हे प्रेम आहे की काय?... भाग 20

चांगला आहे रोहित, खूप काम असत ना त्याला त्या मुळे रागीट झाला, खूप हुशार आहे तो पाहिल्या पासून, लगेच समजत त्याला काय करायच ते, तू काळजी करू नकोस,


हे प्रेम आहे की काय?... भाग 20

©️®️शिल्पा सुतार
........

रिया तिच्या रूम मध्ये येत होती , राधा बाहेर बसली होती छोट्याश्या स्टूल वर,

"राधा आरामात बस, मी नाही जाणार कुठे, जावू शकत नाही मी, टेंशन घेऊ नकोस, जा पड नाहीतर जरा वेळ, आत येते का रूम मध्ये",... रिया

"नको ती तुमची आणि साहेबांची बेडरूम आहे मी बसते इथे",.. राधा

"मोठी खुर्ची तरी घे",.. रिया

पिंकी बाहेर आली... "ही कोण?",

राधा..

"काय करते इथे?,.. पिंकी

"मी मॅडमची बॉडी गार्ड",.. राधा

"का पण हवी वहिनी तुला बॉडी गार्ड, ते ही घरात",.. पिंकी

"अग असच पिंकी तू जा बर आत",.. रिया

" वहिनी मला भूक लागली",.. पिंकी

"चल किचन मधे, काही आहे का बघु आपण ",.. रिया

दोघी किचन मधे आल्या, बाई स्वयंपाक करत होत्या,... "काही आहे का खायला, हिला द्या ",..

" फळ टेबल वर आहेत ",..

" पिंकी सफरचंद खाते का?" ,.. रिया

हो...

" वहिनी चल स्विमिंग पूल वर ",.. दोघी पाण्यात पाय सोडून बसल्या

" तुला पोहता येत का पिंकी? ",.. रिया

" हो आमच्या त्या घरी स्विमिंग पूल आहे",.. पिंकी

अच्छा..

"तुला येत का वहिनी?",.. पिंकी

नाही..

का??

"कधी शिकली नाही, आमच घर लहान आहे, आमच्या घरी नाही स्विमिंग पूल ",.. रिया

रिया विचार करत होती, मध्यम वर्गीय आहोत आम्ही कुठे जाणार स्विमिंगला, सुट्टीत ठरवल होत एकदा पण खूप फी होती, बाबा किती किती काय काय करणार होते आमच्या साठी, कॉलेज शाळेची फी किती, त्या पेक्षा आम्ही माघार घेत होतो,

" आता शिक पोहायला वहिनी ",.. पिंकी

" इथे? कोण शिकवेल मला, पाणी खोल आहे हे",... रिया

"मी किंवा दादा शिकवेन" ,.. पिंकी

नको..

"का ग सोप असत, खोल नाही पाणी",.. पिंकी

"नाही पिंकी मला भिती वाटते ",.. रिया

"दादा असेल म्हणून नाही म्हणते का?, मग मी शिकवते ",..पिंकी

"नाही मला पाण्याची भीती वाटते",.. रिया

"वहिनी दादा खूप चांगला आहे, तू एकदा त्याच्याशी नीट बोलून घे, खर.. तो नाही रागावत खूप काळजी घेतो ",.. पिंकी

" ते तुझ्यासाठी पिंकी, मला रोहितशी काही प्रोब्लेम नाही, मला इथे रहायचं नाही ",...रिया विचार करत होती

" वहिनी ऐकते ना काय म्हणते मी? मला माहिती आहे तू दादाशी बोलत नाही ",...पिंकी

" अस काही नाही पिंकी मी ठीक आहे ",.. रिया

" मला तू एकदा ही दादा शी बोलतांना दिसली नाहीस ",.. पिंकी

" नाही ठीक आहे मी, काय बोलणार सारख ",.. रिया

किती बोलते ही पिंकी, उगीच त्या रोहितला समजल तर तो पिंकीला बोलणार नाही, मला ओरडा बसेल, नको बोलायला हिच्याशी एवढ

"चल पिंकी ऊन लागतय मी जाते रूम मध्ये ",.. रिया

पिंकी रिया आत आल्या, रिया रूम मध्ये गेली, पिंकीला जायच होत तिच्या सोबत, पण रिया काही बोलली नाही, पिंकी आजीच्या रूम मध्ये गेली

रियाने बघितल सगळे कपाट बंद होते, लॉक होत, म्हणजे इथे असेल मोबाईल माझा, काय करू? लक्ष द्याव लागेल, पण काय करणार फोन घेवून, रीचार्ज करावा लागेल, पैसे कुठे माझ्याकडे, कुठे जाणार रीचार्ज करायला, इथे वायफाय असेल ना? माहिती नाही, असला तरी पासवर्ड असेल अस साधा नाही रोहित, जेल आहे हे, चार्जिंग नसेल तेव्हा 10% होत आता स्विच ऑफ असेल फोन, चार्जर कुठे आहे माझा, तो मामा कडे राहिला तेव्हा

रोहित दुपारी जेवायला घरी आला, तो आजीच्या रूम मध्ये आला, पिंकी बसलेली होती, आजी पुस्तक वाचत होती, अरे व्वा आज देवपूजा झालेली दिसते आहे, चला रिया नाही इथे म्हणजे ती रूम मध्ये असेल, आजी पिंकी जेवायला चला

हो आलो..

रिया रूम मध्ये बसुन डायरी लिहीत होती, रोहित आला, ती आश्चर्याने बघत होती, आज हा दुपारी कसा घरी, तीने पटकन डायरी तिच्या कपाटात ठेवली, बर झालं मी रूम मध्ये आहे,

"रियु मला जेवायला दे, मला बाहेर जायच आहे उशीर होतो आहे",.. रोहित

रिया उठली, स्वयंपाक झाला होता, ती ताट करत होती, पिंकी आजी रोहित आले, जेवायला बसले

"दादा तू रोज येतो घरी जेवायला",.. पिंकी

नाही..

\"मग आज का आला? ",.. पिंकी

" अग मला बाहेर जायच आहे कामा निमित्त म्हणून आलो तुम्हाला भेटायला ",.. रोहित

" काय केल आज दिवसभर पिंकी? ",..रोहित

"काही नाही आजी मी वहिनी मिळून देवपूजा केली, थोड्या गप्पा मारल्या, दादा वहिनी ला पोहता येत नाही आपण शिकवू या तिला ",...पिंकी

"चालेल पण पाणी खोल आहे रियु, नका तोंडात जात पाणी ",.. रोहित मुद्दाम चिडवत होता, तिने मागे उडी मारली होती पाण्यात, त्याची आठवण झाली होती त्याला

रिया गप्प जेवत होती

" तुम्ही बोलत नाही का दोघ दादा वहिनी? ",.. पिंकी

" नाही अस नाही ",.. रोहित

" मी विचारल वाहिनीला ती बोलली बोलतो आम्ही ",.. पिंकी

रिया दचकली... पिंकी काहीही बोलते

"पिंकी गुपचूप जेवण नाही का करता येत तुला?, गप्प बस जरा ",.. आजी ओरडल्या

"काय किती बोर तुम्ही लोक, वहिनी दादा शांत, आजी तू ही अस करते, मी नाही जेवत, सगळे बोलतात मला ",.. पिंकी उठून निघून गेली

" काय कराव या मुलीच? कस होईल मी आलेच",... आजी

"आजी मी बघु का?",.. रिया

ठीक आहे

रिया आत गेली

" पिंकी अल्लड आहे ",.. रोहित

"कसली अल्लड, तिच्या वयाची रिया आहे, किती छान काम करते, सगळ सांभाळते, व्यवस्थित वागते, स्वयंपाक येतो तिला, आपली पिंकी अजून रुसून बसते",.. आजी

" होईल ठीक आजी, लहान आहे ती",.. पिंकी

" स्थळ बघता आहेत तिच्या साठी, अजून एक वर्षात लग्न होईल, हे अस केल सासरी तर कस होईल, नवरा चांगला असला तर ठीक आहे, नाहीतर बोलणी बसतील हिला, काही खर नसत मुलींच ",... आजी

रोहित विचार करत होता, रियुशी मी असा खराब वागतो, उठता बसता बोलतो तिला, किती रडते ती, तरी आपल्याला कीव येत नाही, अजून तिला त्रास देतो मी, रियु सॉरी रीयु मी तुला आता खूप जपेल

पिंकी कॉटवर बसली होती

" पिंकी चल जेवून घे, काय झालं? का आत आलीस तू? ",. रिया

"बघितल का वहिनी आजी कस बोलली मला, गप्पा मारू नको का मी आता, काही बोलायच नाही तर मी आत बसते ना, काही येत नाही बाहेर ",.. पिंकी

"अग जेवताना बोलू नये म्हणून बोलल्या असतिल त्या, खूप छान आहेत आजी, राग सोड पिंकी, चल जेवायला सगळे थांबले आहेत ",.. रिया

"मला सगळे ओरडतात",.. पिंकी

"नाही ग पिंकी तू लाडकी आहेस, छान मुलगी आहे, चल जेवण कर ",... रिया

"वहिनी मला आई कडे जायच इथे बोर होत ",.. पिंकी

अजून एक दिवस राहिली नाही ही इथे तरी बोर झाल , अस होत या घरात, एक दोन दिवसानी आपोआप चीड चीड होते, कुठे जाण नाही येण नाही, कोंडला आहे, जस सोन्याचा पिंजरा आहे हे घर, काय करणार मला झाली आता सवय, आई बाबांची भेट होईल की नाही काय माहीत, आशेवर राहायच..

" चल पिंकी आपण संध्याकाळी टेरेस वर जावू खूप बोलू या, मजा येईल",.. रिया

पिंकी बाहेर आली जेवायला बसली

जेवण झाल...

रोहित पिंकी कडे बघत होता, ती गप्प होती,..." पिंकी काय झालं?, बोल ना प्लीज",.

" काही नाही दादा इथे बोर होत या घरात मला आई कडे जायच आहे ",.. पिंकी

" आली तर रहा थोड, आपण आज अंताक्षरी खेळू, तुला काय आवडत,.. आईस्क्रीम आणु का मी तुझ्या साठी",.. रोहित

"दादा मी संध्याकाळी इथे थोड गेट बाहेर फिरू का वहिनी सोबत ",... पिंकी

" ही कोणाची आयडिया आहे रियु? , काय चाललय हे, मी काय बोललो होतो तुला लक्ष्यात आहे ना?",.. रोहित

रिया दचकली,.. "नाही मी नाही काही बोलली रोहित, विचारा तुम्ही पिंकी ला",

"हो दादा वहिनी काही म्हटली नाही मी बोलते आहे",.. पिंकी

आजीने रोहितचा हात दाबला,.. "जरा शांततेत घे रोहित",

कशी घाबरली ती रिया, का बोलतो हा रोहित तिला अस , मी बोलणार आहे रोहितशी

रोहित अजून चिडलेला होता,.. " नाही जाता येणार पिंकी गेट बाहेर , एकदा सांगितल ना परत विचारु नकोस",... रोहित आत गेला निघून

रिया जेवत होती, काही खरं माझ, आत गेल्यावर काय होईल?, पिंकी ना गप्प का नाही बसत, मी काही बोलली नाही, रोहितला खरं वाटणार नाही, आता रोहित माझी खरडपट्टी काढेल ते वेगळ,

आजी बघत होत्या रिया कडे, रिया त्यांच्या कडे बघत होती,... पोळी घेते का रिया,

"नाही आजी",.. रिया

आता भरल पोट माझ, बोलणी खायची अजून, पिंकी काय करते अस, रोहितला राग आला तर बेडरूम मधे कोंडून ठेवेल तो मला, घरात फिरता येणार नाही, यांना कोण सांगणार हे,

"कशी घाबरून गेली आहे ही रिया , रोहित उगीच चिडला हिच्यावर, किती बोलला तो, चांगली आहे पोरगी" ,... आजी विचार करत होत्या

"रियु आत ये" ,... रोहितने आवाज दिला,

रियाचे हात थरथरत होते, ती आजीं कडे बघत होती, पिंकीला काही महिती नव्हत काय सुरु आहे, ती टेबल आवरत होती ,

रिया आत गेली, रोहित दारात उभा होता, त्याने दार बंद केल,

" रोहित मी नाही काही बोलली पिंकीला, मला माहिती आहे या घरा बाहेर जायच नाही, खरच मी काहीही केल नाही , मी जास्त नाही बोलत पिंकीशी, पिंकी बोलली की तिला फिरायला जायच आहे, मला आता समजल, माझा काही दोष नाही, मी काही केल नाही रोहित, पिंकी गेली बाहेर तरी मी घरात थांबेन, मी नाही जाणार, सॉरी.. " ,... रिया

" मी मीटिंग साठी जावुन येतो रियु, थोडा उशीर होईल यायला, माझी महत्वाची मीटिंग आहे, ब्लॅक कोट दे कपाटातून",... रोहित

रिया आश्चर्यचकित झाली, हा ओरडत नाही मला , सकाळ पासून प्रेमाने बोलतो आहे, कस काय? ,

" रियु ऐकायला आल ना, मला उशीर होतो आहे" ,... रोहित

"हो कपाट लॉक आहे ना, म्हणजे लॉक असेल",.. रिया

"उघड आहे कपाट",.. रोहित

रियाने कपाट उघडल, किती व्यवस्थित लावल आहे कपाट, समोर दोन ड्रॉवर होते उघडून बघु का? नको आता रोहित गप्प आहे, चिडेल तो परत, यात असतिल का मोबाईल? काय माहिती?

तिने कोट बाहेर काढला, रोहित बाथरूम मध्ये होता, बघु का ड्रॉवर, तिची हिम्मत होत नव्हती, नेमक रोहित आल तर, एकतर आता ठीक वागतोय परत चिडेल

रोहित आला, तिने कपाट बंद केल, तो रिया समोर कपडे घालत होता, रिया सोफ्यावर जावून बसली, आता आपल्याला दुसरी कडे बघाव लागेल,.. काय हे,

रोहित तयार झाला, कमालीचा भारी दिसत होता तो, रिया लांबून बघत होती, बॉस वाटतो हा,

"रीयु इकडे ये, येतो जावून मी मीटिंग साठी , आराम कर" ,.. रोहित तिच्या जवळ आला, ऑल द बेस्ट नाही बोलणार का नवर्‍याला? , महत्वाचे डील आहे, खास तुला भेटायला घरी आलो आहे मी , तुला बघायच होत मला, तू लकी आहेस माझ्या साठी रियु,

रिया लाजली होती

रोहितने हात पुढे केला, रिया विचारात होती काय करू? ,

प्लीज ..

रियाने हात मिळवला,.. "ऑल द बेस्ट होईल काम तुमच",

"तुमच नाही आपल,.. महत्वाच टेंडर आहे" ,.. रोहित रिया कडे बघत होता, हात अजून हातात होता तिचा, रियाने हात सोडवून घेतला,

येतो मी.. रोहित रूम बाहेर गेला

लाजता ही येत तर हिला , अजून सुंदर दिसते अशी ही, किती दिवस नुसत बघत बसणार हिला

रोहित आजी पिंकीला भेटायला आला.." मी जावून येतो आजी पिंकी ",.

हो..

"पिंकी आराम कर पुस्तक वाच",.. रोहित

"रिया कुठे आहे रोहित? ",.. आजी

"आहे बेडरूम मधे",.. रोहित गेला

रियाला अजून धड धड होत होत, ती तिच्या हाता कडे बघत होती, आज मला रोहित ओरडला नाही, मला भेटायला आला तो दुपारी घरी, चांगला आहे हा,

पिंकी ने चांगला गोंधळ घातला कश्याला बोलते ही काही मध्येच, तिला काय माहिती मला रोहितला उत्तर द्याव लागत, घरात कोणी नाही तर ठीक आहे पण सगळ्यां समोर बोलतो तो डायरेक्ट, भीती वाटते, रोहितशी जरा जपून वागव लागेल, आजी छान आहेत पण

आजी रियाची काळजी करत होत्या, बोलला असेल तिला रोहित, चिडला होता तो, पिंकी मूर्ख कश्याला काही बोलते, रोहित उगीच मोठ्याने बोलतो चिडतो रिया वर , मी रागावणार आहे रोहितला

रिया लोळून पुस्तक वाचत होती, आजी आत आल्या,.. "येवू का?, झोपली का तू?",

रिया उठली.... या ना आजी

"पिंकी कुठे आहे?",.. रिया

"ती झोपली आहे, ठीक आहे ना तू",.. आजी

"हो आजी काय झालं?",.. रिया

"रोहित बोलला का ग तुला? पिंकीला अजिबात समज नाही काय बोलाव , मला काळजी वाटत होती तुझी ",.. आजी

"नाही बोलले ते काही मला" ,.. रिया

"मला माहिती आहे सोशीक आहेस तू ",.. आजी

"नाही आजी खरच काही बोलले नाही रोहित मला, उलट नीट वागले माझ्याशी, प्रेमाने बोलले ",... रिया

आजीच्या चेहर्‍यावर समाधान होत, चला थोड तरी ऐकतो रोहित

" चांगला आहे रोहित, खूप काम असत ना त्याला त्या मुळे रागीट झाला, खूप हुशार आहे तो पाहिल्या पासून, लगेच समजत त्याला काय करायच ते, तू काळजी करू नकोस, खूप छान आहे रोहित, सुखात राहशील तू त्याच्या सोबत",... आजी

"आजी मला थोड बोलायच होत, मी काय करू समजत नाही मला, तुम्हाला माहिती आहे ना माझ्या बद्दल, सगळे म्हणतात विशाल चांगला नाही, काय करू मी, माझ मन अजुन तयार होत नाही रोहित सोबत, काही चुकीचा निर्णय नको घ्यायला मी " ,... रिया

" हातच सोडून पळत्याच्या पाठी जावू नको एवढ सांगते मी तुला, तुझ्या जवळ जे आहे ते खूप छान आहे, अस मिळत नाही कोणाला, जप जे आहे ते, मन लाव रोहित सोबत, खुश राहशील तू, माझा नातू आहे तो म्हणून नाही सांगत मी पण खरच रोहित खूप चांगला मुलगा आहे, खुश राहशील तू" ,... आजी गेल्या

रिया विचार करत होती काय करू मी, रोहित चांगला आहे, मला अस एवढ छान विशाल सोबत वाटल नव्हत, फक्त मी त्याच्या वर प्रेम करत होती तो कधीच मना पासुन माझ्या सोबत नव्हता, आई बाबांना तेच हव आहे मी रोहित सोबत हवी, थोडा वेळ लागेल पण करेन मी विचार,

सौदा म्हणजे काय करणार होता विशाल माझ्या सोबत? कोण सांगेल मला? , मोबाईल ही नाही, सर्च केल असत नाही तर, रोहित ला विचारू का?, बघू, ती जरा वेळ झोपली...

🎭 Series Post

View all