तिचा खऱ्या प्रेमापर्यंतचा प्रवास (भाग १)

Its a story of Madhuri and her journey towards true love

"माधुरी ए  माधुरी, राहूदे ते सगळं, मी आवरतो नंतर . तू जा बघू ,उशीर होत आहे तुला. बस चुकली  तर आज ऑफिस ला लेटमार्क पडेल " 
बाबा माधुरीला सांगत होते. 

 माधुरी आणि बाबा पुण्यात राहायचे. तिला एक छोटा भाऊ होता जो बंगलोर ला नुकताच जॉबला लागला होता. हे दोघे लहान असतानाच त्यांची आई देवाघरी गेली.  बाबानी दोघांना खूप जपलं. म्हणतात ना मुली लवकर शहाण्या होतात ते काय खोट  नाही . माधुरी जशी मोठी होऊ लागली तशी तिने घरकामात बाबाना मदत करायला चालू केली. नंतर हळू हळू सर्व कामे स्वतःच करू लागली. बाबा सरकारी नोकरी करत होते पण पाठीच्या दुखण्याला कंटाळून त्यांनी व्हीआरएस  घेतली होती . सहामाहीनेच झाले होते.  बाबाना काही काम पडू नये म्हणून माधुरी घरातील सगळं आवरून १० पर्यन्त जॉबला जात असे.. 

" असुदे हो बाबा. मी करते, नाही तर नंतर तुम्ही हे सगळं आवारात बसणार पाठ दुखत असताना. " असे म्हणून आवरून जॉबला गेली. 

 बाबा मात्र एकडे  विचारात पडले. पोरीचं लग्न  करायची वेळ आली.  तीच लग्न लावून तिला सुखी बघितलं कि माझी एक जबाबदारी कमी झाली. गुणांची पोर आहे माझी . देवा एखादे चांगले स्थळ पाठव बाबा. असे म्हणत बाबा पडून राहिले. 


 असेच दिवस जात असताना एक दिवशी माधुरी साठी स्थळ आलं.  वीणाताई  दुपारी यांच्या घरी आल्या.  त्याच्या मुलाचं स्थळ होत.  थोडं बोलून माधुरीचा फोटो आणि पत्रिका  घेऊन गेल्या आणि जाताना सतीश त्यांचं मुलगा त्याच्या फोटो न पत्रिका देऊन गेल्या.  पत्रिका जुळली तर कळवू म्हणाल्या. 

चार दिवसांनी त्यांचा फोनआला. पत्रिका जुळत आहे. एकदा बघायचा कार्यक्रम करू म्हणल्या . रविवारचा बेत ठरला.  बाबानी आतापर्यँत माधुरीला काही बोलले न्हवते.. पत्रिका जुळली म्हनाल्यावर  त्यांनी माधुरीला बोलावून सगळं सांगितलं आणि सतीश चा फोटो दाखवला. सतीश आणि माधुरी दोघे हि एकमेकांना शोभेल असे होते.  तिने त्याला नाही म्हणावं असं काही न्हवत. आयटी कंपनीत जॉबला होता. स्मार्ट होता. 


माधुरी ने याआधी कधी प्रेम लग्न याच विचार केला न्हवता.  जबाबदारीतून तिला फारसा वेळ या साठी कधी मिळाला न्हवता. पण तीच एक होत ,तिचा नवरा तिचा सर्वस्व असेल,तिच्यावर  प्रेम करायचं अधिकार फक्त त्याचा असेल आणि आपण हि फक्त त्यावरच प्रेम करू या विचारामूळ  ती अजून कोणाच्या प्रेमात पडायच्या भानगडीतच पडली न्हवती.  सतीश फोटो वरून तिला आवडला. 

रविवारी संद्याकाळी वीणाताई आणि सतीश आले, सतिशच्या  वडिलांना जाऊन ६-७ महिने झाले होते. १ वर्षभरात लग्न करावं नाहीतर तिन वर्ष करता येणार नाही म्हणून वीणाताईंची घाई चालू होती.  माधुरी चहा पोहे घेऊन आली, तिने सतीश कडे बघितला. सतीश फारस  काही बोलत न्हवता. तिला वाटलं मुलगा शांत आहे वाटत फार.  असं विचार करून गलातल्यागालात हसत उभी राहिली. सर्व प्रश्न वीणाताईंनीच  विचारले. वीणाताई बोलताना खूप प्रेमळपणे बोलत होत्या. शांत  आणि मितभाषी वाटल्या.  बाबाना हे स्थळ आवडलं होत.   चहा पोहे चा कार्यक्रम करून ती लोक निघून गेली. दोन दिवसात फोन करून कळवतो असं निरोप दिला. 

बाबाना हे स्थळ आवडलं होत. सतीश तर छान  होताच शिवाय वीणाताईंचं स्वभाव बघता  माधुरीला सासूच्या रूपात आईची माया भेटेल असे त्यांना वाटत होत. आता ते  त्यांचा होकार यायची वाट बघत होते. 

क्रमशः 

🎭 Series Post

View all