हे प्रेम आहे की काय?... भाग 26

विशाल त्या रोहित चा पूर्ण रीपोर्ट तयार कर, कोण कोण आहे त्याच्या घरी, कुठे राहतात ते, सगळी माहिती हवी आहे, रिया च्या घरचे कुठे आहेत, तिचा फोन ट्रेस कर


हे प्रेम आहे की काय?... भाग 26

©️®️शिल्पा सुतार
........

रोहित आत आला, अण्णा वरती रूम मध्ये गेले, रोहित ने एका बॅग मध्ये त्याच सामान कपडे रियाचे कपडे घेतले मोबाईल चार्जर इतर सामान घेतल, तो बाहेर आला,

रिया रूम मध्ये बसली होती,.. "काय आहे बॅग मध्ये?",

"आपल सामान, कपडे, उद्या लागतील ना ",.. रोहित

"तुम्ही खरच इथेच राहणार का? ",.. रिया

हो रियु... रोहित हसत होता

रिया टेंशन मध्ये होती, कस काय झोपणार इथे?

दोघांनी बेडशीट टाकली नीट, रोहित रिया कडे बघत होती, रिया मुद्दाम दुसरी कडे बघत होती,

"काय करणार आता? कस झोपणार अस एवढ्या जवळ?, मला थोडा वेळ हवा होता " ,.. रिया विचार करत होती

रोहितला समजल.. रियु घाबरली वाटत

"रियु तुला सांगून ठेवतो मी आधीच, मला अजिबात त्रास द्यायचा नाही, माझ्या जवळ यायच नाही रात्री समजल का, एक तर मी झोपलो की मला काही समजत नाही कोण जवळ आल ते, दुपारी ही तू मला न विचारता मला मिठी मारली होती, किती घाबरलो होतो मी तेव्हा, लांब थांबायच माझ्या पासून , समजल का",.. रोहित

रिया बघत बसली रोहित कडे, ती हसत होती, केव्हा झाल हे? ,... अच्छा तेव्हा मी मिठी मारली होती याला रडत रडत ,.." मी त्रास देते का रोहित तुम्हाला? , तेव्हा मला गरज होती तुमची, एवढे घाबरता का तुम्ही मला, अस झाल असत तर काय झाल असत ",

" ते मला माहीत नाही पण आधीच सांगतो एक तर इथे आपण दोघ आहोत, रूम लहान, अजिबात चान्स घ्यायचा नाही, नाहीतरी बघ, आणि मला गरज असली तर मी मिठी मारू शकतो का तुला? ",.. रोहित

रिया हसत होती,

" बोल ना रियु",.. रोहित

हो..

" थॅन्क्स.. चला आता हे बर झाल ",.. रोहित हसत होता

" झोपा तुम्ही शांत, मी काहीही करणार नाही",... रिया

" ठीक आहे,... थोड लांब सरक रियु, आणि मला कराटे येतात ",.. रोहित

" अरे पण मी नाही करणार तुम्हाला काही",.. रिया खूप हसत होती

" तरी सांगून ठेवतो मला कराटे येतात आणि माझी आई बाजूच्या बंगल्यात आहे, नाव सांगेन तिला, लक्ष्यात ठेव",.. रोहित

काही खरं नाही इथे, अजिबात जागा नाही, रिया अजिबात कंफर्टेबल नव्हती, रोहित का घरी जात नाही इथे मुद्दाम माझ्या जवळ झोपला आहे आणि अजून मला च बोलतो आहे,

रिया कॉटवर झोपली, रोहित पाणी प्यायला उठला, रिया घाबरली, रोहित हसत होता

"काय झालं रोहित, का हसताय तुम्ही आता?, झोपा ना शांत ",..रिया

" चेहरा बघ कसा झाला आहे तुझा रिया, आरामात रहा",.. रोहित

रिया त्याला उशीने मारत होती..

रोहित रिया कडे बघत होता ,.. "काय भारी वाटत आहे आज इथे , आई ने हे भारी काम केल",..

" रोहित पुरे,.. मला चिडवायच नाही ",.. रिया

" घाबरली का रियु मला ? ",.. रोहित

"मी नाही घाबरत कोणाला , मला अजिबात जागा नाही म्हणून उठली होती मी",.. रिया

"मग माझ्या जवळ सरक",.. रोहित

नको..

रोहित परत उठला

" काय हवंय? काय शोधताय तुम्ही?, तिकडे सरका ना",.. रिया

" कुठे सरकू मी रियु? खाली पडेन मी, झोप आता मला उद्या ऑफिस आहे आराम होणार नाही, आणि मी सांगितल ते लक्ष्यात ठेव, मला त्रास द्यायचा नाही ",.. रोहित

रिया हसत होती, तीने बघितल रोहित झोपला होता, तिला अजिबात झोप येत नव्हती,

रोहितचा फोन उशी जवळ होता, त्याच्या वर मेसेज आलेला होता, याने आज फोन नीट नाही ठेवला का? , काय करू मी फोन वापरु का? , काय करणार पण कोणाला फोन करणार? , नको अस करायला, तो ठीक वागतोय, चिडेल तो माझ्यावर, आई बाबा तुमची खूप आठवण येते,
...

अण्णा रूम मध्ये आले शारदा ताई नुसत्या बसलेल्या होत्या, त्या नाराज होत्या, अण्णांना बघून त्यांच्या डोळ्यात पाणी होतं,... "रोहित आला होता का खाली? ",

"हो आला होता तो त्याचे कपडे घ्यायला",.. अण्णा

"गेला का मग कपडे घेऊन? ",.. शारदा ताई

"हो तिकडेच आहे तो रिया सोबत",.. अण्णा

"जेवला का तो? ",.. शारदा ताई

"जेवला असेल, तू मला एवढे प्रश्न का विचारते आहेस?",...अण्णा

"त्याच्या बाबतीत मला काळजी वाटते आहे? ",.. शारदा ताई

" त्याची आता काळजी कशाला करते तो त्याचं त्याच्या बायको सोबत ठीक आहे काहीही झालं तरी ते त्यांचे नीट राहतील आपणच बघा कसं वागायचं ते",.. अण्णा

" माझं चुकत आहे का काही? ",.. शारदा ताई

" तू तुझं बघ, तुला तुझं म्हणणं खरं करायचं आहे की तुला तुझा मुलगा सोबत हवा आहे, एवढं फक्त लक्षात ठेव की आता तो कोणाचा तरी नवरा आहे त्याला त्याच आयुष्य आहे तू म्हणशील तसंच तो करणार नाही, तो काही लहान नाही ",.. अण्णा

"कशी आहे ती मुलगी? ",... शारदा ताई

" चांगली आहे, आपल्या पिंकी सारखी आहे, लहान आहे नाही समजत मुलींना कधीकधी समोरची व्यक्ती चांगली की वाईट, झाली चुकी तिच्याकडून समजल आहे तिला, बरीच शिक्षा मिळाली तिला, पुरे आता ",.. अण्णा

" पण तुम्हाला हे अस आवडत आहे का? ",.. शारदा ताई

"मला काही प्रॉब्लेम नाही, रोहित खुश आहे तिच्यासोबत, शेवटी आपल्याला तेच हव होत ना ",.. अण्णा

" मी काय करू आता? मला नाही आवडत अस वागलेल",... शारदा ताई

" आता आली ती आपल्या घरी, होईल ठीक सगळ, समजून सांग तिला, आपण मोठे आहोत पुढाकार घ्यायला हवा",.... अण्णा

"पण मला राग आला आहे रोहितचा कसा वागला तो ",... शारदा ताई

" त्याला बहुतेक वाटल असेल की तू चीडशील म्हणून त्याने सांगितल नसेल ",.. अण्णा

"हो बरोबर... मला रोहित माझ्या पासून दूर जायला नको",... शारदा ताई

" मग रोहित पेक्षा त्याच्या बायको कडे लक्ष दे, तिला नीट सांभाळ ती खुश तर तुझा मुलगा खुश ",... अण्णा

" जमेल का मला?",... शारदा ताई

" जमवून घ्याव लागेल, असा राग राग करून उपयोग नाही, तू एकटी बाजूला पडशील अश्याने , तू ठरव तुला काय करायचं ते, तू हो म्हण किंवा नाही म्हण ते सोबत आहे आणि इथून बाहेर जाता येत नाही त्यांना धोका आहे नाहीतर कधीच कालच रोहित तिला घेऊन दुसरीकडे राहायला निघून गेला असता, आपणही जाणार आहोत एक-दोन दिवसात घरी तयारी करून ठेव, उद्या माझ या फॅक्टरीत थोडं काम आहे ते झालं की निघू आपण",... अण्णांनी झोपून घेतल

शारदा ताई विचार करत होत्या,.. सगळ्यांना खरच काही नाही वाटत त्या मुलीच, सगळ्यांना ती चांगली वाटते, काय करू बोलून बघु का तिच्याशी, रोहित माझ्या पासून दूर जाता काम नये, माझा लाडका आहे तो, आणि अण्णा चिडले वाटत माझ्या वर, अस नको व्हायला, मला ते खूप महत्वाचे आहेत माझ्या साठी , बघू उद्या ठरवू इथून जाण्या आधी नीट करू, रहा काय सोबत रहायच ते, माझ्या मुला साठी मला नमत घ्याव लागेल,

रोहित सकाळी उठला, बाजूला रिया झोपलेली होती, तिच्या कडे बघून तो खुश होता, केस मोकळे होते तिचे, एकदम शांत झोपली होती ती, किती सुंदर दिसते आहे ही, गाढ झोपली अगदी, आपण उठलो की ही उठून बसेल, अस हिच्या कडे बघत बसावस वाटत, त्याने रियाच्या अंगावर चादर नीट टाकली, रोहित उठल्या मूळे हालचाल झाली, रिया उठली,

रोहित अगदी शेजारी झोपून तिच्या कडे बघत होता, रिया घाई ने उठत होती , रोहितने तिला उठू दिल नाही, जवळ ओढून मिठीत घेतल, रियाने स्वतः ला सोडवून घ्यायचा प्रयत्न केला, पण रोहितने तिला सोडल नाही,

" गुड मॉर्निंग... रिलॅक्स रियु एवढी घाबरू नकोस, रहा आरामात माझ्या सोबत" ,.. रोहित

"जावू द्या ना मला, सोडा ",.. रिया

"कुठे जाणार रियु, थांब अशीच माझ्या जवळ , ठीक आहेस ना तू? ",.. रोहित

हो..

"आजची सकाळ किती छान आहे रियु, रोज अस तू माझ्या जवळ यावी अस वाटत मला ",.. रोहित

रिया लाजली होती,

"आॅफीस नाही का आज? ",.. रिया

"हो जायच आहे पण तुझ्या शेजारून उठावस वाटत नाही",.. रोहित

" जा तयार व्हा, चहाच काय? ",.. रिया

" रियु प्रॉमीस कर दिवसातून एकदा तरी माझ्या अश्या जवळ येशील ",.. रोहित

रिया लाजली होती..

" बोल ना रियु नाही तर मी सोडणार नाही तुला आज अस राहू आपण ",.. रोहित

"कोणी आल तर? ",.. रिया

" येवू दे आपण दार उघडायच नाही ",.. रोहित

" पिंकी आली तरी ही नाही उघडणार का दार ",.. रिया

" हो रियु नाही उघडणार ,.. बोल पटकन प्राॅमीस कर ",.. रोहित

" हो प्राॅमीस",.. रिया

" ये हुई ना बात ",.. रोहित

" मी ऑफिस मध्ये घेईन चहा, तुझ्या साठी राधा साठी बाहेरुन चहा नाश्ता ऑर्डर करतो, सिक्युरिटी गार्ड आणून देईन इकडे",.. रोहित

"ठीक आहे उशीर नाही होत का? ",.. रिया

दार वाजत होत..

" कोण आल सोडा ना ",.. रिया

रोहित उठून दार उघडायला गेला

पिंकी आली, तिने चहा नाश्ता आणला होता

"उठले नाही का अजून तुम्ही दोघ? चला गरमा गरम खावून घ्या ",.. पिंकी

" पिंकी कुठून आणला नाश्ता ",.. रोहित

" घरातून ",.. पिंकी

" कसा काय ",.. रोहित

" आई बोलली आधी हा चहा नाश्ता बाहेर देवून ये मग तू घे चहा",.. पिंकी

"आई ठीक आहे ना? ",.. रोहित

"हो आज काम करते आहे खूप, नॉर्मल आहे ",. पिंकी

" आमच्या बद्दल काही बोलली का ती, केव्हा बोलवणार आत आम्हाला",... रोहित

" नाही काही म्हटली नाही ती, मी जाते दादा, उठ वहिनी ",.. पिंकी

हो..

रोहित आवरून आला,

" राधाला चहा नाश्ता देवून येते ",.. रिया

हो..

दोघ नाश्ता करत होते, बहुतेक अण्णा बोलले असतिल काल आई शी, ठीक होईल सगळ, रोहित थोडा खुश होता

रिया घाबरली होती, म्हणजे घरात वापस जाव लागेल का? , बापरे कस होईल? रोहित दिवसभर नसतो घरी, त्याच्या आईने मला गुपचूप रागवल तर? , पिंकी आजी असतिल पण सोबत, आजींना काल पासुन भेटली नाही मी, त्या काळजी करत असतिल,

"मी ऑफिसला जावून येतो रियु, कसला विचार सुरू आहे ",.. रोहित

"काही नाही, ठीक आहे लवकर या",.. रिया आवरत होती

"राधा इकडे ये, घरातून जेवण येईल, जर नाही आल तर सिक्युरिटी गार्ड ला सांग, तो करेल मला फोन मग मी करेन ऑर्डर",.. रोहित

"ठीक आहे साहेब",.. राधा

"रिया कडे लक्ष दे, इथून कुठे जावू नका ",.. रोहित

रोहित ऑफिसला गेला, रियाने आवरल, केस विंचारायला कंगवा नव्हता, काल पासुन असे आहेत केस, पावडर नाही काय होणार, हे काय अस? , पण रोहित सोबत आहे तर काही वाटत नाही, राधा आत येवून बसली,.." राधा तुझ्या कडे कंगवा आहे का?" ,..

" नाही मॅडम माझ ही सामान आत आहे बंगल्यात" ,.. राधा

"आता काय ग मग",.. रिया

"अस बांधुन घ्या केस, छान आहेत तुमचे केस मॅडम, मोकळे खूप सुंदर दिसतात, मी देवू का नीट करून ",.. राधा

हो

राधा ने अशी वेणी घालून दिली..

अण्णा तयार झाले,.." मी जरा जावून येतो, एक दोन काम आहेत, तू तयारी करून ठेव आपण दुपारी जावू घरी ",

" अहो आपण राहू या एक दोन दिवस, रोहित आला की मला बोलायच आहे त्याच्याशी ",.. शारदा ताई

" बघ मला परत वाद नको आहेत",.. अण्णा

"नाही मी नीट समजुतीने घेईन, भांडणार नाही, घरी बोलवू त्याला आणि रियाला ",.. शारदा ताई

" ठीक आहे दुपारी बाहेर जेवण देवून दे, की बोलावते रिया ला आत मध्ये ",.. अण्णा

" नको रोहित सोबत येवु दे तिला घरी ",.. शारदा ताई

ठीक आहे

" अहो तुम्ही चिडले नाही ना माझ्या वर ",... शारदा ताई

" नाही शारदा ठीक आहे काळजी करू नकोस ",.. अण्णा

....

पोलिस लॉक अप मध्ये विशाल बसलेला होता, हवालदार त्याला बोलवायला आले, विशाल बाहेर आला, तुझी जामीन मंजूर झाली आहे, शहरा बाहेर जायच नाही, हजेरी लावायची इथे येवून रोज नाही तर अटक वॉरंट निघेल,

ठीक आहे इंस्पेक्टर साहेब..

मंगेश उभा होता वकीलां सोबत, विशाल त्यांच्या सोबत बाहेर गेला, ते चहा घ्यायला कॅन्टीन मध्ये गेले,.. "खूप धन्यवाद वकील साहेब, मोठ काम झाल एक",.. मंगेश ने त्यांचे पैसे दिले

वकील गेले

विशाल समोर गप्प बसला होता

"काय प्लॅन आहे आता विशाल? काही विचार केला की नाही? की नुसता आराम सुरू होता तुझा?",.. मंगेश

"आता सुटका होवुन पाच मिनिट झाले नाही भाई तुम्ही अस बोलतात ",.. विशाल

" मग आता सुट्टीवर जायचा विचार आहे का तुझा, तुला या साठी नाही सोडल जेल मधुन, पुढचा प्लॅन तयार कर, काहीही झाल तरी मला रिया हवी आहे ते ही लगेच",.. मंगेश

कस काय करणार आता हा प्लॅन? कुठे आहे रिया काय माहिती?, लग्न ही झाल असेल तीच आता पर्यंत, त्या गावत जर चुकून गेलो कोणी पाहिल तर काही खर नाही माझ, रोहित खूप मारेन मला आणि रोज इथे हजेरी लावायची, परत इकडे यायची धावपळ, मंगेश भाई ला काय होत सांगायला, तो रोहित सोडणार नाही मला डेंजर आहे तो,

"विशाल त्या रोहित चा पूर्ण रीपोर्ट तयार कर, कोण कोण आहे त्याच्या घरी, कुठे राहतात ते, सगळी माहिती हवी आहे, रिया च्या घरचे कुठे आहेत, तिचा फोन ट्रेस कर" ,.. मंगेश

हो भाई..

"उद्या सकाळी भेटतो मी तुला",.. मंगेश

हो चालेल..

मंगेशने विशाल ला पैसे दिले, विशाल गॅरेजवर आला, त्याला बघून रॉकी उठून उभा राहिला,

" घराची चावी दे माझ्या, तुझा फोन दे इकडे रॉकी, चहा नाश्ता सांग काहीतरी ",.. विशाल आत जावून बसला, त्याने कामाला सुरुवात केली

" हा कसा काय आला? पोलिसांनी सोडल याला?, रिया कुठे आहे? , नक्की काय सुरु आहे विशालच? आपण लक्ष देवू, परत काही चुकीच काम तर करत नाही ना हा? ",... रॉकी
......

🎭 Series Post

View all