Login

तिचं अस्तित्व भाग -29

नाचणारीच्या मुलीची कथा
मागील भागात आपण पाहिलं की, राधाक्का आणि राजन बोलत असतानाच तिथे अमोल राव आले आणि त्यांच्या कानावर ह्या दोघांचे संभाषण कानी पडले; तसे त्यांचा राग अनावर झाला आणि ते तावातावाने त्या दोघांजवळ आले..... आता पाहूया पुढे........,


"म्हणजे बघा ना एका अर्थाने आम्हाला एकमेकांना ओळखायला, एकमेकांचे स्वभाव आवड निवड जाणून घ्यायला थोडा वेळ देखील मिळतो आहे..! त्यात वय लहान आहे त्यांचे.. त्यामुळे थोडा काळ अजून जावा असे आम्हास वाटते!"

हे सगळं राजन राणूक्काना बोलत असतानाच अमोलराव तेथे आले, जाता जाता त्यांनी त्यांचं सगळं बोलणे ऐकलेही होते आणि कमलाबाईंनी सुद्धा सांगितले होते त्यांना थोडंफार...

त्यामुळेच त्यांच्या रागाचा पारा भलताच चढलेला होता! आता तर त्यांना आयत कोलीत हातात भेटलं होत.



"काय..... काय म्हणालात ..पुन्हा हे बोलायचं न्हाय.... की ....त्यास्नी समजून घिऊ.... आणि काय ते म्हणालात..... हा...फुलायला येळ दिऊ...त्या काय फुल आहेत का जे तुमी वाट बगत आहात???...आम्ही काही रुपये रोख मोजले आहेत त्यांचे....अजूनही काही गोष्टी दिल्यात.... शिवाय त्यांच्या कुटुंबाच समदं आपण पाहणार आहोत. ही गोष्ट ध्यानात ठिवा........! मन आणि शरीर पाहत बसलात तर.... येळ निघून जाईल....... तसबी आबासाहेबानी मृत्युपत्रात आमची जमेल तशी वाट लावली आहे अजून तुमी लावू नका, सगळी संपत्ती निघून जाण्याआधी ह्या घराला वारसाच तोंड दाखवा....म्हणजे उपकार व्हतील आमच्यावर."

"पण दादासाहेब ...एकदा ऐका तर आमचं म्हणणे ........."

राजनला बोलून न देता अमोल राव म्हणाले,

"पण बिन काय न्हाय.....न काय ऐकू म्या तुमचं...ते त्यांचं वय लहान न अजून काय सांगू नगा ..... त्यांच्या वयात आपल्या आईसाहेबांस्नी म्या झालो व्हतो अन रुतूबाईंना राधाई झाल्या व्हत्या.......तरी आम्ही तुम्हास तुमचा निर्णय अगुदरचच इचारला व्हता...... व्हता की नाय....."

अमोलराव जोरात ओरडले तसे राजनने फक्त मान हलवली.....

"तवा तुमी तयार झालात मग आता काय जाले ..... आणि हे बी ध्यानात ठिवा होता की तुमी या संबंधास तयार नसणार तर आमी आहोत खमके ह्या वयात बी....तवा म्या आईसाहेबांची किंवा रुतू बाईची पण  गय करणार न्हाय...."

ते ओरडून म्हणाले तस राणूक्का आणि राजनने चमकून त्यांच्या कडे पाहिले.....त्यांच्या नजरेत सगळं काही दिसून येत होत......


"अमोलराव, अहो काय बोलता तुम्ही....??

राणूक्का बोलतच होत्या की त्यांना थांबवत ते म्हणाले,

"काय बोलता म्हंजी काय अक्कासाहेब ......तुमी चार बुके काय शिकलात म्हणून उडायला लागलात की जमिनीवर राहावं बाई माणसाने. तुमी आम्हाला शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. उलट ह्यास्नी समजवा आणि हे देखील त्यांना सांगा जमत नसेल तर तसे सांगावे त्यांनी...! त्या पोरीला त्या साठीच आणलंय.... या घरासाठी मुलींची कमी न्हायी ...... काही..... कुणीबी तयार व्हईल...... तसंच एक मुलगी या घरासाठी जड देखील नाही! तवा हे येड सोडा आणि लवकरात लवकर या वाड्याला वारस मिळवून द्या! नाहीतर तुमी आहात आणि आमी आहोत......."


असे म्हणून ते रागात पाय आपटत आल्या पावली तिथून निघून गेले.....


"राजन, ह्याचमुळे वाहिनीसाहेब अन रुरुबाई घाई करत आहेत, वेळ आहे तोवर लवकर काहीतरी मार्ग काढा नाहीतर अमोलराव नक्कीच डाव साधतील."

राणूक्का म्हणाल्या तस त्यावर त्यांनी फक्त मान होकारात डोलावली अन ह्यावर काहीही उपाय नाही असा विचार करून त्या क्षणी दोघेही अजून काहीही न बोलता आपापल्या कामास निघून गेले..


**********************************


इकडे पावसाळा काही संपत नव्हता.... त्याने खूप थैमान घातलं होत...... गारवा देखील खूप पडू लागला होता रात्रीचा...! इकडे अनुश्रीच मन मात्र चलबिचल झालं होत. राजनरावांची तिच्या नकळत तिला सतत पाहत असणारी चोरटी नजर आता तिच्या ह्रदयाची धडधड वाढवीत होती..! तिला त्यांचा स्पर्श हवा होता. पण त्या रात्री नंतर सलग आठ दिवस राजन त्यांच्या खालच्या खोलीतच झोपायला जात होते...!

कारण सईला ह्या वातावरणामुळे ताप आला होता. त्यामुळे तिला सोडून वर झोपायला येणे त्यांना काही केल्या वाटत नव्हते आणि नशिबाने या कारणावरून अमोलराव किंवा अजून कुणी देखील त्यांना काहीच बोलू शकत नव्हते..!

पण या आठ दिवसात वाड्यात फिरताना झालेली अचानक भेट,... जेवण वाढत असताना झालेली नजरा नजर आणि जेवण झाल्यावर हात धुवून आजूबाजूला कोणी नाही असे पाहून अलगद त्यांनी केलेला हाताला स्पर्श...!


खूपच वेगळे, हवेहवेसे वाटणारे होते हे सगळं तिच्यासाठी ...! हळूहळू फुलत जाण्याची मजा अनुभवली होती तिने या आठ दिवसात..! प्रेमात पडत चालली होती ती त्यांच्या......! ह्याच काळात राजन राव सुद्धा आपल्या मनाची तयारी करत होते....... सोप्पे नसते हो....... सहजपणे पहिल्या आठवणी मनातून काढून टाकून सगळा मनाचा कागद कोरा करणे...! एका माणसाला काढून दुसऱ्याला स्थान देणे.....! दोघीना बरोबरीने वागवणे हेच त्यांना जास्त महत्वाचं वाटत होत. पुरुषांना देखील मन असत, हे त्यांच्याकडे बघून समजत होत.


तस पाहायला गेलं तर एक नवे पर्व सुरू करताना आधीचा भूतकाळ न विसरता त्याच्या सोबत जगायची तयारी करणे म्हणजे पुरुषांसाठी तारेवरची कसरत! त्यात पुरुष माणसे कुणाशी मोकळेपणाने बोलू शकत नाही... कि मनाने कमजोर स्वतःला दाखवू शकत नाहीत. सगळंच कस आकलण्याच्या पलीकडलं. त्यात घरात घाई होती वारसाची आणि अनुश्रीच वय लहान त्यात अमोलरावांचा हट्टी स्वभाव, कात्रीत अडकले होते राजनराव.


पण हळूहळू ते ही सगळं जमेल तस जमवत होते. स्वतःची मनस्थिती सांभाळून अनुश्रीला कसा वेळ देता येईल याचा विचार करत होते ते. मनाचा तोल सांभाळणे त्यांना जड जात होते...

त्यात आज काहीही करून त्यांना त्यांचे ते कार्य साध्य करणे गरजेचे होते. कारण दुपारीच कमला बाई त्यांना निक्षुन सांगून गेल्या होत्या. त्यांचं बोलणे त्यांना आठवलं......,


"हे पहा राजनराव, खरं म्हंजी तुमच्या आईने ही गोष्ट तुम्हास सांगणे म्हणजे खूप चुकीचं हाय. पण करणार काय.. तुम्ही कोणता पर्याय नाही ठिवला...... तुमी कायबी करायला तयार नाहीत..... लक्षात असुद्या पुढच्या एक दोन दिवसात अनुश्रीचा महिना येईल..... मग परत काही दिवस जातील आणि तुमास्नी सहरात पण जायचं आसल..... जर तुमी आज काय नाही केल.. तर तुमचे वडीलभाऊ काय करू शकतात तुमास्नी चांगलं ठाऊक हाय.... तवा घाई करा.... त्या पोरीचं आयुष्य नासू दिऊ नगा..... म्या तुमच्या पुढे हात जोडते....."


त्याचाच विचार ते करत होते.... आईसाहेबांचं म्हणणे रास्त होत.... त्यांच्या मोठया भावाचा काहीही भरोसा नव्हता. आजकाल तो विचित्र वागू लागला होता. त्यामागे कारण होत तरीही. काही काळ इथे घालवून नंतर अनुश्रीला देखील सोबत नेऊन तिच्यासाठी पूर्ण वेळ द्यायची त्यांची इच्छा होती. म्हणजे तिला घेऊन त्यांना शहरात जायचं होत... पण त्यासाठी त्यांचे भाऊ तयार होतील की नाही हा प्रश्नच होता.

खरं तर त्यांचे शहरात जाणे आणि महिन्यातून काही वाड्यावर येणे हे वाड्यासाठी आणि बाकीच्यांसाठी काही वेगळे राहिले नव्हते...! गेल्या दोन वर्षांपासून सर्वांनाच सवयीचे झाले होते. पण अनुश्री तिला ह्याची सवय सोडा पण कल्पना सुद्धा नव्हती.शिवाय सईला इथे काहीही त्रास नव्हता... पण अनुश्रीबाबत त्यांच्या मनात कसलीही खात्री नव्हती.... कधी त्यांच्या भावाच्या मनात काही चुकीचं आलं आणि ते तेव्हा काय करतील ह्याची कल्पना त्यांना करवत नव्हती....

तस पाहता शहरात त्यांचं स्वताचे घर होते.. ह्या वाड्याएवढी जागा नसली तरी मोठा दहा बारा माणसे राहतील असा बंगला होता तो.....! आजूबाजूला जास्त वर्दळ नव्हती आणि एक घरगडी तिथे होता आणि मुख्य म्हणजे आत्त्या म्हणतात तशी मोकळीक मिळणार होती..! त्यांच्या नात्याला..... अनुश्रीला आणि त्यांना सुद्धा.... मनावर कुठलेही दडपण राहणार नव्हते..... शिवाय महिन्यातून एखादे संगीत, नाटक, किंवा जवळच कुठे तरी फिरायला जाणे.. हे सुद्धा झाले असते... अनुश्रीची शिक्षणाची इच्छा पूर्ण करणे सहज शक्य होत.... शिवाय तिची सोबत अनुभवताना एक निराळाच आनंद देखील मिळणार होता.. .. असे एक ना अनेक कितीतरी विचार डोक्यात साठवत ते त्याच विचारात अनुश्रीच्या खोलीत पोहोचले.

आज दुपारी थोडा वेळ तिथेच आराम करावा, दुपारची वामकुक्षी सुद्धा तिथेच घ्यावी आणि तिच्याशी बोलावे, तिला काही गोष्टींची कल्पना द्यावी. शिवाय तिला त्यांच्यासोबत शहरात यायला आवडेल का हे जाणून घ्यायचे म्हणून ते तिच्या खोली कडे गेले.

ते तिच्या खोलीच्या दाराजवळ गेले आणि दारातच थिजल्यासारखे उभे राहिले.

असं काय पाहिलं असावं त्यांनी असे तिच्या खोलीत?

राजन अनुश्रीला स्वतः सोबत घेऊन जाऊ शकतील का...?

पुढे काय होईल,.....????

त्यासाठी वाचत राहा,
क्रमश

🎭 Series Post

View all