आज रविवार म्हणून सगळे निवांत होते. गौरी आवरून खाली आली होती. मावशी आणि ती नाश्त्यासाठी ची तयारी करत होत्या. विनय मस्त पेपर वाचत बसला होता.
माधुरी वरून आवरून खाली आली. आज न्हाहली होती. केसाचा टॉवेल ने अंबाडा घालत ती खाली येत होती. त्यातच एक छोटीशी केसांची बट तिच्या गालावर तरळत होती. त्यामुळे तर ती अजुनच खुलून दिसत होती.
ती स्वयंपाक घरात जाईपर्यंत तो तिला बघतच राहिला.
नाश्ता बनवून झाल्यावर सगळे टेवलावर ठेवत असताना ही तो तिच्याकडेच पाहत होता.
सगळे नाश्ता ला बसले. विनय च पूर्ण लक्ष मधुरीवरच होत पण सगळयांच्या नजरा चुकवत तो तिच्याकडे पाहत होता. गौरीला ते जाणवलं. गौरीने एकदा विनय कडे बघितल एकदा माधुरी कडे.
माधुरीला या सर्व गोष्टींचा काही थांगपत्ता न्हवता.
ती आपली शांतपणे नाश्ता करत होती. थोडीफार मावशी आणि गौरी बरोबर बोलत होती.
पण गौरी मात्र विनय कडे बारीक लक्ष ठेवून होती.
जेव्हा जेव्हा माधुरी त्याच्या डोळ्यासमोर असायची तेव्हा तो फक्त तिच्याकडे बघत विचारात गुंतला असायचा.
संध्याकाळी माधुरीला घरून फोन आला म्हणून ती फोन वर बोलत फेऱ्या मारत होती.
विनय हॉल मधे बसून मॅच बघत होता. पण सगळं लक्ष मधुरीकडे होते.
इतक्यात गौरी आली आणि म्हणाली.
गौरी - " गेली विकेट"
विनय लगेच मॅच कडे बघत म्हणाला.
विनय - " कधी? कुठ गेलीय विकेट "
गौरी - " मॅच बद्दल नाही मी तुझ्याबद्दल बोलतय. तुझी विकेट गेलेली दिसते." आणि हसली.
विनय - (न कळल्याचा आव आणून विचारला ) म्हणजे?
गौरी - " तुला काय वाटत तू मधुरिकडे बघत असतोस ते मला कळत नाही?"
विनय - ( आता हिला कळलच आहे तर काय लपावयाच अस विचार करून म्हणतो) " तुला कळलं तर. बघ तुला कळलं पण तिला कळत नाहीय."
गौरी - " विनय, तुला खरंच माधुरी आवडते का ?"
विनय -" गौरी तुला माहिती आहे ना मी कसा मुलगा आहे ते. आत्तापर्यंत मी कधी प्रेम प्रकरणाचं विचार ही केला नाही. पण का कोनासा ठाऊक पण ही मला क्लिक झाली. "
गौरी - " बर "
विनय - " पण बघ ना. आता १५ दिवस झाले मी इथं आहे पण ती माझ्याशी फारस बोलत नाही. कामापुरता बोलते फक्त. तुझ्याशी ,आईशी ती नीट बोलते पण माझ्याशी तीच बोलणं झालाच नाही किंबहुना ती बोलतच नाही."
गौरी -" नाहीच बोलणार ती."
विनय - "पण का? "
गौरी - " चल वरती तुझ्या रूम मध्ये बसून बोलू."
दोघे वरती जातात.
विनय - " बोल, "
गौरी -. " अरे तिच्या आयुष्यात अशी काही माणसे येऊन गेलीत ना की तिला आता नवीन माणसाशी संभंध ठेवायला भीती वाटते. तिचे बाबा, भाऊ, मी आणि मावशी आम्हीच तीच जग आहोत. फक्त आमच्याशी ती मनमोकळे पणाने बोलते."
विनय - " पण अस काय झालंय की ती स्वतःला बाकीच्या नवीन लोकांपासून दूर ठेवते "
गौरी - " सांगते"
गौरी विनयला सगळं प्रकार सांगते.
विनय पण शांतपणे सगळं ऐकुन घेतो.
विनय - " एवढ सगळ सहन केलं तिने "
गौरी - " हो. आता मला सांग एवढ सगळं ऐकुन तू अजुन तुला ती आवडते या मतावर ठाम आहेस ना "
विनय - " हो गौरी, मला ती खरच आवडते. तीच लग्न झालं होतं,डिव्होर्स झालं आहे हा सगळा तिचा भूतकाळ झाला. पण मला तिचा वर्तमान आणि भविष्य काळ व्हायचं आहे."
गौरीला खूप छान वाटलं विनयच बोलणे ऐकुन.
गौरी - " बर, माझी काय मदत हवी का?"
विनय -. " म्हणजे काय गौरी.तू मला अस काही तर सांग ज्याने ती माझ्याशी बोलू लागेल."
गौरी - " ठीक आहे. मी आहे तुझ्याबरोबर. आता एक करायचं. सतत तू तिच्या नजरेसमोर राहायचं. स्वतः हुन बोलायचं. म्हणजे तिला तुझी सवय होईल."
विनय - " ठीक आहे. "
दोघे एकमेकींना टाळ्या देतात.
रात्रीच्या जेवणापासूनच त्यांचं प्लॅन चालू होतो.
दररोज जेवण झाल्यावर ताटावरून उठून जाणारा तो आज आवरायला मदत करू लागला. ज्याने करून आपण तिच्या नजरेत राहू.
दररोज रात्री न चुकता गूड नाईट म्हणायचं.
१-२ दिवस माधुरीने पण लक्ष दिलं नाही. पण नंतर ती विचार करू लागली हा अस का वागत आहे.
एकदिवस तो चक्क तिच्या बरोबर भाजी आणायला आला.
माधुरी -" मावशी , मी जरा भाजी घेऊन येते " म्हणून सांगून निघू लागली.
तोच विनय - " थांब माधुरी, मी पण येतो. माझेही फिरणं होईल."
अस म्हणत येऊ लागला.
आता त्याला नाही कसं म्हणायचं म्हणून माधुरी काही बोलली नाही.
दोघींनी बरच फिरून भाजी घेतली. येताना त्याला एक भेळेचे गाडी दिसली. अजुन थोडा वेळ एकत्र घालवता येईल म्हणून तो तिला म्हणाला.
विनय - " माधुरी,आपण भेळ खाऊया का ?खूप फिरलो ना मी आज म्हणून भूक लागली "
माधुरी - ( हो नाही करत शेवटी तयार झाली ) " बर"
त्याने दोन भेळ ऑर्डर केल्या.
जरा तिच्याशी बोलला. ती पण आज थोड बोलली. आता निघायचं म्हणून तो वळला पण ती अजुन तिथेच होती . तो परत आला. तर ती भेळ वाल्या काकांना ऑर्डर देत होती.
माधुरी - " काका, दोन भेळ पार्सल द्या "
विनय -" का ग पार्सल ? तुला अजुन हवी का भेळ ?"
माधुरी - " नाही. ही मी मावशी आणि गौरी साठी घेत आहे. मला ना आधीपासूनच सवय आहे. आपण काही बाहेर खाल्ल तर घरी पार्सल घेऊन जायचं. माझे बाबा जास्त बाहेर पडायचे नाहीत पाठीच्या दुखण्याने, मग मी बाहेर काही खाल्ल तर बाबांना पण घेऊन गेलं पाहिजे अस वाटायचं. ती मला सवयच पडली. आता सुधा मी आणि गौरी जर बाहेर काही खात असू ते मावशिसाठी घेऊन जातो."
विनय ऐकतच बसला. अस विचार आपण का कधी केला नाही. आपण मित्रांबरोबर बाहेर फिरतो ,खातो, पण आईं जास्त कुठे जात नाही. तिच्यासाठी अस आपण कधी का घेऊन गेलो नाही अस त्याला वाटू लागलं. माधुरीच्या विचारांचं त्याला कौतुक वाटल.
दररोज नव्याने ती त्याला जाणवत होती.
दोघे घरी आले. मावशी आणि गौरीला भेळ दिली. मावशीला खूपच छान वाटलं भेळ बघून. ते बघून विनयला पण छान वाटलं.
असाच दिवस संपला.
एक दिवस मावशी गौरी ला म्हणत होती.
मावशी - " गौरी, माधुरी किती गोड मुलगी आहे ग. कोणी कसं काय तिच्याशी वाईट वागू शकत."
गौरी - " तेच ना"
मावशी - " अशी सून मला मिळाली असती तर मुलीसारख जपलं असत"
गौरी - ( जरा धाडसाने ) " मग घे की करून तिला सून आणि कर मुलीसारखी माया "
गौरी कान देऊन ऐकत होती,मावशी आता काय म्हणते ते.
मावशी - " अगदी माझ्या मनातल बोललीस. मला खूप आवडेल ग हिला सून करून घ्यायला. पण विनय तयार व्हायला पाहिजे ना"
गौरी आता पोट धरून हसू लागली.
मावशी - " ग का हसत आहेस एवढी "
गौरी -" ग विनय ला पण ती खूप आवडते. "
मावशी - " काय सांगतेस काय ?" मावशीला पण आनंद झाला
गौरी - " हो अग "
मावशी - " मी बोलू का मग मधुरिशी "
गौरी - " नको मावशी, इतक्यात नको, विनयला पण तिला जाणून घेऊ दे. आणि मुळात माधुरी काय विचार करते माहीत नाही ,"
मावशी - " म्हणजे "
गौरी - " म्हणजे जुन्या नात्यातून तिला इतका त्रास मिळाला होता की आता नवीन नात बनवायला तयार होते की नाही माहिती नाही. तिचे बाबाही तिला जरा समजावं दुसऱ्या लग्नाबद्दल समजावं म्हणून मला सांगत असतात. पण मला वाटत आपण थोडा वेळ देऊया दोघांना. खास करून माधुरीला."
मावशी - " हो ग, बरोबर आहे तुझ "
गौरी - " हे बघ मावशी , आपण स्वतःहून आधी काहीच बोलायचं नाही. विनय विचारू दे तिला मग आपण बोलू. "
मावशी - " चालेल. पण विनय ला तिच्याबद्दल सगळं माहीत आहे ना ?"
गौरी - " हो मावशी मी त्याला सगळं सांगितलं. त्याला काही प्रॉब्लेम नाही "
मावशी - " बर झाल. आणि जे झालं त्यात माधुरीची काही चूक न्हवतीच तर मग तिने का शिक्षा भोगावी. उलट नवीन आयुष्य सुरु करावे."
गौरी - " हो. बघू काय होत यांचं ते "
दोघी खुश होत्या. मावशीला तर माधुरी आधीपासूनच आवडत होती.
पण आता माधुरी हे सगळं कसं घेणार होती हा मुख्य विषय होता. कारण जे काही चालले होते त्याची तिला कल्पनाच न्हवती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा