हे प्रेम आहे की काय?... भाग 33

मला वाटत आहे पिंकीला जे पसंत असेल ते आपण करावे, एकदा स्वतः जाऊन बघून या सगळ घरदार लोक, मग काय तो निर्णय घ्या ",..



हे प्रेम आहे की काय?... भाग 33

©️®️शिल्पा सुतार
........

जस मंगेशने मागच गेट उघडल समोर पोलिस होते, त्याच्या पायावर गोळी मारली पोलिसानी, तो खाली पडला, त्याच्या कडे गन होता त्याने ती पोलिसां कडे फायर केली पोलिसानी त्याच्या हातावर गोळी मारली, दोन तीन पोलिसांनी येवून त्याच्या हातातून गन काढून घेतली, विशाल गाडीतून उतरून पळत होता, त्याला गोळी मारली पायाला, तो बसला होता खाली, पाच मिनिट सगळे शांत होते कोणी गोळी चालवत का हे पोलिस बघत होते, गाडीत रिया बसलेली होती समोरून पोलिस इशारा करत होते, सावध रहा

पोलीस आत आले, रिया गाडीतून उतरली, तिला पोलिसांनी गाडीत बसवल, ती बघत होती रोहित कुठे आहे? रोहित आला मागून, आत फॅक्टरीत पोलिसां सोबत गेला, मंगेश विशालला आत आणले, बाकीचे टोळीचे लोक उरले होते त्यांना पकडल

" काय करायच साहेब यांच" ,... इंस्पेक्टर

"आधी सांगितल ते करा, मला नको हे लोक परत त्रास द्यायला आम्हाला आणि कोणालाच, समाजासाठी घातक आहेत हे असे लोक, कित्येक लोकांच जिवन नरक केल यांनी, खूप त्रास झाला आम्हाला यांचा, एन्काऊंटर करा, अस सांगा या दोन टोळ्यांनी एकमेकांना मारल" ,... रोहित

" ठीक आहे साहेब",.. इंस्पेक्टर

रोहित बाहेर आला, रिया त्याच्या कडे बघत होती, रियाने त्याला पुढे येवून मिठी मारली, खूप घाबरली होती ती, थरथर कापत होती,.." रोहित त्या लोकांना गोळी मारली का? ",

" रियु चल इथून तू विचार करू नकोस ",.. रोहित

" पिंकी कुठे आहे?" ,.. रिया

" पिंकी घरी गेली, चल रियु आपल्याला घरी बोलवलं आहे आता रिलॅक्स हो, तू ठीक आहेस ना रियु",.. रोहित

हो..

रोहितने अण्णांना फोन केला,.. "रिया आहे माझ्या सोबत, संकट टळल, काळजी करू नका, आम्ही येतो जरा वेळाने" ,

"ठीक आहे काळजी घ्या",. अण्णा

रोहितने फोन लावला, रिया कडे दिला

"कोण आहे फोन वर ",.. रिया

"बोल तर",. रोहित

रियाचे बाबा शरद राव होते फोन वर,.. "बोला रोहित",

"बाबा मी बोलते आहे रिया",..

दोघ रडत होते,.." किती दिवसांनी, ऐकला तुमचा आवाज बाबा, कसे आहात तुम्ही? आई कशी आहे? , आजी, टीना कसे आहेत? ",

"रडायचा नाही बेटा, आम्ही ठीक आहोत, कुठे आहेस तू, कधी होईल आपली भेट ",.. बाबा

"माहिती नाही बाबा, मी बाहेर आहे बाबा, आता घरी जातो आहे आम्ही दोघ",.. रिया

" तू कशी आहेस बेटा ",.. बाबा

"मी ठीक आहे बाबा ",.. रिया

" आजी आई टिना ठीक आहे तुझी खूप आठवण काढतात त्या ",.. बाबा

" बाबा सॉरी, मला माफ करा",.. रिया

" पुरे बेटा माफी नको मागू मला तुझा राग नव्हता आला, काळजी वाटत होती बेटा, तु खुश आहेस ना बेटा ",.. बाबा

" हो बाबा तुम्ही माझ्या साठी योग्य निर्णय घेतला होता",.. रिया

" जास्त विचार करू नकोस",.. बाबा

" कुठे आहात तुम्ही? घरी आले की मामा कडे आहात? ",.. रिया

" घरी आलो बेटा ",.. बाबा

रोहित फोन मागत होता,.." आम्ही येतो तिकडे पंधरा मिनिटात रियाला भेटायच आहे तुम्हाला ",..

हो या.. बाबा खूप खुश होते

रोहित ने फोन ठेवला,

रियाला विश्वास बसत नव्हता, ती खूप खुश होती, ती रडत होती, खरच जायच बाबांकडे..

" हो, आता जातो आहे आपण, मग आता खुश ना मॅडम, हेच हव होत ना तुला, अजून काय हव बोल, मी नाही म्हणणार नाही, सॉरी आधी तुला खूप त्रास दिला, फोन करू दिला नाही, सक्ती केली, खूप धोका होता म्हणून अस करत होतो मी",.. रोहित

" खूप खूप thank you रोहित, मला खर वाटत नाही मी आई कडे जाते ते",.. रिया

"आता का डोळ्यात पाणी?",.. रोहित

" खुशी मुळे... रोहित मला खूप आनंद झाला ",.. रिया

"अस नाही चालणार, या बदल्यात काय देणार मला ते सांग ",.. रोहित

रोहित... प्लीज

"हो मग अस सोडणार नाही, मी माझ्या साठी तुला खुश ठेवतो आहे, पुरे आता रडण आता अजिबात काळजी करायची नाही, तू मला अजून सांगितल नाही मला काय मिळेल ",.. रोहित

रिया हसत होती

"हसून चालणार नाही पटकन सांग, नाहीतर सरळ फार्म हाऊसवर जावू",.. रोहित

"नाही बाबां कडे जावू आता, तुम्ही जस म्हणाल तस",.. रिया लाजली होती

" बघ ह नाहीतर नाही म्हणशील, आणि तू आता होकार ही दिला तिकडे थोड्या वेळा पूर्वी आठवत ना ",.. रोहित

रिया खूप हसत होती

रोहित रिया तिच्या बाबां कडे आले, रिया पळत आत गेली, जावून एकदम बाबांना भेटली, रोहित आत येवून बसले, ती आईला भेटली

आजीच्या डोळ्यात पाणी होत,.." माझी पोर किती त्रास झाला तिला ",

" आजी माझ चुकल ग",.. रिया

" नको अस बोलू पोरी, किती आठवण आली तुझी, तु ठीक आहे ना, जावई कसे आहेत नीट वागतात ना",.. आजी

हो आजी

टिना वाट बघत होती, रिया तिला भेटली," कशी आहेस ताई" ,

मी ठीक आहे, तुझी खूप आठवण आली टिना

रोहित शरद राव बोलत होते,.. "ठीक आहे ना आता सगळ? घरी कसे आहेत सगळे?

"ठीक आहे, तिकडे मामांकडे फोन करून द्या, त्यांना सांगा आम्ही आलो, रिया ठीक आहे, ते काळजी करत असतिल",... रोहित

बाबा फोन वर मामांशी बोलत होते

" रिया मामा बोलता आहेत बेटा एक मिनिट इकडे ये",..

" मामा मी रिया ",..

" कशी आहेस बेटा",.. मामा

"मला माफ कर मामा",.. रिया

"तू ठीक आहेस ना बेटा",.. मामा

"हो मामा मजेत आहे मी",.. रिया

"रोहित ठिक आहेत ना तुझ्या सोबत",.. मामा

"हो मामा काही प्रोब्लेम नाही",.. रिया

" \"मी खूप सक्तीने वागलो तुझ्या शी ",.. मामा

" नाही मामा ठीक आहे",.. रिया

"घरी ये आता ",.. मामा

" हो नक्की ",. रिया

आई किचन मधे स्वयंपाक करत होती, लगेच ताट केल, किती दिवसानी आईच्या हातच खाल्ल, रिया खुश होती, खूप बोलत होती ती सगळ्यांशी, बापरे ही एवढी बोलकी आहे हे माहिती नव्हत मला, रोहित तिच्या कडे बघत होता,

" रिया जेवण कर किती बोलणार",.. आजी

सगळे हसत होते

जेवण झाल

रिया आईशी बोलत होती किचन मधे, खुश आहेस ना तू बेटा

हो आई

"टीना इकडे ये रिया ला काय काय आवडत ते सांग",.. रोहित

ताई ला आइस्क्रीम आवडत, चॉकलेट आवडतात, फुल खूप आवडतात, गाणे खूप आवडतात आधी ती कायम मोबाईल मध्ये गाणे ऐकायची, पाणी पुरी पाव भाजी खूप आवडते,

"Thank you बर झाल सांगितल",.. रोहित

"पार्टी द्या जिजू",. टिना

"हो टिना नक्की" ,.. रोहित

"चल रियु घरचे वाट बघत असतिल",..

"येतो बाबा आम्ही",. रोहित

"येत रहा भेटायला",.. बाबा

"हो आता तुम्ही या आमच्या कडे",.. रोहित

रिया येवून बाबांना भेटली,

"नीट रहा बेटा",..

"हो, आई आजी टिना तुम्ही आमच्या कडे या",.. रिया

"अच्छा आता आमच्या कडे का" ,... टिना

रिया खूप हसत होती

रोहित रिया निघाले, रिया रोहित कडे बघत होती

" काय आता हे समोर बघ रियु, काय झालं? ",..

" खूप खूप थँक्स रोहित, आज मला वाटल नव्हत की आई बाबा भेटतील, मी खूप आनंदात आहे, तुम्ही चांगले आहात",... रिया गप्प बसली

" पुढे... पुढे बोल रियु",... रोहित

काही नाही,..

I love you बोल

रिया हसत होती

"झाल आता या साठी किती दिवस? ",.. रोहित

" आता कुठे जातो आपण ",.. रिया

" आपल्या घरी ",.. रोहित

" हा रस्ता दुसरा आहे ",.. रिया

" हो आपण गावातल्या घरी जातो आहे, थांब मी आइस्क्रीम घेवून येतो ",.. रोहित

रिया रोहित घरी आले, शारदा ताईंनी पुढे होवुन रिया ला जवळ घेतल, आजी आल्या उठून, पिंकी आली पळत, ती रडत होती,

" कशी आहेस वहिनी, सॉरी वहिनी माझ्या मुळे तू किती संकटात होती ",.. पिंकी

" पिंकी नाही ग, मी ठीक आहे आता, काळजी करू नकोस",.. रिया

पिंकी रोहित जवळ आली,.. "दादा सॉरी, मी असच गेली होती मैत्रीण कडे, मला काय माहिती अस होईल",

"ठीक आहे पिंकी पण कोणी काही सांगत तर ऐकत जा जरा ",.. रोहित

" हो दादा माझ चुकल",.. पिंकी

" आम्ही आई कडे गेलो होतो आज आता, भेट झाली सगळ्यांची ",.. रिया

" अरे व्वा दादा मस्का पॉलिश सुरू झाली वाटत वहिनी मागे, आइस्क्रीम ही आणल वाहिनीच्या आवडीच ",.. पिंकी

" का तुला नाही आवडत का आईस्क्रीम? , सगळ्यां साठी आहे ते ",.. रोहित

" जेवण झाल का तुमच ",.. शारदा ताई

" हो आई कडे केल",.. रिया

" पिंकी जा रियाला आत ने घर दाखव ",.. शारदा ताई

रोहित अण्णा बोलत होते

" अण्णा तुम्ही आज बरेच फोन केले वरती म्हणून संकट टळल",.. रोहित

" आता काही धोका नाही ना ",.. अण्णा

" नाही पूर्ण गँग उडवली, परत त्यांनी कोणाला त्रास द्यायला नको, खूप त्रास झाला आपल्याला सगळ्यांना ",.. रोहित

रोहित आत आला, पिंकी जवळ रिया झोपली होती, रोहित बघत होता ,.." दादा वहिनीला उठवू का? ",

" नको झोपू दे खूप त्रासात होती ती, आता रिलॅक्स झाली आहे ",.. रोहित

रोहित त्याच्या रूम मध्ये निघून गेला, जरा वेळ आराम केला त्याने, जरा वेळाने तो पिंकीच्या रूम मध्ये आला, रिया नव्हती, ती खाली असेल वाटत, काय यार किती लांब आहे ही माझ्या पासून, रोहित खाली गेला, सगळे चहा घेत होते, रिया रोहितचा चहा आण,

रिया किचन मध्ये गेली चहा घेवून आली, रोहित तिच्या कडे बघत होता, अरे इथे सगळे आहेत हा काय अस बघतो आहे, चहा झाला,

"आज काय मग पिंकी पाव भाजी करू या का आपण",.. रोहित

"चालेल दादा",.. पिंकी

"आत सांगून द्या",.. रोहित

रिया समोर बसली होती, ती आत सांगायला गेली,

रोहितचा फोन सुरु होता

"वहिनी चल आपण माझ्या रूम मध्ये, मला बोलायच आहे तुझ्याशी महत्वाच" ,.. पिंकी

दोघी आत आल्या

बोल.. पिंकी

"कोणाला सांगणार नाही ना तू",.. रिया

नाही.. काय झालं

" दादा आई अण्णा आजी कोणाला नाही",.. पिंकी

" नाही सांगणार कोणाला",. रिया

"वहिनी मला एक मुलगा पसंत आहे, काल मी त्याला भेटायला गेली होती संध्याकाळी",.. पिंकी

" कोण आहेत ते, पिंकी विचार करून वाग, माझ्या कडे बघ एकदा",.. रिया

"वहिनी सौरभ आमच्या शाळेत होता लहान पणा पासुन बघितल त्याला मी, माझ्या मैत्रिणी चा भाऊ आहे तो ",.. पिंकी

" काय करतात ते",.. रिया

" इंजिनिअर आहे एमबीए झाला आहे, बिझनेस आहे त्यांचा, आपल्या इतके नाही पण श्रीमंत आहेत, मेहनती आहे, शेती आहे, स्वतः च घर आहे" ,.. पिंकी

"ओ हो पिंकी जोरात चालू आहे तुझ, पण घरी लवकरात लवकर सांग, अस करु नको, घरचे नेहमी आपल चांगल करतात, कधी पासून सुरू आहे हे, लहान पणा पासुन का, तरीच इकडे यायची एवढी घाई झाली होती मॅडम ला",..रिया

"दोन वर्ष झाले सोबत आहोत आम्ही, त्या आधी फक्त ओळखत होतो आम्ही एकमेकाना, खूप छान आहे सौरभ वहिनी, खूप समजून घेतो मला ",.. पिंकी

" मजा आहे बुवा एका मुलीची, रोहितला माहीती आहे का हे",.. रिया

" नाही वहिनी ",.. पिंकी

" मग आता काय पुढे पिंकी",.. रिया

" मला भिती वाटते घरी सांगायची",.. पिंकी

" कधी करणार लग्न",.. रिया

" माझ हे शिक्षण झाल की",.. पिंकी

" तू सांगितल का त्यांना माझ्या बद्दल, आपल्याला किडनॅप केल होत ते ",.. रिया

"हो माहिती आहे त्यांना, त्यांच्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही",.. पिंकी

रिया खूप खुश होती,.. "पिंकी खूप छान आहे ग स्थळ",

" दादाला सांगू का वहिनी",.. पिंकी

"हो सांग मग ते बोलतील घरी",..रिया

"तो ओरडला तर",.. पिंकी

" ते होणार आहे, न ओरडता होत का काम आपल्या कडे",.. रिया

"ते ही आहेच मग काय करू",.. पिंकी

" सांग घरी, घरचे महत्वाचे असतात, ओरडतील पण समजून घेतात, रोहित चा सपोर्ट गरजेचा आहे, नवरदेवाला घाई झाली का लग्नाची",.. पिंकी

"काहीही काय वहिनी, इथे मला टेंशन आल, तु ही ना ",. पिंकी

रोहित बाहेरून सगळ ऐकत होता, त्याचा फोन झाल्यावर तो नेहमी प्रमाणे रियाच्या मागे आला होता, सगळ ऐकुन प्रचंड चिडला होता तो, रिया त्याला बघून दचकली, पिंकी ने मागे बघितलं,

रोहित आत आला,.." काय सांगते आहेस पिंकी तू रियुला?",.

"काही नाही दादा आम्ही कॉलेज बद्दल बोलत होतो" ,.. पिंकी रिया कडे बघत होती

" हो... हो रोहित" ,.. रिया

"रियु तू गप्प बस, काय बोलत होतीस पिंकी पटकन सांग? कोण आहे तो मुलगा? एवढं झालं ते कमी नाही झालं का? परत तेच सुरू आहे तुझं, अजिबात जमणार नाहि हे सगळं, मी घरी सांगून देईन, गुपचूप घरचे सांगतील तिथे लग्न करायचं, जास्त गोंधळ घातला तर माझ्याहून कोणी वाईट नाही",.. रोहित

" दादा तू एक शब्द माझा ऐकून तरी घे मी काय म्हणते आहे",.. पिंकी

"रोहित प्लीज शांत व्हा, चांगल आहे स्थळ, शांत पणे बोला ",.. रिया

"रियु प्लीज तू खाली जा, आणि अजिबात बोलू नकोस काही रियु",.. रोहित

"वहिनी तू थांब दादा ओरडेल मला तू गेली तर",.. पिंकी

"मला काही ऐकायचं नाही पिंकी, खूप मनस्ताप झाला आहे मला या दिवसात",.. रोहित

शारदा ताई तिथून जात होत्या, त्या आत आल्या,.. "काय झालं आहे रोहित? का एवढ्या मोठ्याने ओरडतो आहेस? काय झालं पिंकी? ",

रिया पिंकी दोघी गप्प होत्या,

" कोणी सांगणार का काय झाल आहे? ",.. शारदा ताई

" आई पिंकीने एका मुलाला पसंत केलं आहे",.. रोहित

"काय आता हे",.. शारदा ताई

" तेच बोलतो मी आई सांग हिला समजवून ", .. रोहित

" कोण आहे तो मुलगा?",.. शारदा ताई

"माहिती नाही मला, ती माहिती सांगत नाही, आत्ताच रियुला सगळं सांगत होती ",.. रोहित

शारदा ताई रोहित दोघ रिया कडे बघत होते, रिया घाबरली

" पिंकी बाहेर चल तुझ्या अण्णां समोर सगळं सांग",.. शारदा ताई

" आई आता नको ना",.. पिंकी

" चल पिंकी",..

सगळे उठून हॉलमध्ये गेले, अण्णा शारदाताई आजी समोर बसलेले होते, रोहित रिया एका बाजूला बसलेले होते, पिंकी समोर खुर्चीवर बसली होती, शारदा ताई अण्णांना सगळ सांगत होत्या, अण्णा उठुन पिंकी जवळ आले

" कोण आहे तो मुलगा बेटा मोकळ सांग, कोणी नाही ओरडणार ",... अण्णा

"माझी मैत्रीण आहे ना मनीषा तिचा भाऊ आहे सौरभ",.. पिंकी

" कधी ओळख झाली तुमची ओळख",.. अण्णा

" दोन वर्ष झाले आम्ही ओळखतो",.. पिंकी

"कुठे राहतात ते पिंकी, काय करतो मुलगा",.. अण्णा

"सौरभ इंजिनीयर आहे, एमबीए झालं आहे, त्यांचा बिझनेस आहे ",.. पिंकी

" अच्छा ते का.. हो मी ओळखतो त्यांना ",.. अण्णा

" त्यांच्या घरी माहिती आहे का ",.. शारदा ताई

" हो माहिती आहे",.. पिंकी

" फोन नंबर दे ",.. अण्णा

"आता नको ना अण्णा ",.. पिंकी

" फोन नंबर दे पिंकी",.. अण्णा

" पिंकी ने फोन नंबर दिला",..

अण्णा तिकडे बोलत होते, सौरभ शी बोलले, त्याच्या वडिलांशी बोलले, रोहित सौरभ शी बोलला

" कसे वाटत आहेत ते लोकं ",.. शारदा ताई

" मी ओळखतो त्यांना, चांगले लोक आहेत फॅक्टरी आहे त्यांची, आपल्या फॅक्टरीचे बरेच काम मिळतात त्यांना",..अण्णा

" चांगलं वाटतं आहे मुलगा बोलण्यावरून" ,.. रोहित

" आजी तुम्हाला काय वाटत आहे",.. शारदा ताई

"मला वाटत आहे पिंकीला जे पसंत असेल ते आपण करावे, एकदा स्वतः जाऊन बघून या सगळ घरदार लोक, मग काय तो निर्णय घ्या ",.. आजी

"मी ओळखते मनीषाला, ती येते आपल्या कडे पिंकी सोबत, बरेच वेळा गेली आहे त्यांच्याकडे चांगले आहेत लोक ",.. शारदा ताई

पिंकी खूप खुश होती,

" ते लोक येणार आहेत आपल्याकडे पुढची बोलणी करायला तुला चालणार आहे ना रोहित",.. अण्णा

" जोपर्यंत पिंकीला काही त्रास होत नाही तोपर्यंत मला सगळं चालेल फक्त फसगत नको व्हायला एवढच वाटत होतं मला",.. रोहित

सगळे खुश होते, पिंकी रिया कडे हसून बघत होती,

पिंकी एवढी मोठी झाली पण, बापरे मला विश्वास बसत नाही, माझ बाळ, शारदा ताईंनी तिला जवळ घेतल.

🎭 Series Post

View all