©️®️शिल्पा सुतार
........
........
रोहितने थोडं काम केलं, मग घरी फोन केला, आजी पिंकी माझ्या रियुला सांगून देवू आनंदाची बातमी, फोन पिंकीने उचलला
"आपल्याला टेंडरची ऑर्डर मिळाली आहे पिंकी",.. रोहित
" खूप अभिनंदन दादा खूप छान",.. पिंकी
"आजी आणि रियुला सांगून दे ",.. रोहित
" तुझी रियु आहे इथे बोल तिच्याशी",.. पिंकी
पिंकी आजीला बातमी सांगायला आत मध्ये गेली
" रियु आपल्याला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे",.. रोहित
"खूप छान खूप अभिनंदन तुमचं",.. रिया
" आपलं रियु.. मी आता खूप मेहनत करणार आहे, तू साथ देशील ना मला ",.. रोहित
हो... एवढंच रिया बोलली, तिला खूप धडधड होत होती,
" आज मी तुला एवढी आनंदाची बातमी दिली, तू त्या बदल्यात मला काय देशील? ",.. रोहित
रिया काही बोलली नाही..
"बोल ना रियु... ठीक आहे आज आपण संध्याकाळी टेरेस वर जाऊ तेव्हा सांगशील का? काही बोलशील का रियु? मला काही समजत नाही तू ऐकते आहे की नाही? ",.. रोहित
" मी ऐकते आहे ",.. एवढंच रिया बोलली
" नुसतं काय ऐकते आहेस, काहीतरी बोल ",.. रोहित
चालेल...
"एवढच काय? फक्त चालेल? अच्छा म्हणजे संध्याकाळी टेरेसवर यायला चालेल",.. रोहित
रियु हसत होती..
" कोण हसत आहे एवढ छान ",.. रोहित
रिया अजून हसत होती.. मी फोन ठेवते
" अरे बोल ना माझ्याशी रियु",.. रोहित
"नाही.. आता आम्ही जेवायला बसतो आहोत, तुमचं जेवण झालं का?",.. रोहित
"नाही आम्हाला कोण देणार वाढुन, आम्हाला कॅन्टीनमध्ये जावं लागेल ",.. रोहित
" डबा का नाही नेत मग तुम्ही? ",.. रिया
" कोण देईल आम्हाला डबा",.. रोहित
"मी देऊ का डबा उद्यापासून",.. रिया
" चालेल पण तुला स्वयंपाक येतो का?,.. रोहित
"नाही येत पूर्ण, थोडा येतो, पण त्या बाई स्वयंपाक करतील ना",.. रिया
"याला काय अर्थ आहे, तू जर स्वयंपाक करणार असशील तर मी डबा नेईन",.. रोहित
"मला मग रात्री फोनवर वर रेसिपी बघावी लागतील",.. रिया
" बापरे इथून सुरुवात आहे का? ठीक आहे ट्राय कर मी खाईन",.. रोहित
ठेवू मी फोन..
चालेल..
" संध्याकाळी लवकर या ",. रिया
" हो पण ते टेरेस वर भेटायच फिक्स ना",.. रोहित
रिया लाजली होती
" बोल ना रियु",.. रोहित
नाही... रिया ने फोन ठेवला
" रियु.... रियु.... बघतो हिच्या कडे संध्याकाळी ",.. रोहित ने फोन ठेवला, रिया खूप खुश होती
आजी पिंकी रिया यांच जेवण झाल, आजी छान बोलत होत्या रिया शी, पिंकी बसुन ऐकत होती
चला जरा वेळ आराम करा मुलींनो...
.......
.......
"झाली की नाही तयारी शारदा? काय करते आहे? एवढ काय सामान घेतल? ",.. अण्णा
"पोराला एवढी मोठी ऑर्डर मिळाली थोडं सेलिब्रेट करू, आज-काल तो नाराज असतो आपण गेलो की जरा खुश होईल ",.. शारदा ताई
"ठीक आहे ",..
"मी होते तयार लगेच , सांगून देऊ का त्यांना आपण येतोय ते ",.. शारदा ताई
" नको सांगू आपण सरप्राईज देऊ",... अण्णा
" चालेल",...
नवीन ऑर्डर संदर्भात रोहितला महत्वाची मिटींग होती, तो अभिजीत सोबत मीटिंग साठी निघून गेला,
अण्णा शारदाताई फार्महाउस वर आले, गेटवर गाडी आली, काय कराव? , रोहित साहेबांना फोन करावा का की गाडी आज जाऊ द्यावी, सिक्युरिटी गार्ड ने नियमाप्रमाणे रोहितला फोन केला, रोहित मिटिंग मध्ये होता, फोन सायलेंटवर होता, त्यांने फोन उचलला नाही, सिक्युरिटी गार्डने ऑफिस मध्ये फोन करून निरोप दिला
गाडी आत मध्ये गेली, मोठे साहेब आहेत, काही बोलता आलं नाही, बंगल्याच्या गेटवर गाडी गेली, गाडी बाहेर लावली, अण्णा शारदाताई आत मध्ये आले ,
गेट वाजलं पिंकीने बघितलं आई अण्णा आले आहेत, ती खूप घाबरुन गेली होती,.. "आजी आता काय करायचं?",
"काय झालं?",.. आजी
"आई अण्णा आले",.. पिंकी
"कुठे आहेत ते",.. आजी
"आत येतं आहेत",.. पिंकी
" घाबरू नको पिंकी, रिया कुठे आहे?",.. आजी
" वहिनी तिच्या रूम मध्ये होती झोपली असेल वाटतं, काय करूया?",.. पिंकी
" रोहितला फोन कर लगेच ",... आजी
"कसा करणार आजी, आई अण्णा आत मध्ये आले, ते हॉलमध्ये आले, हॉल मध्ये फोन आहेत",.. पिंकी
आजी पिंकी पुढे गेल्या, रिया च्या रूमचा दरवाजा बंद होता,
" दार लॉक कर हीच बाहेरून",.. आजी
" आजी चावी कुठे आहे? मी कशी करणार ",.. पिंकी
पिंकी जाऊन दोघांना भेटली,
"असा काय चेहरा झाला आहे ग तुझा पिंकी",... शारदा ताई
"काही नाही आई",.. पिंकी
आजी दोघांशी बोलत होती,
पिंकीने पटकन लॅण्ड लाईन वरून फोन केला, ऑपरेटरने फोन उचलला
"रोहित दादा आहे का",.. पिंकी
"सर मीटिंग मध्ये आहे मी सांगते",..
"अर्जंट आहे",.. पिंकी
हो
"काय करू आजी",.. पिंकी
शांत रहा...
रिया झोपून उठली, तिने आवरल, बाहेर आवाज ऐकला, कोण आल आहे? , रोहित आहे का? , बघते जावून,
ती बाहेर आली हॉलमध्ये शारदाताई अण्णा आजी पिंकी सगळे बसलेले होते, रियाला बघून शारदाताई उठून उभ्या राहिल्या, अण्णा ही बघत राहिले,.." ही कोण आहे, रिया आहे का ही? काय करते आहे इथे?",... , तेवढ्यात शारदा ताईंचे लक्ष रियाच्या गळ्याकडे गेलो, तिच्या गळ्यात मंगळसूत्र होतं, शारदा ताई आजी आणि पिंकी कडे बघत होत्या
"काय आहे हे आई.. पिंकी? तुम्ही सांगाल का? ही काय करते आहे इथे?" ,... शारदा ताई
रिया खूप घाबरली होती, ती आजी कडे बघत होती
" कोण ग तू? ",.. शारदा ताई
" शारदा तू जरा शांततेत घे रोहित ऑफिसहुन आला कि आपण बोलू",... आजी
"तो आला की काय बोलणारच आहे आपण? सगळ स्पष्ट दिसत आहे लग्न केल आहे हिच्याशी त्याने ",... शारदा ताई
रिया एका जागी उभी होती,..." रिया आत जा तू ",.. आजी
" थांब इकडे ये",.. शारदा ताई
काय करू मी?... ती आजींकडे बघत होती, रिया पुढे आली तिने शारदा ताई यांच्या पाया पडायला वाकली, त्या मागे झाल्या, प्रचंड चिडलेल्या होत्या त्या,
" यासाठी रोहित इकडे मजेत आहे का? कुठे सापडली ही? झालं का फिरून मित्रासोबत? काय ग आमचा रोहित सापडलं का तुला? श्रीमंत मुल बरोबर दिसतात अशा मुलींना, लाज नाही का वाटत, तिच्या मामाच्या घरीच किती साधी असल्यासारखं दाखवत होती नंतर बरोबर समजले हिचे गुण, कोणाची परमिशन घेऊन तु या घरात आली",... शारदा ताईंनी रियाला एक जोरात थोबाडीत मारली
आजी पिंकी आण्णा सगळे दचकले, रिया खाली बसली एकदम, राधा पळत आली,... मॅडम प्लीज रिया मॅडमला मारू नका
पिंकी वाकली खाली,.. "उठ वहिनी, बापरे किती गाल लाल झाला, काय करते आहेस आई? कशाला मारते आहेस वहिनीला",..
" शारदा काय आहे हे? ",.. आजी चिडली
"पुरे शारदा, जा बेटा आत , दुसर्याच्या मुलीवर राग काढतेस आपल्या पोराला बोल काय बोलायच ते",.. अण्णा
"तुम्ही सगळ्यांनी गप्प बसा, ही मुलगी मला इथे अजिबात नको आहे तोंडासमोर",... त्यांनी रीयाचा हात धरला, तिला ओढत घराबाहेर नेलं,
"आई सोड वाहिनीला, आई वहिनी रडते आहे" ,.. शारदा ताईंनी पिंकी एक फटका ठेवला, तुझी फुस दिसते हिला, चल हो बाजूला
राधा मध्ये पडली,.. "सोडा मॅडमला ",
रियाने राधाला डोळ्याने सांगितलं की नको बोलू काही
अण्णा पुढे आले,.. "शारदा नको करू अस आधी रोहित ला येवू दे, मी काय सांगतोय",
त्यांनी ऐकल नाही,
शारदा...
"बघितल हिच्या मुळे माझ्यावर कधीही न ओरडणारा नवरा माझ्या वर ओरडतो आहे, जादू करते का ग तू लोकांवर?",. शारदा ताई
"शारदा काय आहे हे थांबव आधी मी काय म्हणतोय ",.. अण्णा चिडले होते
रिया अण्णा कडे बघत होती,.. "मी जाते बाहेर अण्णा नका बोलू काही त्यांना ",..
"बाहेर जाते तर उपकार करते का? हे घर तुझ नाही मुळी ",..शारदा ताई
शारदा ताईंनी रियाला घराबाहेर काढलं, राधा ही तिच्याबरोबर बाहेर गेली, सिक्युरिटी गार्डला गेटला कुलूप लावायला सांगितलं,... "ही मुलगी जर आत आली तर बघा, तुमची नोकरी जाईल",
रिया राधा बाहेर झाडाखाली उभ्या होत्या, पिंकी शारदा ताईं सोबत गेटवर उभी होती
"काय करते आहेस आई? का बरं तू असं करते आहेस वहिनीला?, अग ती चांगली आहे, नको करू अस, तो दादा ही चिडतो तिच्यावर, नको अस करु उघड गेट, अग माझ्या एवढी आहे ती, मला कोणी अस केल तर तुला चालेल का? ",. पिंकी
"काय वहिनी वहिनी करते आहे तू, तुला माहिती आहे का त्या पोरीने काय केला आहे, असं लग्नाआधी दुसर्यासोबत पळून दिवे लावले, तू अस केल तुला ही हुसकून देईन मी, शहाणपण नको पिंकी चल आत ",.. शारदा ताई
" आई वहिनीच तस काही नाही, तो मुलगा तिला फसवत होता माहिती आहे ना आपल्याला ",.. पिंकी
"बरीच माहिती दिसते तुला या पोरीची, तुलाही जायचं आहे का घराबाहेर गुपचूप आत चल ",.. शारदा ताई
शारदा ताई आत आल्या, आण्णा आजी त्यांच्याकडे बघत होत्या
" शारदा मी काय म्हणते आहे ",.. आजी
" तुम्ही काहीच म्हणू नका आई, तुम्हाला माहिती होतं ना ति इथे राहते, मला का नाही सांगितलं आणि कधी झालो हे लग्न ",.. शारदा ताई
आजी गप्प होत्या
" नका बोलू तुम्ही काही त्या पोरीची बाजू घ्यायच ठरवल आहे तुम्ही सगळ्यांनी ",.. शारदा ताई
" शारदा अग ऐक रोहित आल्यावर बोललो असतो आपण",.. अण्णा
" तुम्ही मला काही सांगू नका ",.. शारदा ताई रूम मध्ये चालल्या गेली
पिंकी ने परत फोन केला, ऑपरेटरने उचलला,.. "दादा कुठे आहे? इमर्जन्सी आहे सांगितलं ना एकदा ",
" सर मोठ्या मीटिंगमध्ये आहेत, त्यांनी फोन द्यायला नकार दिला आहे ",..
" ठीक आहे... मीटिंग झाली की लगेच इकडे फोन करायला सांगा",.. पिंकी
ठीक आहे
पिंकी... अण्णा आणि आजींकडे बघत होती
"कुठे आहे रिया",.. आजी
"गेट बाहेर झाडाखाली उभी आहे",.. पिंकी
"शारदा पण ना का असं करते",.. आजी काळजी करत होत्या, मी जाते जरा बाहेर बघते
"काही उपयोग नाही आजी, आई चिडेल, तू तब्येत सांभाळ",... पिंकी
" अति झालं आहे हा दादा का फोन उचलत नाही, अण्णा तुमचा मोबाईल द्या ना",.. पिंकी
" मी जातो बाहेर, बघतो रिया कडे ",.. अण्णा बाहेर गेले, गेट उघडा, वॉच मन ने गेट उघडल, अण्णा बाहेर आले, रिया रडत होती, ती झाडाखाली बसली होती, राधा बाजूला बसली होती, अण्णा त्यांच्या जवळ आले,.." चल आत रिया ",
रिया उठून उभी राहिली, ती मानेने नाही बोलली
"चल आत बेटा",.. अण्णा
"रोहित आले की येते",.. रिया
"चल मी आहे ना, मी माफी मागतो तुझी, शारदा जरा तापट आहे, तिने अस तुला मारायला नव्हत पाहिजे ",.. अण्णा
रिया ने पटकन त्यांच्या पाया पडल्या,.." अस नका बोलू तुम्ही , चुकी माझी आहे मला माहिती आहे अण्णा, मी थांबते बाहेर, मी नाही येत आत, मला भिती वाटते, रोहित कुठे आहे" ,...
" तो येईल मी आहे चल आत ",.. अण्णा
" नको तुम्ही जा आत माझ्या मुळे तुमच्या दोघात भांडण नको ",.. रिया
"चल कार मध्ये बस मग, नाही तर दुसरी कडे करतो तुझी व्यवस्था",.. अण्णा
"नको साहेब, रोहित साहेबांनी मॅडमला इथून बाहेर नाही न्यायला सांगितल, मी आहे आम्ही थांबतो इथे",.. राधा
त्या दोघी कार मध्ये बसल्या, अण्णांनी एसी ऑन केला, ते ही पुढे बसले
पिंकी ने फोन केला, रोहितची मिटिंग संपली होती,
"बोला अण्णा",.. रोहित
"दादा मी बोलते आहे पिंकी",.. पिंकी
" पण तुझ्याकडे कसा पिंकी हा फोन ",.. रोहित
" आई अण्णा इकडे आले आहेत दादा ",.. पिंकी
"रिया कुठे आहे",.. रोहित
" खूप गडबड झाली आहे दादा, तू लवकर घरी ये, आई खूप चिडली आहे, आईने वाहिनीला घराबाहेर काढलं",.. पिंकी
"कुठे आहे मग आता रिया ",.. रोहित
" बाहेर झाडाखाली उभी आहे ",.. पिंकी
"राधा कुठे आहे",.. रोहित
" वहिनी सोबत आहे राधा, अण्णा बाहेर गेले आता वहिनी सोबत, दादा आईने वहिनीला मारलं आणि वहिनी रडते आहे",.. पिंकी
" काय चाललं आहे हे? , तू काय करत होती, थांबवता नाही आल का हे? ",.. रोहित
" मी मध्ये पडले होते दादा, मला ही मारल आई ने, विचार आजीला, आई खूप बोलली वाहिनीला" ,... पिंकी
"असं कसं काय झालं केव्हा आले हे लोक?",.. रोहित
" काहीच माहिती नाही दादा, गेट वाजल तर मी बघितलं आपली गाडी आली होती, वहिनीला काही सांगणार तेवढ्यात ती बाहेर आली हॉल मध्ये, आल्यानंतर पाच मिनिटातच हे सगळं झालं",... पिंकी
रोहित डोक्याला हात लावून बसला होता, त्याने गेटवर फोन केला, वर्कर कॉर्टर मधल्या दोन रूम खाली आहे ना, त्यातली एक रूम उघडून त्यात रियाला बसवा, मी येतो आहे लगेच,
वॉचमन कार जवळ आला, मॅडम साठी मागे कॉर्टर खाली आहे, तिथे बसायला सांगितल,
अण्णा रिया राधा त्यांच्यासोबत गेले, बंगल्याच्या मागच्या बाजूला लोकांना राहायला जागा होती, त्यातली कोपर्यातली रूम रिकामी होते, ती वॉचमनने उघडली
रीया राधा आत जाऊन बसले, अण्णा बाहेर उभे होते, त्यांना खुर्ची आणून दिली, एक रूम होती छोट किचन आणि बाथरूम होतं, रिया खूप गप्प झाली होती, रडून रडून डोळे दुखत होते, राधा तिच्याजवळ गप्प बसली होती,
"मॅडम पाणी हव का?",.. राधा
"कुठे आहे पाणी राधा? मला काहीही नको, मला रहायची नाही इथे" ,... रिया रडत होती
"झोपून घ्या जरा वेळ मॅडम, प्लीज रडू नका" ,... राधा
"राधा तू नको त्रास करून घेवू, अस होणार मला, चुका खूप केल्या मी, ठीक आहे, तू तुझे आई वडील बोलतील ते नेहमी ऐकत जा ",.. रिया रडत होती
मलाच का असं होतं नेहमी, कोणा सोबत राहण्यासाठी मन तयार केलं की काहीतरी अडचण येते, किती डेंजर आहे रोहितची आई, कसं काय राहणार आहे मी त्यांच्यासोबत, चुकी मी केली आहे त्याची शिक्षा त्यांनी मला दिली, आता काय होईल पुढे?, किती बोलल्या त्या मला, फटका मारला,
रोहित अजून ऑफिसहुन आला नाही, त्याने जर आईच ऐकून मला इथून जायला सांगितलं तर, तिला अजुनच रडायला येत होतं, आधी मला रोहितची भीती होती आता त्याच्या आईची, अजिबात शांतता नाही, मी इथे रहाणार नाही, जावू दे, त्यांनी जायला सांगायच्या आधी मी जाते इथून, किती डेंजर आहे हे लोक, सगळे चिडतात माझ्यावर, खूप गाल दुखतोय... आई मला यायच आहे तिकडे, ही राधा सोडणार नाही पण मला अस, काय करू, ती दोन मिनीट इकडे तिकडे जात नाही मला सोडून, एवढे गेट या फार्म हाऊसवर, रोहित येईल लगेच, पूर्ण फसली आहे मी, काही खरं नाही... रिया परत रडत होती...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा