©️®️शिल्पा सुतार
........
........
काही वाचकांना मागचे दोन तीन भाग स्लो वाटत होते, माफ करा, आता कथेचा स्पीड वाढवला आहे, कसा वाटला आजचा भाग ते जरूर सांग, वाचकांचे खूप आभार,
कथा संपत आली आहे
.........
.........
"रोहित फोन वाजतो आहे" ,.. रिया
"वाजू दे रियु",.. रोहित
"रोहित मला जावू द्या",.. रिया
नाही..
"खरच फोन परत वाजतो आहे" ,... रिया
"एक शब्द आता बोलू नकोस" ,... रोहित
बेडरूमच दार वाजत होत,.. साहेब मॅडम
"रोहित कोणी तरी आल",.. रिया
रोहित बाजूला झाला, रिया उठून बसली, त्याने दार उघडल, तो बाहेर आला हॉल मध्ये,
" सर घरून फोन आहे, मोठ्या मॅडम लगेच फोन करायला सांगितला ",..
रोहित ने मोबाईल बघितला आईचे दोन तीन मिस कॉल होते, त्याने फोन केला,.. "काय झाल आई?
" मी अण्णा बोलतोय, पिंकी सापडत नाही रोहित, तु लगेच ये इकडे",..
रोहित तसा खाली बसला,.." मी सांगितल होत कुठे जावू नका, कुठे गेली होती ती बाहेर? ",..
"संध्याकाळी शेजारी गेली होती ती ",.. अण्णा
" कितीत पडेल आता हा निष्काळजी पणा ",.. रोहित
" काय करू या आता रोहित?",.. अण्णा
" मी पोलिस स्टेशन वर जातो, मग येतो घरी, आई आजी कसे आहेत" ,... रोहित
" आजीला माहिती नाही, तुझी आई शोधते आहे पिंकी ला रडते आहे ती, रोहित काही होणार नाही ना पिंकी ला? ",.. अण्णा
"काही होणार नाही अण्णा, धीर धरा, मी येतो एक तासात पोलीस स्टेशन ला जावून येतो",.. रोहित
रोहित आत आला, रिया त्याच्या कडे बघत होती, काय होईल आता? रोहित परत जवळ येईल का माझ्या? , भीती वाटते त्याची, रोहित कपडे बदलत होता,
"रोहित कुठे चालले? काय झालं रोहित? कोणाचा फोन होता? ",.. रिया
त्याने उत्तर दिल नाही,
"रोहित प्लीज सांगा काय झालं",... रिया
" मी बाहेर जातो आहे, तू जेवून झोप रियु" ,... रोहित
" केव्हा येणार? सांगता येईल का? , म्हणजे मला काळजी वाटत नाही, मी येवू का रोहित सोबत",... रिया
" रिया मी येईन रात्री, इथे थांब बेडरूम मधे, इथून बाहेर जायचं नाही, हॉल मध्ये ही नाही, प्लीज काळजी घे टीव्ही बघ" ,... रोहित निघून गेला घाईत, खूप काळजी वाटते हिची
त्याने बेडरूम बाहेरून लॉक केली, तो राधा कडे आला राधा उठुन उभी राहिली,
" पुढे हॉल मध्ये बस मी येइ पर्यंत, ही बेड रूमची चावी जेवण पाणी रूम मध्ये दे, परत रूम लॉक हवी मला, मी सांगितल तस झाल नाही तर माझ्याहून कोणी वाईट नाही",... रोहित
कुठे गेले रोहित? काय झालं असेल? कोणाचा फोन होता? , तिने बघितल रूम लॉक होती, बापरे आधी सारख आता इथे बसा, मी स्विमिंग पूल वर गेली आता शिक्षा मिळेल मला, अजून आल्यावर काय करतो हा काय माहिती?, की धोका आहे काही, विशाल ने काही केल तर नसेल?
रोहित निघाला त्याने इंस्पेक्टर साहेबांना फोन केला,.. "पिंकी सापडत नाही" ,
"हो मला आला अण्णांचा फोन",.. इंस्पेक्टर
"कुठे असेल ती काय करू या? ",.. रोहित
"तिला विशालने किडनॅप केल",.. इंस्पेक्टर
"तुम्हाला कस समजल? ",.. रोहित
"Cctv बघितल विशाल ला आज संध्याकाळी तुमच्या घरा जवळ, अण्णांनी कंप्लेंट केल्यावर गेलो होतो आम्ही तिकडे आता आलो" ,... इंस्पेक्टर
" पिंकी होती का सोबत विशाल च्या ?" ,.. रोहित
"नाही माहिती त्याने या वेळी वेगळी चाल खेळली, मागच्या वेळी आपण त्यांचा रस्ता अडवला होता ना, या वेळी बरेच लोक असतिल ते सोबत",.. इंस्पेक्टर
" मला खूप टेंशन आल आहे, ते काही करणार नाही ना पिंकीला" ,... रोहित
"नाही काही नाही होणार, त्यांच टार्गेट पिंकी मॅडम नाही रिया मॅडम आहे",.. इंस्पेक्टर
"ते ऐकुन रोहित ला खूप टेंशन आल होत, हेच नको होत मला, रिया माझी आहे, काय कराव, यासाठी मी चिडत होतो की सावध रहा " ,.. रोहित विचार करत होता
"मी घरी जावून येतो, मग येतो इकडे, करू आपण फोन त्याला, काय मागेल ते देईन त्याला, आहे ना त्याच्या नंबर रेकॉर्ड मध्ये ",.. रोहित
"तो रिया मॅडम ला मागेल ",.. इंस्पेक्टर
नाही रियु माझी आहे, माझ खूप प्रेम आहे तिच्यावर, कस होईल? काय संकट आहे हे
रोहित घरी आला, अण्णा शारदा ताई आजी समोर बसलेल्या होता, आजी रडत होत्या, त्यांना समजल होत,
" आजी तब्येत सांभाळ, कोण होत पिंकी सोबत? कुठे गेली होती ती? ",... रोहित
"शेजारी मैत्रिण कडे गेली होती" , .. शारदा ताई
"तिची बॉडी गार्ड कुठे आहे?",.. रोहित
बॉडी गार्ड पुढे आली,
"काय करत होती तू? कशाला अप्यांट केल आहे तुला? , अशी कशी पिंकी एकटी बाहेर गेली, इकडे ही पिंकी तिकडे रियु अजिबात समजत नाही यांना, एवढी चीड चीड होते माझी",.. रोहित
ती बॉडी गार्ड गप्प होती..
"बोल पटापट काय करत होती तू? समजेल का मला , पिंकी एकटी कशी बाहेर गेली, काही उपयोग नाही या लोकांचा",... रोहित खूप चिडला होता,
" मॅडम गुपचुप निघून गेल्या, मला आत रूम मध्ये बंद करून, विचार मॅडमला",..
रोहित शारदा ताई कडे बघत होता त्या हो बोलल्या
"किती मूर्ख आहे ही पिंकी या साठी मी बोलत होतो तिला माझ्या कडे ठेवा, पण नाही तुम्हाला कोणाला ऐकायच नाही माझ", ..रोहित
" रोहित शांत हो",. शारदा ताई
" काय करू शांत होवुन माहिती का काय होईल आता?, किती घोळ झाला, काय ठरवल होत काय झालं ",.. रोहित पुढच्या खोलीत निघून गेला ,अण्णा मागे आले
"अण्णा कुठे शोधू मी पिंकीला? , तिला काही झाल तर काय करणार आहोत आपण? त्या लोकांना रियु हवी आहे रियुला द्यावा लागेल आता तिकडे, किती मूर्ख पणा आहे हा, आपल्या हाताने आपण त्यांना मदत करतो आहे",...रोहित
"काय?, झाल का तुझ बोलण त्या लोकांशी",.. अण्णा
"नाही इंस्पेक्टर सांगत होते, मी पोलिस स्टेशनला जातो अण्णा, इकडे लक्ष द्या",..रोहित
" रिया कुठे आहे? घरी आहे कोण आहे तिकडे? ",.. अण्णा
" कोणी नाही, लॉक केल तिला, माहिती नाही काही",... रोहित
" आजी ला पाठवू का तिकडे? ",.. अण्णा
"नको, काही उपयोग नाही, मी सोडून येणार रियुला त्या गुंडा कडे, पिंकीला सोडवून आणेन",.. रोहित
" नको अस नको करू रोहित, खूप धोका आहे",.. अण्णा
" मग कस सोडवू पिंकीला, तिला काही झाल तर? तुमच्या कडे आहे का काही आयडिया",.. रोहित
" नाही, पण रिया ला काही झाल तर? रिया ला नको सोडु तिकडे ",.. अण्णा
" रिया ला लगेच काही करणार नाही ते लोक, वेळ मिळेल आपल्याला, तेवढ्यात काही तरी कराव लागेल, ही रिस्क घ्यावी लागेल अण्णा, पिंकीच्या मुर्ख पणा मुळे रियाला द्याव लागेल तिकडे, घरी काही सांगू नका मी येतो अण्णा",.. रोहित
"रोहित काही मधला मार्ग नाही का? कुठे आपले एवढे बॉडी गार्ड ",.. अण्णा
" अण्णा त्या बॉडी गार्डचा काही उपयोग नाही, त्या गुंडाना वेगळया पद्धतीने हॅण्डल करायला हव, तुम्ही जास्त विचार करू नका, सोडवून आणेन रिया पिंकीलाही, तुम्ही आई आजी जवळ थांबा मी करतो फोन",... रोहित पोलीस स्टेशन वर आला,.." लावा फोन विशाल ला",
" काय बोलणार पण ",.. इंस्पेक्टर
" मी करतो नीट ",.. रोहित
त्यांनी फोन लावला
मी रोहित बोलतोय,
" बोला साहेब, कशी आठवण काढली ",.. विशाल
" पिंकी आहे का तिकडे? ",.. रोहित
" हो आहे, यावेळी काय प्लॅन आहे मग रोहित साहेब तुमचा? , मागच्या वेळी तुमच्या सांगण्यावरून मला किती त्रास दिला पोलिसांनी मी बदला घेणार आहे, पिंकी छान आहे पण ",.. विशाल
" माफ करा विशाल, काही प्लॅन नाही माझा , प्लीज सोडा पिंकी ला काय हवाय तुम्हाला ",.. रोहित
"आम्हाला काय हव काय सांगणार तुम्हाला, माझी रिया आहे तुमच्या कडे, ती हवी आम्हाला, माझ्या सोबत असतांना किती घाबरली होती ती तुम्हाला, किती त्रास दिला तुम्ही तिला आणि मला ",.. विशाल
रोहित खूप चिडला होता, गप्प बसला तरी तो एकदा पिंकी येवू दे हातात काय करतो मी बघा
" मंगेश भाई शी बोला ",.. विशाल
" कोण आहेत ते ",.. रोहित
" माझे साथीदार ",.. विशाल
" नमस्कार साहेब मी मंगेश ",..
" पिंकीला सोडा काय हव तुम्हाला? मी देतो किती पैसे हवे",.. रोहित
" आम्हाला रिया हवी पैसे नको ",.. मंगेश
"एक मिनिट अस करु नका पैसे घ्या हवे तेवढे ",.. रोहित
"ते आमच्या कडे ही आहेत भरपूर,... रिया फक्त रिया" ,... मंगेश
"मंगेश प्लीज, का अस करताय, जरा समजून घ्या, ती माझी बायको आहे, मी करतो तुम्हाला मदत, काय हव ते देतो, पैसे नौकरी परदेशात जायच का? पोलिस काही करणार नाही तुम्हाला, मी वचन देतो ",.. रोहित
"नाही फक्त रिया हवी मला, बाकी मी करेन मॅनेज, आमच्या कडे होतो आधी रिया, तुम्ही तिला आमच्या कडून काढून नेली, जस नेल तस आणून द्या, नाही तर पिंकीला माझ्या रूम मध्ये बसवल आहे मी , समजत ना मी काय म्हणतोय ते, एक तास फक्त, सांगा काय करताय",... मंगेश
"मला थोडा वेळ द्या, पिंकी कडे लक्ष द्या तिला काही होता कामा नये, मी रिया ला घेवून येतो तिकडे उद्या सकाळी एवढ्या रात्री नाही",.. रोहित
"एका तासात हवी रिया इथे",.. मंगेश
"ती तिकडे माझ्या घरी आहे, अस रात्री तिला बाहेर घेवून येता येणार नाही, ऐका प्लीज, आई आजी येवु देणार नाही ",.. रोहित
" उद्या सकाळी केव्हा ",.. मंगेश
10 वाजता..
ठीक आहे
" पिंकीला सांभाळा",.. रोहित
" काही होणार नाही पिंकीला उद्या सकाळी 11 पर्यंत नंतर काही सांगता येत नाही ",.. मंगेश
" प्लीज मंगेश पिंकी तुम्हाला बहिणी सारखी आहे",... रोहित
" हो काही प्रॉब्लेम नाही, रिया ला पाठवा",... मंगेश
"रिया हवी आहे का तुम्हाला, ऐका ना प्लीज ",.. रोहित
" जमणार नाही या बाबतीत , रिया हवी आहे आम्हाला ",.. मंगेश
ठीक आहे
पिंकीला एका रूम मध्ये बसुन ठेवल होत, कोणी अजून भेटेल नव्हत तिला ती रडत होती, खूप मूर्ख पणा केला मी, हे लोक आपल्या घरा जवळ उभे होते, दादा सांगत होता तरी आपण ऐकल नाही, काय होईल आता, काय म्हणताय हे गुंड काही करणार तर नाही ना मला, की त्यांना वहिनी हवी आहे, माझ्या मुळे वहिनी धोक्यात येईल, आई आजी अण्णा काळजीत असतील
.......
.......
घरी राधा ने जेवण पाणी आणून दिल,
"राधा तू जेवली का" ,.. रिया
"नाही मॅडम आता बसते तुम्ही ठीक आहात ना",.. राधा
"हो राधा दार उघड राहू दे ना राधा",.. रिया
"नाही मॅडम मला अस करता येणार नाही साहेब आले तर खूप रागवतील",.. राधा
"कंटाळा येतो आत" ,.. रिया
"मी जाते मॅडम",.. राधा
"थांब राधा प्लीज",.. रिया
"मॅडम माफ करा, मला थांबता येणार नाही",.. राधा
राधा गेली, किती बोर होत आहे इथे, रोहित कुठे गेले, काही प्रॉब्लेम असेल का, रिया जेवली, तिला झोप येत नव्हती, कधी येतील रोहित काय माहिती? , रात्री तिला झोप लागली
.....
.....
" आता काय करायच इंस्पेक्टर साहेब मंगेश अजिबात ऐकत नाही, रिया हवी त्यांना, मला अजिबात रिया पिंकी ला काहीही झालेल नको आहे त्या लोकांची सावली नको रिया वर ",.. रोहित
"पण तरी उद्या तुम्हाला सोडव लागेल जरा वेळ मॅडमला तिकडे",... इंस्पेक्टर
दोघ प्लॅन करत होते
" अस होईल का ",.. रोहित
" करू आपण रोहित साहेब तुम्ही उद्या त्यांना कुठे भेटायचा ते विचारा ",.. इंस्पेक्टर
रोहित ने मंगेश ला फोन केला,.." उद्या कुठे येवू? ",
"मी सांगतो सकाळी काय घाई आहे",.. त्याने फोन ठेवला
" सांगितल नाही",.. रोहित
"नंबर ट्रेस करा कुठे आहे हा",.. इंस्पेक्टर
" इंडस्ट्रियल एरिया मध्ये एका फॅक्टरी जवळ दिसत होता नंबर",..
इंस्पेक्टर साहेब फोन वर बोलत होते
रोहितने अण्णांना सांगितल सगळ,
"काळजी घे दोघी पोरी सुखरूप येवू दे घरी",.. अण्णा
"तुम्ही रियाच्या माहेरी बघा ना टीना वगैरे ठीक आहेत का? मामां ना करा फोन रिया च्या बाबांना सांगू नका ",... रोहित
ठीक आहे
रात्री इंस्पेक्टर, रोहित जावून आले त्या फॅक्टरी साईटला तिकडे त्यांनी प्लॅन तयार केला रात्रीच्या अंधारात पोलिसानी फॅक्टरीला घेराव घातला
"तुम्ही जा घरी आता रोहित साहेब, सकाळी मॅडमला घेवून या",.. इंस्पेक्टर
"पिंकी आहे इथे, मी जाणार नाही ",.. रोहित
"हो पण तुम्ही जागे राहून काय होणार? जा घरी उगीच कोणाला दिसले तर अडचण येईल",.. इंस्पेक्टर
रोहित निघाला, सगळ्यात अवघड काम आहे आता रियु ला कस मी देणार या लोकां कडे, त्या लोकांना रिया हवी आहे, काही केल तर तिला, कसा बोलला तो विशाल.. माझी रिया, मला अजिबात आवडल नाही, त्याला मी सोडणार नाही,
डोळ्यात पाणी होत त्याच्या, काय हे? मला नाही सहन होत नाही,
रिया ला काही माहिती नाही, ती माझी वाट बघत असेल, काय सांगणार आहे मी तिला, मला माफ कर रिया, काय होईल पुढे? ठरवल प्रमाणे झाल तर ठीक आहे, नाही तर काहीही होवू शकत, किती मोठा गेम आहे हा, माझ्या बाबतीत का अस होत? मला खूप प्रिय आहे रिया, कोणी तिच्या कडे बघितल तरी त्रास होतो मला, अस कस त्या लोकां कडे कस देणार हिला,
रोहित घरी आला, राधा हॉल मध्ये झोपलेली होती तिने रोहित ला चावी दिली, रोहित आत आला, रिया झोपलेली होती, तो तिच्या कडे बघत बसला, निरागस चेहरा, शांत झोपली आहे ही, एवढ्या वेळ आहे सोबत माझ्या, नंतर काय होईल, रोहित रडत होता, काय करू उठवू का हिला, नको करू दे आराम, हिचा काय दोष तिला माहिती नाही आज तिला मी गुंडा कडे सोडून येणार आहे, तसा प्लॅन केला आहे आम्ही, पण तरी धोका आहे, त्याने पुढे होवुन रिया ला जवळ घेतल, तिच्या जवळ झोपला तो...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा