एक चूक आयुष्य बदलून टाकणारी.......

राधाच्या आयुष्यात झालेले बदल
भाग (२)
राधाचे पुढचे काही दिवस..............
कुटुंबातल्या प्रत्येक माणसाला कसा त्रास होईल हेच ती बघत होती रोज नवीन विषय आणि रोज तिचे धमक्यांचे फोन!...
हे सगळ ऐकून एक दिवस आईला कमी प्रमाणात पण हृदयविकार चा झटका आला आणि दवाखान्यात भरती केलं .....
तीच काळीज इतकं कठोर तिला काहीच फरक पडला नाही तीच वागन्यात काही बदल झाला नाही.
आता पुढे तिने ठरवलं की घरच्यांना बरबाद करायचं
त्यांना सुखाने जगू द्याच नाई म्हणून मग मोठ्या भावावर पोलिस केस केली की याने माझे २न लाख रु चोरले आणि लहान भावाने विनयभंग केला?
सगळ किती भयंकर आहे ना तिला ज्यांनी २९ वर्ष जपलं त्यांना बरबाद करायचं ठरवलं. दीड महिन्या पूर्वी भेटलेला एक अनोळखी माणूस तीच आयुष्याचा भाग झाला.
अशाही मुली असतात ज्या स्वार्था पोटी काहीही करू शकतात.
त्या व्यक्तीच्या पहिल्या पत्नी पासून त्याला दोन मुलं आहे यांनी लग्न केलं हे त्यांना कळलं तसच त्यांनी ते २न मुल यांच्या कडे आणून टाकले. तिथून राधाचं आयुष्य परत बदल झाला आणि ती कुटुंब बद्दल सगळी कडे कुटुंबाची स्वतःच्या पैशाने तोंडाने बदनामी करू लागली.
मुळात तिला शिकायचं होत अजून वरची पोस्ट घ्यायची होती म्हणून लग्न करायचं नव्हत.पण आता तिने सगळ्यांना सांगितलं की हेच माझ लग्न लाऊन देत नव्हते. आता तीन महिने झाले सगळ अजूनही तसच आहे काहीच बदल झाला नाई आता तो माणूस वाईट आहे म्हणून त्याच्या तावडीतून सुटका कशी करायची यासाठी कुटुंबाचे अथक प्रयत्न सुरू आहे.
तिला हळू हळू तिच्या चुकलेल्या निर्णयावर विचार करत आहे अस वाटत आहे यात तिचा सगळ्यात मोठा तोटा म्हणजे तिची नोकरी गेली कारण अस की तिने तिथे जाऊन हे सगळे तमासे केले आणि बँकेच्या इज्जतीला ठेच पोहचली म्हणून बँकेने तिला नोटीस पाठवली आधीच्या नोटीस वर उत्तर देऊ नाई शकली म्हणून परत नोटीस आली आणि खाते चौकशी करायची असा बँकेने आग्रह केला.
शेवटी राधा ने कुठलाही प्रतिसाद बँकेला दिला नाही म्हणून बँकेने नोटीस बजावून नोकरीवरून कमी करण्याचे आदेश दिले.
म्हणजे सगळच गेलं एक चुकीचं निर्णय आयुष्य बदलून टाकलं पद, प्रतिष्ठा, आणि पैसा, आणि सगळ्यात मोठी ताकत म्हणजे कुटुंब सगळ एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. आता कुटुंबाला तिला धडा शिकवायचा आहे आणि तिला कुटुंबाला सगळ इतकं विचित्र झालं की कश्यावरचं कोणताच उपाय नाई. खर तर मूली स्वतःचा स्वार्थ साधायला कोणत्याही थराला जाऊ शकतात तसच मुल सुद्धा कोणतही पाऊल उचलू शकतात प्रतेक मुलीने सांभाळून सगळ करावं. आधी सगळ तपासून पाहावं खर खोटं इतका मोठा निर्णय घेण्या आधी त्या व्यक्तीच्या कुटुंबाची चौकशी करा. त्याने तुम्हाला जे सांगितलं ते खर आहे का हे बोलताना लक्ष ठेवा तो तुमच्याशी प्रामाणिक आहे का ते बघा सगळ इतकं पटापट करू नका की नंतर आयुष्य भराचा पछ्यातप होईल आणि आयुष्य बरबाद होईल.
कुटुंब आपली ताकत आहे आधी त्यांच्यावर विश्वास ठेवा कोणत्याही मुलीचे आई वडील कधीच आपल्या मुलीचं वाईट व्हावं हा विचार करत नाहीत. आणि प्रत्येक वेळेस प्रेम पूर्णत्व पावेल अस सुद्धा नाई प्रेम परत होऊ शकत पण आयुष्य परत नाई आणि मनस्ताप सुद्धा भरून निघत नाई......
(पुढे काय झालं ते नक्की सांगते आवडल तर comment मद्ये सांगा)

🎭 Series Post

View all