हे प्रेम आहे की काय?... भाग 34

अग बाई मोना अस असत आयुष्य, आपल्याला उगीच आधी वाटत मी कोणाच ऐकणार नाही, मी काही काम करणार नाही, माझा नवरा मी म्हणेन तेच करेन, पण नंतर काही चालत नाही बाई


हे प्रेम आहे की काय?... भाग 34

©️®️शिल्पा सुतार
........

रिया पिंकी किचन मध्ये आल्या, रोहित मागे होता त्यांच्या

" पिंकी खुश ना मग",.. रोहित

"हो दादा",.. पिंकी

"बघतो जरा तुझ्या नवर्‍या कडे सांग त्यांना मी भेटायला बोलावल ते",.. रोहित

"दादा तू आता त्याला छळू नकोस,.. पिंकी

" मग मी काय सोडणार आहे का, इंटरव्यू आहे त्यांचा",.. रोहित

" वहिनी तू सांग ",.. पिंकी

" माझ एवढ ऐकल असत तर काय झालं असत",.. रिया विचार करत होती, तिला हसू आल

"का हसली तू रियु? बोल",.. रोहित

"रोहित.. काही नाही ",.. रिया

" चला आता जेवायला, रियु पाव भाजी वाट बघते, नंतर
फ्रीजमध्ये आईस्क्रीम आहे" ,.. रोहित बाकीच्यांना बोलवायला गेला

रिया पिंकी आवरत होत्या

"वहिनी तू मला लकी आहेस तुला सांगितलं आणि झालंच काम, कितीतरी महिन्यांपासून मी विचार करत होती की कसं करणार आहे मी, हे सगळं घरी कसं सांगणार आहे",..पिंकी

" मग मला तिकडेच का नाही सांगितलं फार्म हाऊस वर",.. रिया

" तेव्हा तिकडे आई अण्णा नव्हते आणि सौरभला पण विचारलं नव्हतं की सांगू का घरी असं, आता त्याचं म्हणणं आहे की सांगून देऊ घरी, म्हणून सांगितलं ",.. पिंकी

"हो का आता तिकडे विचारून सगळ ठरत वाटत, नवरदेवाला घाई झालेली दिसते",.. रिया

"वहिनी तू ही ना ,.. तू आता दादाचं बघ वहिनी, त्याला किती घाई झालेली आहे संध्याकाळपासून तुझ्यामागे आहे",.. पिंकी

रिया खूप हसत होती,.." पुरे पिंकी",

आता का?..

चला जेवायला, पिंकी रिया ताट करत होते, मस्त झाला होता बेत, रिया खुश होती सगळ आवडीच, आज रोहित माझी खूप काळजी घेतो आहे, काय म्हणण आहे नक्की त्याच, रिया लाजली होती,

मस्त गप्पा करत जेवण झाल

दोघी आईस्क्रीम घेऊन बाहेर आल्या, आईस्क्रीम खाऊन झालं, अण्णा रोहित काहीतरी बोलत होते, आजी खुश होत्या, शारदाताई सगळ्यांच्या गप्पा ऐकत होत्या, लग्नाच्या तयारीचं त्यांना थोडं टेन्शन आलं होतं, मुलगी सासरी जाईल हा विचार ही मनात होता, चला आता आराम करा सगळ्यांनी, सगळे उठले

" थांबा एक मिनिट रोहित रिया मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे, पिंकी तू आजीला घेऊन आत मध्ये जा",... शारदा ताई

" काय आहे आता? बोला ना माझ्या समोरही, आता माझंही लग्न होणार आहे",.. पिंकी

" पिंकी वेळ आहे त्या गोष्टीला ",.. शारदा ताई

पिंकी आजीला घेऊन आज केली

रोहित रिया समोर बसले,

" रोहित तू आणि रिया अजून सोबत राहिले नाहीत ना",.. शारदा ताई

दोघांना समजलं आई काय म्हणते आहे ते, रिया खाली बघत होती

" नाही राहिलो अजून सोबत",.. रोहित

" उद्या रियाच्या आई बाबांना बोलवलं आहे, गुरुजी येतील सत्यनारायण पूजेचा मुहूर्त काढून घेवू, मग त्याच दिवशी संध्याकाळी रिसेप्शन चालेल ना, मग रहा आरामात सोबत, रिया उद्या माहेरी जा, आई बाबांच्या सोबत रहा थोडे दिवस, आठवण येत होती ना त्यांची तुला, नंतर रहायच आहे इथे रोहित सोबत " ,... शारदा ताई

"हो आई",.. रिया खुश होती

म्हणजे?..

" पूजे नंतर सोबत रहा, रोहित हिला जावू दे थोडे दिवस माहेरी",.. शारदा ताई

ठीक आहे..

" काय झालं रोहित ? ठीक आहे ना, असा काय चेहरा केला",.. शारदा ताई

काही नाही आई... रोहित

" पिंकी इकडे ये, रियाला घेवून जा तुझ्या सोबत रूम मध्ये",... शारदा ताई

" काय झालं आई? वहिनी दादा सोबत नाही रहाणार का?",.. पिंकी

"पिंकी तुला जे सांगितल ते कर",... शारदा ताई

पिंकी रोहित कडे हसून बघत होती, एक मुलगा किती चिडला,

रिया पिंकी सोबत आत गेली, आजी पिंकी त्यांच्या मध्ये रिया झोपणार होती, रोहित ही त्यांच्या सोबत रूम मध्ये येत होता, पिंकी ने येवु दिल नाही त्याला,.. जा दादा तुझ्या रूम मध्ये,

रोहित रूम मध्ये आला, त्याने कॉटवरची उशी समोर फेकून मारली, रियु मला तू हवी आहे आता इथे, आई ही ना, तिच्या समोर जास्त बोलता आल नाही, त्याने पिंकीला फोन केला,.. "पिंकी रियु कडे फोन दे",

"नाही दादा आईने नाही सांगितल",.. पिंकी

"बोलायला ही नाही सांगितल का? रियु कडे चुपचाप फोन दे, नाहीतर मी सौरभ ला त्रास देईल ",.. रोहित

"हे काय आता मधेच दादा, चांगला पॉईंट मिळाला तुला",.. पिंकी

"रियु कडे फोन दे",.. रोहित

"नाही तू आज माझ्याशी किती ओरडून बोलला, केव्हाचा रागावतो आहे, वहिनी माझ्या ताब्यात आहे",.. पिंकी

"सॉरी पिंकी मी अस करणार नाही या पुढे, दे फोन प्लीज",.. रोहित

" एक मिनिट.. वहिनी घे फोन.. दादा बोलतोय ",.. पिंकी

" बोला रोहित ",.. रिया

" रियु रूम मध्ये ये ना दहा मिनिट, मला तुला मिठी मारायची आहे, केव्हा पासून वाट बघतो आहे तुला भेटण्यासाठी आणि आता हे अस ",..रोहित

" नाही रोहित जमणार नाही ",.. रिया

" रियु प्लीज फक्त दहा मिनिट ",.. रोहित

" नाही कस येणार कोणाला समजल तर ",.. रिया

" मी येवू का तुला घ्यायला",.. रोहित

" नाही.. आईंना समजल तर त्या रागवतील",.. रिया

" एवढ का घाबरते तू तिला, नाही समजणार तिला ये ना ",.. रोहित

" झाल का बोलून वहिनी, फोन दे इकडे ",.. पिंकी

" दादा फोन ठेव ",.. पिंकी

" पिंकी रिया ला पाठव इकडे ",.. रोहित

" आई आई.. दादा बघ काय म्हणतोय, वाहिनीला बोलवतो आहे ",.. पिंकी

" पिंकी नको सांगू आईला",.. रोहित

"हो ना.. झोप मग शांत, इकडे यायच नाही रात्री, आमची रूम बंद आहे",.. पिंकी

आजी हसत होत्या, रिया लाजली होती

काय वैताग आहे, रिया माझ्या सोबत फार्म हाऊस वर होती तेव्हा मला काही वाटल नाही, आज अचानक ती माझ्या सोबत नाही तर आठवण येते आहे, चांगली आहे ही शिक्षा

रियुला फोन घ्यायला पाहिजे, उद्या घेवू, रियुला छान ड्रेस साड्या घेवू, छान दिसते ती साडीत, रियुचा विचार जात नाही मनातून, झोपा आता,

रियाशी पिंकी खूप बोलत होती, आजी ऐकत होत्या त्यांच्या गप्पा,

"झोप वहिनी आता, की जाते दादा कडे, मला काही प्रॉब्लेम नाही, मी उगीच त्रास देते त्याला\",... पिंकी

रिया नाही म्हटली,

उद्या आई बाबां कडे जायच, रिया खूप खुश होती, किती दिवसांनी आई जवळ राहील मी, आठ दिवस मी आरामात रहाणार आहे, आई वडलांची किम्मत समजली मला, आई बाबा लव यु, कधी माहेरी जावू अस झाल होत तिला, टिना.. आजी सोबत मनसोप्त गप्पा मारणार आहे मी, आई च्या हातचा वरण भात, वा... खूप छान करते आई स्वयंपाक

रिया सकाळी लवकर उठली, आवरल तिने, आई बाबा कधी येतील, ती वाट बघत होती, रोहित उठून खाली आला, रियाच्या मागे किचन मधे आला तो,.. "आज जाणार आई कडे?",.

हो..

"मजा आहे बाबा एका मुलीची, मी येवू का सोबत? ",.. रोहित

नको..

"येतो सोडायला, तुला फोन घ्यायचा ना? ",.. रोहित

रिया आश्चर्याने बघत होती

"हवा ना फोन? ",.. रोहित

हो..

"अजून काय काय हव? , साडी घ्यायची का? ",.. रोहित

"काही नको, कोणी बघत नाही आम्ही साडी नेसली की ",.. रिया

दोघ हसत होते...

" किती टेंशन मध्ये होतो मी तेव्हा, पण किती छान दिसत होती माझी बायको साडीत ",.. रोहित

"काय सुरु आहे दादा? वाहिनीच्या मागे का आहेस तू? आई इकडे ये ",.. पिंकी

" पिंकी का त्रास देते जा ना",.. रोहित

"वहिनीची जबाबदारी माझ्या वर आहे ",..पिंकी

"सौरभला मी सोडणार नाही, आज कडक मीटिंग घेतो त्याच्या सोबत, बघ कसा घाबरेल तो मला ",..रोहित

"नाही घाबरणार सौरभ डॅशिंग आहे ",..पिंकी

रियाचे आई बाबा टिना आले, रिया खुश होती, टिना रिया सोबत होती, गुरुजी आले, सगळ्यांच चहा पाणी झाल,

" पुढच्या रविवारी चांगला मुहूर्त आहे तेव्हा ठेवू पूजा ",..

" ठीक आहे, त्या दिवशी रिसेप्शन साठी संध्याकाळी हॉटेल बूक केल त्यांनी ",..

" आम्ही निघू का आता",.. सुरेखा ताई

"आता पिंकी ला बघायला पाहुणे येतं आहेत, थोड थांबा तुम्ही दुपारनंतर जा घरी",... शारदा ताई

ठीक आहे..

" पिंकी जा तयार हो, रिया मदत कर तिला, तू ही साडी नेस",.. शारदा ताई

" आई माझे कपडे नाहीत इथे ",.. रिया

" थांब मी घेतल्या तुझ्या साठी साड्या, चल तुला देते",.. शारदा ताई

पिंकी रिया टिना शारदा ताई सुरेखा ताई आत गेल्या

रिया पिंकीला तयार करत होती, तिच्या एक दोन मैत्रिणी आल्या होत्या, खूप छान वातावरण होत,

रिया खुश होती, पिंकीच मस्त ठरतय, चांगली आहे ती,

रिया साडी नेसून तयार झाली,

" खूप छान दिसते आहेस पिंकी, तयारी मस्त झाली तुझी , कुठे आमचे सौरभ राव? , निघाले का बघ, सगळे विचारतात आहेत",..रिया

"माहिती नाही वहिनी ",..पिंकी

"दाखव फोन खोट बोलते ना, मिनीट मिनिटाची माहिती असेल तुला, कुठे पर्यंत आले माहिती असेल ",.. रिया

"येता आहेत रस्त्यात आहेत",.. पिंकी हसत होती

पाहुणे आले, सौरभ त्याचे आई वडील, बहीण मनीषा सगळे होते हॉल मध्ये बसले होते , छान उंच पुरा सौरभ मस्त दिसत होता, सगळे ओळख करून घेत होते, रोहित सौरभ बोलत होते, रोहित ला सौरभ चा स्वभाव आवडला

शारदा ताई सुरेखा ताई खाली होत्या, पाहुण्यां सोबत आजी पुढे बसलेल्या होत्या

"चल पिंकी" ,.. अण्णा बोलवायला आले, रिया तू पण ये, तुझ्याशी काम आहे,

"अण्णा काय ",.. रिया

"तुझी ओळख करून द्यायची आहे बेटा",.. अण्णा

रिया हॉल मध्ये आली, अतिशय सुंदर दिसत होती ती साडीत, सगळे बघत होते,

"रोहित इकडे ये, हा आहे रोहित ह्या आमच्या सूनबाई रिया , तुम्हाला माहिती आहे काय काय झाल ते यांच्या बाबतीत",.. अण्णा

"हो माहिती आहे",..

"काही प्रोब्लेम आहे का तुम्हाला? ",.. अण्णा

" नाही अजिबात नाही",..

सगळे आनंदात होते, पिंकी ला बोलवा, रिया पिंकीला घेवून आली,

पिंकी बाहेर येवून बसली, सुंदर अश्या गुलाबी साडीत पिंकी मस्त दिसत होती, आज पहिल्यांदा तिला अस लाजतांना घरचे बघत होते, तिच्या ओळखीचे होते सगळे, छान बोलत होते ते , चहा पोहे झाले, मुलगा आवडला होता सगळ्यांना

" कधी काढायची लग्नाची तारीख? " ,.. अण्णा

"परीक्षे नंतर अण्णा",. रिया

"नाही दिवाळी नंतर",.. सौरभ

सगळे हसत होते

"हा सौरभ ही ना",.. पिंकी

"पिंकी काय मग आता?",.. अण्णा

"चालेल जस हे म्हणतील तस",.. पिंकी

"आता हे ठरल",.. अण्णा

दुपारी जेवणाची तयारी सुरू होती, शारदा ताई लक्ष देवून होत्या, रिया मदत करत होती, सुरेखा ताई आजींशी बोलत होत्या, पिंकी पुढच्या खोलीत होती

टिना रिया जवळ आली,.. "ताई तुला जिजू बोलवता आहेत हॉल मध्ये ",

" टिना काम आहेत मला ",.. रिया

" खर अग चल, ओळख करून द्यायची पुढे बोलवलं",.. टिना

"हो आली",.. आई मी येते पाच मिनिटात

टिना रिया पुढे आल्या,

" वहिनी इकडे ये , मी ओळख करून देते, हे सौरभ, ही मनीषा,... ही वहिनी ही टिना सगळे बोलत होते",..

" छान आहे तुझी वहिनी पिंकी ",.. मनिषा

जेवण झाल, जरा वेळाने पाहुणे गेले,

" आम्ही निघतो आता, आजी एकट्या आहेत घरी, रिया चल येते ना तू" ,... बाबा

रोहित ही निघाला...

"कुठे दादा? तू कुठे जातोस? ",.. पिंकी

" या सगळ्यांना घरी सोडून येतो ",.. रोहित

सगळे हसत होते

" आम्ही जावू",.. बाबा

"नाही मला काम आहे तिकडे, मी येतो, आई मी जावून येतो, पिंकी चल ",.. रोहित

सगळे आधी रियाच्या माहेरी गेले, तिथे आई बाबांना सोडल, मग रिया टीना पिंकी रोहित मोबाईल घ्यायला गेले, हेड फोन घे रियु तुला आवडत ना गाणे ऐकायला

"हो तुम्हाला कस माहिती? ",.. रिया

हमारे जासुस कोने कोने मे फैले है...

" माहिती आहे टीनाने सांगितल असेल",.. रिया

सगळे घरी आले, रोहित पिंकीने रियाचा नंबर सेव केला

" हे बर झालं आता दिवस रात्र बोलता येईल ना वहिनीशी.. दादा ",.. पिंकी

पुरे पिंकी....

" चल आता निघू या दादा, की थांबतो इथे",.. पिंकी

रोहित रिया पुढे जावून बोलत होते

"दूर राहणार तू माझ्या पासून आठ दिवस, मला नाही करमणार रियु",.. रोहित

"हो मला पण नाही रोहित, पण मी आई बाबां साठी खुश आहे, बाबा किती आनंदी आहेत ",.. रिया

" रहा मस्त एंजॉय कर काळजी करू नकोस कसली ",.. रोहित

" हो मला फोन करा ",.. रिया

" हो मग मला काम काय दुसर",.. रोहित

दोघ हसत होते, घरी गेले की फोन करा

रिया टिना घरात आले, रिया जावून आजी जवळ बसली, आजी ने तिला प्रेमाने जवळ घेतल, आजी तुझी खूप आठवण आली ग, मला आता छान स्वयंपाक शिकव

" अरे बापरे खरच बदलली तू रिया, आधी तुझा घरकामाचा छत्तीस चा आकडा होता ",.. आजी

आजी... प्लीज

बाबा हसत होते

"काय करायचा स्वयंपाक रिया? , तुझ्या आवडीच करू या",..सुरेखा ताई

"आई काहीही कर पण स्वयंपाक करतांना मला बोलव मला बघायची आहे रेसिपी",.. रिया

"रिया रूम मध्ये जावुन पडली, ताई मोनाला फोन कर नंतर, ती सारखी विचारत असते तुझ्या बद्दल ",.. टिना

हो करते..

"मोना मी रिया बोलते आहे, हा नंबर माझा आहे सेव करून ठेव ",..

" कशी आहेस रिया",.. मोना

" भेटायला ये ना मला खूप आठवण येते तुझी ",.. रिया

" जरा वेळाने मोना आली, कुठे होती तू? , काही फोन नाही काही नाही, लग्न झाल ना तुझ? ",... दोघी रूम मध्ये बोलत बसल्या

"बरच काही झाल माझ्या बाबतीत मोना, खूप मोठी चूक केली होती मी आयुष्यात, चांगला धडा मिळाला, तुला माहिती पोलिसांनी विशालला मारल ",.. रिया

" बापरे तू ठीक आहेस ना? ",.. मोना

" हो मोना, आधी मला खूप वाईट वाटल होत, पण मी कंट्रोल केल, हे मी तुला एकटीला सांगते आहे कोणाला बोलू नकोस, रोहित समोर आता मला अस वागता येणार नाही, माझ प्रेम होत विशाल वर , त्याला पोलिसानी मारल नसत, तर मी गेले असते, तो मला परदेशात विकणार होता, तो काय बोलाल मला माहिती का त्याच माझ्या वर कधीच प्रेम नव्हत",.. रिया

"बापरे काय सुरु होत हे, आम्ही आधीच बोलत होतो तो चांगला मुलगा नाही तू ऐकत नव्हती ",.. मोना

" हो ना, मूर्ख पणा झाला माझा, खूप भयानक अनुभव होता हा माझ्या साठी, आधी मी माझ्या नवऱ्यावर विश्वास नव्हता ठेवला, खूप भांडले मी रोहित शी विशाल साठी, हळू हळू समजल तेच बरोबर आहेत विशाल चुकीचा होता ",.. रिया

" तुझ्या सासरचे ठीक आहेत ना, काही बोलत नाही ना तुला ",.. मोना

" काही प्रॉब्लेम नाही, चांगले आहेत ते, आता मी कोणती चुकी करणार नाही मोना, मोठ्या मुश्किलीने सगळ नीट झाल, माहिती आहे का आता मी रोहित वर प्रेम करते, खूप चांगले आहेत ते ",.. रिया

" अरे वा जिजु लकी आहेत एवढी छान बायको मिळाली ",.. मोना

हो ना..

" रिजल्ट कधी आहे ",.. रिया

" आता लागेल लास्ट इयर चा बाकी आहे, तू घेणार का पुढे अ‍ॅडमिशन?",.. मोना

" विचारते रोहित ला",.. रिया

" अरे बापरे एवढ रिया? अति झाल पती परमेश्वर ",..मोना

" अग बाई मोना अस असत आयुष्य, आपल्याला उगीच आधी वाटत मी कोणाच ऐकणार नाही, मी काही काम करणार नाही, माझा नवरा मी म्हणेन तेच करेन, पण नंतर काही चालत नाही बाई, कोणी ऐकत नाही आपल, सासरचे म्हणतील तस कराव लागत, पण आता मला काही प्रॉब्लेम नाही, खूप चांगले आहेत रोहित, घरचे चांगले आहेत, पण मला विचाराव लागेल त्यांना ",.. रिया

" बापरे... अस आहे का रोहित म्हणतील तस",.. मोना

गप्प ग मोना... " तू कधी करते लग्न?",..

"बघता आहेत स्थळ",.. मोना

" ओ हो आम्हाला बोलवा लग्नाला ",.. रिया

" तू नाही बोलवलं मला ",.. मोना

" माझ लग्न कस झाल तुला समजल तरी घाबरून जाशील",.. रिया

" म्हणजे काय? काय झालं रिया? ",.. मोना

" जावू दे मोना, हो ठीक आहे, मी खुश आहे आता ",.. रिया

" उद्या ये आपण जावू शॉपिंग ला",.. मोना

हो..

मोना गेली, रिया किचन मध्ये आली,.. "आई मला का नाही बोलवलं भाजी करतांना, आता सांग कशी केली भाजी? थांब एक मिनिट लिहून घेते",.. रिया जावून मोबाईल घेवून आली

आई सांगत होती, रिया टाइप करत होती, बाबा लांबून कौतुकाने बघत होते

रोहितचा फोन आला,.." काय करते आहेस रियु",

"मी बिझी आहे",.. रिया

"बापरे काय चाललय ",.. रोहित

" मी भेंडीची भाजी कशी करायची ते शिकते आहे",.. रिया

" अरे व्वा मला डबा मिळेल मग आता",.. रोहित

"माझी फ्रेंड आली होती मोना, लवकर रिजल्ट आहे मी पुढच पोस्ट ग्रॅज्युएशनच अ‍ॅडमिशन घेवू का?",. रिया

"हो घे किती फी आहे ते सांग मला ",..रोहित

"मला उद्या शॉपिंग ला जायच ",..रिया

"काय काय घ्यायचं आहे मजा आहे बाबा",..रोहित

"ड्रेस घेणार ",..रिया

" ठीक आहे मी येतो ",.. रोहित

" नको मी मोना सोबत जाणार, आम्ही मैत्रिणी सोबत आहोत",.. रिया

" आमच्या सोबत कोणी येत नाही आता ",.. रोहित

" नाही तस नाही पण छान वाटत मैत्रिणी सोबत ",.. रिया

" ठीक आहे एन्जॉय ",.. रोहित

टीना क्लास हून आली, सगळे जेवायला बसले, खूप खूप छान झाला आहे आई स्वयंपाक,

" तिकडे कोण करत होत स्वयंपाक ताई ",.. टिना

" बाई होत्या स्वयंपाक साठी",.. रात्री बराच वेळ रिया टिना बोलत होत्या

" ताई तू ठीक आहे ना आता? , जिजू चांगले आहेत ना, तुमच पटत ना ",.. टिना

"हो टिना चांगले आहेत ते, तुला माहिती आहे टिना मी प्रेम करते त्यांच्या वर",.. रिया

" सांगितल का त्यांना तस ",.. टिना

" अजून नीट नाही, त्या दिवशी फॅक्टरी जवळ थोड बोलली होती मी, सांगेन आता" ,.. रिया

"ताई मी खुश आहे तुझ्या साठी, तुमची स्टोरी डिफरंट आहे",.. टिना

हो एकदम,...








🎭 Series Post

View all