हे प्रेम आहे की काय?... भाग 29

काय कराव ह्या विशालच? पिंकी घरचे कोणी ऐकत नाही, किती डेंजर आहे ते लोक समजत नाही का यांना, काहीही झाले तरी रियु ला काहीही व्हायला नको,


हे प्रेम आहे की काय?... भाग 29

©️®️शिल्पा सुतार
........

विशाल गॅरेजवर येवून बसला, त्याला मंगेश भाईचा फोन आला,.. "कुठपर्यंत आलं काम विशाल? ",..

" सुरू आहे भाई, काढतो आहे माहिती",.. विशाल

" काही चौकशी केली का कुठे आहे रिया?, कधी होईल काम?, अतिशय आरामात सुरू आहे तुझ, लक्ष्यात ठेव 24 तास वेळ देतो तुला नंतर जेल मध्ये पाठवेन तुला मी, मला रिया हवी आहे ",.. मंगेश

" हो रिया रोहितच्या घरी आहे, फार्म हाऊसवर ",.. विशाल

"रिया च्या घरचे कुठे आहेत?",.. मंगेश

" ते ही गावालाच आहे",.. विशाल

"तिला अजून तिला एक बहीण होती ना? ",.. मंगेश

" हो आहे.. टिना ती पण तिकडेच आहे गावाला, सगळ्यांच्या घरावर रोहितने सिक्युरिटी लावली आहे",.. विशाल

" काहीतरी करावं लागेल कुणीतरी बाहेर येईलच ",.. मंगेश

" हो टिना चालेल का तुम्हाला? ",.. विशाल

" नाही मला फक्त रिया हवी आहे, घरच्या एखाद्या मेंबरला पळवून नेऊ त्याच्या बदल्यात रियाला मागता येईल ",.. मंगेश

" खूप रिस्क आहे यात भाई, आधी रिया एकटी होती आता तिच्यासोबत रोहित आहे, ते लोक डेंजर आहेत, खूप ओळखी आहेत त्या रोहित च्या, मी परत एकदा सांगतो अस नको करायला आपण, जिवाला धोका आहे आपल्या, मी दुसरी मुलगी देतो तुम्हाला मंगेश भाई रिया चा नाद सोडा ",.. विशाल

" नाही मला रिया हवी आहे, काहीही झाल तरी चालेल, तो रोहित डेंजर आहे तर आपण ही काही कमी नाही, काढल ना तूला जेल मधुन, तो रोहित काही करू शकला नाही ",.. मंगेश

" भाई पण रिया आता त्या रोहितची बायको आहे, तो सोडणार नाही तिला, आणि आपल्याला ही ",.. विशाल

" खूप घाबरतो तू विशाल, कुठे गेला तुझा कॉन्फिडन्स? कस सोडत नाही तो रोहित रिया ला बघतो मी, अस मजबूर करेन ना मी त्याला स्वतःच्या हाताने रिया ला माझ्या जवळ सोडून जाईल तो रोहित",... मंगेश

" काय होईल काय माहिती?, मंगेश भाई अजिबात ऐकत नाही, कठिण आहे",... विशाल विचार करत होता

रोहित ऑफिस मध्ये पोहोचला, त्याला इंस्पेक्टर साहेबांचा फोन आला..." समजल का तुम्हाला रोहित साहेब विशाल काल सुटला जेल मधुन, त्याला जामीन मिळाला",

बराच वेळ रोहित तसाच बसुन होता, त्याला टेंशन आल होत, नंतर त्याने दोन तीन फोन फिरवले, सगळीकडे सिक्युरिटी टाईट ठेवा, आता रियु बाबतीत कोणतीही रिस्क मी घ्यायला तयार नाही, ती माझ्या पासून दूर जाईल ही कल्पना सहन होत नाही मला, अतिशय निरागस आणि छान आहे ती, आत्ताशी थोडी बोलते ती माझ्याशी, त्यात हे अस, काय एक एक प्रॉब्लेम आहे,

पोलिस इन्स्पेक्टर रोहित बर्‍याच वेळ बोलत होते ,

रोहितने अण्णांना फोन लावला,.. "तुम्ही फोन करा वरती, विशालला जामिन मिळाला आहे, धोका आहे आपल्याला",

"हो लगेच करतो फोन",.. अण्णा

रोहित घरी आला, खूप काळजीत होता तो, आत जावून फ्रेश होवुन आला, सगळे चहा घेत होते, रिया समोर बसलेली होती, तिच्या कडे बघून खूप भरून आल रोहित ला.. हिला काही व्हायला नको, उगीच हट्ट करते पण ही, बाहेर खूप धोका आहे, सांभाळायला हव हिला,

अण्णा रोहित कडे बघत होते, रोहित ने इशार्याने विचारल केला का फोन, अण्णा हो बोलले

"काय झालं रोहित? काही विचारता आहेस का आज तु? ",.. शारदा ताई

"नाही आई ठीक आहे मी ",.. रोहित

"रोहित एक बोलायच होत",.. शारदा ताई

"बोल आई",.. रोहित

" रियाच्या घरचे कसे आहेत रोहित? , ती एकदा ही बोलली नाही घरच्यांशी का अस? , बोलु देत जा तिला त्यांच्याशी ",.. शारदा ताई

अरे बापरे का बोलल्या आई तुम्ही अस? रोहितला वाटेल मीच सांगितल आता सगळ्यां समोर काही खरं नाही माझ, ती घाबरून रोहित कडे बघत होती, रोहित तिच्या कडे बघत होता रागाने, आजींना समजल झाल आता काही खर नाही त्या पोरीच,

" काय आहे हे रियु",. रोहित

रिया घाबरली होती

"अरे रिया काही नाही बोलली मीच विचारते आहे, माझ्या मनात आहे हा प्रश्न",.. शारदा ताई

"आई आहेत काही प्रॉब्लेम त्या मुळे शक्य नाही",.. रोहित

"आम्ही उद्या निघतो",.. शारदा ताई

"हो पण कुठे जायच नाही बाहेर, पिंकी ला राहू दे इथे माझ्या सोबत",.. रोहित

"नाही दादा मी जाणार आई सोबत घरी, मी नाही राहणार इथे ",.. पिंकी

" नाही पिंकी चुपचाप इथे रहा, मी काय सांगतो ते ऐक ",.. रोहित

" आई मी येणार माझा रिजल्ट आहे, मला पुढच अ‍ॅडमिशन घ्यायच आहे",.. पिंकी

" अग बाहेर धोका आहे ",.. रोहित

" मला कशाला तो वाहिनीला धोका आहे ना आणि मला ड्रायवर आहे फ्रेंड्स आहेत बॉडी गार्ड दे वाटल तर, मी घरात नाही थांबणार माझ नुकसान होईल पुढच अ‍ॅडमिशन घ्यायच आहे ",... पिंकी

अण्णा शारदा ताई सगळे बोलले येवू दे तिला घरी, आम्ही आहोत, तू काळजी करू नको रोहित

"ठीक आहे तुम्हाला कोणाला ऐकायच नाही माझ तर मी काय करणार ",.. रोहित

रियाला समजल रोहित चिडला आहे खूप, झाल म्हणजे आता काही खर नाही, मला बोलणी बसतील फोन साठी आणि रोहित माझ काही ऐकुन घेणार नाही, बहुतेक मला फोन करता येणार नाही घरी आई बाबांना , गप्प बसलेल बर

अण्णा शारदा ताई आत गेले, आजी पिंकी बॅग भरत होत्या

रिया तिच्या रूम मध्ये गेली, रोहित टीव्ही बघत होता, रिया जावून त्याच्या जवळ बसली, रोहित काही बोलला नाही,

"काय झालं आहे रोहित, तुम्ही नाराज आहात का",.. रिया

\"काही नाही रियु ",.. रोहित

" मी काही बोलली नाही ते फोनच, आई बोलल्या, त्या विचारात होत्या की तुझे आई बाबा कसे आहेत? मग मी बोलली की नाही बोलली मी त्यांच्याशी कधीच ,खरं.. तुम्हाला मला बोलायच असेल तर बोला",.. रिया

रोहित काही बोलला नाही,

बापरे काय झालं याला, काही प्रॉब्लेम आहे का? , अजिबात बोलत नाही, पिंकी आई अण्णा आजी जात असतील म्हणून वाईट वाटत असेल का? काय झालं असेल? ,

काय कराव ह्या विशालच? पिंकी घरचे कोणी ऐकत नाही, किती डेंजर आहे ते लोक समजत नाही का यांना, काहीही झाले तरी रियु ला काहीही व्हायला नको, माझ खूप प्रेम आहे रियु वर, मी नाही राहू शकत हिच्या शिवाय, तो विशाल आधी रियाला मिळवायचा प्रयत्न करेन, इथून जेल मधुन बरोबर सुटला तो म्हणजे डेंजर लोक आहेत हे, तो बाहेर आला म्हणजे काहीतरी उद्योग करणार, ठीक आहे पिंकी सोबत बॉडी गार्ड देवू, त्याने फोन केला एक लेडी बॉडी गार्ड ला उद्या सकाळी यायला सांगितल,

रिया माझी आहे, तिला मी कोणाला देणार नाही, किती बोर झाल तरी तिची सुरक्षा महत्वाची, इथे नीट ठेवेन मी तिला,

रिया काही तरी काम करत होती रूम मध्ये,.. "रियु इकडे ये आधी" ,

रिया दचकली.. ती पटकन आली,

"इथे बस माझ्या जवळ",.. रोहित

"काय झालं रोहित?",.. रिया

"तुला तुझ्या घरच्यांना फोन करता येणार नाही, की भेटायला जाता येणार नाही, समजल का रियु ? रोज रोज मला तेच विचारायच नाही सांगून ठेवतो, शांत रहायच इथे",.. रोहित

"ठीक आहे, काय झालं रोहित? तुम्ही का चीड चीड करता आहात",.. रिया

"काय होणार आहे मला? ठीक आहे मी",.. तो उठून बाहेर निघून गेला

काय अस वागतो हा काय माहिती? का एवढी चीड चीड होते आहे यांची ? नक्की काही तरी बिनसल

रिया गप्प बसली कॉटवर, तिच्या डोळ्यात पाणी होत, काही सांगत नाही मला नीट, मी कुठे काही बोलली आज , किती ओरडत आहे मला,

रोहित काही तरी घ्यायला लगेच आत आला, त्याने बघितल रिया रडते आहे, तो कॉट जवळ आला, त्याने रिया ला हाताने धरून जवळ ओढल, खूप चिडला होता तो, .. "दुसर काही येत का तुला रियु? , सारख आपला हट्टी पणा, रडत बसायच, फोन नाही करायचा बोलल तर लागली रडायला, काही चांगला सांगितल तर समजत नाही तुला, काही कारण आहेत या मागे , एकदम गप्प बस रियु, मला खूप राग येतो आहे, शांत रहात जा जरा माझ्या समोर" ,...

रिया खूप घाबरली होती, तीने तिचा हात सोडवून घेतला, ती बाथरूम मध्ये निघून गेला, काय झालं अस आज? मला सारख बोलता आहेत रोहित, माझ काय चुकलं?, मी कुठे काही बोलली, कसला राग आला काय माहिती, सगळा राग माझ्या वर काढता आहेत हे, ती बराच वेळ तिथे बसली, जावू दे बाहेर जावुन काम करू, घरी सगळे आहेत,

रिया बाहेर आली, रोहित नव्हता पुढे, कुठे गेला हा? जावू दे असेल बाहेर, रिया ताट करत होती, पिंकी आली मदतीला

"दादा कुठे आहे?",.. पिंकी

"माहिती नाही",.. रिया

"काय झालं वहिनी?, तू रडली का",... पिंकी

"काही नाही पिंकी, प्लीज काही विचारू नको, रोहित समोर काहीही बोलू नको " ,.. रिया

"ठीक आहे, दादा बोलला का तुला? , कुठे आहे पण तो? ",.. पिंकी

"असतिल बाहेर फोन आला होता त्यांना, पिंकी बोलाव ना त्यांना, बघ कुठे आहेत ",.. रिया

हो... पिंकी जावून सगळ्यांना बोलवून आली, आई अण्णा आजी आले, रोहित आला पाच मिनिटात, रिया वाढत होती, रोहित तिच्या कडे बघत होता, ती गप्प होती,
सगळे जेवायला बसले, रिया जेवत होती सगळ्यांना काय हव नको ते बघत होती, रोहित आई अण्णांशी बोलत होता, शारदा ताई त्याला नंतर रिसेप्शन करू ते सांगत होत्या

"ठीक आहे आई आम्ही येवू, कधी ते सांग आणि रिया च्या घरच्यांना ही बोलवून घे सगळ्यांना",.. रोहित

हो..

रोहित बघत होता रिया नाराज आहे म्हणून तिला बर वाटाव अस तो करत होता

जेवण झाल, रिया आजी पिंकी शी बाहेर बसुन बोलत होती, अण्णा शारदा ताई बाहेर फेर्‍या मारत होते, पिंकी त्यांच्या सोबत बाहेर गेली, रोहित येवून रिया जवळ बसला, रिया बाजूला सरकली, आजी बघत होत्या ,

"बघितल आजी मला किती त्रास आहे ते, कोणी नुसत जवळ बसत नाही माझ्या",... त्याने मागून रियाचा हात धरला, आजी समोर होत्या,

काय करू मी आता? का बोलतोय हा माझ्याशी? अस दाखवतो खूप प्रेम आहे, हात धरला,

"बोलला ना तू आज रिया ला खूप",.. आजी

"नाही आजी",.. रोहित

"हो ना रिया ",.. आजी

रिया काही बोलली नाही, ती हात सोडवत होती

" आजी तू थांब ना इथे आमच्या जवळ",... रोहित

"येईन मी नंतर, आता तुम्ही दोघ तिकडे या आणि नीट प्रेमाने रहा सोबत, रोहित चीड चीड कमी कर",... आजी

"मी कुठे चिडतो आजी, कोणीतरी पिन मारलेली दिसते",.. रोहित

" नको चिडवू तिला, काही बोलली नाही ती मला, पण समजत ना मला, मी तुझी आजी आहे, प्रेमाने रहा",... आजी

" हिला सांग आजी, भांडकुदळ ",.. रोहित

" ते तू बघ आता तुझी बायको आहे",.. आजी

अण्णा आई आले समोरून, रोहितने रियाचा हात सोडला, रिया तिथून उठली, सगळे आत आले, झोपा आता सकाळी लवकर निघू, रोहित अण्णा बोलत होते हळू हळू

रिया रूम मध्ये आली, खूप कंटाळा आला आज, रोहित नाही इथे तेच बर आहे, उगीच बोलतो विना कारण मला, झोप ही येत नाही करणार तरी काय, ती पुस्तक वाचत होती, दार वाजला, रोहित आत आला रिया तिची तिची बसली होती

रोहित तिच्या जवळ येवून बसला, रोहित तिच्या कडे बघत होता, रियु सॉरी... तो काही बोलणार तेवढ्यात पिंकी आत आली,.. "वहिनी तू आज आमच्या रुम मधे येते का जरा वेळ बोलू",

"नाही पिंकी तू जा बर इथून",.. रोहित

"दादा तुला नाही विचारल मी, वहिनी सांग ना",.. पिंकी

"पिंकी जा इथून मला रियु शी बोलायच आहे",.. रोहित

"वहिनी चल ना उद्या बोल तू दादा",.. पिंकी

रोहित रिया कडे बघत होता

"हो येते मी",.. रिया

" चल मग ",.. पिंकी

रिया उठली, पिंकी सोबत निघून गेली, रोहित बघत राहिला, काय करु आता? उगीच चिडलो हिच्यावर, किती दिवस अबोला आता काय माहिती, झोपा आता,

पिंकी रिया छान गप्पा करत होत्या, आजी खुश होत्या, बर झाल रोहित मागे मागे आला नाही,

"रिया जा झोप आता, रोहित वाट बघत असेल ",.. आजी

रिया रूम मध्ये आली, रोहित झोपलेला होता, बर झालं, रिया पण झोपली, सकाळी लवकर उठायचं होत, हे लोक जाणार म्हणजे आता रोहित ऐकणार नाही अजिबात, आजी समोर किती त्रास देत होता तो, कोणी नसेल तर काय होईल? , तो आणि मी इथे, बापरे काही खरं नाही,

रिया सकाळी लवकर उठली, चहा नाश्ता रेडी होता, सगळे तयार झाले नाश्ता केला, चला आम्ही निघतो,

रिया इकडे ये आई अण्णा बोलवत होते,.. "नीट रहा आम्ही करतो फोन, तिकडे घेवून ये हिला" ,

पिंकी येवून भेटली,. वहिनी ये ग तिकडे,

आजींना बघून रियाच्या डोळ्यात पाणी होत,

"नीट रहा पोरी भांडू नका दोघांनी",.. रिया आजी पिंकी शी बोलत होती

रोहित आई अण्णा जवळ आला,.. "चांगली आहे तुझी बायको सांभाळ तिला, मी केला वरती फोन, करू आपण बंदोबस्त",

" हो अण्णा.. पिंकी कडे लक्ष द्या, तिला एकटीला सोडू नका, पिंकी जरा उत्साह आवर काळजी घे अलर्ट रहा",... रोहित

" हो दादा.. वाहिनीला फोन करेन मी लॅण्ड लाइन वर",.. पिंकी

हो..

शारदा ताई रिया ला भेटल्या, नीट रहा बेटा, रिया ने त्यांच्या पाया पडल्या

सगळे निघाले, रिया रोहित आत आले,

" रियु मला जायच आहे लगेच ऑफिस ला मला चहा दे",... रोहित आत निघून गेला

रिया किचन मध्ये गेली, तिने चहा तयार केला, ती चहा घेवून आली, रोहित रेडी होता, रियु इकडे ये, त्याने पुढे येवून रियाला मिठी मारली,.... रियु सॉरी, प्लीज बोल ना काहीतरी, अशी गप्प नको राहू, मी नव्हत चिडायला पाहिजे तुझ्या वर,

"काय झालं आहे रोहित? ",.. रिया

" विशाल जेल मधुन सुटला" ,.. रोहित

रियाच्या चेहर्‍यावर टेंशन होत, आता काय? तो माझ्या मागे आहे का? बापरे मला नाही जायच त्याच्या कडे, मला रोहित जवळ रहायच,.. "आता काय होईल रोहित?",

"काही होणार नाही रियु मी आहे, जास्त विचार करू नकोस ",.. रोहित

"हो, आणि मला राग नाही आला तुमचा ",.. रिया

"आहेच तशी गोड तू, नंतर बघतो मी",.. रोहित

काय?

"किती गोड आहेस तू ते ",.. रोहित

रिया लाजली..

"मी निघतो रियु, राधा आहे घरात, कुठे जायच नाही, शांत रहा, फोन वापरु नको, धोका आहे खूप, मी करतो आहे ठीक, काळजी करू नकोस, येतो मी लवकर ",... रोहित

तुम्ही काळजी घ्या

हो

रोहित ऑफिसला गेला, रिया ने राधा सोबत घर आवरल,
काय करणार दिवस भर, रोहित केव्हा येईल काय माहिती? , कसा असेल त्याच्या मूड? , सगळे नाही तर बोर होत, ती डायरी लिहीत बसली, दुपारी फोन आला पिंकीचा ते पोहोचले,

काळजी घे पिंकी कुठे जावू नकोस",.. रिया

हो वहिनी...

रोहितने त्या घरची सिक्युरिटी वाढवली...










🎭 Series Post

View all