Login

तिचं अस्तित्व भाग -28

नाचणारीच्या मुलीची कथा
मागील भागात आपण पाहिलं की, आजीच्या बोलण्यामुळे अनुश्री खूप दुखावली गेली होती, पण सईच्या जवळ जाण्यामुळे तिची कळी खुळली.... पण थोड्या वेळात तिला समजलं की कमळाबाई व रुतूबाई सुद्धा तिच्यावर रागावल्या आहेत... पण त्या मागचं कारण काही केल्या तिला समजलं नाही..... आता पाहूया पुढे.......,

अनुश्रीला रडवलेले पाहुन राणूक्का तिच्याजवळ गेल्या,


"काय हो, अनुश्रीबाई रात्री झोप लागली ना शांत....? की झोपच नाही आली....."

राणूक्काने खट्याळ पणे विचारलं, पण तेही अनुश्रीला समजल नाही.... ती तर ह्याच विचारात होती की, आईसाहेब व ताईसाहेब का रागावल्या असतील......,??? त्यामुळे ती पटकन बोलली.......,

"हो तर आक्कासाहेब, अगदी शांत लागली झोप....! ते ह्यांची वाट बघत रात्री पुस्तक वाचत होती....., तर वाचता वाचता कधी झोप लागली ते देखील समजलेच नाही.. सकाळीच जाग आली मला !"

"ऐकलंत का.....वाहिनीसाहेब .?"

असे म्हणत राणूक्का हसून कमलाबाईंच्या कडे पाहू लागल्या आणि परत त्यांना म्हणाल्या....,

"तरी मी तुम्हाला म्हणालेच होते की रात्री खूप उशिरा पर्यंत चिरंजीव खालीच दिवाणखान्यात कामात होते...... ते जाईपर्यंत ही झोपली नसेल तर मिळवली!"


ते आठवून त्यावर कमलाबाई काहीच बोलल्या नाहीत, त्या तिथून जाऊ लागल्या पण जाता जाता राणूक्काला म्हणाल्या....,

"वन्स....., तिथे काही फळे आणि दूध आहे....ते तिला खायला द्या......"

तस हसून राणूक्का हो म्हणाल्या आणि अनुश्रीकडे वळून त्या तिला म्हणाल्या....,

"बघितलं, रागावल्या त्या.... पण त्यांचा जीव देखील आहे हा तेवढाच.... आता खाऊन घ्या बर..... आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे."

तस नंदी बैलासारखी तिने मान डोलावली आणि पुढ्यात आलेले खाऊन घेतलं.... त्यानंतर ती राणूक्का सोबत तिच्या दालनात गेली.

"ये बस.... तुला माहित आहे... वाहिनीसाहेब अन रुतुबाई आज का रागावल्या तुज्यावर ते ????"

नाही माहित म्हणून तिने मान डोलावली आणि अंग चोरून राणूक्का जवळ बसली.

"... बर मग मला सांगा...... आज तुमचं एकत्र स्नान झालं ....?"

राणूक्काने असं विचारातच तिने विचार करत उत्तर दिल....

"उम्म्म.... असावी काहीतरी प्रथा किंवा विधी म्हणून.... एवढ्या विधी झाल्या त्यातलीच एक......"

अनुश्री उत्तरली.... तस हसून राणूक्का तिच्या हातावर हात ठेवत म्हणाल्या.....,

"नाही अनुश्री......!... तुला ह्या घरात का आणलं आहे माहित आहे ना ......? लवकरात लवकर ह्या घराला कुलदीपक मिळावा म्हणून आणि म्हणूनच तुला या घरात सर्व विधी पार पाडून आणले आहे.... म्हणजे पुढे कुणी आक्षेप घेऊ नये...."

थोडं थांबून मोठा श्वास घेऊन त्या परत म्हणाल्या,

"खरं तर...... काल रात्री तुमच्या मध्ये काही झाले की नाही हे समजण्यासाठी......."

"हा पण ते कस समजेल.... न अजून काय व्हायला हव होत......"

भाबडेपणाने न समजून अनुश्रीने विचारले......,

"तेच समजण्यासाठी एवढ्या स्त्रिया जमल्या होत्या....... आणि हे त्या तुझ्या चालण्या, बोलण्यावरून, दिसण्या वरून समजणार होत...... पण बघ ना ती संधीच त्यांना मिळालीच नाही... ना तुमच्या पलंगावरची फुले विस्कटली..... की नाही चादर माखली........ ना तुझे कुंकू फिसकटलं... ना तुझ्या अंगावर नखं रुतलेली दिसली..... की नाही कुठे दातांचा ओरखडा.... की नाही कसल्या खुणा......"


तिला समजावत राधाक्का म्हणाल्या......

"पण हे सगळे का होईल...? आणि चादर का माखेल मी स्नान करूनच झोपते. अन मला कोण कश्याला ओरखडे काढेल.....  मी बरे काढून देईन त्याला !"

तिच हे निरागस बोलणे ऐकून राणूक्काला खूप हसायला आलं......

"मग तू ह्या घराला वंश कसा देशील..?.. "

"हा मग काल पाटील माझ्या शेजारीच झोपले होते पण....... ते झोपले इतके पुरेसे नाही का....???? त्यासाठी हे सगळे का व्हायची गरज? ओरखडे काढून काय बाळ होत??? ते जवळ झोपले म्हणजे होईलच ना बाळ......"

आता कपाळावर हात मारायची वेळ राणूक्कावर आली, त्या जे समजायचे ते समजून गेल्या होत्या...!

अनुश्री ह्या सगळ्या गोष्टींपासून अनभिज्ञ होती..! तिला पती-पत्नी मधील संबंधच मुळात माहित नव्हते. कसे माहित असणार ना...... अठरा वर्षाची आई जवळ असून नसलेली तिच्याशिवाय वाढलेली पोर, जवळचे सांगणारे, समजवणार बाईमाणूस कोणीच नव्हते...! खरं तर काल कमलाबाई बोलल्या होत्या ह्या गोष्टी पण मर्यादेत... अगदी थोडके मोडके....... पण ते काही तिला समजलं नव्हतं.......!

तेव्हा हळू हळू करून तिला समजावून घेऊन.., सगळं सांगून करणे महत्वाचे होते........! असा विचार करून त्यांनी आपल्या समंजस आणि शिकलेल्या भाच्याला म्हणजे राजनकडे हा विषय बोलायचे ठरविले आणि अनुश्री च्या कलेने घ्यावे असे बोलावे म्हणून त्या तिथून जायला निघाल्या...... पण दारात जाऊन परत वळून विचारात गढलेल्या अनुश्री ला म्हणाल्या.....

"तुमचं म्हणणे बरोबर आहे...... पण सगळेच नाही.. ऐका बर...... तुमचे पती.. राजनराव या बाबतीत तुम्हास सगळं समजावून सांगतील हा..... आणि करवून देखील घेतील....... तेव्हा तुम्ही विचार नका करू...... "

एवढे म्हणून त्या तडक तेथून निघून राजनसोबत बोलण्यासाठी त्यांच्या दालनाकडे गेल्या........

राणूक्काला अनुश्री चांगलीच कळली होती..... अनुश्री म्हणजे काही मुले जन्माला घालणारे मशीन नव्हती तर अत्यंत संवेदनशील असणारी नाजूक मनाची अजाण, बालिश मुलगी होती. ती हुशार तर होती, पण सर्वाना आपलेसे करणे, चूल सांभाळणे, नव्या योग्य गोष्टी वापरून सगळं सांभाळून नवीन गोष्टींची निर्मिती करणे ह्यात हातोटी होती तिची....! शिवाय काही कला देखील तिच्या अंगात होत्या.......!

पण...... पण नवरा-बायकोचे ते नाजूक नाते अजून तरी तिला अवगत नव्हते...! आणि ते तुम्ही हळुवारपणे तिच्या मनाचा ठाव घेत तिला अवगत करून द्या.. हेच सोप्या शब्दात सांगायला आत्याबाई राजनरावांच्या कडे आल्या होत्या..!

इकडे राजन सुद्धा सकाळी झालेल्या गोष्टींचा विचार करत होता...... झालेल्या सर्व गोष्टी त्यांच्या मनाला फारच उद्विग्न करत होत्या...! त्याचाच विचार करत बसले होते ते........!

त्यांना तस पाहून राणूक्काने दारावर टकटक करून विचारलं.........

"आम्ही यावे का आत ? कामात आहात का???"

त्यांना बघून राजनच्या चेहऱ्यावर त्याही परिस्थितीत हास्य उमटले....... आत्त्या आणि भाच्याचे नाते फार जवळचे आणि आपुलकीचे..... त्यात ह्यांचे तर खूपच जिव्हाळाचे.......! आईपेक्षा जास्त त्यांना त्यांच मन समजत होत......

निलमच्या आजारपणाच्या सुरवातीच्या काळात देखील राणूक्कानेच ओळखून सांभाळली होती..... ती परिस्थिती आणि त्यांच्या मनाची अवस्था सुद्धा तसेच खूप प्रमाणात सावरले देखील होते त्यांना......! त्यामुळेच आता त्यांना आलेल पाहून राजनराव खूपच आनंदित झाले.

नाजूक विषय असल्यामुळे राणूक्का थोडं सांभाळून बोलण्याचा विचारातच होत्या.. थोडा वेळ ते दोघे एकमेकांकडे पाहत होते......

शेवटी राणूक्काच बोलल्या...

"निलमच्या दुःखातून तुम्ही सावरत आहात हळू हळू! हे पाहून बर वाटलं मनास .!त्यात अजून एक गोष्ट समजली त्यामुळे मनापासून आनंद झाला म्हणून कौतुक करायला आले आहे..बर .!"

राजनराव अचंबित होऊन त्यांच्याकडे पाहू लागले......,

"कौतुक.... कसले बर आत्यासाहेब.....? "


न समजून त्यांनी विचारले...

"काल तुम्ही दाखविलेली सबुरी.... कोणतेही फुल अलगद तोडून त्याचा सुगंध आणि आनंद मनात साठविण्याची मजा वेगळीच........... पण तेच फुल कुस्करून टाकण्यात नाही. हे तुम्हाला चांगलंच जमत.....! उलट अशाने ते खराब होऊन जाते..! आणि हे आपण पुरते जाणले..! महत्वाचं काय तर जुन्या रासवटी कल्पनांना छेद देत आलेल्या मुलीचे मन राखले...! यासाठी! काहीही घाईगडबड नाही केली......!"

राणूक्का म्हणाल्या......,

"आत्या अहो...... मला त्यावेळी जे योग्य वाटले तेच केले! ह्यात कौतुक करण्यासारखं काहीही नाही..... मलाही मन आहे......... इच्छा आहेत, पण ओरबाडून सुख नाही मिळत, फक्त वासना शमते!.... हे मला चांगलंच ठाऊक आहे आणि खरं सांगायचं झालं तर...... मला सुख जसे घ्यायचे आहे तसेच ते द्यायचे देखील आहे..! आणि आत्या खरं तर या वाड्यातील कोणीही काहीही म्हणाले तरी दुसरा घरोबा करताना मनाला येणारी अडचण शरीराला आपोआपच थांबवत आहे...!"


आत्या अगदी भारावून त्यांच्या कडे पाहत होत्या...... थोडं थांबून ते परत म्हणाले....,

"ह्याने एक फायदा देखील होईल बघा........"

"तो आणि काय........?"

राणूक्काने न समजून विचारले,

"म्हणजे बघा ना एका अर्थाने आम्हाला एकमेकांना ओळखायला, एकमेकांचे स्वभाव आवड निवड जाणून घ्यायला थोडा वेळ देखील मिळतो आहे..! त्यात वय लहान आहे त्यांचे.. त्यामुळे थोडा काळ अजून जावा असे आम्हास वाटते!"

हे सारे राजन राणूक्काना बोलत असतानाच अमोलराव तेथे आले,.... जाता जाता त्यांनी त्यांचं सगळं बोलणे ऐकलेही होते आणि कमलाबाईंनी सुद्धा सांगितले होते त्यांना थोडंफार...

त्यामुळेच त्यांच्या रागाचा पारा भलताच चढलेला होता!


पुढे काय होईल,.....???
अमोलराव राजनला काही बोलतील का?
क्रमश

🎭 Series Post

View all