तिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग १३)

Vinay meets madhuri

मावशीला घेऊन माधुरी आणि गौरी घरी आलया .. मावशीला घरी येऊन खूप बर वाटलं. 
त्यादिवशीची तिची अवस्था बघता तिला आपण जगू कि नाही अशी भीती वाटली होती. पण आता तबियतीत  सुधार होता. 


गौरीच्या आईने स्वयंपाक बनवला. दोघी फ्रेश होऊन आल्या.  मावशीला रूम मध्ये बसवलं होत. 

गौरी ताट वाढून मावशीच्या खोलीत घेऊन गेली.  मावशी व्यवस्थित  जेवल्यावर बाहेर आली.  तोपयंत माधुरीने आणि गौरीच्या आईने  बाकीच्यांची पान  वाढाली.  सगळे जेवले.  माधुरी मावशीच्या खोलीत गेली आणि मावशीला गोळ्या देऊन गेली. . गौरीची आई आज मावशी पाशी झोपणार होती. 

मावशीला नीट झोप लागली. सकाळी उठुन परत सगळे कामाला  लागले. आज गौरी सुट्टी घेणार होती. आज तिचे आईबाबा पण परत जाणार होते . विनय हि येणार होता. विनय ला भेटून  ते निघणार होते. 

माधुरीला आज ऑफिस ला जावं लागणार होत.  ती आवरून  खाली आली. नाश्ता  घेऊन मावशीकडे गेली.  मावशीचा नाश्ता खाऊन झाला. 
ती मावशीला गोळ्या देत होती तोच विनय आला.  

विनय घरी आला ते लगेच आईच्या खोलीत गेला.  माधुरी औषधें देऊन बॉक्स बंद करतच होती तेव्हड्यात तो आईला हाक मारत आत आला. 

मावशीनेहि त्याला मायेने जवळ घेतलं. 

माधुरी हे सगळं बघत होती.  त्यांना त्यानाचा वेळ द्यावा म्हणून ती खोलीतून बाहेर पडली. आणि गौरीला सांगून ऑफिस ला 
निघाली. जाताना  गौरीच्या आई वडिलांना पाय पडून गेली. 

इकडे विनय आईंची  विचारपूस घेत होता. 

विनय- " आई , काय हे? तू काळजी घेत नाहीस का? मला किती भीती वाटली माहिती का हे सगळं ऐकून "

मावशी - " अरे घेते रे. उलट या दोघी माझी जास्त काळजी घेतात. पण ती वेळच खराब रे. "

विनय- " पण अचानक तुला काय झालं? "

मावशी -" अरे मलाच कळलं नाही. एकदम छातीतून कळा  सुरु झाल्या.  काही सुचेनाच झालं. तेव्हड्यात माधुरी आली  म्हणून बर . नाहीतर माझं काय झालं असत. ते विचार हि करवत नाही.  "


विनय- " हो . पण हि माधुरी कोण?"

मावशी- " अरे असं का तुला सांगितलं होत ना गौरीची मैत्रीण माधुरी.  आता आपल्याबाबरोबर इथे राहते म्हणून.  मघाशी तीच तर मला गोळ्या देऊन गेली तुझ्यासमोर. "

विनय- " हा तू म्हणली होतीस. मी विसरलो. "

विनय ने माधुरीला बघितलं न्हवत.  पण त्याच्या आईला तिने वाचवलं म्हणून त्याच्या मनात तिच्या विषयी आदर निर्माण झाला. 
आईशी बोलून तो बाहेर आला. 

गौरीची आई-बाबा  , गौरी बाहेर थांबले होते. 

गौरिची आई - "विनय, आहेस ना तू आता इथं "

विनय - " हो मावशी.  १ महिना आहे इथे. थोडे दिवस सुट्टी काढली आहे , आणि थोडे दिवस इथूनच काम करणार. "

गौरीची आई- " बर . जप आईला. आम्ही निघतो आता. "

विनय- " हो मावशी . आणि थँक यू "

गौरीची आई- " चल वेडा  कुठला.  तुझी आई होण्याआधी माझी बहीण आहे ती . "

विनय ने त्यांना नमस्कार केला. ते हि  गेले.  

आता घरात गौरी, मावशी आणि विनयचं . 

विनय- " गौरी., तू इथं आईबरोबर असतेस म्हणून मला चिंता नसते बघ "

गौरी- " अरे , काय तू? बर  तू फ्रेश हो आपण एकत्र नाश्ता करू .  "

विनय फ्रेश होऊन आला .  गौरी आणि तो एकत्र नाश्ता करू लागले. 

गौरी- " खरच  रे वेळ चांगली म्हणून. देवाने माधुरीला वेळेत पाठवले इथे. "

विनय- " हो . तिलाही मला थँक्स म्हणायचं आहे. "

गौरी- " म्हण निवांत . इथेच राहते ती आपल्याबरोबर . "

विनय- " हम्म "

दोघांनाच नाश्ता झाला.  गौरी आणि विनय मावशीच्या खोलीत बसून होते. 
थोडयावेळाने गौरी जेवणाची तयारी करायला गेली. 
मावशीला जेवण दिलें . माधुरीला फोनवर विचारून गोळ्या हि दिल्या. 

नंतर दोघे जेवले.  विनय वरती'त्याच्या खोलीत गेला.  गादीवर  पडला ते त्याला झोपच लागली. 

संद्याकाळी माधुरी आली. येताना तिने मावशी साठी फळ  आणली होती. 
फ्रेश होऊन तिने एक फळ कापलं  आणि मावशीकडे घेऊन गेली.  समोर बसवून तिला खायला लावेल. 

नंतर माधुरी आणि गौरीने जेवणाची तयारी केली.  मावशीला जेवण दिले.  आता हे तिघे बसणार जेवायला म्हणून गौरीने विनयला  उठवून आणले. 
दुपारी झोपलेलो तो आता उठला. 

तो पर्यन्त  माधुरीने पाने वाढली होती. 
दोघे खाली आले.  जेवायला बसले. 

गौरी- " माधुरी हा विनय , विनय हि माधुरी " अशी गौरी ने त्यांची एकमेकांना ओळख करून दिली. 

विनय  - " हाय "

माधुरी -" हाय "

विनय ला वाटलं ती काही बोललं पण माधुरी फक्त हाय म्हणून शांतपणे जेवत होती.  तिने त्याच्या कडे परत बघितलं हि नाही. 
गौरीची एकटीची बडबड चालू होती. मध्ये मध्ये माधुरी तिच्याकडे बघून एकदा शब्द बोलत होती. 
अशीच जेवण उरकली.  माधुरी आणि गौरी सगळं आवरायला घेऊ लागल्या.  विनय आपला ताटावरून उठून हात धुवून आईच्या खोलीत गेला. 

गौरी- " हे मी आवरते, तू मावशीला गोळ्या दे तोपर्यन्त "

माधुरी- " चालेल " म्हणत मावशीच्या खोलीत गेली. 

जिथं औषधांचा डबा  ठेवला होता तिथंच नेमका विनय बसला होता. 
ती आत आली आणि तिने बघितलं कि विनय तिथं बसला आहे. 

माधुरी- " एक मिनिट , तुम्ही जरा या बाजूला येत का ? तिथे मेडिसिन बॉक्स आहे तो मला हवा आहे. "

विनय- "ओह्ह सॉरी "  म्हणत बाजूला झाला. 

माधुरीने मेडिसिन काढले  आणि मावशीला दिले. 

माधुरी- " मावशी आज बर वाटलं का? त्रास नाही ना होत काही ? "

मावशी-  " नाही ग. उलट घरी येऊन अजून बर वाटतंय. "

माधुरी- " वाह . छानच कि. बर.  आज मी झोपू का तुझ्याबरोबर इथे "

इतक्यात विनय म्हणाला  " मी थांबतोय  आईबरोबर "

माधुरीने फक्त त्याचंकडे  बघितलं आणि मानेने बर  म्हणत  मावशी शी बोलू लागली. 

माधुरी- " .  चालेल कर तू आराम मावशी . आम्ही आहोत वरती "

असं म्हणून माधुरी रूम च्या बाहेर गेली. 

विनयला  तिला थँक्स  म्हणायचे होते म्हणून तो लगेच खोलीच्या बाहेर आला आणि तिला हाक मारली. 

विनय- " माधुरी "

माधुरी- " बोला "

विनय- " थँक्स , तू आईला वेळेत हॉस्पिटलला वेळेस. "

माधुरी- " अहो थँक्स काय त्यात. माझी पण मावशीच आहे ती. "
असं म्हणत ती पूढे  जाऊ लागली. 

विनयला बोलायचं होत पण काय बोलावं ते न सुचल्याने त्याने तिला "  गुड नाईट " असे म्हणला 

माधुरी वरती जात होती , तिने ऐकले आणि  तिने हि त्याला  " गुड  नाईट " म्हणून वर गेली. 

आता हे रोजच रुटीन  झालं होत. तिघे मिळून मावशीची काळजी घेत होते.  मावशीला आता एकदम ठणठणीत झाली. सगळीकडे चालूफिरू लागली. 

पण या इतक्या दिवसात  विनय ला एक गोष्ट कळली. माधुरी त्याच्याशी जास्त बोलत नसे.  कामापुरत काही बोलणं झालं तर नाहीतर असं स्वतःहून तिने आत्तापर्यन्त  एकदाही विनयाशी संभाषण  केलं न्हवत. 

त्याच्या आईचा जीव वाचवला म्हणून तर त्याच्या मनात माधुरी बद्दल आदर  होताच. पण ती एक व्यक्ती म्हणून पण त्याला छान  वाटू लागली. 
तिला जाणून घ्यावं असं त्याला खूप वाटे पण ती फारशी बोल्ट नसल्याने  त्याला काही करता  येत न्हवत. 

एक दिवस माधुरी संद्याकाळी बरीच पुस्तके  घेऊन आली वाचायला.  आधीच दमली होती , परत हेलपाटा नको म्हणून सगळी पुस्तके एकवर एक रचून त्याची थप्पी बनवून तिने उचलली आणि  जिना चढून  वरती जाऊ लागली.  पण आता त्या थप्पी मुळे  तिला पायरी नीट दिसत न्हवती. तसाच अंदाज लावत मॅडम वर चढत होत्या . तेव्हड्यात विनय हि वरून खाली येत होता.  हीच पायरीचा अंदाज चुकला .  सगळी पुस्तके तर पडलीच शिवाय त्या पुस्तकांना  पकडायच्या नादात हिचा तोल हि गेला.  तितक्यात विनय आला आणि त्याने तिचा हात धरून तिला पडण्यापासून वाचवलं. 

आज कधी न्हवे ते माधुरीने केस मोकळे सोडलेले.  तिचा हात पकडला तसा  तो तिच्याकडे बघतच बसला.  मोकळ्या केसांकडे तर ती अजून खूपच  सुंदर दिसत होती . 
माधुरी ला कळेना हा असा  का हात धरून बघत बसलाय. 

तिने तोल सावरून त्याच्याहातातून हात सोडवत थँक यु म्हणत बाजूला  झाली आणि पुस्तके  उचलू लागली. 

त्यालाहि जाणवलं कि आपण तिच्याकडे असे इतकावेळ बघत बसलेलो. 
तोही पटकन पुस्तक  उचलू  लागला. 

विनय - " मी मदत करतो. "

माधुरी-  "  असुदे मी नेईन "

 असं म्हणत तिने अर्धी पुस्र्के उचलली आणि वरती रूम मध्ये गेली. 
 ती ठेवून उरलेली अर्धी पुस्र्के नेण्यासाठी ती वळली  आणि एकदम दचकून २ पाऊल  मागे आली. 

विनय मागून पुस्तके घेऊन येत होता हे तिला माहीतच न्हवत. 
पुस्तक ठेवत विनय म्हणला 

विनय- " काय झालं ग इतकं दचकायला "

माधुरी- " सॉरी, मला माहित नव्हतं तुम्ही येत आहात ते. " 

विनय- " असुदे , आणि प्लिज  तू मला अहो जावो  करू नकोस. मला खूप ऑड  वाटत "

माधुरीला काय बोलावं कळेना . 

माधुरी- " बर . प्रयत्न करते. "

एव्हडं बोलून विनय खाली गेला.  पण त्याच्या डोळ्यासमोर अजून माधुरीचाच चेहरा होता.  त्याच्या हि नकळत त्याला ती आवडू लागली होती. 
मुळात दिसण्यापेक्षा त्याला तिचा स्वभाव खूप आवडला.  जीव लावणारी होती. 
 पण प्रॉब्लेम एकच होता कि ती त्याच्याशी फार बोलत न्हवती. 

क्रमशः 


 

🎭 Series Post

View all