Login

तिचं अस्तित्व भाग -30

नाचणारीच्या मुलीची कथा
मागील भागात आपण पाहिलं की, द्विधा मनःस्थितीत राजन होते आणि अनुश्रीसोबत बोलावे म्हणून ते तिच्याकडे आले होते, आता पाहूया पुढे....

आज दुपारी थोडा वेळ तिथेच आराम करावा, दुपारची वामकुक्षी सुद्धा तिथेच घ्यावी आणि तिच्याशी बोलावे, तिला काही गोष्टींची कल्पना द्यावी शिवाय तिला त्यांच्यासोबत शहरात यायला आवडेल का हे जाणून घ्यायचे म्हणून ते तिच्या खोलीकडे गेले.

ते तिच्या खोलीच्या दाराजवळ गेले आणि दारातच थिजल्यासारखे उभे राहिले.

अनुने तिचे केस मोकळे सोडून त्यातून हात फिरवत.. त्यातील सुगंध अनुभवत होती. समोरच्या मोठ्या आरशात पाहून ती स्वतःला गुंग होऊन न्याहाळत होती..!

त्यात ती एकटीच तिच्या खोलीत असल्यामुळे मोकळेपणाने हे सगळं करत होती, पण खाली वाकून केसात हात घालताना तिचा पदर अनाहूतपणे खाली ढळला होता आणि कुणीच येणार नाही ह्याची खात्री असल्यामुळे तिने तो तसाच राहू दिला. तिचे ते मुक्त सौंदर्य पाहताना राजन मात्र हरवून गेले होते आणि तिच्याकडे बघतच ते दारातच थांबले.

आकस्मिक तिची नजर दाराकडे वळली. समोर उभे असलेले राजनला पाहून ती एकदम लाजली. ती एवढी बावरली की खाली पडलेला पदर सुद्धा तसाच राहिला.

इकडे राजनने पुढे होत मागच्या मागे हाताने दार बंद करून घेतले. ते एखाद्या कळसूत्री बाहुलीप्रमाणे अनुश्रीकडे खेचले गेले..!

एव्हाना ते तिच्याजवळ पोहोचले सुद्धा तरीदेखील ती काहीही न सुचून तिथेच कपाटाच्या आरश्याला टेकून उभी राहिली...

राजनने पुढे होत तिच्या लांब सडक केसात आपली बोटे गुंतवली आणि हळुवारपणे पुढे आलेल्या बटा मागे घेत तिच्या खांद्यावर हात ठेऊन तिला ते एकटक पाहत राहिले.

इकडे अनपेक्षितपणे ते समोर येऊन काय करतील याचा अंदाज न आल्यामुळे अनुश्री नखशिखांत थरथरत होती..! तिचे हातापायाचे तळवे घामाने ओलावले आणि तिची मान तिने खाली घातली होती. पायाचे दोन्ही अंगठे ती एकमेकांवर घासत होती.

राजन तिच्या इतक्या जवळ आले होते की तिला हालचाल करणे देखील कठीण झाले होते.
त्यात त्यांची पकड देखील मजबूत होती.. ते एकटक तिच्या गुलाबी थरथरणाऱ्या ओठांच्याकडे पाहत होते. ते ओठ आणि त्या मोकळ्या केसांनी आज त्यांना वेड लावले होते..! त्यात तिच्या गालावर लज्जा उत्पन्न झाल्यामुळे ते गुलाबी झाले होते. जे त्यांना मोहवून घेत होते.

पुढच्या क्षणी त्यांचा चेहरा जवळ येताच अनुश्रीचे डोळे आपोआप मिटले गेले..! थरथर अजूनच वाढली आणि आता तर काय हृदयाची धडधड देखील इतकी वाढली की त्याचे ठोके राजनच्या कानावर जातील की काय असे वाटत असतानाच, राजनने तिच्या ओठांवर ताबा मिळवला..!

तिचे दोन्ही कान त्यांच्या भरगच्च हातांच्या मध्ये झाकले गेले होते आणि तिच्या पूर्ण चेहऱ्याचा ताबा घेतला होता त्यांच्या ओठांनी...!


हे सगळंच अनुश्रीसाठी नवीन असले तरी हवेहवेसे वाटणारे होते...! ती सुद्धा त्यांच्यामध्ये गुंग झाली. थोडा वेळ असाच गेल्यावर त्यांनी तिला आपल्या बाहुपाशात उचलून आतल्या बाजूच्या पलंगावर नेऊन आडवे केले...! तिला काहीतरी सांगायचे होते खरं तर त्यांना .! पण बोलायला ओठ उघडतील तेव्हा सांगणार ना....

पलंगावर पडून देखील अर्धा तास झाला तरी राजन काही तिला सोडत नव्हते. तिला मिठीत आणि ओठांमध्ये बंदिस्त केलं होत आणि आपलं हे लाजाळूचं झाड... बोलायचं असून देखील बोलत नव्हते आणि शांत राहून ती सुद्धा सर्व काही आनंदाने अनुभवत होते. सुखाचे क्षण होते त्या दोघांसाठी....... दोघेही ते अनुभवत होते.

पण तेवढ्यात दार वाजले...

"छया..... आता ह्या वेळी कोण आलं असेल.....?"

असं म्हणून ते नाराजीनेच उठले, तशी अनुश्री हसली, तेवढ्यात त्यांनी दरवाजा उघडला......

दारात शेवंताला बघून त्यांनी विचारलं.....,

"काही हवं होत का.....?"

"ते मोठ्या पाटलांनी तुमास्नी सांगावा धाडलाय. ते सांगायला आलती......."

ती जरा चाचरत त्यांचा स्वर ओळखत म्हणाली.......,

"ठीक आहे.... येतो आम्ही......"

मोठ्या भावाचा निरोप असल्यामुळे इच्छा नसून सुद्धा ते जायला निघाले. पण जाता जाता....

"ऐका...... आज रात्री काहीही झालं तरी मी येईपर्यंत झोपु नका, बोलायचं आहे तुमच्याशी.....खूप महत्वाचे...."

असे म्हणत हसून राजनराव खाली निघून गेले......

अनुश्री देखील ते ऐकून गोरीमोरी होत लाजत काय बोलावे हे न समजून हसली आणि तिने मान डोलावली.....

इकडे शेवंता थोडा वेळ तिथेच थांबली, आणि तिने मुद्दाम आत डोकावून पाहिले,

अनुश्रीचा गोरामोरा झालेला चेहरा आणि विस्कटलेले केस आणि चादर पाहून ती खूप खुश झाली आणि पटकन आतमध्ये येऊन म्हणाली,

"ताई साहेब सुखाची अनुभूती झाली तर......"

अनुश्रीने फक्त लाजून मान डोलावली, तशी शेवंता तिच्या जवळ जाऊन तिची माया मोडून पटकन निघून गेली, ते ती ती थेट स्वयंपाक घरात गेली.

बाजूला काम करत असलेल्या कमलाबाईंच्या जवळ जाऊन म्हणाली,

"बाईसाहेब आज रातच्याला आपली समद्याची इच्छा पुरी व्हईल बगा....."

"शेवंते हे अस कोड्यात न बोलता नीट बोल काय ते...."

सुपातले तांदूळ निवडत कमलाबाई म्हणाल्या....

"छोटे पाटील आणि ताईसाहेब लवकरच गोड बातमी देणार बघा....."

असं म्हणून तिने वर पाहिलं ते सगळं कमलाबाईंना सांगितलं...

तस खुश होत वर बघत हात जोडत त्या म्हणाल्या......,

"देवा.... तूच आहेस बाबा... लवकर तो दिवस आण .."

शेवंता घरकाम करणारी असली तरी कमलाबाईंची खूप खास होती. अगदी लहानपणापासून ती तिथे काम करत होती.

इकडे दुपार टळली पण अंगावर आलेली दुपारची सुस्ती आणि हवेतला पावसाळी गारवा मनात करीत असलेली मस्ती काही केल्या अंगातून उतरत नव्हती राजन रावांच्या! त्यांच्या मनावर अनुश्रीचा कैफ चढला होता.....

निरोप आल्यामुळे ते नाईलाजाने भावासमोर जाऊन बसले खरे तर, पण मनावर चढलेली धुंदी आणि ओठावर आलेली नशा पुन्हा पुन्हा त्यांचे कामातले लक्ष उडवत होती..! त्यांचं कामात लक्ष लागत नव्हतं की हिशोब जुळत नव्हता. त्यांना कधी एकदा आपण अनुश्रीकडे जातो असं झालं होत.

थोडा वेळ त्यांनी कसा तरी घालवला पण तेवढ्यात तोच सईची देखरेख करणारी आजी बाई तिथे आली.... त्यांना कामात पाहून तिने जोरात आवाज दिला

"छोटे पाटील .... आव..... पाटील ... तुमास्नी छोट्या सई बाईंनी सांगावा धाडलाय...."

"सई ने .... ते आणि का बर....."

त्यांनी त्या आजीला विचारलं,

"मी पडली नोकर माणूस मला काय बा ठाव.... पण तुमी लगोबगी चला बर..... त्या तिथे वाट बघतात.. रडत हायेत..."

असं म्हणून ती आजी निघून गेली सुद्धा.

इकडे छोटी सई तिच्या आईची निलमची आठवण काढत बसली होती, तिच्या फोटोजवळ जाऊन रडत होती. राजनला तिला असं बघून काय झालं तेच समजेना त्यांनी तिला जवळ घेतलं आणि म्हंटल..,

"सई बाळ काय झालं? तुम्ही अश्या रडत का आहात?"

"ते बाबा ... मला ना आज आईची खूप आठवण येते .. तुम्ही आज माज्याच जवळ झोपा ना...."

असं म्हणून ती राजनच्या गळ्यात पडली, राजनने ही तिला जवळ घेत शांत केले आणि तो देखील निलमच्या आठवणीत मागे गेला.

खरं तर निलम आणि राजन..... ते दोघेही एका सुंदरशा मैत्रीच्या नात्यात आधी पासूनच होते..! त्यांच्या वडिलांच्या मित्राची मुलगी निलम. त्यामुळे तिला लहानपणापासून भेटत आले होते राजनराव. ती सुद्धा मोकळेपणाने त्या घरात वावरली होती आणि त्या दोघांची लहानपणापासूनच घट्ट मैत्री झाली होती.  त्यामुळे तिची प्रत्येक गोष्ट, तिला काय हवं काय नको, तिचा स्वभाव सगळं काही बऱ्यापैकी जाणून होते ते...

तिचं बालपण अतिशय वाईट गेलेले. आई आणि भावंडे दोघेही सावत्र! त्यामुळे त्यांनी काही तिला नीट वागणूक दिली नाही. तिचं लग्न झाले आणि दीड वर्षात तिचे वडील गेले.त्यामुळे आई आणि भावंडांनी फक्त दिखावा म्हणून तिसऱ्या महिन्यात बाळंतपण करायला तिला माहेरी नेले.. पण तिथे तिचे अतोनात हाल केले तिच्या मनाचे, शरीराचे आणि छोट्या बाळाचे देखील!

खरं तर आधी मुलगा हवा म्हणून तिने हट्टाने बाळ राहून दिल पण मुलगी झाली! पण नशिबाने राजन तिला सोडून गेले नाही उलट घरी आणून त्यांनी तिची देखरेख केली.


पुढे काय होईल,.....????
अनुश्री राजन एकत्र येतील का??
त्यासाठी वाचत राहा,
क्रमश

🎭 Series Post

View all