१४ वर्षाची मुलगी जेव्हा आई होते...... (भाग एक)

असेही क्रूर लोक या समाजात आहेत

नव्याआयुष्याची नवी गोष्ट

        खूप दिवसा पासून मनात होत मुलांना कचरा पेटीत फेकण्याचा प्रकार...........

४ वर्षा पूर्वी माझी वहिनी तिला जिल्हा स्त्री रुग्णालयात गर्भावस्थेच्या ८ वा महिना असताना बाळंतपणासाठी आणलं त्रास खुप होत होता मग डॉक्टर नी सांगितल या बाईला १५ दिवस इथ भरती करावं लागत....

मग तिथून आमच्या त्या रुग्णालयात जान येणं सुरू झाल रोज नवीन शिकायला मिळायचा रोज नवीन लोक आणि रोज नवीन घटना...........

वहिनी २४ दिवस आधी नाई ६ दिवस नंतर असे बरोबर एक महिना तिथं असल्यामुळे रोज टिफीन घेऊन तिथं जान ही दिनचर्या सुरू झाली...... मी रोज सकाळ संध्याकाळ तिथं जात होती मुद्दाम मी कारण माझी ज्या वार्ड मद्ये होती त्याच वार्ड मद्ये एक १४ वर्षाची मुलगी ९ महिन्याच्या गर्भावस्थेत होती , तिला बघतच राहावं अशी ती दिसायला " सुंदर" मला कुतूहल होत तिच्या इतक्या कमी वयात आई कशी काय होऊ शकते याचं...., मी तिच्याशी बोलायचं प्रयत्न केला पण मला त्या मुलीच्या आईने आधी १० दिवस तिच्या जवळ सुद्धा फिरकू दिलं नाही, परिचारिका तिच्यावर लक्ष ठेऊन असत.... अस करतात करता एक दिवस मी तिला भेटायचं म्हणजे भेटायचं म्हणून गेली संधी चांगली होती त्या मुलीची आई बाहेर गेली होती तिथल्या एका ओळखीच्या परिचारिकेची मदत घेऊन मी तिच्याशी बोलायचा ठरवलं.......

आणि त्या नंतर जे काही कळलं आणि बाहेर पडलं ते खूप भयंकर होत....

त्या मुलीच्या वडिलांनी मद्यधुंद अवस्थेत तिच्यावर बळजबरी केली ( बलात्कार ) आता हे जे झालं ते त्या मुलीच्या आईने लपून ठेवलं तिला दवाखान्यात न नेता तिला गप्प बसायला सांगितलं.... ती बाई अडाणी असली तरी बाई होती तिला त्यातून काय होईल हे कळत होत.. तरीही तिने इतकी मोठा धोका पत्करला दिवसा मागून दिवस गेले आणि तीन महिने झाल्या नंतर त्या बाईला समजलं की मुलीला दिवस गेले????

मग तिने घरी सगळे प्रयत्न केले पण कुठलाही उपाय लागू झाला नाही.......

आणि मनात नसताना तिला रुग्णालयात आणाव लागल

मग वय इतकं कमी म्हणून सगळ्यांचं विरोध रुग्णालयात तिची पूर्ण कागदपत्र जमा केल्याशिवाय आम्ही काहीही करणार नाई अस स्पष्ट सांगितलं आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी मुलीला ताब्यात घेतलं आणि पोलीसांना कळवल मग आधी तिच्या त्या क्रूर बापाला पोलिस चौकीत हजर केलं..

पोलिस आणि डॉक्टर यांच्या सल्ल्यानी त्या मुलीचं बाळ जन्माला घालायचं हे ठरलं आणि पूर्ण ६ महिने ती मुलगी जिल्हा स्त्री रुग्णालयात होती......?

कारण ते बाळ काढून टाकलं तर त्या मुलीच्या जीवाला धोका आहे हे डॉक्टर नी आधीच सांगितलं होत सो पर्याय नव्हता जन्मला घालन्यासिवाय? ती १४ वर्षाची मुलगी एका बाळाला जन्म देणार होती आणि त्या बाळाचा बाप त्या मुलीचा बाप होता आवडल तर comment box मधे नक्की सांगा पुढच्या भागात ९ महिन्या नंतरची पूर्ण गोष्ट आणि बाळाचं काय झालं 

🎭 Series Post

View all