तिचा संघर्ष (भाग -4)

Every Woman Wants Love,respect And Support.

दीपा रात्री खूप वेळ विचार करत होती. पहाटे कुठे दीपाला नुकताच डोळा लागला होता. तोच सासुबाई चा आवाज आला.



सासुबाई :उठ दीपा, आज जोशना आणि माझ्या बहिणीची मुलं येणार आहेत. बघ जरा आवरायचं.



(काल केलेल्या दिवसभराच्या कामाच्या ताणाने दीपाला आज कणकण आल्यासारखे वाटत होते.)



दीपा : माझं अंग जरा गरम लागतेय, बहुतेक मला ताप आलाय वाटतं.



सासुबाई : किती ढोंगी आईस गं, दीपा तु.  आज माझी एकुलती एक लेक येणार म्हणून आजारी पडलीस व्हय. अशीच आजारी पडायचीसं वाटतं बापाच्या घरी म्हणून माझ्या मुलाच्या गळ्यात बांधली अन् ते बी फुकट.



\"फुकट\" हा शब्द ऐकताच दीपाच्या अंगात कुठून ऐवढे बळ संचारले देवच जाणे.



दीपा : संतोष तुझे खूप उपकार आहेत माझ्यावर. माझ्या आबांना तूच मरणाच्या दारातून परत आणलेस, इतकेच नव्हे तर माझ्याशी एकही रुपया हुंडा न घेता लग्न केलेस ! मला आजारी पडून चालणार नाही, आज तुझी बहीण येणार आहे ना मला होईल तेवढे मी नक्की करेन.आज तुझ्या बहिणीच्या स्वागतात मी कुठलीही कमी पडू देणार नाही.



सासूबाई : विचार करून इथं ते पेनाने पेपर सोडवायचा नाही,अंग हलव जरा लाग पटपट कामाला.



दीपा : हो.करते मी पटपट. 


(म्हणून हातात झाडू घेऊन दीपा कामाला लागते.)



सासूबाई : किती ही दीपा नाटकं करतेय ! आता म्हणाली, मला कणकण आहे म्हणून अन् आता तर अशी काम करतेय की दहा हत्तीच बळ तिच्या अंगात संचारले. वा पोरी वा !



दीपा : खूप उपकार आहेत संतोषचे माझ्यावर आता तुम्हीच सांगितले ना मग आता त्याच्या घरच्यांना गरज आहे मग मी आजारी असले तरी होईल तेवढी मदत करेन. 



सासूबाई : होय का गं ! संतोषचे घरचे,अन् तुझं कुणीच नाहूत ? मला तू या घरात आल्यापासून हाच संयश होता ; तो आज खरा करून दाखवला.



 दीपा : कसला संशय ? नाही आज तुम्ही स्पष्टच बोला. रोज-रोज तुमच्या अशा वागण्याचा मला खूप त्रास होतोय आणि तुमचा जो माझ्याविषयी गैरसमज आहे तो दूर होईल.



सासूबाई : तुझ्यासाठी नवरा,त्याचं घर हे काही महत्त्वाचं नाहीच. तुझ्या बापाची ऐपत नव्हती पुढं शिकवायची अन्  तुला तर शिकायच होतं म्हणून तु माझ्या पोराबरोबर लग्न केलंय हा हेतू आहे तुझा. मग नाती निभावून नेणं तुला कसं जमणार ? शिकून नोकरी करायची आणि माझ्या सोन्यासारख्या पोराला आमच्या पासून दूर करायच घेऊन जायचं त्याला आपल्याबरोबर होय का नाय ?



दीपा : अरे बापरे ! तुम्ही विचार केला इतका दुष्ट हेतू माझा कधी स्वप्नात सुद्धा नव्हता. मी तुम्हाला खरं सांगतेय. 



सासूबाई : हा हेतू नसेल तर , मग तुला माझ्या एकुलत्या एक मुलाची संतोषची शप्पथ आहे तु त्या कॉलेजात जायचं नाव काढणार नाहीस.बघ खरं प्रेम आहे का तुझं ?



दीपा : सासूबाई तुम्ही असा कसा विचार करताय ?


        (दीपा रडायला लागली.)



सासूबाई :बघ तु कधीच ऐकणार नाहीस.म्हणाले होते न् मी. प्रेमबिम काही नाही तुझं. माझ्या मुलावर आणि या घरावर.



दीपा : ठीक आहे सासूबाई . तुम्हाला जर मी कॉलेजला गेले नाही तरच या घरावर, माझ्या नवऱ्यावर प्रेम करतेय असं वाटत असेल तर मी आता कॉलेजला जाणार नाही.



सासूबाई : मी शपथ घातली आहे हे संतोषला सांगायचं नाही हे लक्षात असू दे.



दीपा : बर.


(म्हणून दीपा डोळे पुसते.आणि कामाला लागते.)



वरवर दीपा खंबीरपणे सर्व जबाबदाऱ्या लीलया पेलताना दिसत असली तरी आतून मात्र पुरती ढासळली होती.आपण एक परिवार जोडून ठेवू शकत नाहीत तर काय करायचय शिकून म्हणून तिने पुढे शिक्षण घ्यायचे नाही हा ठाम निर्णय घेतला.



स्वयंपाक झाला, सर्व कामे अगदी चोख बजावून दीपा रूममध्ये जावून पडणार तोच संतोषने आईला आवाज दिला.



संतोष : आई , आली बघ तुझी लाडाची लेक.



सासूबाई : ये थांबा पोरांनो, आलेच.भाकरीचा तुकडा ओवाळायला घेऊन. 



जोशना :आई, ये बाई लवकर कधी तुला मिठीत घेते असं झालंय बघ मला.



सासूबाई : "काळी बांगडी,काळा पदर 


         लेवून उभी मी दारी,


          जा गं दुष्ट परत आपल्या घरी."


( अस म्हणत दीपाच्या सासूबाईंनी सगळ्यांची दृष्ट काढली.)



सगळे घरात आले.जोशनाने आईला प्रेमाने मिठी मारली. 



आजीसासूबाई : ये दीपा, बघत काय बसलीस ? जा जोशनाला पाणी घेऊन ये पाय धुवायला.



दीपा : हो आणते. 


( म्हणून पाणी घेऊन आली.)



जोशना ,संतोष आणि त्यांच्या माऊशीची दोन मुलं पाय धुऊन घरात आले.



सासूबाई : चहा प्यायचा, का जेवण करतीस गं ?



जोशना : चहाच कर बाई. प्रवासात लय जीव दमलाय बघ.



सासूबाई : दीपा चहाला ठेव .



दीपा :हो.


(म्हणून चहा करायला गेली.)



जोशना दीपाच्या खोलीत गेली.



 संतोष : ये जोशना बस.



जोशना : (इकडे तिकडे पाहते.) दादा,ही फाईल कशाची आहे ?



संतोष : अगं काल दीपाला कॉलेजमध्ये एॅडमिशन घ्यायला जायलो होतो पण आई म्हणाली तुला आण.म्हणून तिकडं आलो बघ. अन् दीपाच मन किती मोठेय बघ की,तीच म्हणाली आधी तुला घेऊन या एडमिशनच  उद्या बघू.



जोशना : कोण बी असतं तर असचं म्हणल असतं, तिथं मावशी किती आजारी आहे अन् मी राहाणं बरं दिसतं का तिच्याजवळ ?



संतोष : अगं पण जोशना, मावशीकडं बघून मावशी आजारी असल असं मला वाटलं नाही बघ.



जोशना : म्हणजे आम्ही खोटं बोलतोय असं म्हणायचंय का तुला ? तुझ्या बायकोला काम पडेल माझ्या येण्यामुळे असं तुला वाटत असेल तर जाते मी परत.



संतोष : काही पण बोलू नको . तुझं आपलं काहीतरीच असते बघ . मी आपलं सहज विचारलं, मला वाटलं ते ! बहिण आहेस तू माझी. तुला सांभाळनं माझी जबाबदारी आहे.बर मी आलोच बाहेर जरा जाऊन .


(संतोष बाहेर निघून गेला.)



जोशना : आई माझा चहा कुठे ग ?



सासुबाई :ये दीपा, झाला का गं चहा ?



दीपा : हो झाला.



सासूबाई : मग काय, आता नंदेनं हितं यायची वाट बघत बसलीस काय चहा प्यायला ? बाहेर घेऊन जा तिथं निहून द्यायचा असतो नंदेच्या हातात चहा. अन् तुला जर काय कमीपणा वाटत असल्यास मला सांग मी नेऊन दिन चहा.



दीपा : कमीपणा कसला त्यात ? घेऊन जात होते मी चहा.



जोशना : (चहा पीत पीत म्हणाली.) गरम गरम चहा घेतला. बरं वाटलं जरा आई.



सासुबाई : चल जरा गप्पा मारू.


(आतल्या खोलीत निघून गेल्या.) दीपाला पाहूण्याच्या पोरांना काय हवं नको ते बघ म्हणून सांगून गेल्या.



दीपा : अजय दादा, विजय दादा जेवायला वाढून का तुम्हाला ?



अजय : टीव्ही च्या खोलीतच आणा जेवायला आम्हाला.



दीपा : बरं.


(म्हणून ताट वाढून घेऊन गेली.)



विजय : इतकी भाजी. जरा कमी करून आणा. 



दीपा : बरं. (ताटातली वाटी घेऊन जाते, भाजी कमी करून घेऊन येते.)



अजय : माझा भात थोडा कमी करा.



दीपा : ताटात भात मी एवढासाच वाढलाय. यातला किती कमी करू ?



अजय : बरं.



आजी सासूबाई : पाहूण्याच्या पोराने सांगितल्यावर ऐकायचं असतं का नाही ? का तुला लय हेलपाटे व्हयलेत?  भात कमी करायला जायला ? 



दीपा : कुठच्याकुठे विषय होऊन गेल्या ?  या सगळ्यांनी फक्त मला मुद्दाम त्रास द्यायचे ठरवले आहे . काम न करता दोन दोन वेळा चहा पिऊन बसलेत , पण साधं मला एकदाही विचारलं नाही ? तुला भूक लागली का ? म्हणून.



जोशना : (आत मध्ये आई ला म्हणाली.) आई, तु फोनवर म्हणाली होती की नाही. त्या दीपाला कॉलेजमध्ये पाठवायचं नाही म्हणून तु मला बोलवून घेतले. बघ आता ती दीपा कॉलेजला कधी जाऊ शकणार नाही.



सासुबाई : म्हणजे तुला बी कळलं होय ! मी ती दीपा कॉलेजमध्ये जाऊ नये, म्हणून काय आयडिया केली ती!



जोशना : म्हणजे तु आधीच आयडीया केली होय ! मी पण एक आयडिया केली होती.



सासुबाई : तू काय केलंत ?



जोशना : मी कनाय तिची ऍडमिशन घ्यायला जायची फाईलच लपवून ठेवली होती. अन् तुला तर माहिती आहे, दादाला वेळ लावला की किती राग येतो आणि ती दीपा बसली असती ती फाईल शोधत. ॲडमिशन झालं नसतं बघ तिचं.



सासुबाई : तू फक्त एक दिवसाची तर आयडिया केली.  मी तर कायमचीच संतोषची शपथ घालून तिला आता त्या कॉलेजच एडमिशन विसरायला लावलं बघ.



जोशना : आता खरी तू आजीची सुन शोभायलीस बघ. हुशार माझी आई !



(दोघी मोठ्याने हसलेला आवाज बाहेर आला.)




दीपाच्या पुढे नंदेच्या रूपानं नवीन संघर्षाची सुरुवात असेल का?


पाहूया पुढील भागात क्रमशः



सौ प्राजक्ता पाटील 


लेख आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा नावासकट शेअर करा.


आवर्जून लेख वाचल्या बद्दल खूप खूप आभार.???






🎭 Series Post

View all