हे प्रेम आहे की काय?... भाग 19

हिच्या कडे मोबाईल नाही का? किती रीलॅक्स आहे ही, असेल फोन त्या रोहित ने घेतला असेल काढून, म्हणजे माझा मोबाईल त्याच्या कडे आहे,


हे प्रेम आहे की काय?... भाग 19

©️®️शिल्पा सुतार
........

रिया रोहित रूम मध्ये आले, रिया जावून सोफ्यावर बसली, आता काय पुढे? , कुठे झोपणार मी? , रोहित तिच्या कडे बघत होता, ती मुद्दाम पुस्तक कुठे ते बघत होती,

तो रिया जवळ येवून बसला, रियु....

तेवढ्यात दार वाजल,.." मी येवू का आत दादा वहिनी? , काही बोलायच्या आत पिंकी आत आली, दादा तुझी रूम छान आहे, आजी बोलवते आहे दादा, तिची बॅग उघडत नाही" ,

"हो आलोच, तू जा पिंकी",.. रोहित

"वहिनी तुझे कपडे खुर्चीवर का? कपाटात ठेव ना",.. पिंकी

"हो ठेवते" ,.. रिया

"साडी किती छान आहे ही, दादाने घेतली का वहिनी? , तुला खूप छान दिसेल",.. पिंकी

चल पिंकी...

"हो दादा तू जा मी आलीच",.. पिंकी

"पिंकी चल" ,.. रोहित

"येते वहिनी गुड नाइट",.. पिंकी

दोघ आजीच्या रूम मध्ये आले, आजीची बॅग उघडत नव्हती, रोहितने किचन मधून चाकू आणला नीट कुलूप उघडल

" ठीक आहे आता अजून काही हव आहे का? ",.. रोहित

नाही..

" झोपा आता ",.. रोहित

पिंकी बाथरूम मधे होती,

" इकडे ये रोहित, रिया कुठे आहे? , काय बोलत होता तू तेव्हा? ",.. आजी

"माझ्या रूम मध्ये आहे रिया, माझ्या सोबत " ,.. रोहित

"ती बोलत नाही ना तुझ्याशी? ",.. आजी

"नाही बोलत, लांब थांबते माझ्या पासून आजी, तिने अजून मला होकार दिला नाही, किती समजवून बघितल धमकी दिली काही उपयोग नाही, मी हात लावू शकत नाही तिला एवढी घाबरते ती ",.. रोहित

" मग आता काय करायचं ठरवलं आहेस तू? ",.. आजी

"काही नाही, तरी माझ्या सोबत राहाव लागेल तिला, होईल सवय, कधी नीट होणार आहे आमच काय माहिती? ",... रोहित

" ठीक आहे, भांडू नका पण, चांगली आहे तुझी बायको, लागतो वेळ मुलींना, तिच मन वळणाच्या प्रयत्न कर, तर ती तुझ्या सोबत आनंदाने राहील, तिला ओरडलास, धमकी दिली तर अजून उलट करेन ती, होईल ती ठीक करून बघ हे ",.. आजी

"हो आजी",.. रोहित

" तिला नाही आवडत ना अजिबात हात लावू नको तिला, लांबून बोल, काळजी घे खूप तिची , ती आरामात राहील अस बघ, खूप चांगल वाग तिच्याशी, ती तुझ्या कडे पळत येईल बघ, तिला समजेल कि चांगला आहेस तू ",.. आजी

रोहित विचार करत होता अस करु का? ठीक आहे,.. "आजी तू गोड आहेस",

"तुझ्या रिया पेक्षा ही का? ",.. आजी

हो...

पिंकी बाथरूम मधुन आली दादा आजी का हसता आहात

काही नाही झोप तू पिंकी...

रोहित आत मध्ये आला, रूम बंद केली, पिंकी केव्हाही येऊन धडकते, रिया अजूनही सोफ्यावर बसलेली होती, रोहितला समजल होत ही घाबरली असेल, तिला वाटत असेल कस काय याच्या बेड वर झोपायच, रोहित कुठे झोपेल?,

रोहितने बाहेरून येतांना त्याच्या साठी एक गादी आणली होती, ती त्यांने खाली अंथरली, कपाटातुन बेडशीट ब्लॅंकेट घेतलं, व्यवस्थित बेडशीट टाकलं कॉटवरून उशी घेतली आणि खाली झोपला

रिया लांबून बघत होती काय सुरू आहे,.. "काय गरज आहे एवढं करायची? मी ठीक होती ना वरच्या रूम मध्ये, बोलून बघू का याच्याशी",

"रोहित तुम्ही का खाली झोपता आहात?" ,..रिया

" मग काय करणार मी रियु? तुला चालेल का मी तुझ्यासोबत कॉटवर वर झोपलेल",.. रोहित

" तसं नाही मी जाऊ का वरच्या रूम मध्ये? मी तिकडे राहू का?.. प्लीज ",.. रिया

"नाही माझ्यासोबतच रहा इथे",.. रोहित

" प्लीज.. मला इथे झोप येणार नाही",.. रिया

"मला वाद नको आहेत रियु, झोप येते आहे... झोपू दे मला ",.. रोहित

रिया त्याच्या कडे बघत होती,.. "तुम्ही वरती झोपा मी झोपते खाली ",

काही नको.. रोहितने झोपून घेतलं

काय करू मी झोपू का कॉटवर? मला आज अजिबात झोप येणार नाही, तसा रोहित शांत वाटतो आहे, पण काय सांगता येतं? तो मला इथून जाऊ का देत नाही? , काय होणार आहे मी त्याच्या सोबत राहिली तर? मला काय त्याच्या विषयी प्रेम वाटणार आहे का? कोण सांगणार त्याला हे, त्यांने काहीही केल तरी मी ऐकणार नाही

रिया जरा वेळाने कॉटवर जावून झोपली, पांघरुन घेतल, सुचत नाही काही, तिने लाइट बंद केला, किती अंधार आहे, खूप भीती वाटते, राधा सोबत ठीक होती मी, दोन तीन दा तिने उठून बघितल रोहित झोपलेला होता, बापरे किती याची दहशत आहे, भीती वाटते आहे मला, हा उठणार तर नाही ना मध्ये, रात्री माझ्या जवळ आला तर काय करणार आहे मी , काही खर नाही माझ, आज काही झोप येणार नाही, ती उठून बसली,

झोप यायला हवी सकाळी लवकर उठाव लागेल आजी उठतील, त्यांना चहा नाश्ता द्यावा लागेल, कस उठणार पण? , आधी मोबाईल मध्ये बेल लावत होती मी, रोहितला तरी सांगितल असत मला उठवायला, नको त्याच्याशी बोलायला, रिया झोपली

सकाळी उठली, रोहित नव्हता जागेवर, त्याने त्याची गादी उचललेली होती, कुठे गेला हा? किती वाजले, उशीर तर नाही ना झाला? ती आवरून बाहेर आली,

हॉलच्या पॅसेज मधुन मागचा स्विमिंग पूल दिसत होता, रोहित पोहत होता, एकदम एक्स्पर्ट वाटत होता तो स्विमिंग मध्ये , रिया बघत राहिली, किती छान दिसतो आहे रोहित, बॉडी छान आहे त्याची, उंच आहे, हॅडसम आहे, डॅशिंग आहे हीरो सारखा , पाण्यात किती फ्रेश दिसतो आहे हा, आपल्याला काय पण? कसा का असे ना हा , वागायला कसा आहे रागीट,

आजी बाजूला बसुन त्याच्याशी बोलत होती, आजी किती लवकर उठतात, आजी किती छान आहेत या, त्या रोहितचे लाड करतात, रोहित किती छान वागतो त्यांच्याशी, ती अस त्या दोघांना बघत होती

"वहिनी गुड मॉर्निंग काय बघते आहेस?",.. पिंकी

"काही नाही",.. रिया

"दादा कडे बघते आहेस ना",.. पिंकी

"नाही पिंकी.. सॉरी पिंकी ताई",.. रिया

"वहिनी तू मला पिंकी बोल ते पिंकी ताई वगैरे नको",.. पिंकी

ठीक आहे

"सांग ना वहिनी.. दादा छान आहे ना माझा, तुला आवडतो का तो? " ,.. पिंकी

रिया काही बोलली नाही, आत निघून गेली

पिंकी मागे गेली.. "वहिनी चल ना आपण जावू स्विमिंग पूल वर ",..

"नाही तू जा पिंकी ",.. रिया

पिंकी स्विमिंग पूल वर गेली,... " आजी किती लवकर उठली तू , दादा तुला ऑफिस नाही का? ",..

" हो जातो आता",... रोहित

" चला चहा घेवू, रिया उठली का बघ पिंकी",.. आजी

"हो वहिनी उठली आहे आणि ती खिडकीतून बघत होती इकडे तुमच्या दोघांकडे, मी बोलेल तिला चल आपण जावू स्विमिंग पूल वर ती आली नाही, आत निघून गेली ती",... पिंकी

रोहित लाजला होता,... अस आहे तर

रोहित रूम मध्ये आला, रिया कपाटात तिचे कपडे ठेवत होती, माझ्या कडे चुपचाप बघते का, होईल ठीक अस वाटतय , बघतो जरा हिच्याकडे, रोहित हसत होता,

रिया मी ऑफिसला जातो आहे, नीट रहा घरात, आजी पिंकी आहेत घरी, त्यांना ही तुझ्यासारख या घराबाहेर जाता येणार नाही, उगीच अति बोलत बसू नको त्यांच्याशी, कुठे जायच नाही, हुशारी नको मला, पिंकीला काही सांगू नको इतर गोष्टी, ती लहान आहे, तो अंघोळीला निघून गेला.

रिया रूम आवरत होती, बस काही झाल की मला येवून बोलायच एवढ येत, मी कशाला विशाल बद्दल काही सांगेन पिंकीला, मला बोलायच नाही या रोहितशी, मी बाहेर जाते, मी वरच्या रूम मध्ये बरी होती, पिंकी माझ्या पेक्षा फक्त एका वर्षाने लहान आहे, ती लहान मी मोठी का? , मी चालते याला बायको म्हणून, माझ्याशी कस ही वागायच, त्याची बहीण त्याला प्रिय, ती लहान तीला काही समजत नाही, बापरे किती फरक करतो हा माझ्यात आणि इतरात, राग आला होता रियाला, ती बाहेर चहा नाश्ता झाला का ते बघत होती,

आजी बघत होती रिया हुशार आहे, चांगल काम करते, काही बोलत नाही, काही सांगाव लागत नाही हिला, व्यवस्थित आवरते, वेळ लागेल चांगला करेल संसार, जोडी छान आहे पण ही

पिंकी रियाच्या मागे होती, रिया सगळ्यांना नाश्ता वाढत होती,

" पिंकी बघ जरा अस काम करत जा, पिंकीला काहीही येत नाही",.. आजी

रियाला एकदम तिच्या आजीची आठवण आली, आजी अशी रागवत होती मला तेव्हा, आता मी करते थोड तरी काम, काळजीने बोलत होती आजी, लव यु आजी, मिस यु

रोहितची आजी ही छान आहे

रोहित आला बाहेर, व्हाइट शर्ट.. ब्लॅक पॅन्ट, हातात बॅग, मोबाईल वर तो बोलत होता, त्याची लोकांना काम सांगायची पद्धत एकदम जबरदस्त होती, तिघी त्याच्या कडे बघत होत्या,

"दादा किती भारी दिसतो आहेस तु" ,.. पिंकी

आजी हसत होती..

रिया किचन मध्ये निघून गेली,..

रोहित नाश्ता करत होता, आजी पिंकी बसल्या होत्या, रिया त्यांच्या डिश घेवून आली, ती उभी होती,

"बस रिया खावून घे थोड",.. आजी

"हो जरा वेळाने करते नाश्ता",.. रिया

जावू द्या या रोहितला ऑफिस ला, तेव्हा ठीक वाटेल थोड, नुसता चिडतो, याच्या समोर बसुन मला जेवण जात नाही

आजीला समजल, रिया रोहित आहे म्हणून खात नाही, आजीने रोहितला खुणावले,

"रियु चल लवकर नाश्ता कर, सगळ्यां सोबत बस",.. रोहित

रिया बसली खाली

रोहितचा नाश्ता झाला, आजी मी निघतो, तो रिया कडे बघत होता , पिंकी आजी नाश्ता करत होत्या, रिया खाली बघत होती ,

"रिया रोहितला काय हव ते बघ, तो ऑफिसला निघतोय, बॅग दे त्याची" ,... आजी

अस ऐकलच नसत पण आजी बोलता आहेत तर उठाव लागेल, रिया उठली, तिने रोहितला बॅग दिली, रोहित तिच्या कडे बघत होता, येतो रियु...

हा काय असा अचानक प्रेमाने बोलतो आहे, घरच्या समोर बहुतेक, नको मला पण ह्याच प्रेम , प्रेमाने का बघतो माझ्या कडे, त्या पेक्षा ओरडलेला बरा

रोहित ऑफिसला गेल्यामुळे तिला बर वाटत होत, रिया परत नाश्त्याला येवून बसली,

"वहिनी आता बर वाटत का? दादा समोर किती घाबरली होतीस तू",.. पिंकी

"पिंकी अटोप खा पटापट" ,.. आजी ओरडली, या पिंकी ला कधी अक्कल येईल काय माहिती, काहीही बोलते ती

लॅण्ड लाइन फोन वाजत होता, पिंकी गेली फोन उचलायला

आजी रिया कडे बघत होत्या,.. "थोड घे अजून रिया, भरपूर खात जा ",..

"हो आजी तुमचा चहा आणु का? ",.. रिया

"बस तू त्या बाई आणतील",.. आजी

शारदा ताईं चा फोन होता

"तुझा मोबाईल का लागत नाही पिंकी?",.. शारदा ताईं

"माहिती नाही आई रेंज नसेल",.. पिंकी

"पण रोहित चा फोन लागतो",.. शारदा ताईं

"माझा सिम दुसर्‍या कंपनीचा आहे",.. पिंकी

"कसा आहे रोहित",.. शारदा ताईं

"नॉर्मल मस्त आहे तो आता ऑफिस ला गेला",.. पिंकी

"काही बोलला नाही ना मला काळजी वाटते त्याची",.. शारदा ताईं

"नाही ग आई ठीक आहे तो आजी आल्या पासून खुश आहे सकाळी स्विमिंग केली त्याने" ,.. पिंकी

" ठीक आहे मग तू नाश्ता केला का ",.. शारदा ताईं

हो...

" आजी ठीक आहे ना",.. शारदा ताई

हो

ठेवते फोन

ठीक आहे

पिंकी आली,... आईचा फोन होता

रिया ऐकत होती

नाश्ता झाला

" चला आपण देवपूजा करू ",.. आजी

" इथे देव आहेत? ",... रिया ला माहिती नव्हत

"हो आमच्या खोलीत, फार नाही एक दोन फोटो आहेत" ,.. आजी

"पिंकी बाहेरून फुल आण, चल रिया",... आजी

आजी रिया आत गेल्या, आजीने फोटो पुसले, पिंकी फुल घेवून आली, दिवा लावला खूप छान वाटत होत,

" आपल खावून झाल्यावर पूजा आहे आज ",.. आजी

"काहीही होत नाही आजी, आपल मन चांगल आहे ना ते महत्वाच",... पिंकी

आजी आरती म्हणत होत्या, रिया रमली होती त्या दोघीं सोबत

आज खूप छान वाटत आजीं सोबत, पिंकी छान आहे,

शारदा ताई चिडलेल्या आहेत हे रियाला माहिती नव्हत

" रिया जा तुझा कंगवा घेवून ये, केस बघ कसे केले, मी देते विंचरुन",.. आजी

आजी रियाची वेणी घालत होत्या, रियाला आईची आठवण येत होती, पिंकी काही तरी वाचत होती

हिच्या कडे मोबाईल नाही का? किती रीलॅक्स आहे ही, असेल फोन त्या रोहित ने घेतला असेल काढून, म्हणजे माझा मोबाईल त्याच्या कडे आहे, कुठे असेल तो कपाटात का? मी आता आत गेली की बघते,

"वहिनी तुमच्या घरी कोण कोण आहे?",.. पिंकी

"आई बाबा आजी टिना माझी बहिण",.. रिया

"हो छान आहे टिना तुझ्या सारखी सुंदर",.. पिंकी

"पिंकी तू ही किती छान आहे तुझ कॉलेज कुठे आहे",.. रिया

"तिथे घरा जवळ",.. पिंकी

"म्हणजे कुठे रहाता तुम्ही?",.. रिया

"अग वहिनी अजून एक घर आहे ना आपल, तिकडे तुझ्या मामाच्या गावाला, तिथे रहातो आम्ही ",.. पिंकी

अच्छा अस आहे का...

" अण्णांची एक इंडस्ट्री आहे, एक दादाची इंडस्ट्री, म्हणून दादा इकडे रहातो, तू गेली का ऑफिस मध्ये, छान आहे ऑफिस दादा च",.. पिंकी

नाही...

" आधी ही फॅक्टरी एवढी चालत नव्हती, अण्णा विकणार होते, दादा ने विकु दिली नाही, त्याने फॉरेन हून आल्यावर जोरात काम सुरु केल, आता खूप फायदा होतो, दादा खूप हुशार आहे ",... पिंकी

रोहित परदेशात होता का शिकायला...

" आजी अण्णांची आई का?",.. रिया

हो..

"अजून कोण कोण आहे तिकडे? ",.. रिया

" आई अण्णा आजी दादा मी आणि आता तू वहिनी",... पिंकी

पिंकी किती लकी आहे, सगळे तिची काळजी घेतात, अजिबात काही बोलत नाही हिला, लहान समजतात, मस्त सुट्टी एन्जॉय करते आहे ही, नंतर कॉलेज सुरू होईल, मस्त कॉलेजला जाईल ही, तिच्या मैत्रिणी असतिल, माझ आधी अस छान लाइफ होत,

राहून घे एक दोन वर्ष मजेत पिंकी, नंतर होईल लग्न, हे अस नको व्हायला, हिला चांगला नवरा मिळू दे, तीच ज्याच्या वर प्रेम असेल तोच मिळू दे, काही खरं नाही कारण प्रेम केल तरी अस होत, घरचे दुसरीकडे जबरदस्ती लग्न लावतात, देतात सोपवून आपल्याला त्या मुलावर , तो मुलगा म्हणजे नवरा ओळखीचा नसतो, उगीच हक्क गाजवतो तो , किती भीती वाटते त्याची, हे बोलू नको ते बोलू नको, इथे रहा माझ्या सोबत, हेच कपडे घाल, होकार दे, जेवायला वाढ, किती ते त्याचे काम करा, परत तो ओरडणार,

विशाल कुठे असेल?, त्याला येत असेल का माझी आठवण? , मी इकडे सासरी, माझ्या नवर्‍या सोबत, संपला विशालचा विषय, रोहित सोडणार नाही त्याला, मलाही सोडणार नाही, काय करू मी, विशाल वाईट आहे का खरच, माझ मन सांगत तो चांगला आहे, काय माहिती, आता हल्ली समजत नाही कोण बरोबर कोण चूक, धोका आहे का मला खरच विशाल पासून?, सौदा म्हणजे काय?, विकणार होता विशाल मला म्हणजे काय? कोणाला विचारणार, शांत राहिलेल बर...

🎭 Series Post

View all