हे प्रेम आहे की काय?... भाग 25

आई आत येवु देत नाही, आज जेवण दिल नाही आम्हाला, इथे कपडे नाहीत, पाणी नाही भांडी नाही, स्वयंपाक कसा करणार


हे प्रेम आहे की काय?... भाग 25

©️®️शिल्पा सुतार
........

रोहित ऑफिसच काम करत होता, रिया त्याच्या कडे बघत होती

"रियु इकडे बघु नको अस",.. रोहित

"मग कुठे बघु मी? एक तर रूम लहान, टीव्ही नाही, फोन नाही, बाहेर जायच नाही, काय करणार मी?" ,... रिया

"तू अस बघितल तर मी काम कस करणार",.. रोहित रिया कडे बघत होता, ठेवून देवू का लॅपटॉप?

नको...

रोहित हसत होता.... घाबरट

" तुम्ही जा घरी तिकडे तुमचे आई बाबा आले बर्‍याच दिवसांनी ",.. रिया

"नाही माझ्या बायको जवळ राहीन मी",.. रोहित

"मी चांगली मुलगी नाही",.. रिया

"कोण बोलल अस? ",.. रोहित

रिया काही बोलली नाही

"भांडण झालं की अस होत रियु, बोलतात घरचे, आपल्या पण चुका झाल्या आहेत ना, तुझ्या घरचे ओरडले असतिल ना तुला आधी, अस विचार करत बसायचा नाही, फक्त या पुढे अस होणार नाही इकडे लक्ष दे, इकडे ये माझ्या जवळ, थोडा विचार करायचा वागतांना, बघायच आपल काही चुकत तर नाही ना",... रोहित

रिया शांत बसुन ऐकत होती,... हो मामा किती ओरडला होता मला, बाबा चिडले होते, आजी ही रागवली होती मला, आई टिना नव्हते ओरडले...

"माझा राग आला का तुम्हाला रोहित? मी चुकीची वागली , मला नाही समजल काही तेव्हा, वाटल तो मुलगा चांगला आहे आणि मला त्याच्या सोबत राहायच होत तेव्हा ",.. रिया

" नाही रियु नाही आला राग ,.. मला माहिती आहे तू कशी आहेस ते, जास्त विचार करू नकोस, होत अस, आपल्याला काय माहिती कोण कस आहे ते",.. रोहित

रोहित काम करत होता,

" आता तुमच्या घरचे कधीच बोलणार नाही का माझ्याशी? ",.. रिया

" अस नाही होईल ठीक आई खूप छान आहे, प्रेमळ आहे, आता चिडली आहे ती एवढच",.. रोहित

कधी ठीक होईल सगळ काय माहिती? , घरी बाबा... मामा.. आजी.. असेच चिडतील का मी भेटली तर?, काय माहिती? मामाने मला मारला तर? , त्या दिवशी त्याने सांगितल होत घरा बाहेर पाउल टाकल तर बघ...

" काय विचार करतेस रियु?" ,... रोहित

" काही नाही....काय करता आहात तुम्ही? ",.. रिया

" खूप काम असत रियु मला ऑफिसच",.. रोहित

" कसली आहे फॅक्टरी ",.. रिया

" इंजिनिअरिंग युनिट आहे",.. रोहित

"तुम्ही इंजिनिअर आहात का? ",.. रिया

हो..

" मशीन वर आहेत का काम? ",.. रिया

" हो पण मला नाही बाकीचे वर्कर्स आहेत तिथे",.. रोहित

"मला पण यायच ऑफिसला",.. रिया

" हो सगळ नीट झाल की घेवून जाईन एकदा ",.. रोहित

" तस नाही रोज तुमच्या सारख ",.. रिया

"अस नाही येता येत ऑफिसला रियु, इंटरव्ह्यू द्यावा लागतो, त्यात पास व्हायला हव",.. रोहित

" कोण घेणार माझा इंटरव्ह्यू",.. रिया

" मी.. बॉस मी आहे ना ",.. रोहित

" काय काय प्रश्न असतिल? ",.. रिया

"अवघड असतिल प्रश्न ",.. रोहित

" मला सांगाल ना तुम्ही आधी प्रश्न ",.. रिया

" नाही रियु अस करता येणार नाही ",.. रोहित

प्लीज..

नाही...

रोहित मुद्दाम रियुला कंफर्टेबल करत होता,

पिंकी आली,.." दादा एक मिनिट",

"काय झालं पिंकी",... रोहित

रोहित बाहेर गेला,

" आईने किचन मधून वहिनी साठी जेवण द्यायला नकार दिला, त्या बाई येत होत्या आता जेवण घेवून, आई ओरडली त्यांना, पाणी सुद्धा दिल नाही ",.. पिंकी

"आई ला कस समजल पण ",.. रोहित

"तू आला होता किचन मधे ते समजल तिला",.. पिंकी

"काय हे अस पिंकी, रिया आता थोडी ठीक आहे, परत नाराज होईल ती",.. रोहित

"हो ना दादा, काय करणार, आई काय एवढी चिडली",..पिंकी

" ठीक आहे मी बाहेरून जेवण मागवतो, उगीच भांडत बसायला नको, रियाला भूक लागली खूप ",... रोहित

"हे घे फळ दे वाहिनीला, मी आणले चूपचाप ",.. पिंकी

" पिंकी आत ये ना, काय झालं ",.. रिया

" काय करते वहिनी?, दादा सोबत मस्त ह",.. पिंकी

"पिंकी आपण पार्टी करू या का मस्त? रियु चालेल का तूला, राधा इकडे ये काय खायचं तुम्हाला सांगा, आपण ऑर्डर करू आज ",... रोहित

" दादा मला पिझ्झा हवा आहे कधीचा खाल्ला नाही",.. पिंकी

"का बाहेरून घेताय जेवण , नको.. घरून येईल आता जेवण",.. रिया

" वहिनी बोर रोज पोळी भाजी, आपण पार्टी करू ग, तुला काय आवडत सांग ",.. पिंकी

" काय झालं आहे पिंकी रोहित? ",.. रिया

" काही नाही रियु",.. रोहित

" जेवण नाही का घरून आज? ",.. रिया

दोघ काही बोलले नाही..

ठीक आहे...

" राधा तू काय खाशील? पिंकी तू? रियु तू? ",.. रोहित

रिया काही बोलली नाही, ती गप्प बसली होती, काही खरं नाही, रोहितची आई लगेच ऐकणार नाही वाटत, खूप चिडल्या वाटत त्या, काय बोलल्या असतिल त्या रोहित शी, तो सांगत ही नाही काही ,

पिंकी ने जेवण ऑर्डर केल..

बाहेरून जेवण आल, पिंकी ने जेवण आत ठेवल , ताट नव्हते पाणी ही नव्हत, पाण्याची बाटली ही मागवली होती,

रिया सगळ बघत होती उद्या काय करणार आम्ही? , चहा नाश्ता जेवण कस होणार, बाहेरून किती घेणार, पाणी हव प्यायला , उद्या ऑफिस असेल रोहितला, रोहित मला जावू देत नाही, मी आई कडे गेले असते थोडे दिवस, बोलून बघते मी

"दादा मी आत जाते आईकडे ती ओरडेन",.. पिंकी

ठीक आहे

"रोहित एक बोलू का?",.. रिया

हो

"तुम्ही घरी जा, मी राहीन इथे, नाहीतरी मला आई कडे सोडून द्या, राधा असेल माझ्या सोबत, हे अस किती दिवस बाहेरून जेवण मागवणार" ,.. रिया

"तू कर स्वयंपाक रियु माझ्या साठी",.. रोहित हसत होता

" भांडी कुठे आहे, गॅस नाही" ,.. रिया

"मी आणतो काय काय हव ते सांग, पण तुला येतो का स्वयंपाक?, मला वाटत काही येत असेल तुला, नुसत आपल दिवस भर सुंदर दिसत फिरायच ",.. रोहित हसत होता

रिया चिडली होती, तिने रोहितला मारल,... येत मला सगळ

" आईला सांगू का मला मारते ही",.. रोहित

" नको... ते करू नका", .... दोघ हसत होते

" मला खिचडी येते, पोळ्या येतात, भाज्या येत नाही, ते रेसिपी बघून घेवू, मिक्सर नाही फ्रीज नाही रोहित",... रिया

" बापरे बर्‍याच गोष्टी हव्या",.. रोहित

"मला आई कडे जावू द्या ना",.. रिया

" नाही रियु मी बोलवेन त्यांना इकडे, उद्या मी करतो तुझ्या जेवणाची व्यवस्था ",.. रोहित

" तुमचे हाल होतील इथे, तुम्ही घरी जा, मला आई कडे जायच, प्लीज रोहित",.... रिया

"नाही रियु.. पुरे आता.. चल जेवायला",.. रोहित

"कधी येणार आई बाबा, प्लीज सांगा ",.. रिया

" हो आता आईचा रुसवा घालवू दे, अश्या परिस्थितीत तुझे आई बाबा आले तर अजून भांडण होईल ",.. रोहित

रिया खूप नाराज होती, आई बाबा मी कधी भेटेन तुम्हाला? , काय आहे हे बाहेर गेल की धोका , घरात डेंजर वातावरण, इकडे रोहितच्या आई चिडलेल्या, एक गोष्ट धड होत नाही,

राधा चल जेवायला...

रिया, राधा गप्प जेवत होत्या, रोहित त्यांना हव नको ते बघत होता,

"तुम्ही बसा जेवायला की आत जाणार",.. रिया

"मी इथेच जेवतो",.. रोहित जेवायला बसला

घरात डायनिंग टेबल वर आजी बसल्या होत्या, शारदा ताई अण्णा आले, पिंकी आली,

"रोहित कुठे आहे त्याला बोलवा जेवायला",.. शारदा ताई

"आई दादा जेवतो आहे तिकडे वहिनी सोबत, मला ही दिला पिझ्झा",.. पिंकी

"पिंकी तुझ्या दादाला बोलाव",.. शारदा ताई

" आई तो जेवतो आहे तिकडे ",.. पिंकी

शारदा ताई चिडल्या...

"मी करतो त्याला फोन शारदा.. शांत हो",.. अण्णा

"रोहित चल जेवायला",..

"मी जेवतो आहे अण्णा इथे ",.. रोहित

" तुझी आई बोलवते आहे",.. अण्णा

" हो आलोच, पाच मिनिट ",.. रोहित

" काय झालं? ",.. रिया

" आईने बोलवलं आहे, मी जेवतो मग आत जावून येतो",..रोहित

राधा इथे थांब रियु जवळ,... रोहित आत आला

सगळे जेवायला बसले, रोहित नुसता बसला होता, शारदा ताई त्याच्या कडे बघत होत्या

" काय जेवायच नाही का रोहित ? ",.. शारदा ताई

" झाल माझ जेवण? का बोलवलं होत आत",.. रोहित

" नेहमी आपण सोबत जेवतो पूर्ण फॅमिली",.. शारदा ताई

" हो पण ही पूर्ण फॅमिली नाही, माझी बायको नाही इथे",.. रोहित

"माझ्यासाठी तुझ लग्न झाल नाही अजून ",.. शारदा ताई

"पण तेच सत्य आहे आई, माझ लग्न झाल आहे, मान्य कर, एकदा बोलून बघ शांत पणे रियुशी, खूप चांगली आहे ती ",.. रोहित

" हो आई वहिनी चांगली आहे, पुरे आता भांडण, तू आज तिला जेवायला दिल नाही, पाणी ही नाही दिल प्यायला , आणि दादाला बरोबर बोलवलं जेवायला, म्हणजे तू सासू झाली आता आई, तुझ्या मुलाला काही बोलत नाही, वाहिनीला ओरडते मारते ",.. पिंकी

शारदा ताई पिंकीला फटका मारला,.." करशील का मध्ये मध्ये नेहमी, खूप बोलते ही ",

" आई नको ना मारू तिला, बरोबर बोलते आहे पिंकी, मी दोषी आहे तू रियाचा का राग राग करते, जेवण नाही तिला पाणी ही नाही, चिडली तू तिच्यावर, काय केल तिने, ती नव्हती तयार माझ्या सोबत यायला, मीच आणल तिला इथे",.. रोहित

"रोहित मला काहीही ऐकुन घ्यायच नाही ",.. शारदा ताई

" एकदा बोलून बघ तिच्याशी ",.. रोहित

नाही

" मी जातो आई इथुन, आता बोलण्यात काही अर्थ नाही, तुझ डोक शांत झाल की बोलू",.. रोहित

" तुला इथुन जाता येणार नाही रोहित, रूम मध्ये जा तुझ्या ",.. शारदा ताई

" आई मी ठरवेन मला काय करायच ते, रियु एकटी आहे, येतो मी, आरामात जेवा तुम्ही ",.. रोहित

" रोहित जर तू गेला तर तुलाही घरात घेणार नाही मी, तुझ ही जेवण बंद ",.. शारदा ताई

" ठीक आहे आई तुला जस वाटत तस कर ",.. रोहित

रोहित बाहेर आला

रिया राधा बाहेर फिरत होत्या, सिक्युरिटी गार्ड लक्ष देवून होता,

" छान वाटत ना इथे बाहेर मॅडम ",.. राधा

" हो खरच गार वारा आहे, मोकळ वाटत इथे घरात कोंडल्या सारख होत ",.. रिया

बाकीच्या घरातील लोक या दोघीं कडे बघत होत्या, बाजूच्या घरात ताई, आजी आजोबा होते, इतर घरात फॅमिली होत्या, सगळे हळु हळू बोलत होते काय झालं असेल? ह्या मॅडम इथे का राहतात? ,

रोहित बाहेर बसला होता,.. चला आत आता मध्ये दोघी

" राधा तू राहशील ना इथे ",.. रोहित

हो..

" दार लाव नीट",.. रोहित

"मॅडम एकट्या आहेत का? ",.. राधा

"मी आहे तिच्या सोबत",.. रोहित

ठीक आहे

राधा आत गेली, रिया आत आली

"रोहित आपल्याला बेडशिट कपडे नाहीत, आतून आणावे लागतील" ,.. रिया

"जावू दे झोपू अस मी परत नाही जाणार आत",.. रोहित

"काय झालं काही बोलल्या का तुला आई",.. रिया

" नाही... रोहित ने सांगितल नाही की त्याला ही घराबाहेर काढल आता आईने",..

पिंकी अण्णा आले, रिया रोहित कॉटवर बसले होते, ते उठून उभे राहिले, पिंकीने ब्लँकेट उशी बेडशीटआणली होती, राधा साठी ही उशी ब्लँकेट बेड शीट आणले होती, रिया राधा कडे गेली होती

"पिंकी उद्या साठी माझे ऑफिसचे कपडे हवे होते" ,... रोहित

"हो आईने घराबाहेर काढल ना तुला?",.. पिंकी हसत होती

"हसू नको पिंकी, आता तुझा नंबर आहे, उद्या आमच्या सोबत रहाव लागल तर तुला",.. रोहित

"हो सांगता येत नाही, मला ही घराबाहेर काढु शकते आई",.. पिंकी

" मला नाही वाटत आई आत येवू देईल मला" ,...रोहित

"आणते दादा... काय काय हव ते सांग, आता कसतरी बाहेर आलो आम्ही गुपचूप ",.. पिंकी

"तू समजवून सांग आईला, इथून बाहेर जाता येत नाही, नाही तर रियुला घेवून हॉटेल मध्ये राहिलो असतो मी, उद्या चहा नाश्ता कसा करणार? दुपारच जेवण सगळाच प्रश्न आहे?",.. रोहित

"आई का अस करते, काय माहिती? , मी काही बोलाल की मारते",.. पिंकी

"मी अण्णांशी बोलू का ",.. रोहित

हो..

"तू आत बस रियु जवळ",.. रोहित

"अण्णा मला बोलायच आहे थोड",.. रोहित

बोल..

"तुम्ही समजून सांगा ना आईला, रियाला धोका आहे बाहेर, तिला नाही नेवू शकत मी बाहेर, नाही तर हॉटेल वर राहिलो असतो",... रोहित

" हो बोलतो मी तिच्याशी, काय झाल ते गुंड पकडले गेले का? ",.. अण्णा

"पकडल होत एकाला त्याला शहरात घेऊन गेले त्याचे साथीदार आणि ते सगळे आमच्या मागे आहेत, खूपच धोका आहे रीयाला बाहेर",.. रोहित

"तू पोलिसात परत एकदा त्यांची कम्प्लेंट कर, नाही तर मी करतो वरती फोन, त्यांचा बंदोबस्त करतो, तू काळजी करू नकोस, का मागे लागले आहेत ते असे",.. अण्णा

" त्यांना रिया हवी आहे, त्यांचे काम आहे हे चांगल्या मुलींना फसवण",.. रोहित

"कठीण आहे हे सगळं",.. अण्णा

" हो ना अण्णा मी कसा तरी त्या लोकांच्या तावडीतून रीया ला बाहेर काढला आहे, तिच्या घरचे खूप घाबरून गेले होते, ते मला खूप रिक्वेस्ट करत होते की काहीही करून रियाला तुम्ही सेफ जागी ठेवा, मी नकार देऊ शकलो नाही आणि मलाही रीयाशी लग्न करायचं होतं, चांगली आहे ती अण्णा, तिला काही कल्पना नव्हती त्या लोकांचा काय प्लॅन होता",.. रोहित

" ठीक आहे ना आता रिया",.. अण्णा

" हो रडत होती, तिला तिच्या आई कडे जायच आहे ",.. रोहित

" काळजी घे तिची",.. अण्णा

हो

" तुझ्याशी ठीक आहे ना बोलते ना आता",.. अण्णा

" हो माझ्याशी ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही",.. रोहित

" मी समजावतो शारदा ला",.. अण्णा

" आई आत येवु देत नाही, आज जेवण दिल नाही आम्हाला, इथे कपडे नाहीत, पाणी नाही भांडी नाही, स्वयंपाक कसा करणार, मी उद्या ऑफिसला गेल्यावर या मुली काय खातील? , सामान आणल तरी मला नाही वाटत रीयाला स्वयंपाक येत असेल ",.. रोहित

" मी बघतो शारदाने ऐकल नाही तर मी आणून देईन त्यांना जेवण",.. अण्णा

" अण्णा उद्या रिया कडे लक्ष द्या, ती आज इथून जायच म्हणत होती कसतरी समजवल आहे तिला",.. रोहित

" हो मी आहे लक्ष देवून तरी पूर्ण वेळ नाही इथे थांबू शकत, बॉडी गार्ड ठेव इथे एक ",.. अण्णा

"हो.., माझी महत्त्वाच्या दोन तीन मीटिंग आहेत, जाव लागेल मला ऑफिस ला",.. रोहित

पिंकी... रोहित आवाज देत होता

पिंकी बाहेर आली,

" माझे कपडे आणून दे ना, रियाचा ड्रेस, टॉवेल साबण",... रोहित

" जा आत काय लागत ते घे रोहित, तुझी आई वरती रूम मध्ये आहे मी थांबतो तिच्या जवळ, पिंकी हा गेला की दार लावून घे ",... अण्णा

" हो चल दादा",... पिंकी

🎭 Series Post

View all