हे प्रेम आहे की काय?... भाग 18

रिया काही बोलली नाही, म्हणजे काय? याच्या घरच्यांना याने सांगितल नाही का लग्न झाल ते?, लग्नाला कोणी नव्हत तस, की मी पसंत नसेल त्यांना, काय माहिती,


हे प्रेम आहे की काय?... भाग 18

©️®️शिल्पा सुतार
........

रोहित त्याच्या विचारात होता, काय करू मी रियुच, मला हवी आहे ती, गेट वरून फोन होता,.. साहेब घरून गाडी आली

"काय? कोण आहे गाडीत?",.. रोहित

"आजी, पिंकी मॅडम, गाडी आत गेली साहेब",..

"मला विचारल्या शिवाय गाडी आत का सोडली? ",... रोहित

"घरची गाडी होती आणि पिंकी मॅडम रागवत होत्या खूप आम्हाला" ,...

ठीक आहे ,.. रोहित

रोहितने बंगल्याच्या मेन गेट वर फोन केला,.. "घरची गाडी अडवून ठेवा मी येतो दहा मिनिटात",

"ठीक आहे साहेब ",..

काय करू आता, घरात रियू आहे, आजी पिंकी घरी सगळ सांगून देतील, इथे आधीच रियु नीट नाही वागत, तिला समजून सांगता सांगता कंटाळतो आहे मी, त्यात अजून आईला समजल तर ती इकडे येईल, आईने रियाला माझ्या सोबत बघितल तर काही खर नाही, आईला तिचा राग आहे, भांडण होईल ते वेगळ, काय करू, ड्रायवर जरा फास्ट गाडी चालवा, घराकडे घ्या गाडी

गेट वर गाडी उभी होती, पिंकी खाली उभी होती, रोहित आला

"दादा आम्हाला आत का नाही जावू देत होता तू? काय झाल? ",.. पिंकी

"तुम्ही कशाला आले इथे पिंकी आजी? ",.. रोहित

"तुझ्या सोबत राहायला आलो आहोत",.. पिंकी

"का पण?",.. रोहित

"म्हणजे?, याला काय अर्थ आहे दादा? , हे आमच ही घर आहे, का आले म्हणजे काय?",.. पिंकी

" अगं पिंकी असं नाही, काही काम होतं का? ",.. रोहित

" तू नंतर लगेच इकडे निघून आला, आई काळजीत आहे तुझ्याकडे लक्ष द्यायला मला पाठवल आहे",.. पिंकी

" मी एकदम ओके आहे ",.. रोहित

"ठीक आहे मग आम्ही जाऊ का वापस, तुझी इच्छा नाही आहे आम्हाला घरात येवू द्यायची, काय प्रॉब्लेम आहे ",... पिंकी

" पिंकी खरच मला तुला काहीतरी सांगायचं आहे ",.. रोहित

आजी कार मधून सगळं ऐकत होती,..." मला ऐकायला येत आहेस सगळं रोहित, काय सांगायचं आहे तुला पिंकीला ",

"आजी पिंकी ऐका ना ",.. रोहित

" अरे आधी आम्हाला आत तर येऊ दे मग बोला आमच्याशी",.. पिंकी

" मोठा प्रॉब्लेम आहे",.. रोहित

"ठीक आहे आत बसून ऐकू का आम्ही? की बाहेरच गेटवर बोलत बसणार आपण",.. आजी

" तुम्ही दोघी प्रॉमिस करा की मी जे सांगणार आहे ते आईला सांगणार नाही आणि माझ्यावर रागवणार नाही स्पेशली पिंकी तू रेडिओ ",... रोहित

" दादा मी आता हे सगळ आईला सांगणार कारण तू मला आत्ताच रेडिओ बोलला, आधी माझी माफी माग दादा",.. पिंकी

" सॉरी पिंकी ",.. रोहित

" तू एवढं नमत घेतो आहे दादा म्हणजे नक्कीच काहीतरी झालं आहे ",.. पिंकी

" तुम्ही दोघी तुमचे फोन माझ्याकडे द्या",.. रोहित

" म्हणजे काय दादा ",.. पिंकी

" म्हणजे तुझा मोबाईल आजीचा मोबाईल माझ्याकडे द्या तो माझ्याकडे राहील ",.. रोहित

" का पण? मी नाही देणार, मला माझा फोन लागतो ",.. पिंकी

"मी सांगतो ते कर पिंकी, आत यायच ना, जर मोबाईल माझ्याकडे दिला तर आत मध्ये येता येईल",... रोहित

" आजी कडे तर नाहीये मोबाईल तिला वापरता येत नाही",.. पिंकी

" तुझा मोबाईल दे इकडे स्विच ऑफ कर, लॉक आहे ना त्याला ",.. रोहित

"हो लॉक आहे",.. पिंकी

रोहितने पिंकीचा मोबाईल स्वतःजवळ घेतला, अजून आहे का मोबाईल तुझ्याजवळ पिंकी?

"नाही दादा माझ्याजवळ एकच फोन आहे काय झालं आहे दादा? ",... पिंकी

" चला आता आत मध्ये मग सांगतो",.. रोहित

सगळे आत गेले, हॉलमध्ये आजी पिंकी आणि रोहित बसले होते, बाईला स्वयंपाक वाढवायला सांगितल,

"काय झालं सांग दादा",.. पिंकी

तोपर्यंत त्यांच्या बॅग आत मध्ये आल्या

" एवढ्या बॅग म्हणजे तुम्ही इथे राहायला आले आहेत का? ",.. रोहित

हो...

"आजी पिंकी मी रियाशी लग्न केलं आहे",.. रोहित

दोघी जणी रोहित कडे बघतच होत्या,.. "दादा आईच काय? तिने नकार दिला होता, काही खरं नाही आता, आई अशी बघेन ना दादा तुझ्याकडे",.. पिंकी

"पिंकी जरा गप्प बस",.. रोहित

" आजी मला कराव लागल हे लग्न रियासाठी, तिच्या वडलांना तस वचन दिल होत मी ",.. रोहित

"कधी झालं हे",.. आजी

" आता 5-6 दिवस झाले",.. रोहित

"कुठे आहे वहिनी? ",.. पिंकी

" आत रूम मध्ये",.. रोहित

" मग घरी का नाही सांगितलं",.. आजी

" आईची भीती वाटते ",.. रोहित

" पिंकी पाणी आण आजीसाठी ",.. रोहित

पिंकी आत गेली

"कुठे सापडली रिया ",.. आजी

"तिथेच होती बाजूच्या गल्लीत, मी तिला सरळ इकडे घेऊन आलो, लगेच लग्न केलं ",.. रोहित

"तुला तर माहिती आहे आजी, आई नकार देते आहे, खरं सांगू रियाच तसं काही नव्हतं, ते लोक तिला फसवत होते, जेव्हा तिला मी इकडे घेऊन आलो तेव्हा ती बेशुद्ध होती, तिला काहीच माहिती नाही काय झालं तिकडे, मी डॉक्टर बोलवलं होता, त्यांनी चेक केल रियाला, ठीक आहे ती",.. रोहित

"ठीक आहे, पण मग तू आता ही बातमी असं किती दिवस लपवून ठेवणार आहे ",.. आजी

" बघू ना आता हळूहळू आईला सांगावं लागेल, त्याआधी रियाला पण समजावाव लागेल, म्हणजे ती ही नीट बोलत नाही माझ्याशी, तिलाही माझ्याशी लग्न करायचं नव्हतं, आता काय लपवणार तुझ्यापासून आजी रियाला मनवु असं ठरवलं होतं मी, मग आईकडे तिला घेऊन जाणार होतो, अजून रिया माझ्याशी नीट बोलत नाही, नावाला लग्न केल आम्ही आणि रियाच्या जीवाला धोका आहे",... रोहित

पिंकी आली पाणी घेवून

रोहित गप्प बसला

" पिंकी जा तू आवर",.. आजी

" पिंकी तुला सांगतो रियाशी अति बोलत बसू नको, तिला अजिबात कुठलीही माहिती देऊ नको पिंकी, तिला फोन वापरायला द्यायचा नाही, ती जर म्हटली बाहेर कुठे जाऊ या शॉपिंगला वगैरे तर जायचं नाही, ती या घराबाहेर जाता कामा नये, तिच्याबरोबर तुम्हीसुद्धा या वेळी बाहेर पडू शकत नाही, पटत असेल तर रहा इथे, त्या मुलांची मोठी गॅंग आहे ते लोक डेंजर आहेत, रिया ला धोका आहे, पण ते रियाल समजत नाही, तिला इथून बाहेर जायचं आहे, ती नक्कीच प्रयत्न करेन, तुम्ही दोघी तिला मदत करू नका",.. रोहित

"नको आम्ही घरी जातो",.. आजी

"नाही आजी आपल्याला लगेच जाता येणार नाही, आपण लगेच गेलो तर आई स्वतः इकडे येईल, काय झालं आपण लगेच परत का आलो ते बघायला",.. पिंकी

"हो आई अजून एक महिना तरी इकडे येता कामा नये, प्लीज फोन केला तर काहीही सांगू नका",... रोहित

" पण आम्ही फोन कसा करणार आईला? फोन तुझ्या कडे आहे दादा ",.. पिंकी

" संध्याकाळी फोन माझ्या फोनवरून, नाहीतर या लैंडलाइन वरून कर ",.. रोहित

" कुठे आहे रिया",.. आजी

" आता ती खाली आहे माझ्या खोलीत, आजी पिंकी जर तिने तुम्हाला काही बोललं तर माफ करा मला, तिची मनस्थिती सध्या ठीक नाही, सांभाळून घ्या",... रोहित

" तू काहीच काळजी करू नको रोहित, आम्हाला नाही राग येणार, कशाला बोलेल ती काही आम्हाला",.. आजी

" मी बोलवतो तिला तुम्ही दोघेही फ्रेश होऊन या सोबत जेवण करू",.. रोहित

ठीक आहे..

रोहितच्या रूम च्या बाजूची खालची रूम त्या दोघींची होती, त्या दोघी रूममध्ये चालल्या गेल्या,

" रोहित ने काय काय सांगितलं ते लक्षात ठेव बाई पिंकी, नाहीतर काही खरं नाही आपलं ",.. आजी

"आजी तू आईला काही सांगू नको",.. पिंकी

" नाही ग बाई नाही सांगणार मी",.. आजी

रोहित आत मध्ये आला, रिया सोफ्यावर लोळून पुस्तक वाचत होती, ती एकदम उठून बसली, हे अस आहे आता, नीट पडता ही येणार नाही इथे, नीट बसा नीट कपडे घाला, माझा दुपट्टा कुठे आहे, हा का इकडे येतो आता, परत लेक्चर

रोहित तिच्या जवळ येऊन बसला,.. "रियु मी काय सांगतो ते ऐक, आजी आणि पिंकी आल्या आहेत, त्या इथे राहतील थोडे दिवस, व्यवस्थित वागायचं त्यांच्याशी, त्यांचे फोन वापरणे, त्यांच्याशी भांडण, त्यांच्या मदतीने इथून बाहेर पडायचा प्लॅन करण, अजिबात चालणार नाही मला, जर चूक झाली तुझ्या कडून तर मी काय करेल तुला माहिती आहे, तुला तर त्रास देईल मी तुझ्या घरच्यांना ही सोडणार नाही, तुला कधीच तुझ्या घरच्यांना भेटता येणार नाही, मी काहीही करू शकतो तुला माहिती आहे, शेवटी रात्री तुला माझ्या रूममध्ये येऊन झोपायच आहे, एवढ लक्षात ठेव ",... तो बाथरूम मध्ये निघून गेला

मी आता काही बोलली का याला? हा उगीच मला सारखं बोलत असतो,.. मी तुला असं करीन.. मी तुला तसं करेन.. मी कशाला भांडेल त्याच्या आजी आणि बहिणीशी, उलट त्या दोघी आला तर मला छान वाटतं आहे, थोडं बोलता येईल छान वाटेल, बोर रोहित पेक्षा चांगल्या असतिल त्या, हा दिसायला हॅन्डसम आहे, बाकी वागायला कसा आहे हा, खडूस, एवढ मला कधी कोणी बोलाल नव्हत,

पिंकी चांगली आहे आणि त्या दिवशीच किती छान वागत होती ती माझ्याशी, आजींचा स्वभाव नाही माहिती पण माझ्या आजी सारखीच असेल रोहितची आजी, एकदम क्यूट, रिया खुश होती, चला दोन-चार दिवसांनी का होईना कोणीतरी आलं इथे, मला तर वाटलं होतं की वर्ष-दोन वर्ष फक्त रोहित आणि मी तिथे राहील का आणि ती राधा बास, दोन तीन लोक

माझा स्वभाव काही भांडकुदळ नाही मला त्या रोहित सोबत राहायचं नाही म्हणून चिडते मी, पण रोहित जास्त करतो, सदोदित मला बोलतो,

त्याच्या आजीने मला रागवल तर, जावू दे बोलू दे काही, काहीच बोलणार नाही मी, माझी आजी किती बोलत होती मला, रोहित आवरून आला,.. चल बाहेर रियू जेवायच नाही का? ,

रिया बाहेर आली, आजी पिंकी अजून त्यांच्या रूम मध्ये होत्या, रोहित त्यांना बोलवायला गेला, रिया किचन मध्ये स्वयंपाक झाला का ते बघत होती,

आजी पिंकी पुढे आल्या, त्या रिया कडे बघत होत्या, किती गोड मुलगी आहे ही, खूप सुंदर, रिया त्यांच्या जवळ गेली आजीच्या पाया पडल्या, आजी काही बोलली नाही, पिंकी येवून भेटली, रियाला एकदम भरून आल, किती छान वाटत या आल्या तर,

"कशी आहेस वहिनी" ,... पिंकी

"मी ठीक आहे, तुम्ही कश्या आहात पिंकी ताई? " ,.. रिया

ठीक आहे

बापरे एवढ गोड बोलता येत रियुला? माझ्याशी वचवच भांडत असते, मला हात लावू नका, मला नाही रहायच इथे, किती बोलते ही मला मोठ्या आवाजात,.. रडकी

आजी रिया कडे बघत होत्या, रिया त्यांच्या जवळ जावून बसली, चांगली वाटते आहे ही रिया, आजीने रोहितला जवळ बोलवलं, रिया रोहितला जवळ घेतल, सुखाने संसार करा पोरांनो, चांगले रहा, रोहित रिया कडे बघत होता, ती काही बोलली नाही, तिने त्याच्याकडे बघितल नाही,

रिया ताट करत होती, पिंकी तिच्या मदतीला गेली, रोहित बघत होता आज बर रियुची गाडी ताळ्यावर आहे, अशी रहा बाई शांत, आजी रोहित जेवायला आल्या, रिया उभी होती,

बस रिया,..

"तुम्हाला काही लागल तर बघते मी, नंतर बसते मी ",.. रिया

"नको आम्ही घेवू आमच्या हाताने",.. आजी

रिया पिंकी जवळ बसली जेवायला,

रोहित आई अण्णां बद्दल विचारता होता, आजी पिंकी बोलत होत्या, रिया ऐकत होती

किती लोक आहेत यांच्या कडे? , काय माहिती? रोहितचे आई बाबा आले तर इकडे? , हे सगळे इथे राहतात का? की यांच अजून एक घर आहे? काय माहिती ते कुठे आहेत? जावू दे आपल्या काय? नसत्या चौकशी नको करायला, उगीच उलट सुलट बोलली तर रोहित माझा जीव घेईन रात्री, त्या पेक्षा गप्प बसा, जेवण करा,

जेवण झाल, बाई आवरत होती, आजी रोहित सोफ्यावर बसले होते, पिंकी फोन वर बोलत होती, पिंकी कडे कोणाचा फोन आहे, तिचा का रोहितचा? बहुतेक हा रोहित चा फोन आहे, मग पिंकीचा फोन कुठे आहे? नक्की तो रोहितने घेतला असेल, मी वापरू नये म्हणून, खूप छान कंट्रोल ठेवला आहे याने माझ्यावर , अजिबात काहीही करता येत नाही मला, पूर्ण अडकली आहे मी,

रोहित रिया कडे बघत होता, ती उभी होती,

"रिया ये इकडे बस",... आजी बोलवत होती , रिया जावून आजी जवळ बसली

"छान दिसतेस तू, मी काही आणल नाही तुला, मला माहिती नव्हत तू इथे आहेस",.. आजी

रिया काही बोलली नाही, म्हणजे काय? याच्या घरच्यांना याने सांगितल नाही का लग्न झाल ते?, लग्नाला कोणी नव्हत तस, की मी पसंत नसेल त्यांना, काय माहिती,

फोन झाला, पिंकी आत येवून बसली,.." ड्रेस छान आहे तुझा वहिनी, खूप छान दिसते आहेस तू",

" ही मला काय सारखी वहिनी वहिनी करते, पण काही बोलता येणार नाही, रोहितची प्रिय बहीण आहे ही, आत सांगितल ना रोहितने यांना काही बोलल तर माझ काही खर नाही ",.. रिया

रोहित किती शांत बसला आहे या दोघीं सोबत, जसा एकदम चांगला आहे हा, थोड्या वेळा पूर्वी कस केल मला, एकदम चिडला होता, धमकी देत होता, पोलिसांना फोन करत होता, ती राधा काय विचार करत असेल, तिच्या समोर माझ्या किती जवळ होता हा रोहित माझ्या , तिला ही खाली घालवल त्याने, किती ओरडला मला, आता ही बोलला ,

आजी रोहित हळु हळु बोलत होते,

पिंकी रियाशी बोलत होती,.. "रिजल्ट कधी आहे तुझा वहिनी? , तू लास्ट इयर ला होतीस ना? ",.

"बापरे माझी परिक्षा झाली हे तर विसरून गेली होती मी, कधी आहे रिजल्ट काय माहिती? काय करणार आता कधी असू दे रिजल्ट, कुठे जावू देणार हा रोहित मला रिजल्ट घ्यायला, पुढे शिक्षण होईल का माहिती नाही" ,.. रिया उदास होती

" तुमचा कधी आहे रिजल्ट पिंकी ताई ",.. रिया

"आता आहेच पंधरा दिवसात ",.. पिंकी

" वहिनी तू मला पिंकी बोल, अहो नको बोलू",.. पिंकी

नको बाई उगीच कोणी काही बोलल तर, अजून घरचे कसे आहेत माहिती नाही मला, रोहितचे आई वडील अजून आले नाहीत इथे, या दोघी तर चांगल्या आहेत, पण मी का विचार करते आहे रोहितच्या फॅमिलीचा, मला कायम राहाव लागणार आहे बहुतेक इथे, विशालच काय पण मग, तो कधीच भेटणार नाही का मला आता, तिच्या डोळ्यात पाणी होत, एकदम घसा कोरडा पडला, ती उठून किचन मधे निघून गेली, रडत होती ती तिकडे,

"तुम्ही दोघी करा आराम",.. पिंकी आजी रूम मध्ये गेल्या..

🎭 Series Post

View all