Jan 23, 2022
वैचारिक

सहज मनाला पटलेलं पानावर उतरल

Read Later
सहज मनाला पटलेलं पानावर उतरल

खूप काही लिहायचं आहे पण लिहितांना शब्द सुचत नाई काय लिहावं खूप मोठं होऊन जगण्या पेक्षा छोट्या छोट्या गोष्टीत आनंदी राहून जगावं फार नाई पण आयुष्यात एकदा तरी कोणीतरी केलेल्या उपकाराची जाणीव असावी कोणालाही प्रेम वाटावं आपल्या बद्दल इतकं चांगल वागावं पण पुढे त्या प्रेमाला अंत येईल त्याची सुध्दा खात्री असू द्यावी प्रेम मागुन मिळत नाई ते कमवावं लागत ही भावना आहे ती विकत घेता येत नाई हे डोक्यात ठेऊन डोळ्यात रुजावी ती भावना
अश्रू उगाच येत नाहीत आणि आले तर वाट मोकळी करावी कारण दाबून ठेवल्याने बऱ्याच गोष्टी खराब होतात मोकळ्या असल्या की जगाचं आणि परिस्थितीच भान त्याला नक्की असत इतकं चांगलं वागावं की त्यातून समृद्ध होता येईल दुसऱ्यांच्या चांगल्या विचाराने आपण घडत असणार तर त्याच अनुकरण नक्की करावं प्रेम आहे म्हणून हक्क असणारच अस नाई आणि प्रेम नसलेल्या गोष्टीवर हक्क नसणार अस पण नाई आपण ठरवायचं कुठे हक्क गाजवावा भंग झाला तर स्वाभिमान दुखावणार आणि या जगात प्रेमा पेक्षा मोठा स्वाभिमान आहे . तुम्ही स्वतःला जपलं तर लोक तुम्हाला जपतील आवड आणि निवड यात फरक असला तर जगणं अजून सोप्प होईल भीक मागून मिळत समोर असलेल्या भांड्यात खूप कमी मानस टाकतात ते मागावं पण स्वतःसाठी आणि त्याची किंमत असावी देणाऱ्याला प्रेमही तसच दिलं तर मिळेल नाहीतर असलेलं ही संपून जाईल कारण या जगात प्रत्येक गोष्टीत मोबदला कायम आहे तो द्यावा फुकट घेतलेलं प्रत्येकाला पचेल अस नाही फार कमी असतात ज्यांना ते पचत त्यात आपण नाई हे आधी कळलं पाहिजे जगताना समाधान असावं हाव असली तर जगणं कठीण होत कारण रोज 100 रू कमावणारा ही पोळी भाजी खातो आणि 1000 रू कमवानारा सुद्धा तेच मग फरक कश्यात आहे lifestyle छान असली म्हणून माणूस मनाने छान आहे अस नसत त्यासाठी त्याच्याशी तितकं जुळवून घ्यावं लागेल आणि तितका वेळ
त्यासाठी परत तीच आटापिटा म्हणून माणूस समजून घेण्याच्या भानगडीत न पडन हाच शहणपणा खूप गोष्टी माणसाला माणूस म्हणून जगण्याची रीत भात शिकवत असतात आपण लिहावं आणि समोरच्याने मन झोकून देऊन ते वाचावं काही गोष्टी इतिहास जमा असतात प्रेम ही भावना आहे आणि ती समृद्ध करताना त्या प्रेमाला कुठेच अंत नसावा नात्याला नाव देण्यापेक्षा नात्यातला भाव जपन गरजेचं आहे दिखावा आणि देखावा यातला फरक कळला की आयुष्य आणि मानस समजायला सोपी जातात प्रत्येक वेळेस सगळ आपल्याच मनासारखं झालं तर माणसाला दुःखाचा चटका आणि सुखाचा श्वास घेता नाई येणार सुख अनुभवायचं असेल तर आधी दुःख भोगाव लागेल ज्याने लावलं तो नाई सुटला म्हणजे देव मग आपण तर मानस आहोत त्यांच्या पेक्षा आपली परीक्षा कठीण असणार मिळालं तर आपल आणि नाही मिळालं तर तो हिस्साच दुसऱ्याचा खूप काही मिळावं या आशेने जगत आल की काहीच मिळत नाही हा अनुभव आहे आणि काहीच मिळणार नाही तरीही निरंतर काम केलं तर सगळ मिळत या जगात म्हणजेच हया कलियुगात सुखासाठी जस दुःख भोगाव लागत तसच माणसाला प्रारब्ध आणि कर्म कधीच सुटत नाही जगताना मजेत जगा म्हणजे मनस्ताप कमी होईल सुख जितकं स्वतःच महत्वाचं आहे तितकंच महत्त्व दुसऱ्याच्या सुखाला द्या म्हणजे तुमच्या सुखाचा अनुभव तुम्ही मनापासून घेऊ शकणार जर दुसऱ्याला त्रास होत असेल आणि तो त्रास पाहून तुम्ही त्यात आनंदी असणार तर तुम्ही कधीच ते सुख भोगू नाही शकणार नकार आपल्याला पचवता आले पाहिजेत. कारण आपल्याला अपेक्षित प्रत्येक वेळेस घडेलच असे नाही. (Instead of running for some days take small step everyday) काही दिवस धावण्यापेक्षा रोज लहान पाऊल उचला म्हणजे यश अधिक सोप्प होईल आयुष्य खडतर असेल तर पुढचा प्रवास सांभाळून करा म्हणजे धोके टाळता येतील जबाबदारीची जाणीव झाली की बऱ्याचदा स्वप्न ही बदलावे लागतात पू. ल म्हणतात नेहमी आवडणारी कामच वाटणील येतात अस नाही काही काम कर्तव्य म्हणून करायची असतात मंगेश पाडगावकर च एक सुंदर वाक्य आयुष्य हे विधात्याच्या वहितल पण असत, रिकाम तर रिकाम पण लिहिलं तर छान असत. छोट्या छोट्या गोष्टीच अमाप सुख आणि आनंद देतात मोठ्या सुखाच किंवा आनंदाचं बऱ्याचदा ओझचं जास्त असत...कधी कधी प्रवासात सोबत इतकी छान असते की प्रवास संपूच नये असं वाटत कारण त्या सोबतीने आपण आपल आयुष्य सुंदर वळणावर नेत असतो वेळ कमी असतो पण तो खूप महत्वाचा असतो दुःखाच्या गर्दीत चेहऱ्यावर समाधानच हसू असं फार गरजेचं आहे गंध मातीतून येतो फुलाला पण त्याचा सुगंध जेव्हा होतो त्याच सर्व श्रेय त्या झाडाला जात तसच काही आपल्या माणसाचं असत करता करविता कोणी दुसराच असतो आणि श्रेय कोणी दुसरच घेऊन जात nasibavr अवलंबून राहावं पण त्याला मर्यादा असावी कारण नशीब आपण स्वतः तयार करायचं असत मग ते चमकत बसल्या ठिकाणी तुम्हाला कोणी आणून नाई देणार कारण प्रत्येकाला एक स्वतंत्र बुद्धी आणि विकाहर करण्याची दुसऱ्या इतकीच ताकत दिलेली आहे स्वतःहून घडणारी प्रत्येक गोष्ट नशीब नाही घडवत फार फार तर तुम्ही केलेलं कर्म आणि दुसऱ्या विषयी असलेला आदर तुम्हाला जगण्याचं नव बळ देतं प्रेमाला सीमा नाई पण भरकटलेल्या प्रेमाला कुठलीच व्याख्या नाही. परिस्थिती ठरवते वचन पालयच की नाही कधी कधी माणसाने स्वतःवर प्रेम करावं आणि स्वतःला पाळता येईल असे वचन द्यावं आणि ते वचन पूर्णत्वास नेण्यासाठी मनापासून प्रयत्न करावा आयुष्यात दुसऱ्याला वचन देऊन ते पूर्ण करन या पेक्षा स्वतःला दिलेलं वचन पूर्ण करन स्व हितासाठी खूप गरजेचं आहे कारण या जगात मानस फक्त वापर करतात जीव लावणारे वचनपूर्ती चया मागे नाई लागत

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Darshana Sushir

student

Satisfied innocent and very clear about my career I tried best to write