
सुखी संसारासाठी तिची अट
अस्मिताच्या लग्नाला पाच वर्ष झाले होते ,पदरी एक मुलगा आणि मुलगी दिले होते ,ती तिच्या माहेरी राहत होती,मुलीला तिथेच शाळेत टाकलं होतं,ती लहान मुलांचे ट्युशन घेणं तिने सुरु केलं,केक बनवायला शिकली आणि घरगुती केकच्या ऑर्डर घेणं सुरु केलं होतं. पण मन कुठं तरी खट्टू होतं ,स्वत:च्या घरी जायची ओढ होती ,कुणा स्त्रीला वाटतं की ,आपण माहेरी राहावं. म्हणून ती साकेतला प्रेमाने समजून सांगत होती ,तुम्ही काहीही काम करा ,पण कष्टाने चार पैसे कमवा ,तुम्ही आमच्या साठी स्वत:चे पैसे खर्च करा ,मी तुम्हाला साथ देईन,पण सुरूवात मात्र तुम्हाला करावी लागेल ,तुम्ही जेव्हा आमचा खर्च करण्याइतपत सक्षम व्हाल ,मी तुमच्या बरोबर येईन,अशी तिची सासरी जाण्यासाठी अट होती.
मला तिच्या या निर्णयाचे खूप कौतुक वाटलं ,स्त्री कशी एखाद्या पुरुषाच्या यशास कारणीभूत असते, त्याचं उत्तम उदाहरण आहे ,असं वाटलं.
अस्मिता आणि साकेत दोघांनीही डीएड केले होते ,लग्न झाले तेव्हा साकेत एका आश्रमशाळेत कामाला जात होता.तिथे जॉबला लागण्यासाठी आईवडीलांनी पाच लाख रुपये भरले होते ,लग्नानंतर दोन वर्षे तो कामावर जात होता,पण पगार अजून मिळत नव्हता ,उलट येण्याजाण्याचा खर्चही करावा लागत होता,प्रत्येक गोष्टी साठी आई वडिलांकडे पैसे मागायला लागायचे. मुलं आजारी पडली तरी ,तिला सासू सास-यांवर अवलंबून राहावे लागत होते,पगार तीन वर्ष मिळाला नाही ,म्हणून त्याने शाळेला जाणे बंद केले. शेती करतो म्हणाला ,आई वडीलांचा एकुलता एक ,घरची पाच ऐकर शेती,तिला वाटल आता तरी चांगले दिवस येतील.
तो शेती करत होता,म्हणजे काय रोजाच्या माणसांकडून काम करून घ्यायचा,त्यामुळे शेतीतही जास्त पैसा हातात राहत नव्हता, त्याचं म्हणणं होतं ,ट्रॅक्टर घेऊन द्या ,पण आई वडिलांनी त्याला घेऊन देण्यास नकार दिला . ते बोलले ,आधीच तुला आम्ही जॉबला लागण्यासाठी पैसे भरले ,आता आमच्या कडे पैसे नाही ,मग साकेत खूपच नाराज झाला .
तो एकटा एकटा राहू लागला आणि यामुळे त्याला मोबाईल मध्ये व्हिडिओ पाहायचे वेड लागले .
त्याचं मळ्यात जाणं ही कमी झालं ,असं म्हणतात ,रिकामं मन म्हणजे शैतानाच्ं घर ,तो अस्मिताकडून विचारसुध्दा करु शकत नाही ,अशा अपेक्षा ठेवायला लागला.
एक दिवस असचं ,मुलं खेळत होती आणि त्याची अपेक्षा होती ,तिने बेडरूम बंद करून त्याच्या बरोबर वेळ घालवावा.
अस्मिता- तुमच्या मागण्या अलिकडे जास्तच वाढत चालल्या आहेत ,आपल्याला दोन मुले आहेत ,ती खेळत आहे आणि तुमचं काय चाललं आहे,दिवस रात्र तुम्ही काहीच बघत नाही,हे जरा जास्त होत आहे ,असं नाही वाटत का तुम्हांला
साकेत-तुझं नक्की दुस-या कोणा बरोबर लफडं असणार ,म्हणूनच तू अशी वागते,सांग तुझं कोणा बरोबर लफडं आहे.
अस्मिता-लफड़ं असल्यावरच्ं माणूस नाही म्हणतं का,तुम्ही कधी माझ्या मनाचा विचार केला का ,तुम्हाला फक्त तुमचं काम असेल तर तुम्हाला माझी आठवण होते.लग्न झाले तेव्हा,मी किती स्वप्न पाहिली होती ,तुम्ही त्यातलं एकही पूर्ण नाही केलं
ती असं बोलत असताना साकेतने,तिला एक कानाखाली वाजवली.
अस्मिता -तुम्ही असाच पुरुषार्थ दाखवू शकता ,जबरदस्ती करण्याचा ,जर खरचं तुमच्यात हिंमत असेल तर पैसे कमावून दाखवा
साकेत खूपच चिडला,त्याने जवळच पडलेला पट्टा घेतला आणि तिला दोन तीन फटके मारले ,ती जोरात कळवळली,तसं बाहेर खेळत असलेली मुलगी धावत आत आली ,तिने तिच्या बापाचं हे रूप पहिल्यांदाच पाहीलं होतं.ती भितीने थरथर कापत होती ,हे सगळं पाहून साकेत डोक्याला हात लावून बसला ,
साकेत- मलाच कळत नाही,मी असा का वागतो ,मी तुला असं कसं मारु शकतो आणि तो त्याचा स्वत:चा हात भिंतीवर आपटू लागला .
हे सगळं पाहून अस्मिता मुलीला घेऊन बाहेर गेली ,तिला खेळणी दिली,तसं मुलीने विचारलं -पप्पा असे का करत आहे
अस्मिता-काही नाही गं,त्यांच डोकं दुखतय्ं ना म्हणून ,मी त्यांना औषध देऊन येते.
मुलगी-तू लगेच ये ,नाहीतर ते परत तुला मारतील
अस्मिता -नाही मारलं मला ,ते मीच पडली म्हणून आवाज झाला
अस्मिता रूम मध्ये गेल्यावर ,साकेत दोन्ही हात जोडून माफी मागत होता,
साकेत-मला माहित नाही,मी असा कसा वागलो ,माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ,प्लीज मला माफ कर,मी परत असं नाही करणार,असं म्हणत तो तिच्या पाया पडायला लागला.
हे सगळं पाहून तिला त्याची दया आली आणि ती म्हणाली ,इथून पुढे असं होता कामा नये .
काही दिवसांनी त्यांचा मुलगा तापाने फणफणला होता ,ती साकेतला म्हणाली ,डॉक्टर कडे घेऊन जाऊ
साकेत-माझ्याकडे पैसे नाहीत,आई यायची वाट बघावी लागेल
तितक्यात साकेतचे वडील येतात .
अस्मिता - बघा ना बाबा,याला किती ताप आलाय ,मी ह्यांना सांगत होते की,शुभमला दवाखान्यात नेऊ ,पण हे म्हणतात पैसे नाही
बाबा-जा घेऊन,डॉक्टर बोलले तर ऐडमिट करा,मी देतो पैसे
साकेत आणि अस्मिता शुभमला दवाखान्यात घेऊन जातात,
डॉक्टर ऐडमिट करायला सांगतात,ते ऐडमिट करतात .
तितक्यात साकेतचे बाबा पैसे घेऊन येतात ,ते काही पैसे भरतात , बाकीचे औषधांसाठी साकेत जवळ देतात आणि घरी जातात .
रात्री ते डबा घेऊन येतात ,तेव्हा अस्मिताला म्हणतात, मी बसतो ,तू जेवून घे .ती जेवत असते ,तेव्हा साकेत येतो ,त्याला खूप राग आलेला असतो
साकेत-तुम्ही इथं काय करताय ,मी आहे ना ,तुम्हाला इथं यायची काही गरज नव्हती
दोघेही त्याचं बोलणं ऐकून विचारात पडतात ,हा असा काय बोलतोय ,वेळ मारुन नेण्यासाठी
अस्मिता-अहो ते माझ्या साठी डबा घेऊन आले ,असं काय बोलता आणि त्यांचा शुभम वर किती जीव आहे ,तुम्ही घरी नसले की ,तो त्यांच्या जवळच असतो
साकेत-त्याचाच तर फायदा घेत आहेत ते
अस्मिता काही बोलणार,इतक्यात बाबा म्हणतात ,आपण नंतर बोलू या विषयावर ,इथं दवाखान्यात उगाच तमाशा नको ,असं बोलून ते निघून जातात .
दुस-या दिवशी सकाळी शुभमला घरी सोडतात,घरी आल्यावर
साकेत अस्मिता वर जास्तच चिड चिड करत असतो.
अस्मिता -काय झालं
साकेत-मला काय विचारते ,तू नालायक पणा करते आणि परत मला विचारते
अस्मिता -मी काय केलं असं
साकेत -मी घरात नसताना तुझे आणि त्याचे काय काय चाळे चालू असतात ,तो सगळं पुरवतो ना तुला ,मी नाही देत ना ,मग तुला तोच गोड लागणार ,मी मात्र जवळ आलो की,तुला लगेच पोरं आठवतात.
अस्मिता -अहो काय बोलताय हे आणि कुणाबद्दल बोलताय
साकेत-कळून न कळाल्यासारखी करु नकोस,माझा बाप आणि दुसरं कोण
अस्मिता-अहो,काही काय बोलताय ,तुमच्या जिभेला काही हाड आहे की नाही ,ते मला माझ्या वडिलांसारखे आहे
साकेत-पण वडील तर नाही ना,तुला जरा त्यांचा जास्तच पुळका आहे,त्यांना वेळेत जेवायला देते ,त्यांच सगळं पुढं पुढं करत असते,त्यांचा डबा वेळेत करुन देते
अस्मिता -का नको करु ,आज तो माणूस रिटायर झालाय,तरी जॉब करतो आणि तुम्ही तरणे ताठे तरी घरात आइत्ं बसून खाता
साकेत-तुझी जीभ जरा जास्तच चालायला लागली आहे ,असं म्हणत तो तिला मारणार तितक्यात ,त्याचे बाबा बाहेरुन येऊन त्याचा हात पकडतात आणि म्हणतात -काय झालं एवढं तुला,घरातल्या लक्ष्मीवर हात उचलतोस,मी अजून पर्यंत तुझ्या आईवर साधा हात सुध्दा उगारला नाही.
साकेत-तुम्ही तसेच बायले आहात आणि तुम्ही स्वत:च्याच सुने बरोबर,मला तर विचार करून,तुमचा मुलगा म्हणायची लाज वाटते असं म्हणत ,तो त्यांच्यावर हात उगारतो .
बाबा-किती घाणेरडे विचार आहे तुझे,ती मला माझ्या मुली प्रमाणे आहे,तू तिच्या बरोबर कसाही वागतो ,तरी ती सगळं हसतं सहन करते ,मला तुला मुलगा म्हणायची लाज वाटते
साकेत-असंही याआधी तरी तुम्हाला माझ्या साठी कुठे वेळ होता ,सगळा वेळ तर तुम्ही तुमच्या बायको बरोबर घालवायचे ,एक नंबरचे स्त्रीलंपट आहात तुम्ही ,तुम्ही आत्ताच्या आता माझ्या नजरे समोरुन दूर व्हा
बाबा -हे घर माझं आहे ,तू आमच्या जिवावर खातोस आणि परत आम्हालाच घराबाहेर जा म्हणतोस
साकेतची आई-अहो , शांत रहा ना ,आधीच त्याचं डोकं तापलय्ं
बाबा-तू बघितलं ना ,तो माझ्यावर काय आरोप करतोय
साकेतची आई-तुम्ही शांत व्हा ,जा तुम्ही वर जाऊन झोपा ,मी बोलते त्याच्याशी
बाबा रागात निघून जातात ,साकेतची आई त्याला काही तरी समजावून सांगते ,तरी तो ऐकत नाही ,मुलाला आणि मुलीला मारतो ,कसं बसं साकेतची आई त्यांना त्याच्या कडून घेते आणि अस्मिताला मुलांना घेऊन माहेरी पाठवते .
साकेत दोन तीन दिवसांनी जाऊन माफी मागतो,मग अस्मिता परत आपल्या घरी येते .
असं खूप वेळा झालं ,आता ती आणि तिचे माहेरचे त्याच्या या नाटकांना कंटाळले होते ,अस्मिता फोन उचलत नव्हती ,म्हणून त्याने तिच्या बहिणीला खूप घाणेरडे मेसेज केले ,तिच्या आईला फोनवर नको नको ते बोलला ,त्या सगळयांनी आता ही गोष्ट खुपच मनावर घेतली आणि अस्मिताला परत न पाठवण्याचा निर्णय घेतला.
अस्मिता जाऊन आता दोन महिने झाले होते,त्याला आता तो वागला या गोष्टीचा पश्चात्ताप होत होता ,तो दोन तीन वेळा मुलांना भेटायच्या निमीत्ताने जाऊन आला ,तिला म्हणाला ,घरी चला .
अस्मिता-आता ही गोष्ट माझ्या हातात राहिली नाही ,सगळे मोठे मिळून हे डिसीजन घेतील ,तुम्ही स्टंप पेपरवर लिहून द्या की,इथून पुढे तुमच्या कडून या चुका परत होणार नाही आणि स्वकष्टाने कमी मिळाले तरी चालतील ,पैसे कमवाल,एक महिना काम करून दाखवा ,तेव्हाच मी परत घरी येण्याचा विचार करेल.
साकेतला कष्टाची कामे करायची,काही सवय नव्हती ,तो एका वेल्डर बरोबर मदतनीस म्हणून गेला,तिथे ना लोखंड उचलले ,ना त्याला काही मदत केली आणि संध्याकाळी पैसे मागू लागला ,त्याने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला.
त्याला आता समजलं,फुकटच्ं कुणीही पैसे देत नाही ,त्याने दुसरीकडे प्रयत्न सुरु केले ,त्याला एका पेट्रोल पंपावर काम मिळालं ,पण आठ तास सारखं ऊभं राहून ,त्याचे पाय दुखायचे ,घरी आल्यावर ,दमल्यामुळे जेवल्याबरोबर झोपला ,तसं त्याला पटकन झोप लागली.
आता त्याला दुस-या कोणत्याही गोष्टींचा विचार ही मनात येत नव्हता,काम करून थकून जात होता ,कारण असं काम त्याने आतापर्यंत कधीच केलं नव्हतं.
जेव्हा महिना संपला आणि पहिला पगार त्याच्या हातात आला ,तेव्हा त्याच्या डोळ्यातून पाणी आलं.दोन मिनीट तो त्या पाकिटाकडे असचं बघत बसला ,आता यात काय काय करू आणि काय काय करू नको असं त्याला झालं ,तो तिथून निघून गेला ,घरी गेल्यावर आता मुलांसाठी काय काय घ्यायचं,अस्मिता साठी साडी घेऊ ,असं करत त्याने हिशोब लावला तर त्याच्याकडे फक्त हजार रुपये खर्चायला राहत होते.
मग त्याने गिफ्ट घ्यायचा विचार सोडून दिला आणि झालेला पगार तसाच ठेवून दिला.
अस्मिताला फोन करून सांगितले,की पगार झाला आहे.
अस्मिता- खूप बरं वाटलं ना तुम्हाला ,स्वत: कमवलेल्या पैशांचा आनंद वेगळाच असतो ना,एकदा का याची चटक लागली ,की माणूस भरून पावतो.
साकेत-मग तुमची अट पूर्ण केली मी,कधी येऊ न्यायला
अस्मिता -मला ही आवडेल स्वत:च्या घरी यायला ,पण मोठ्या माणसांचा मान ठेवला पाहिजे ना ,तुम्ही माझे मामा,मावस भाऊ यांना फोन करुन रविवारी यायला सांगा ,सगळ्यांची तुम्ही जे वागलात ,त्याबद्दल माफी मागा, माफी मागण्यासाठी सुध्दा खूप हिंमत असावी लागते,ती दाखवा, तुम्हाला नक्की सगळे माफ करतील आणि एकमेकांच्या मनातील गैरसमज दूर होतील आणि मलाही तुम्हाला नंतर कुणी काही बोललेलं आवडणार नाही,तुम्ही आता जो मार्ग स्वीकारला आहे,त्यावर असचं चालत रहा ,मी नेहमीच तुमच्या बरोबर असेल.
साकेत-खरचं तू म्हणतेस ,तसं मला स्वकष्टाने पैसे कमावल्याचा खुप आनंद झाला आणि मी काहीतरी करू शकतो ,हा आत्मविश्वास निर्माण झाला,मला खरचं आज देवाचे खूप आभार मानावेसे वाटतात ,ज्याने माझ्या आयुष्यात तुला पाठवलं.
अस्मिता -प्रत्येक बायकोची इच्छा असते की,तिच्या
नव-याकडे सगळ्यांनी सन्मानाने बघावं आणि माझी इच्छा तुम्ही पूर्ण केली,देव तुम्हाला अजून शक्ती देवो,तुमची उत्तरोत्तर प्रगती होवो ही देवाला प्रार्थना
साकेत-मी करतो फोन तुझ्या दादाला आणि मामाला ,मला आता रविवार कधी येतोय असं झालं आहे ,आता परत मला एकट्याला सोडून परत कधी जाऊ नकोस.
अस्मिता-नाही जाणार ,माझा भटकलेला नवरा मार्गाला लागलाय तर मी असं कशाला करेल आणि माझी खात्री आहे परत तुम्ही माझ्यावर अशी वेळच येऊ देणार नाही ,हो ना .
साकेत-मला इतक्या दिवसांत ,हे चांगलंच कळून चुकलं की,घरातल्या लक्ष्मी शिवाय आणि मुलां शिवाय घराला घरपण नाही.
ठरल्या प्रमाणे रविवारी सगळं व्यवस्थित होतं ,ती तिच्या स्वत:च्या घरी येते ,मुलं पण आनंदी असतात ,तिच्या अटीने ,त्याच्यात चांगलाच बदल घडवून आणला होता आणि आता ते सुखाने संसार करत आहेत.
ही सत्यकथा आहे,तुम्हाला सगळ्यांना जर आवडली असेल ,तर नावासहित शेअर करू शकता आणि अभिप्राय अवश्य द्या.
रुपाली थोरात