. तिचं अस्तित्व * भाग -18
मागील भागात आपण पाहिलं कि, अनुश्री ला काय चाललं आहे हेच समजत नव्हतं......, तिच्या गळ्यात कुणाच्या नावाचं मंगळसूत्र येणार हेही तिला माहित नव्हतं.........तर पुढच्या भविष्याची ची काहीही खात्री नव्हती........आता पाहूया पुढे.........,
खरं सांगायचं झालं तर तस पाहायला गेलं ना हे सगळे खूप अचानक होत होत पण ह्याची कल्पना तर तिला समजायला लागल्यापासून होती. त्यामुळे तिच्या मनाची तशीही तयारी होती. त्यामुळे आता तिने आहे ती परिस्थिती स्वीकारली आणि त्यासाठी तोंड द्यायला रेडी झाली.
हसतमुख चेहरा घेऊन ती बाहेर आली. ती मुळात खूप सुंदर होती. त्यावर नुकताच तरुणाईत परदार्पण केल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज चढले होते.
कासार आल्यामुळे अनुश्री शेवंता सोबत बाहेर आली आणि एका पाटावर बसली.
त्या पाटाभोंवती मस्त रांगोळी काढली होती. काही बायका सुद्धा आसपास जमल्या होत्या. आणि त्या एकटक तिच्या कडे पाहत होत्या. त्या आवाक झाल्या होत्या, तिचं ते मूर्तिमंत सौंदर्य पाहून.......
गोल गोरापान चेहरा, पाणीदार, काळेभोर, बोलके डोळे, गालावर पडणारी ती नाजूक खळी, बारीक अंगकाठी, गुलाबी गाल, आणि गुलाबी ओठ...... ♥️♥️♥️
त्या पाटावर तिला बसवण्यात आलं आणि रुतूबाईंनी तिला ओवाळून तिची खणा-नारळाने ओटी भरली.
नंतर कासाराने तिच्या हातात हिरव्या बांगड्या घातल्या. त्या घालून झाल्यावर कमला बाईंनी तिची दृष्ट काढली व तिच्या हातात दोन सोन्याच्या बांगड्या घातल्या.
ते तिचं पाहिलं स्त्रीधन होत, मग पाच सवाष्णी येऊन तिला ओवाळलं.
त्यानंतर तिला मुंडावळ्या बांधल्या आणि हळद व चंदन एकत्र करून तिथे असलेल्या सुवासिनीनी आंब्याच्या पानाने तिच्या अंगाला लावले.
काही वेळाने तिच्या हातावर मेहंदी काढण्यात आली.
आलेल्या बायकांना मानपान देऊन नंतर जेवायला वाढल.
पंगती आटोपल्यावर अनुश्री ला सुद्धा जेवायला वाढल.
तिच्या ताटाभोवती छानशी रांगोळी काढली होती, आणि तिच्या ताटात वेगवेगळे पदार्थ होते. तिचं ताट, पेला सगळंच चांदीच होत. त्यानंतर तिथे असलेल्या सगळ्या बायकांनी एक एक करून तिला जेवण भरवलं. तेपण एकदम कौतुक आणि आग्रह करून भरवलं जात होत.
आलेल्या बायकांना मानपान देऊन नंतर जेवायला वाढल.
पंगती आटोपल्यावर अनुश्री ला सुद्धा जेवायला वाढल.
तिच्या ताटाभोवती छानशी रांगोळी काढली होती, आणि तिच्या ताटात वेगवेगळे पदार्थ होते. तिचं ताट, पेला सगळंच चांदीच होत. त्यानंतर तिथे असलेल्या सगळ्या बायकांनी एक एक करून तिला जेवण भरवलं. तेपण एकदम कौतुक आणि आग्रह करून भरवलं जात होत.
तिच्या ताटात वेगवेगळे पदार्थ होते ......, जसे कि वरण, भात,, साजूक तूप, गोडाचा शिरा, पुरी, आमरस, पंचामृत, वेगवेगळ्या चटण्या ,पापड, लोणचे...असे एक ना अनेक जिन्नस वाढलेले होते.
तिचं जेवण आवरल्यावर राणूक्का तिच्या जवळ आल्या आणि म्हणाल्या.....,
"बाळ अनुश्री..., आता तु जाऊन झोप..... उद्या पहाटे सगळ्या विधी करायच्या आहेत.... पुरुषांची जेवणे आवरल्यावर मी सुद्धा तुझ्याजवळ येऊन झोपेन....तेव्हा . तू आता जा तुझ्या दालनामध्ये. "
अनुश्री ने नेहमी प्रमाणे मान हलवली आणि होकार देऊन झोपायला निघून गेली. दुसऱ्या दिवशी जे होईल ते देवावर सोडून ती झोपी गेली.
******------****------*******------******
अमोल पाटील ह्यांना दोन्ही मुलीचं....त्यांना तिसरं बाळ झाल्यास रुतू ह्याच्या जीवाला धोका होता अस वैद्य बुवांनी सांगितल होत. अमोल ह्यांचा त्यांच्या पत्नी वर खूप जीव होता, त्यामुळे दुसरं लग्न आणि तिसरा चान्स घ्यायला त्यांनी नकार दिला होता हणमंत पाटील असताना....आता राहिले धाकटे सावकार...राजन चांगले मात्र असे असूनही... त्यांची पत्नी निलम दोन वर्षांपूर्वी सोडून गेलेली, ते सई साठी दुसरं लग्न करत नव्हते ; कारण दुसऱ्या येणाऱ्या स्त्रीने सईचा दुस्वास केला तर... म्हणजे काय पाटलांचा वंश खुंटणार ना ....! ह्याची काळजी हणमंत पाटलांना आधीच होती. म्हणून त्यांनी मारण्याच्या आधी कागदपत्रे बनवून घेतले होते. ज्याबद्दल अमोल पाटलांना ठाऊक होत.
तसे पाहायला गेले तर त्या घरात काय नव्हतं ,पैसा अडका, दागदागिने, जमिनी, स्थावर, खूप सारी माणसे, मान सन्मान..... अगदी सगळं होत..... पण ह्या पाटील घराला नव्हता तो वंशाला दिवा!...... त्यासाठीच तर अनुश्री ला आणलं होत. तिच्या मुळे हे काम साध्य होईल हा निर्णय अमोल पाटलांनी घेतला आणि त्यावर त्वरित अंमलबजावणी देखील केली.
राजन राव आपल्या वडील भावाच्या सूचनेनुसार घरी आले....... आल्याबरोबर ते आपल्या पत्नीच्या निलमच्या खोलीत शिरले..! त्या गेल्यानंतर सुद्धा ती खोली तशीच ठेवली होती. ते तिच्या फोटोपाशी गेले. आणलेला गजरा त्यांनी आधी फोटोला घातला आणि नंतर एकटक बघत राहिले. हा चिरा उतरवण्याचा निर्णय घेऊन आपण निलमला व सईला दुखावणार आहोत, ह्याची चांगलीच कल्पना होती त्यांना......एवढे दिवस त्यांनी सुद्धा पुढे ढकळले पण आता काहीच पर्याय नव्हता.त्यांच्या डोळ्यासमोर त्यांचा अधुरा संसार उभा राहिला.
खरेतर त्या दोघांचे एकमेकांवर अतिशय प्रेम होते.. लग्ना नंतरचा एक वर्ष..... म्हणजे अगदी स्वर्गातले दिवस होते त्यांच्यासाठी.......
पण कोणाची दृष्ट लागली काय माहीत..?आणि सगळे होत्याचे नव्हते झाले......!
निलम दिवस गेले ही आनंदाची बातमी आली आणि राजन हवेतच उडू लागले........ पण नशीब खराब म्हणून कि काय निलम ला रक्तक्षय झाला आणि त्यातच आकडी सुद्धा यायला लागली.....खूप काळजी घेतली जायची तिची तेव्हा. निलम खूप गोष्टी लपवल्या होत्या, ज्या नंतर नंतर राजन ला समजल्या होत्या. तब्येत नाजूक म्हणून त्या माहेरी गेल्या होत्या..... तेव्हा तिथे वैद्य बुवा त्यांना म्हणाले.....,
"बाईसाहेब... तुमची प्रकृती खूप नाजूक हाय.... हे गरभार्पण तुमास्नी झेपणार न्हाय... तवा मी काय म्हणतो...तुमी सावकारांना निरोप धाडा आणि गर्भपात करून घ्या....आणि अजून एक दुसर पोर बी कधी ठेवू नका...... तुमास्नी ते काही पेलवणार न्हाय.... जीवावर बेतल.........तुमच्या...."
"समजलं अमास्नी... पण हे बाळ आम्हला हवं हाय..... तुमी काय बी उपचार करा..... आणि कुणालाही काहीही सांगायची गरज न्हाय समजलं.....हे आपल्यातच राहील."
असं म्हणून निलम ने त्या वैद्य बुवांना गप्प केल आणि हे तिने मरेपर्यंत कधीही राजन किंवा घरच्यांना समजून दिल नाही... खरं तिला अपेक्षा होती कि मुलगा होईल.... म्हणजे वंश पूर्ण होईल, घराला वारस मिळेल आणि ती दुसऱ्या मुलाचा विचार करणार नाही....म्हणून तिने होणारा त्रास कधीच कुणाला समजून दिला नाही आणि हट्टाने हे बाळ ठेवून ती मुद्दाम माहेरीच राहिली.
पण ते सगळे तिच्या अंगावर आले..... एकतर मुलगा न होता मुलगी झाली आणि कायमच अपंगत्व आलं ते वेगळं.....!
कदाचित तिने वेळेवर राजन ला सांगितलं असत तर काहीतरी करता आलं असत पण हे तिला आधीपासून माहित होत ह्यांचा थांग पत्ता मात्र निलम ने मरेपर्यंत राजन ला लागून दिला नव्हता कि तिच्या
पण माहेरच्यांनी सांगितलं नव्हतं.....!
पण माहेरच्यांनी सांगितलं नव्हतं.....!
निलम च बाळंतपण झालं..... आणि ती अंथरुणाला खिळली. त्यावेळेस मात्र तिच्या माहेरच्यांनी राजन रावांना बोलावून घेतलं. तिथे जाऊन त्यांनी जे दृश्य पाहिलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच हादरली.
निलम ची वाचा गेलेली, त्यामुळे ती काही बोलू शकत नव्हती किंवा मागू शकत नव्हती. छोटी सई सुद्धा खूप रडायची पण तिच्या माहेरचे लोक ना निलम कडे पाहत होते ना छोट्या सई कडे......!
त्यांची ती अवस्था पाहून ते त्वरित त्या दोघीना आपल्या वाड्यावर घेऊन आले, तेव्हा पासून गेली चार वर्षे वाड्यातच तिची शुश्रूषा केली जात होती.. तिच्यासाठी अणि मुलीची काळजी घ्यायला एक बाई नेमली होती. ती त्या दोघींची चांगली काळजी घेत होती.
राजन सुद्धा जातीने सर्व पाहत असायचा, बायकोला काय हवे नको, मुलीचे कौतुक, तिच्यासाठी काही बाही खेळ, भातुकली, कपडे आणणे हे ते आनंदाने करत होता.
त्या पाच वर्षात निलमच्या माहेराहून एकही व्यक्ति तिला भेटायला, तिची खुशाली विचारायला, किंवा सईला भेटायला आला नव्हता........ त्यामुळे निलम खूप रडायची..... बोलता ही जास्त येत नव्हतं..... दुसर करणार तरी काय.....! एवढंच काय तिच्या शेवटच्या दिवशी सुद्धा फक्त भाऊ यायचा म्हणून येऊन गेला.
हे सगळं आठवून त्यांना आताही खूप भरून आलं होत....,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा