती मोहरून गेली. 

रात्री तिला लवकर झोपच येईना . कारण उद्या तिला भेटायला सतीश येणार होता.  विचार करता करता ती झोपी गेली. 

क्रमशः 
 

🎭 Series Post

View all