Jan 26, 2022
नारीवादी

तिचा संघर्ष भाग-5

Read Later
तिचा संघर्ष भाग-5

मागील भागात आपण पाहिलं होतं सासूबाईनी दीपाला संतोष ची शपथ घालून कॉलेजात शिकायला जायचं नाही ही आपली अट मान्य करून घेतली आणि याचा आनंद व्यक्त करताना दीपाची ननंद आणि दीपाच्या सासुबाई खूप खुश होत्या.सासुबाई : जोशना, तुला भूक लागली असेल तर सांग, दोघी जेवायला जाऊ.जोशना : चल आई जेवायला.


(बरं चल. म्हणत सासूबाईंनी आजीसासुबाईना हाक मारली आणि त्या तिघी स्वयंपाक घरात गेल्या.)आजी सासुबाई : दीपा, ये बाई आम्हाला जेवायला वाढायला. (दीपाने चार ताटं काढली आणि जेवायला वाढायला सुरुवात केली)सासुबाई : आम्ही तर तिघीच जेवणार आहोत. मग हे चौथं ताट कुणाला वाढायला लागलीस ?दीपा : मी ही जेवले नाही अजून.आजी सासुबाई : उपकार केलास बघ आमच्यावर. हे काय तुझं माहेर नाही ! नवरा जेवल्याशिवाय या घरातली बाई जेवण करत नाही आणि संतोष अजून जेवला नाही आणि लागली व्हय जेवायला बसायला.दुपारचे दोन वाजले होते अन्नाचा कणही दीपाच्या पोटात नव्हता. कालपासून घाण्याला जुंपलेल्या बैलासारखा तिच्याकडून काम करून घेतलं होतं. आज ताप आला असतानाही दीपा सगळ्यांच्या पुढे पुढे करत होती. पण इथे कुणाला काहीच पर्वा नव्हती.आजी सासुबाई : ये थांबा ग पोरींनो जेवू नका आत्ताच.(दीपाला तर आता आपलं काय चुकलं ? हेच कळत नव्हतं, घाबरलेल्या नजरेनं दीपा आजी सासूबाईनकडे पाहत होती.)सासुबाई : काय झालं हो, सासुबाई ?आजी सासुबाई : अग रत्ना, ही तुझी सून कोणतं काम धड करते का ? विचार तिला तिनं देवीला नैवेद्य दाखवला आहे का ? आपल्या घरी गोडाधोडाचं जेवण बनवलं की आपण देवीला नैवेद्य न चुकता दाखवतो पण ह्या दीपाच्या लक्षात राहिला तर खरं !(दीपाच्या सासरी घरात देवी होती. या देवीची दररोज घरात पूजाअर्चा केली जायची. नवरात्रीत या देवीला गावातील चौकात स्थापन केले जायचे. मोठ्या उत्साहात नवरात्रीचे नऊ दिवस जातात हे संतोष ने दीपाला एकदा सांगितले होते.)
सासुबाई : होय बाई, ते बी खरच आहे ! दाखवलास का ग दीपा, देवीला नैवेद्य ?दीपा : विसरले मी, आत्ता दाखवते.सासुबाई : उठ लवकर, जा पटकन दाखवं. जोशणा ला भूक लागली असेल.(दीपा देवीला मनोभावे नैवेद्य दाखवते. )


(पण तिच्या मनात विचार चक्र सुरु होते. इथे साक्षात देवीचे रुप असलेली एक स्त्री उपाशी असताना, यांना तिची बिलकुल पर्वा नाही आणि मूर्तीत असलेली देवी उपाशी राहू नये अट्टाहास करतायेत. मी उपाशी असताना दाखवलेला नैवेद्य त्या देवीला ग्रहण करावा वाटेल का  ?)सासुबाई : घे ग जोशना, लाजू नकोस.जोशना : मला ना एकदा पोट भरून जेवायची सवय नाही गं इतर बायकांसासखी ! सतत काही ना काही खात राहिलं तरच माझं पोट भरतं बघ !सासुबाई :हो बाई, दुसर्यासमोर जेवायची तुला सवयच नाही.दीपा : जाऊ का मग मी बाहेर.सासुबाई : का ? जेवायला वाढून दमलीस वाटतं.दीपा : जोशना ताईंना दुसर्यासमोर जेवण जात नाही तुम्हीच म्हणालात ना आत्ता ! म्हणून जाते म्हटलं.आजी सासुबाई : जेवताना सुद्धा दीपा चार घास सुखाचे खाऊ देत नाही माणसाला.सासुबाई : नाहीतर काय !(दीपा आवंढा गिळून पुन्हा गप्प बसली. त्या तिघींनी पोटभर जेवण केले. आणि दीपाला भांडी घासून खरकटं मोडून घे अशी सूचना देऊन तिघीही निघून गेल्या.)दिपाने सगळं आवरलं, घासलेली भांडी आत आणून ठेवली.  तोपर्यंत दारात संतोष आला होता. दीपा, जेवायला वाढ म्हणून त्याने दीपाला हाक मारली.दीपा : हो वाढते.संतोष : काय ग जोशना, झालं का तुझं जेवण ? का येतीस माझ्यासोबत चार घास खायला ?सासुबाई : चाखत माखत खाल्लं थोडं. पापड भाज म्हणावं तुझ्या बायकोला. आवडतेत जोशना ला.संतोष : दीपा, जोशना साठी पापड भाज बर ! तिला आज प्रवासामुळे जेवण गेलं नाही वाटतं.(दीपा पापड भाजते. विचार करते हा संतोष माझा नवरा.ज्याच्या सोबत मी सात जन्माची गाठ बांधलीय, तो बायकोच्या चेहऱ्यावरून ती आजारी आहे, जेवली आहे की नाही ? हे ओळखू शकत नाही म्हणजे माझ्या सारखी दुर्दैवी मीच आहे. जोशना ताई माझ्या समोर पोटभर जेवल्या तरीही सासुबाई खोटं का बोलल्या? एकदा तरी म्हणाल्या का दीपा अजून जेवली नाही. )संतोष : आज जायचं ना ऍडमिशन घ्यायला. (जेवण जेवत संतोषने दीपाला विचारले.)दीपा : नाही, नको, काय करायचय पुढे शिकून ?संतोष : बघ नाहीतर पुन्हा म्हणशील, तुम्ही शिकू दिलं नाही म्हणून. मी तर तुला विचारलं होतं.संतोष ने किती अलगद डोक्यावरचं ओझं खांद्यावर घेतलं नाही तर चक्क खाली फेकल. तुझं तू बघ असच म्हटल्यासारखं. दिपाने घड्याळाकडे पाहिलं. सव्वा चार झाले होते. संतोष च जेवणनही झालं.


आता जेवणाची दीपा ची इच्छाच मेली होती. संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात करावी लागेल म्हणून थोडावेळ आराम करावा म्हणून दीपा खोलीत गेली. सासुबाई : जेवलीस का गं दीपा तू ?दीपा : नाही मला भूकच नाही. (दीपाला वाटलं काळजीनं विचारत होत्या सासूबाई.)सासुबाई : तुला भूक नव्हती तर एवढा स्वयंपाक कशाला करायचा ग ? वाया जायला नको खाऊन घे. आमच्या घरात सकाळचं संध्याकाळी खात नाहीत. तुलाच खावं लागेल संध्याकाळी तो राहिलेला स्वयंपाक. ऊठ आणि लाग संध्याकाळच्या स्वयंपाकाच्या तयारीला.दीपा : घरात पाळलेल्या जनावराला देखील चांगली वागणूक मिळत असेल, पण इथे मी माणूस असूनही कोणाला पर्वा नाही.अस हळू आवाजात म्हणाली आणि स्वयंपाक करायला लागली.(अजय विजय शेतातून घरी आले होते. त्यांना चहा कर म्हणून सासुबाईनी सांगितल्यावर दीपाने चहा केला त्यांना नेऊन दिला.)अजय : अहो चहा कशाला आणलाय ? आम्ही अजून फ्रेश नाही झालोय.दीपा : बर तुम्ही फ्रेश व्हा मी परत घेऊन येते चहा.


(म्हणून आत गेली)


 


अजय : मावशी चहा आण गं!सासूबाई : दीपा चहाच काय झालं ? होतोय की नाही अजून?दीपा : मी मगाशी आणलेला पण…(दीपाला सासुबाई पुढे बोलूच देत नाहीत.) सासूबाई : बर बर जा. अन् उरक लवकर.(एकेक दिवस चिंतेत उगवत होता तसाच मावळत होता. दीपाला काहीच सुचत नव्हतं.चिंतेचे ढग सभोवार पसरल्यासारखे दीपाला वाटत होते. काळजीचा वनवा भडकतच चालला होता. रोजच नवनवीन आव्हानं आणि त्या आव्हानांना तोंड देताना दीपाचा होणारा संघर्ष यापासून संतोष मात्र अनभिज्ञ होता. लग्नाला इतके दिवस झाले पण कधी प्रेमाचे दोन शब्द संतोष कडून ऐकल्याचे दीपाला तर आठवेनासे झाले होते.)संध्याकाळी परत तेच सगळ्यांचे जेवण झाल्यावर भांडे घासून, खरकटे मोडून दीपाला झोपावे लागत होते.(दीपा सगळं आवरून रूममध्ये झोपायला गेली. ननंद जोशना अजय आणि विजय टी.व्ही. पाहात बसले होते.)जोशना : वहिनी जा बाई. शेजारच्या रूम मध्ये जाऊन झोप. आम्हाला चित्रपट बघायचा आहे. आत्ताच सुरू झालाय.(दीपा अंथरून -पांघरून घेऊन आजी सासूबाईंच्या खोलीत झोपायला गेली. थोड्यावेळात दारू पिऊन येणारे सासरे दीपाला पाहून जास्तच गोंधळ करतात त्यापेक्षा मागे आजी सासूबाईंच्या खोलीत झोपावे असे तिला वाटले. )आजी सासुबाई : इकडं कुठे आलीस ? मलाच इथं जागा नाही.( दीपा खोलीत पाय टाकण्याच्या आतच मागे सरकली.)सासुबाई : जा बाई दीपा, झोप स्वयंपाक घरात. पावण्याची पोर आहेत तोवर संतोष बी शेतातल्या कोट्यावर झोपल.अन् तू झोपत जा स्वयंपाक घरात.दीपा स्वयंपाक घरात अंथरूण घालुन झोपी गेली. दिपाली जिथे झोपली होती, तिथून तिला घरातली देवी स्पष्ट दिसत होती. दिपक ताडकन उठुन बसली . देवीपुढे तिने हात जोडले. भक्तीने देवीला विनवणी करत होती.दीपा : हे जगदंबे आई, तू चुकलेल्या सर्वांना वाट दाखवली आहेस. आज भरकटलेल्या, वाट चुकलेल्या मलाही तुला वाट दाखवावीच लागेल. या साऱ्यांना कंटाळून आत्महत्या करणार करणारी मी नाही आणि आई- आबांकडे जाऊन त्यांच्या जीवाला नसता घोर लावणारी ही मी नाही.  हे तुला माहित आहे ना ग ! आई जगदंबे प्रत्येक युगामध्ये स्त्रियांचीच अग्निपरीक्षा, सत्वपरीक्षा घेण्यात आली हे फक्त मी वाचलं होतं आणि ऐकलं होतं पण ही माझी कसली परीक्षा ? काय चुकलं माझं ? आत्तापर्यंत कोणालाच मी माझ्यापासून त्रास होऊ दिला नाही आणि इथे सगळा त्रास मलाच का देतात सगळे ?(दीपा धाय मोकलून रडू लागली.)
खरंच आहे का देव या जगात ? ऐकेल का दीपा चं ? पाहूया पुढील भागात...


क्रमशःसौ प्राजक्ता पाटील ..✍?


लेख आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि नावासकट शेअर करा..


वेळ काढून लेख वाचल्या बद्दल खूप खूप आभार???ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

प्राजक्ता पाटील

Teacher

Reading And Writing is my Passion....