Login

*तिचं अस्तित्व * भाग -32

नाचणारीच्या मुलीची कथा

मागील भागात आपण पाहिलं कि, आजीबाईंने नको ते कट रचले, त्यामुळे राजनला अनुश्रीला भेटता आलं नाही... त्यात त्यांचं काम आल्यामुळे त्यांना वाड्यावरून तातडीने निघून जावं लागले.......त्यामुळे कमलाबाई सुद्धा रागात होत्या...त्यात रुतूसुद्धा पाय घसरून पडल्या. अनुश्री सगळं सांभाळून घेत होती .., आता पाहूया पुढे.........,



त्याच कारणामुळे कमलाबाईंची व रुतुबाईंची सुद्धा चिडचिड होत होती.पण खरं तर त्याचे कारणच वेगळे होते. तर झाले असे की देवळात जाऊन कौल लावला तेव्हा तो पाहिल्या क्षणात राजन पाटीलसाठीच सकारात्मक मिळाला होता, पण ऐनवेळी सईताई पडल्या, तवा बिगीबिगी चला निरोप म्हातारी आज्जी बाई स्वताच देवळात द्यायला आली होती.

ते त्यांच्या कानावर पडता क्षणी राजन वाड्याकडे जायला निघाले. तेव्हा काही विधी बाकी होत्या; आणि त्यांचं जाणे गरजेचे होते. शिवाय सर्वांच्या समोर बसून अनुश्रीच्या शेजारी बसून तिचा चिरा उतरवून देवाचा व वडिलधाऱ्या लोकांचा आशीर्वाद घेऊन वाजत गाजत घरी यायचे बाकी होते....,

पण हे सगळे कसे होणार? हा मोठा प्रश्न उभा राहिला होता, आणि त्याच गोष्टीचा फायदा अमोलरावांनी घेतला, राजनला सईला सांभाळायला सांगून ते स्वतः तिथे बसले..... आणि तिचं पाणी ग्रहण केलं..

पण ते तिथे पोहोचले तो पर्यंत कोणीतरी आधीच वर उचलून ठेवले होते सईला. पण त्या खूपच घाबरल्यामुळे राजनराव नाईलाजाने बराच वेळ त्यांच्या शेजारीच बसून होते..! आणि खूप वेळाने ते परत गेले तिकडे.पण तोपर्यंत पुढची विधी झाली होती.

त्यामुळे त्या दिवशी नाव घेताना,

"पाटलांच्या नावे हे मंगळसूत्र आणि ही मुलगी आता पाटलांची झाली अन पाटलांनी तिचा चिरा उतरवला."

असे अडखळत कमळाबाई बोलल्या.. खरं तर खोटे बोलायला जीभ आणि विधी पूर्ण करायला हात पुढे येत नव्हते त्यांचे..!

त्यात पाहिल्या रात्रीच्या प्रसंगानंतर राजनरावांना दोन महिन्यात जर काही करता आले नाही तर आम्हीच काय करायचे ते ठरवू त्या मुलीचे.. असा निर्वाणीचा इशारा अमोलरावांनी कमलाबाईना व रुतूबाईंना बोलता बोलता दिला होता..! त्यामुळेच त्या खूप घाई करत होत्या..... कारण त्याच अधिकाराने पाटील कधी अनुश्रीच्या अब्रूवर हात टाकतील काहीही सांगता येत नव्हतं आणि ह्या बाबतीत त्यांना कुणी टोकूही शकल नसत. त्यामुळे त्या दोघीसुद्धा खूपच टेन्शनमध्ये असायच्या. त्यांना धुसपूस करण्याशिवाय दुसरं काही करता येत नव्हतं.


           

           दोन महिने सरत आले तरी राजन रावांना कामाच्या व्यापात खूप अडकून पडल्यामुळे घरी यायला काही मिळाले नाही. अनुश्रीची आठवण यायची पण त्यांनी पत्र व्यवहार केला नाही. त्यामुळे अनुश्री खूप दुःखी होती.

         कारण इकडे अनुश्रीला मात्र रोज त्यांची आठवण येत होती..ती रोज एक वेडी आशा मनात ठेऊन  तिच्या खोलीचे दार उघडे ठेवून झोपत होती. पण तिला माहित नव्हतं ह्यामुळेच तिच्यावर खूप मोठं संकट येणार आहे....... कमलाबाईंची भीती खरी तर नव्हती ना ठरणार, हे तर येणारा काळचं ठरवणार होता.......

              त्यात जेव्हापासून अमोलरावांनी तिला पाहिलं होत आणि विधी करताना तिच्या मऊ  हाताचा झालेला स्पर्श आठवून त्यांना तिला भोगण्याची तीव्र इच्छा होत होती.......स्वतःवर ताबा ठेवणे दिवसेंदिवस अवघड होत चालले होते त्यांना.... त्यात बाईचा नाद त्यांना नव्याने लागला होता. अनुश्री हिशोब करत असताना देखील ते तिला वाईट नजरेने बघत बसायचे.

             राहून राहून ते स्वतःच्या मनाला समजावत होते..एक घाणेरडी आशा मनात ठेवून विचार करत होते...... काहीही झालं तरी शेवटी बोलून चालून ती नाचणारीची मुलगी ना?? तिला फक्त घराचा वारस मिळविण्यासाठी आणली आहे इथे.....मग आम्ही अंगाला लावली काय, किंवा आपल्या छोट्या भावाने लावली काय........ काय फरक पडणार आहे....कुणापासून का होईना..... वारस तर मिळणारच आहे......आणि तेच तर हवं आहे शिवाय ह्यावर कोणच आक्षेप घेणार नाही. अश्या ह्या घाणेरड्या विचारात त्यांना पशाडलं होत.


              त्यात दोन महिने उलटले तरी राजन पाटील काही घरी आले नाहीत, ना त्यांनी काही निरोप पाठवला की  नाही काही पत्र पाठवले..... त्यामुळे आधीच चिडलेले अमोलराव अजून चिडले...... त्यात गावात काही प्रॉब्लेम आला तर सगळे जमून वाड्यावरच येत असत. मग ते जमिनीचे व्यवहार असो नाहीतर पाण्याचे प्रश्न.... त्यावर तोडगा गावचे पाटीलच काढत असत.....

               एक दिवस गावचे सरपंच सकाळीच वाड्यावर आले. गावात विहिरी काढण्यासाठी तलाठी कार्यालयातून परवानगी घेऊन निधी उपलब्ध करण्याचं काम होत. राजन सावकार त्या प्रकरणात लक्ष घालीत होते.
पण त्यांच्या कामाच्या व्यापात त्यांच्या कडून ते काम अर्धवट राहिले होते आणि पावसाच्या आधी विहिरी खोदणे गरजेचे होते, नाहीतर पुन्हा सहा महिने थांबावे लागणार होते. सगळा दोष राजनला लागला होता. खरं तर हे काम ते सुद्धा करू शकत होते किंवा अजून कुणाला सांगून ते सुद्धा तडीस नेऊ शकत होते....पण काहीतरी चुकी काढून ते त्यांचा राग राग करत होते. त्यावरून त्यांनी त्याच वाड्यात खूप आदळआपट केली.कस तरी कमळाबाईंनी त्यांना थोपवून धरलं.


        "अमोल राव , तुमी शांत व्हा पाहू....., म्या सांगावा धाडते म्हणलं ना......"

कमळाबाई कश्यातरी त्यांना शांत करत म्हणाल्या.


"तुमीच सांगा आता आईसाहेब, ..राजनरावांना आपण जितकी सुट देतोय तितका ते गैरफायदा घेत आहेत कि नाही.....????"

ह्यावर कमळाबाईंकडे काहीच उत्तर नव्हते, त्यांना शांत राहिलेले पाहून ते पुन्हा म्हणाले,

"त्यांच्या तारुण्याचा भान ठेवून उपभोगाची व्यवस्था केली.. नवीन संसार धाटून  दिला..... पुढचा पाऊल उचलायला सांगलं तर म्हणे त्या अजून लहान आहेत....... हळुवार जपायचं आहे त्यांना...... त्यांना जाऊन निक्षुण सांगा तुमची आई व वाहिनी याच वयात तीन लेकरे सांभाळत होती. बर ते जाऊदे बाकी कामे सांगितली तर म्हणतात कसे माझीच कामे आहेत मला....... येळ नाही....हे करायला येळ नाही ते करायला न्हाय मग येळ आहे तरी कश्याला.....????"

असं म्हणत ते आग ओकत बाहेर पडले......

कमलाबाई मध्यरात्री पर्यंत त्यांची वाट बघत बसल्या होत्या..त्यांना माहित होत ते खूप पिऊन येतील आणि जेवायला पाहतील..... पण हाय रे नशीब.....! त्यांना महिना आल्यामुळे त्यावेळच्या रीती नुसार  त्यांना मागच्या खोलीत जावे लागले..! नेमक्या रुतुबाई तेव्हा माहेराला गेल्या होत्या.

            खूप रात्री झोकांड्या देत पाटील वाड्यात आले.. पण आता मुख्य वाड्यात रात्रीची वेळ असल्यामुळे अनुश्री शिवाय कोणच नव्हते.रात्रीच्या अंधारात सर्वत्र शांतता पाहून आणि कमलाबाई व रुतुबाई दिसत नसल्यामुळे त्यांनी जोरात रघूला आवाज दिला..... त्यांच्या आवाजासरसी रघु पटकन धावत आला......


"जी मालक......"   

रघु

"ते बाईसाहेब व आईसाहेब कुठ हायेता, त्यांना पाठवून द्या....भूक लागली हाय . "

            झोक्यावर बसत ते रघु ला म्हणाले.

त्यावर तो म्हणाला,

"त्या आताच मागच्या खुलीत गेल्यात...अन रुतुबाई साहेब तर माहेराला गेल्यात.....म्या जेवायला वाढायला अनुश्री बाईसाहेबस्नी बोलावतो....."


"ठीक आहे.....जेवायला वाढायला सांगा त्यांना आमास्नी अन आम्ही आमच्या खोलीत वाट पाहतो तवा तिथंच घिऊन यायला सांगा......न रात्र खूप झाली आहे तवा दरवाजा लावुन तू पण झोपायला जा....."

असे म्हणत ते झोकांड्या देत वर त्यांच्या खोलीत निघून गेले.

इकडे रघु अनुश्रीला निरोप द्यायला तिच्या खोलीकडे गेला. अचानक दरवाजा वाजल्यामुळे  ती थोडी गडबडली.., पण त्याचा निरोप ऐकून ती गडबडीने खाली उतरून स्वयंपाक घरात गेली .


अन्न गरम करुन तिने ताट तयार केले आणि ती ताट घेऊन पाटलांच्या खोलीत गेली न तिथेच तिचा घात झाला........