मागील भागात आपण पाहिलं की, अनुश्री आणि राजनच्या पहिल्या रात्रीची तयारी सगळ्यांनी केली होती.... आता पाहूया पुढे......
आज कमला बाई आणि राणूक्का सईसोबत तिच्याच खोलीत झोपणार होत्या, आणि बाकीचे इतर दालनात.रात्री सगळ्याच नोकर मंडळीना सुट्टी देण्यात आली होती. आणि हे सगळे अतिशय शांतपणे कुणाला समजणार नाही, अशा पद्धतीने चालू होते. खरं तर राजन तिकडे आले की सईला ते तिच्या जवळच लागायचे पण आता त्यांना तिकडे जाणे जास्त गरजेचे होते. त्यात जे होतंय ते होऊ देणे जास्त महत्वाचे होते सगळ्यांसाठी.... ह्या वाड्यासाठी ...! राजनसाठी आणि सईसाठी सुद्धा
इकडे अनुश्री राजनची वाट पाहत बसली होती; परंतु खूप वेळ झाला तरी काही राजन तिच्या दालनाकडे फिरकले नाहीत म्हणून हातात पुस्तक घेऊन पलंगावर पडून वाचत बसली... खरेतर अशावेळी कसे वागायचे काय बोलायचे हेही तिला काहीच सुचत नव्हते...! मनात काहीही विचार येत होते... आणि तेवढ्याच आतुरतेने ती राजनची वाट पाहत होती......
इकडे राजन.. मनात असूनही मनाला समजावताना थोडे हळवे झाले होते. ते स्वतःलाच समजावत होते.... निलमसोबत प्रतारणा करणे त्यांना खूप अवघड जात होत! पण एक मन अनुश्रीकडे ओढ घेत होत.... कारण ह्या एका रात्री नंतर त्यांचे पूर्ण आयुष्य बदलून जाणार होते. शेवटी त्यांनी स्वतःला समजावलं निलम इथे असती तर ते असे वागलेच नसते, तरीदेखील निलमची पुन्हा एकदा मनापासून माफी मागत स्वतःच्या मनाला समजावत ते पुढे सरसावले.
त्यात सगळ्यांच्या म्हण्यानुसार त्यांना एक त्यांची सोबतीण मिळणार होती..... तेव्हा तिच्या आवडी निवडी, तिच्या सवयी जपत... तिच्या कलाने घेत ह्या सगळ्यांसोबत त्यांना आयुष्यात पुढे जायचे होते.. तिला समजून घेऊन तिच्याशी समरसून.. पटले तर आयुष्यभर तर चांगलेच नाहीतर किमान वंश पुढे जाईपर्यंत तरी सारे निभावून न्यायचे होते.
त्या रात्री विचारात खूप उशिरा पर्यंत ते त्यांच्या दालनात बसून काम करीत होते. त्यांच्या दालनाचा दिवा चालू बघून अखेरीस रघू अमोल पाटलांच्या सांगण्यावरून अनुश्रीकडे जायची आठवण करून द्यायला आला, तसे ते द्विधा मनस्थितीत वर गेले......
पण इकडे रात्र इतकी झाली होती की अनुश्रीच्या डोक्यावर पुस्तक खाली पडून ती कधी झोपी गेली हे तिला देखील समजले नाही.
राजन अनुश्रीच्या खोलीत आले, त्यांनी दार बंद करून घेतलं आणि पाहतात तर काय....... अनुश्री गाढ झोपेत होती... त्यांनी तिच्या तोंडावर पडलेले पुस्तक बाजूला ठेवून दिले...! तेव्हा त्यांचं लक्ष तिच्या चेहऱ्याकडे गेलं..... त्या मंद प्रकाशात तिच्या अंगावर पडलेल्या उजेडात तिचा आरक्त झालेला चेहरा आणि त्यावरील निरागस भाव त्यांनी पाहिले. मागून पुढे आलेले मोठे भरगच्च रेशमी केस.. तिच्या गुडघ्या पर्यंत येत होते... एकदम सुंदर दिसत होती ती.... तिच्या शरीराचे प्रत्येक अवयव ठाव घेण्यासारखे होते.... ते तिच्याकडे खूप वेळ तसेच पाहत राहिले......
थोड्या वेळाने त्यांनी तिला हलकेच जागे करायचा प्रयत्न केला. तिने चुळबुळ केली पण ती काही उठली नाही.. शेवटी त्यांनी तिला फक्त मिठीत घेतलं आणि ते सुद्धा लगेच झोपी गेले..... त्यांच्या मनाची अवस्था सुद्धा दोलायमान झाली होती.... त्यात दिवसभराचा मानसिक ताण..! स्वतःच्या मनाची द्विधा अवस्था.! नवीन जबाबदारी... नवा माणूस, त्याला सांभाळायला आपल्याला जमेल का? ह्या विचारात ते झोपेच्या अधीन झाले... त्यांची ती रात्र तशीच गेली!
सकाळी जरा लवकर जाग आली अनुश्रीला... तिने उठण्याचा प्रयत्न केला तर तिला अंगावर काहीतरी जड जाणवले...... तिने पहिले तर, बाजूला राजन झोपले होते.. आणि त्यांचा हात तिच्या अंगावर होता.... ते पाहून तिच्या अंगातून एक लहर गेली..... ती एकदम बावरली त्यांना पाहून.... पण रात्र सरली होती.. अगदी शांततेत.. काहीही न होताच! ह्याची जाणीव तिला झाली आणि ती लाजली.....
ती एक मिनिट त्यांच्या शांत चेहऱ्याकडे पाहतच राहिली..... निरागस वाटत होते ते..... तिने अलगद त्यांचा हात काढला आणि ते झोपलेले असताना आवाज होऊ नये म्हणून ती हळू उठली.
आवरायला म्हणून ती उठून तिच्या खोलीबाहेर आली... बाजूच्या बाथरूममध्ये तिने स्वतःच आवरलं आणि ती खाली गेली....
रीतीनुसार दोघे एकत्र असण्याच्या दुसऱ्या दिवशी त्या दोघांना सुहासिनी एकत्र अंघोळ घालणार होत्या..... त्याची तयारी आधीच शेवंताने करून ठेवली होती..... हे कमलाबाईंनी तिला आधीच सांगितलं होत... त्यामुळे ती त्याच दिशेने गेली.......
पण ती खाली उतरून आली तेव्हा सई खालच्या पायरीवर रडत बसली होती...! तिला बघून अनुश्रीला खूप आनंद व्हायचा..... ती एवढीशी गोंडस मूर्ती पाहून अनुश्रीला राहावले नाही.. आधीपासूनच तिला सईबद्दल खूप ओढ होती.... तिला असं बघून ती तिच्या जवळ गेली.. तिच्या डोक्यावरून हात फिरवत ती म्हणाली,
"सई..... काय झालं ..बाळ.... तू इथे बसून अशी का रडतेस,....... काही हवे आहे का तुला?"
"तू.... तू.... मला जेवायला देशील.... भूक लागली आहे....."
तिच्या छोट्या हातांनी पोटावरून हात फिरवत सई म्हणाली....,
अनुश्रीला ते पाहून खूप हसू आले.. आणि तिने तिला उचलून घेतलं......
"चल...., मी तुला दूध बिस्कीट देते...... चालेल.....?"
सईने मान डोलावून होकार दिला तस अनुश्रीने .. तिच्या गालावर ओठ टेकवले...... आणि तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली......
तिला दूध आणि बिस्कीट भरवत असताना सईने तिला विचारलं...
"मी तुला काय म्हणू... तुझं नाव काय......"
"माझं नाव अनुश्री..... अम्म. पण .. तू मला काय म्हणशील बर..?... "
मुद्दाम विचार करण्याची ऍक्शन करत अनुश्री म्हणाली.....
"अनु.... मा..... अनुमा.... म्हणेन मी तुला..... चालेल..... "
"हा चालेल म्हण.... अनुमा...... "
अनुश्रीला तिचं खूप कौतुक वाटलं.... तिला भरवून झाल्यावर ती तिला सोडायला स्वयंपाकघराच्या बाहेर आली की तेवढ्यात तिच्या कानावर आवाज पडला...
"ए... बये! कुठे घेऊन चाललीस सईला बाळाला? आधीच छोट्या पाटलांना नाद लावलास, आता ही पोर पण नादी लावशील की काय? तिला पण नाही सोडणार का....."
तिने मागे वळून पाहिलं तर सईची देखरेख करायला जी आजी होती, ती दात ओठ खात तिला ओरडत होती. ती तिच्याकडे पाहतच राहिली, ती काहीही बोलत नाही हे पाहून ती परत अनुश्रीवर खेकसली,
"हे बघ, तुझ्या धान्यात असुंदे..... तुला इथे फक्त वंश वाढवायला आणलं आहे.... त्यासाठीच तुला पोसणार हायता.... इथल्या स्वयंपाकघरात जाऊन ते अपवित्र करू नकोस.... तू इथली मालकीण नाहीस.... ती गेली म्हणुन काय तिची जागा घेशील?"
भरल्या डोळ्याने ती फक्त ती म्हातारी जे बोलत होती ते ऐकत होती.
"जा..... जा..... वर जा बोलावणे येईल तवाच खाली ये...... आणि हा पुण्यादा ह्या पोरीच्या जवळ यायचा प्रयत्न करायचा नाही.....!"
असं म्हणून तिने हिसकावून सईला घेतलं.अनुश्रीच्या डोळ्यात तिथेच टचकण पाणी आलं. ती म्हातारी आज्जी जितकी शांत वाटली होती तितकी तोंडात निखारे ठेवून तिच्या मनाला डाग लावून गेली.
त्याच वेळी हे सारे घडत असतानाच छोटे पाटील उठून बाहेर आले होते, आणि माडीवरून त्यांनी सगळे बोलणे ऐकले होते.... पण ते काही पुढे आले नाहीत.
तिचे शब्द फार बोचरे होते, आल्या पावली तशीच अनुश्री निघून गेली तिच्या खोलीत.... आणि धाडकन पलंगावर तिने अंग टाकून दिले.... पण थोड्या वेळाने दोन चिमुकले हात तिचे डोळे पुसत असल्याचे तिला जाणवले.
काय होणार पुढे अनुश्रीच्या आयुष्यात?
राजन असाच विषय सोडून देत राहील की तिला सोबत करेल?
क्रमश
क्रमश
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा