Jan 26, 2022
नारीवादी

तिचा संघर्ष. भाग-6

Read Later
तिचा संघर्ष. भाग-6

रडू नकोस दीपा. हो.हो मीच आई जगदंबा.दीपा : आई तू... ! ( दीपा प्रत्यक्ष प्रकटलेलं तेजस्वी, तेजपुंज असं देवीचं रूप पाहून हात जोडते.) तुला प्रश्न पडलाय ना ? या जगात देव आहे का नाही याचा? अगं जेव्हा -जेव्हा या पृथ्वीवर कोणत्याही जीवावर अन्याय झाला तेव्हा मीच तर मनुष्य रूपात अवतार घेतला. श्रीकृष्ण, भीमा आणि अर्जुन किंवा राम, लक्ष्मण यांना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलं नसेल, 


पण मुगल,औरंगजेब,आदिलशहा आणि निजामशहा जनावरांप्रमाणे मराठी मुलखातील रयतेला वागणूक देत होते. आया-बहिणींची अब्रू धुळीला मिळवत होते. मंदिर असो की अंगणातील तुळस त्याचं पावित्र्य या जुलूमी लोकांनी संपुष्टात आणलं होतं. अगं मग मीच आले दुर्गेच्या रूपात जिजाऊंच्या अवरात. जिला डोहाळे लागले, ते सुद्धा फक्त आणि फक्त अन्याय करणाऱ्यांना कठोरात कठोर शासन देण्याचे, आणि स्वराज्याची स्थापना करण्याचे म्हणूनच देव आलाच ना तिच्या पोटी आणि त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज होय.माणसा माणसात कसली आली अस्पृश्यता ? माणुसकी हाच धर्म खरा. बघितले सगळ्यांच्या अंगातील रक्ताचा रंग सुद्धा एकच असतो. देवाला जर असा भेदाभेद मान्य असता तर त्याने प्रत्येकाचं रक्त वेगळ्या रंगाचं बनवलं असतं. मग त्याने भेद केला नाही तर, आपण मग एक समाज उच्चभ्रू आणि दुसरा कनिष्ठ असे समजावे का ? म्हणून मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रूपात पुन्हा देव अवतरला. त्यांनी दलित बांधवांना जीवनावश्यक असलेलं पाणी मिळवून देण्यासाठी महाडच्या चवदार तळ्याचे पाणी हा सत्याग्रह केला, शिक्षणाचा हक्क मिळावा म्हणून अतोनात प्रयत्न केला. राजर्षी शाहू महाराजांच्या रुपाने त्यांना दुसरा देव भेटला ज्यांनी मुलांसाठी वसतिगृहे सुरू करून बाबासाहेबांना पाठिंबा दर्शवला.स्त्री आणि पुरुष एकाच आईची मुलं. पण स्री-पुरुष असा भेदाभेद का ? स्त्री(पत्नी) मृत झाली तर पुरुष (पती) दुसरे लग्न करू शकतो पुरुष (पती) मृत झाला तर स्त्रीला (पत्नीला) सती जावं लागतं. या प्रथेला विरोध करण्यासाठीच राजाराम मोहन राय यांच्या रूपात देव पुन्हा प्रकटला. शिक्षणाचा अधिकार फक्त पुरुषांसाठी असतो तो स्त्रियांना बिलकुल नाही.  त्यांची जबाबदारी फक्त चूल आणि मूल एवढीच मर्यादित आहे असा समाजाचा गोड भ्रम महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्वतःच्या पत्नीला साक्षर करत समाजापुढे नवा आदर्श ठेवला.


फुले दांपत्याच्या रूपाने आम्ही तर पृथ्वीवर जन्म घेतला.आजी सासुबाई : ये दीपा, उठ बाई पहाट झाली  सडासारवण करायचं बघ पटकन.(दीपा आजी सासूबाईंच्या हाकेने जागी झाली. डोळे उघडून पाहते तर देवी वगैरे काही नाही. म्हणजे हे सगळं स्वप्न होतं ! पण स्वप्न जरी असलं तरी ते सत्य होतं ! आणि आहेच जगदंबे आई माझा तुझ्यावर विश्वास. तू मला नक्की वाट दाखवशील.)
दीपाने अंगणात छानशी रांगोळी रेखाटली. आकर्षक रंगाने ती सजवली होती. आपल्या संसारात ही अशीच रंग भरण्याची स्वप्न पाहत दीपा त्या घरात आली होती. पण तिथे मात्र सगळं उलट होतं. दिपाने आंघोळ वगैरे उरकली देवी वरची श्रद्धा अधिकच दृढ झाली होती. स्वप्न जरी असलं तरी तिची देवी खूप काही सांगून गेली होती.दीपा : किती प्रसन्न वाटतं म्हणून सांगू देवी तुझ्या सानिध्यात ! जणू काही सकारात्मकता ठासून भरलेली असते, मग ते घरातले मंदिर असो किंवा एखादे तीर्थक्षेत्र.(आज जणू देवीला मैत्रीण समजून दीपा बोलत होती.)सर्वांना चहा बनवून बसल्या जागेवर नेऊन देत होती. आता दीपा स्वतःच्या कपात चहा ओतू लागली तोच सासुबाई तरातरा तिच्याजवळ आल्या आणि म्हणाल्या-सासुबाई :  काय ग हे दीपा ? माझ्या जोशनान चहा घेतलाय का ? जरा दम निघाला नाही का तिची आंघोळ होई स्तोवर ?दीपा : पण सासुबाई, मी त्यांना विचारलं होतं, " ब्रश करून चहा घेता का म्हणून,  घेऊन सुद्धा गेलते तिथं चहा. पण त्याच नको म्हणाल्या मी आंघोळ केल्याशिवाय चहा घेत नाही म्हणाल्या  ?


आणि असा शिजवलेला चहा खूप वेळाने घेतला तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होत असतो. मग चहा टाकून देण्यापेक्षा गरम करून घेतला तर कुठे बिघडलं ?सासुबाई : अग मला आणून द्यायचा. मला चालतो दोनदा चहा घेतलेला.दीपा : चुकलच जरा माझं. माफ करा मला."एवढंच मुलीचं प्रेम आहे; तर मुलीसाठी स्वतः थांबायचं चहा घ्यायचं. स्वतःला मात्र भूक कंट्रोल होत नाही, पण सुनेला मात्र उपाशी मारायचं हा बहुतेक यांनी ठेका घेतलाय असो ! " हा दीपा मनात विचार करत होती.
(शांत बसून एक कप चहासाठी दीपानं सासूबाईंची माफी मागितली कारण दीपाला विषय वाढवायचा नव्हता. चार दिवसांवर नवरात्र आली होती सण समारंभात सासुबाई बरोबर वाद घालून दीपाला वातावरण दूषित नव्हतं करायचं.)दीपा स्वयंपाकाला लागली. सासुबाई शेतावर गेल्या होत्या  अजय विजय जवळ डबा पाठवून दे म्हणून दीपाला सांगून गेल्या. हो म्हणत स्वयंपाक करण्यात मग्न होती. तितक्यात अचानक आजी सासुबाई तावातावाने स्वयंपाक घरात आल्या आणि म्हणाल्या-आजी सासुबाई :  दीपा, काय तुझे लक्ष कुठे आहे ग ? कवाच जोशनाची आंघोळ झाली. काय तिला चहा बी करती का नाही ? पाहुणी हाय ती या घराची चार दिवसाची. उद्या जाईल नांदायला. हाय तवर तर तिला दे बाई ग येळेवर.दीपा : हं.. घेऊन येते.(या घरात मीच काय ती तेवढी हक्काची आहे. बाकी सगळे पाहुणेच तर आहेत. बसल्याजागी मला तर द्यावे लागते सगळे. असू द्या आता मी ही ठाम राहिला शिकणार! सुनेचा मान मिळवून दाखवणारच. तुमच्यासारखा मान मागून घेणार नाही माझ्या वागणुकीतून तो तुम्हाला द्यायला नक्कीच भाग पाडणार शब्द आहे दीपाचा)चहा घेऊन दीपा जोशना जवळ गेली. जोशना दारातल्या अंगात फोनवर कोणाशी तरी गप्पा मारत होती.दीपा : जोशना ताई, चहा आणलाय बघा !


जोशना : मला आता चहा नकोय, मी थोड्या वेळाने घेईन.दीपा : आजी, जोशना ताई आत्ताच चहा नको म्हणाल्यात. तुम्हाला द्यायचा का ?आजीसासूबाई : अगं दीपा, वेडी का खुळी ग तू ? चहा ठेवायच्या आधी विचारायचं असते का नाही ? अन् सारखा सारखा चहापाजून मारतेस काय मला ? स्वयंपाक झाला की जेवायला बोलव मला.दीपा : किती निरनिराळ्या तऱ्हा आहेत या घरातल्या लोकांच्या. अगदी युनिक पीस गोळा करून बनवली बघ देवा तु ही फॅमिली. आणि अशा घरात माझी सात जन्मासाठी गाठी ही बांधलीस.(आज दीपाचा चेहऱ्यावर स्मित हास्य होतं.आज कुठेतरी देवाचं अस्तित्वं असतं हे  तिच्या खुळ्या मनाने मान्य केलं होतं.)दीपा चा स्वयंपाक तयार झाला.आजी सासूबाईंना जेवायला वाढू का ? म्हणून विचारण्यासाठी दीपा गेली.आजी सासुबाई : आता काय पंचांगात बघणार आहेस होय? मला जेवायला वाढायला मगाशी सांगितलं होतं की, स्वयंपाक झाला की मला जेवायला वाढ म्हणून. आलेच बघ मी जेवायला वाढ लवकर. दीपाने आजीसासूबाईना जेवायला वाढले.आजी सासूबाईंनी जोशना ला आवाज दिला.आजी सासुबाई : जोशना , चहा बी घेतला नाहीस ये दोन घास खायला.जोशना : वहिनीला म्हणावं, कर आता चहा मला चहा घ्यायचा आहे आता.दीपा सगळी कामं आटोपून आता भांडी घासण्या च्या तयारीत होती,  पण जोशना ताईंची ऑर्डर आली म्हटल्यावर हातातली कामं टाकुन दीपा चहा करायला गेली. चहा उकळल्यानंतर दीपा चहा घेऊन जोशना कडे गेली. जोशना चा फोन अजूनही चालू होता.जोशना ताई चहा. म्हणून दीपन हाक मारली.जोशना : आता काय वहिनी, तू ऐकायला थांबलीस का फोनवर मी काय बोलते ते ? ठेव तो चहा तिथं आणि बघ ती तुझी तुझी कामं.दीपा चहा ठेवून निघून गेली. तेवढ्यात फोनची रिंग वाजली.. ट्रिंग...ट्रिंग.. ट्रिंग…आता हा फोन कोणाचा असेल ? दीपाच्या संघर्षात त्यामुळे भर तर पडणार नसेल?


पाहू या पुढील भागात क्रमशःसौ. प्राजक्ता पाटील.लेख आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा आणि नावासकट शेअर करा.


आवर्जून लेख वाचला त्याबद्दल खूप खूप आभारईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

प्राजक्ता पाटील

Teacher

Reading And Writing is my Passion....