हे प्रेम आहे की काय?... भाग 21

रोहित मला जावू द्या",... खूप सुंदर चांदण पडल होत सगळीकडे, रिया खूप छान दिसत होती, रोहित ऐकायला तयार नव्हता,


हे प्रेम आहे की काय?... भाग 21

©️®️शिल्पा सुतार
........

पाच वाजता पिंकी आत मध्ये आली,.. "वहिनी आजी बोलवते आहे चहा घ्यायला",..

"बापरे उशीर झाला का खूप मला उठायला",.. रिया

"नाही वहिनी",.. पिंकी

रिया बाहेर आली, आजी डायनिंग टेबल वर बसलेल्या होत्या

तिघींनी चहा घेतला, रिया तिच्या विचारात होती, रोहित बद्दल विचार सुरू होता, चांगला आहे तो, घरचे चांगले आहेत, वागायला बरा आहे, समजून घेतो, काय करू आजी बोलतय तस मी उगीच विशाल विशाल करते का?, रोहितचा विचार करू म्हणजे नेमक काय करू मी? , त्याला विसरत नाही मी, सारख आजुबाजुला असतो तो,

" वहिनी आपण बागेत फिरायच का? ",.. पिंकी

" हो पण गेट बाहेर जायचं नाही",.. रिया

"ठीक आहे, मला माहिती आहे दादा ओरडेल ",.. पिंकी

"आज आपण टेरेस वर जावू ",.. रिया

"ठीक आहे ",.. पिंकी

रिया पिंकी आजी मस्त बाहेर फिरत होत्या, राधा होती त्यांच्या सोबत, आजी राधा बोलत बसल्या होत्या ,

"वहिनी ड्रेस कुठून घेतले तू",.. पिंकी

"माहिती नाही रोहितने आणले",.. रिया

" ओये होय.. मजा आहे बुवा, तुला मंगळसूत्र छान दिसत, केस छान आहेत तुझे",.. पिंकी

रिया हसत होती.. पुरे पिंकी

"सगळे तुझ नेहमी कौतुक करत असतिल ना वहिनी तू खूप छान आहेस",... पिंकी

कसला काय कौतुक, किती ओरडतात मला सगळे, आजी, मामा, रोहित सगळ्यात जास्त ओरडले आता पर्यंत,

"तू पुढे शिकणार आहे का पिंकी? ",.. रिया

हो..

"तू वहिनी? ",.. पिंकी

"माहिती नाही, पिंकी तुझ्या लग्नाच बघता आहेत ना? ",... रिया

" नाही मी अजून दोन वर्ष लग्न करणार नाही",.. पिंकी

आजी बोलवत होत्या, चला आत पोरींनो रोहित येईल थोड्या वेळाने ओरडेल तो तुम्हाला बाहेर बघितल तर , चला दिवा बत्ति करू

आजींनी देवाला दिवा लावला, रिया पिंकी आजी जवळ बसल्या होत्या, रिया रोहितचा विचार करत होती आज महत्वाच काम आहे, ते नीट होवु दे देवा

मंगेश भाई खूप प्रयत्न करत होता विशालला शहरात घेवून यायचा, विशाल एकदा शहरात आला की मग त्याची सुटका सहज करू शकत होता तो आणि रियाला मिळवायचा प्रयत्न करता येईल , मंगेश भाईला थोड्या दिवसात यश मिळाल एका मोठ्या मंत्रीशी ओळख होती त्याची, पोलिसाच्या गाडीतून सहज त्यांनी विशालला गावच्या पोलीस चौकी तून काढल शहरात घेवून आले,

पोलिस रोहितला फोन करत होते, रोहित अति महत्त्वाच्या मीटिंग मध्ये होता त्याने फोन उचलला नाही, मीटिंग झाली, मनासारखे टेंडर आपल्याला मिळेल ही खात्री होती रोहितला, तो खुश होता, अभिजीत सोबत घरी निघाला,

"अभिजीत फोन लाव इंस्पेक्टर साहेब का फोन करत होते एवढ",.. रोहित

अभिजीतने फोन लावला

"साहेब रोहित साहेब आहेत का? ",.. इंस्पेक्टर

बोला..

"त्या विशालला शहरात घेवून गेले",.. इंस्पेक्टर

"कोणी केल हे? ",.. रोहित

"त्याची ओळख होती मंत्री पर्यंत ते पोलिसांच्या गाडीत घेवून गेले, अगदी दोन तासात झाल हे सगळ ",.. इंस्पेक्टर

" जामीन नाही ना मिळाला त्याला अजून",.. रोहित

" नाही पण मिळेल लवकर कोणी तरी मोठा गुंड दिसतोय सोबत ",.. इंस्पेक्टर

" ठीक आहे कठीण आहे हे ",.. रोहित

"साहेब सावध रहा ",.. इंस्पेक्टर

हो...

रोहित ने शरदरावांना फोन लावला,..." विशालला शहरातल्या पोलीस स्टेशन मध्ये हलवल आहे, आपल्याला धोका जास्त आहे, टिना कडे लक्ष द्या, घराबाहेर जाऊ नका मी तिकडे बॉडीगार्ड पाठवतो आहे",..

" बापरे अस कस त्याला शिफ्ट केल तिकडे? म्हणजे तो लवकर सुटू शकतो, हो ना",. शरद राव

"हो कुठे जावू नका",.. रोहित

"पण अस किती दिवस लपून राहणार आपण ",.. शरद राव

" लवकर काही तरी कराव लागेल ",.. रोहित

" रिया कशी आहे?, तिची आई खूप आठवण काढते आहे ",.. शरद राव

" ठीक आहे आता अॅडजेस्ट होते आहे, माझी आजी बहीण आली आहे इकडे",... रोहित

"अरे वा चला कोणी आहे सोबत तिच्या",.. शरद राव

" तुम्ही काळजी करू नका, लवकरच भेटू आपण ",.. रोहित

रोहित विचार करत होता, हे जे झालं ते चुकीचं झालं, ते लोक रीयाच्या मागे असतील, पण काहीही झालं तरी मी रियाला काही होऊ देणार नाही,

"अभिजीत... काकांकडे बॉडी गार्ड पाठवून दे लगेच, घरची सिक्युरिटी वाढव",.. रोहित

रोहित घरी आला, रिया रूम मध्ये नव्हती, कुठे गेली आहे ही काय माहिती? , तो आजीच्या रूम मध्ये आला, आजी आरती म्हणत होती रिया आणि पिंकी शांत बसलेल्या होत्या, खूप छान आणि शांत वाटत होतं,

रोहित त्याच्या रूममध्ये निघून गेला तो फ्रेश होऊन बाहेर येऊन बसला,

रिया उठून आली तिने रोहित साठी चहा ठेवायला सांगितला, त्याला पाणी दिलं, रोहित त्याच्याच विचारात होता काय करता येईल? ,

तो फोन घेऊन बाहेर गेला त्याने दार लावून घेतलं, पोलीस स्टेशनला फोन केला होता त्याने,.. "मोठे मोठे लोकही आपल्या ओळखीचे होते तरीसुद्धा आपण विशालला इथे थांबवू शकलो नाही म्हणजे हे प्रकरण वेगळ दिसत आहे इन्स्पेक्टर साहेब ",

" हो साहेब हा विशाल मोठा गुंड दिसतो आहे" ,.. इंस्पेक्टर

"तुम्ही जरा शहरातल्या पोलीस स्टेशनला फोन करा आणि मला त्या लोकांचा फोन नंबर द्या",.. रोहित

जरा वेळाने पोलीस स्टेशन हून फोन आला, त्या लोकांनी तिथल्या नंबर रोहितला दिला, रोहितने लगेच तिकडे फोन लावला, बराच वेळ तो तिकडे पोलीस इन्स्पेक्टर यांच्याशी बोलत होता, अजून बऱ्याच लोकांना त्याने फोन केला, विशाल सुटता कामा नये,

रिया खिडकी तून बघत होती रोहित केव्हाचा बाहेर उभा राहून बोलत फोनवर बोलत आहे, दोन-तीनदा तिने विचारलं चहा देऊ का? त्याने नाही सांगितलं, दार उघडलं नाही

काय झालं आहे नेमक? ,.. रिया विचार करत होती, विचारल तरी सांगणार थोडी आहे रोहित मला, आपण टेंशन घेवून उपयोग नाही,

रोहित आत आला, तो रूम मध्ये निघून गेला

रोहितला खूप टेंशन आल होत, काय करू आत? डेंजर दिसताय ते लोक, रिया जरा शांत आहे मला लवकरात लवकर रियाच माझ बॉन्ड स्ट्रॉग कराव लागेल म्हणजे मग त्या पोरं कडे जायला रिया स्वतःहून नकार देईल, मी खूप काळजी घेईन रियाची, एकदम व्यवस्थित वागेन

रिया रूम मध्ये आली , रोहित सोफ्यावर बसला होता

" काय झालं रोहित?",.. रिया

"काही नाही, इकडे ये रियु बस माझ्या जवळ" ,.. रोहित

रिया जावून बसली

" आजची मीटिंग कशी होती ",.. रिया

"चांगली होती टेंडर आपल्याला मिळेल",.. रोहित

"काय झालं आहे का?, तुम्ही टेंशन मध्ये आहात",.. रिया

"नाही काही नाही",.. रोहित

"घरी सगळे ठीक आहेत ना",.. रिया

हो.. रोहित रिया कडे बघत होता , हिला मी काहीही होवु देणार नाही, खूप काळजी वाटते आहे

" चहा आणु का? ",.. रिया

"नको, वेळ झाला आता जेवण करेन मी डायरेक्ट",.. रोहित

काय झालं असेल रिया विचार करत होती

पिंकी आत आली,..." वहिनी आपण टेरेस वर जाणार होतो ना, दादा चल टेरेस वर",

" तुम्ही दोघी जा मला काम आहे",.. रोहित

"कुठे काय करतोस तू दादा, नुसता तर बसला आहेस, मुद्दाम करतो हा भाव खातो ",.. पिंकी

रोहित रागात होता,.. "तुला समजत का काही पिंकी, जा बर इथून",

"दादा अति करतो",.. पिंकी

" पिंकी गप्प रहा ना",.. रोहित

रियु.. पिंकी इथून जा

रिया दचकली, चल पिंकी..

त्या दोघी बाहेर आल्या.

" काय झालं दादा ला?",.. पिंकी

" काय माहिती? घरी आले तेव्हा पासून बोलत नाही कोणाशी ",.. रिया

" तू विचारल का ",.. पिंकी

" हो सांगत नाही काही",.. रिया

"जावू दे असेल काही ऑफिसच",.. पिंकी

त्या दोघी टेरेस वर आल्या, खूप छान गार वारा सुटला होता, आजुबाजुला खुप अंधार होता,.. "हे शेत कोणाच आहे पिंकी? ",

"आपल आहे वहिनी ",. पिंकी

" फॅक्टरी कुठे आहे ",.. रिया

" इथून 15 मिनिट वर ",.. पिंकी

" अजून गावाला शेत आहे वहिनी, खूप लोक काम करतात शेतात ",.. पिंकी

" या शेतात नाही काम करत का कोणी" ,.. रिया

"करतात दिवसा, आपण आत असतो त्या मुळे दिसत नाही, गेटच्या त्या बाजूला खूप पीक लावली आहेत, या बाजूला जुनी झाडे आणि गार्डन आहे ",.. पिंकी

"पिंकी एक सांगू का ",.. रिया

"बोल ना वहिनी ",.. पिंकी

" रोहितला सांगू नको मी हे विचारल ते",.. रिया

"ठीक आहे वहिनी,.. सॉरी दुपारी माझ्या मुळे तुला दादा ओरडला जेवतांना, नंतर काही बोलला का तो तुला? ",.. पिंकी

"नाही बोलले काही",.. रिया

"मला लक्ष्यात आल नाही वहिनी, मी उगीच बाहेर फिरायला जायच बोलली, कंटाळा येतो ग घरात, पण तुला धोका आहे ना बाहेर, तो कोणी गुंड तुझ्या मागे आहे ना, डेंजर आहे ते लोक ",.. पिंकी

रिया काही बोलली नाही,...

" दादा सांगत होता त्या दिवशी घरी गुंड चांगला नाही, मुलींना विकतो तो परदेशात जावून, तू घरात रहा वहिनी, भितीदायक आहे हे ",..पिंकी

रिया विचार करत होती काय आहे हे नक्की? एकदा बोलू का रोहितशी व्यवस्थित?, विशाल अस का करतो, अस किती मुलीच्या मागे आहे तो, बापरे कठिण आहे हे, आजी बोलल्या आज की नको काहीही निर्णय घेवू, नुकसान होईल, खरच धोका आहे का विशाल पासून? राॅकी ही बोलायचा की नको येत जावू इथे, बाबा बोलले, रोहित बोलला, आता पिंकी बोलते, काय करू मी? एकदा बोलते रोहित शी,

रोहित टेरेस वर आला, खूप गार वारा सुटला होता, तो येवून रिया जवळ उभा राहीला,.. "रिया पिंकी... सॉरी",

"ठीक आहे दादा काही टेंशन आहे का?",.. पिंकी

नाही पिंकी..

छान वाटत आहे ना इथे,.. खूप अंधार होता, रोहित रिया जवळ उभा होता, रियाला तिकडे सरकता येत नव्हत, बाजूला पिंकी होती, रोहितने हळूच रियाचा हात धरला, काय कराव आता?.. रिया रोहित कडे बघत होती, ती घाबरली होती

पिंकी खूप बोलत होती, ते दोघ ऐकत होते, रोहित रिया च्या अजून जवळ येत होता, ती बाजूला सरकली, तो हसत होता रिया कडे बघून

"आजी नाही आली का दादा",.. पिंकी

" नाही आली आजी",.. रोहित

"तुम्ही दोघी काय बोलत होत्या आता",.. रोहित

रियाला वाटला पिंकी सांगते की काय..

" काही नाही दादा आम्ही कॉलेज बद्दल बोलत होतो" ,.. पिंकी

रिया हात सोडवून घ्यायचा प्रयत्न करत होती, रोहित अजिबात ऐकत नव्हता, पिंकी समोर होती, काही बोलता येत नव्हत, तिला समजलं तर हा रोहित ही ना

"वहिनी इकडे ये ना",.. पिंकी

रियाला जाता येत नव्हत

हो आले..

" वहिनी अग ये, हे बघ मी काय दाखवते ",.. पिंकी

हो आलेच..

"प्लीज रोहित सोडा ना हात... प्लीज, पिंकी बोलवते आहे ",. रिया

"वहिनी काय ग? ये ना, तुम्ही दोघ काय बोलत आहात तिकडे ",.. पिंकी

"काही नाही पिंकी आलेच,.. रोहित प्लीज",.. रिया

रोहितने हात सोडला, रिया पळत पिंकी कडे गेली

"काय झालं वहिनी? ",.. पिंकी

"काही नाही",.. रिया

"पळतेस काय मग अशी",.. पिंकी

असच.. पिंकी काहीतरी दाखवत होती

रिया मागे वळली, मागे परत रोहित येवून उभा होता, रिया घाबरली, काय आहे हे, पिंकी इथे आहे, हा काही करणार नाही ना मला पिंकी समोर, त्याने रियाचा हात धरायच्या आत ती पिंकीच्या त्या बाजूने जावून उभी राहिली, रोहित तिकडे ही गेला,

किती त्रास देतो आहे हा मुद्दाम करतो...

खालून एक बाई आल्या, पिंकी ताई तुमचा फोन आहे,

"मी येते पाच मिनिटात वहिनी दादा",.. पिंकी

पिंकी गेली, रिया जात होती तिच्या सोबत , रोहितने तिला अडवल, टेरेस वर आता रोहित रिया होती, रोहित रिया कडे बघत होता, रिया गप्प होती, रोहित तिच्या जवळ गेला, रिया मागे सरकली, वार्‍यावर रियाचे केस छान उडत होते,.. पिंकी का गेली खाली मी रोहित इथे.. बापरे ,...

"मला जायच खाली ",.. रिया कसबसं बोलली

"खूप सुंदर दिसते आहेस तु आज रियु" ,... रोहित

"खाली काम आहेत",.. रिया

"हा ड्रेस छान दिसतो तुला, आपण तुला अजून साड्या ड्रेस घेवू या, तू मी दिलेली साडी अजून नेसून दाखवली नाही मला रियु, कोणता कलर आवडतो तुला, काय हव तुला सांग मला रियु, रोहित तिच्याकडे बघत होता, पुरे झाल रियु आता ये ना माझ्या जवळ ",... रोहित

" रोहित मला जावू द्या",... खूप सुंदर चांदण पडल होत सगळीकडे, रिया खूप छान दिसत होती, रोहित ऐकायला तयार नव्हता,

" एवढच बोलता येत का तुला रियु... मला जावू द्या, मला हात लावू नका, छान छान वाक्य बोल ना त्या पेक्षा आय लव यु वगैरे... ",.. रोहित

रिया खाली बघत होती, काय करू मी? ही पिंकी का येत नाही, मी आता अजिबात या टेरेस वर येणार नाही रोहित सोबत, कोणी तरी वाचवा मला,

" तुला चंद्र तारे आवडतात का रियु? , मला खूप आवडतात, तू कशी दिसते माहिती का,... रात्रीच्या या सुंदर आकाशात माझ्या सोबत आहे माझी चांदनी, खूप गोड, रियू आय लव यु",.. रोहित

रिया खाली बघत होती, चांदनी नाव ऐकुन रिया दचकली, विशाल तिला अस बोलायचा जेव्हा ती पांढरा ड्रेस घालायची... , काळजात धस्स झालं तिच्या, खूप कसतरी होत होत तिला , मला खाली जायच आहे,

" थांब जरा वेळ रियु माझ्या जवळ ये ",... रोहित

रोहित तिच्या जवळ उभा होता,.. "नाही मला जायच आहे",

"थांब जरा वेळ रियु, किती छान वाटतय गार" ,..रोहित

"जेवायची वेळ झाली, आजी वाट बघत असतिल",.. रिया

"काय झालं हिला? अचानक नाराज झाली ही? " ,... रोहित

रिया खाली निघून आली, बाथरूम मध्ये जावुन उभी राहिली, खूप धड धड होत होत तिला, विशालची आठवण येत होती, मी जितक त्याला विसरायला बघते तितक त्याची आठवण येते, मला रोहित सोबत नाही राहायच घरी जायच आहे, तिला रडू येत होत, तिने तिथे बाथटब जवळ बसुन घेतल,

रोहित आत आला,..." रियु रियु बाहेर ये, मी आत येवू का काय झालं?",

रोहित आत आला, रिया रडत होती, डोळे ओले होते तिचे,

" काय झालं का रडते आहे रियु, घाबरली का तू, काय केल मी तुला हात तर धरला ना, अस करता का? आपल्याला एकमेकांची सवय व्हायला हवी ना" ,.. रोहित

रिया गप्प होती,..

"काय झालं रियु बोल ? ",.. रोहित

काही नाही.. कधी कधी मधेच अस उदास व्हायला होत, काय करू मी रोहित चांगला आहे, तो चांगला वागतो, हेच चांगल आहे माझ्या साठी, तरी विशालची आठवण येते मध्ये मध्ये, मला रोहितशी चांगल वागल पाहीजे , विशाल ला विसरायला हव,

"रियु शांत हो घाबरायचं नाही अस, मी आहे ना, रडण बंद कर बर " ,... रोहित

रिया डोळे पुसत होती

" मी जावू का बाहेर ",.. रिया

" नको माझ्या जवळ थांब",.. रोहित

प्लीज..

" जा पण रोज थोड तरी येत जा माझ्या जवळ ",... रोहित

रिया गेली

काही खरं नाही, फार वेळ लागेल रियुला, खूप समजावाव लागेल...

रियाने बाहेर येवून ताट करायला घेतले....

🎭 Series Post

View all