हे प्रेम आहे की काय?... भाग 16

रोहित पोलीस स्टेशनला गेला होता, आज पहिल्यांदा तो विशाल ला बघत होता, विशाल ला पोलीस इन्स्पेक्टर खूप मारत होते,


हे प्रेम आहे की काय?... भाग 16

©️®️शिल्पा सुतार
........

रिया सरळ बाथरूम मध्ये गेली, दार बंद केल, खूप धड धड होत होती तिला, ती रडत होती, उगीच केली पेपर वर सही, बाबा सुटले नाही, विशाल सुटला नसेल, कुठे आहे तो माहिती नाही? , विशाल ला अटकवण्यासाठी रोहित ने माझी सही घेतली, पूर्ण फसले मी इथे, बाबांना काही झाल तर, बापरे, माझी कधीच इथून सुटका होणार नाही का? , ती रडत होती,

रोहित किती रागवतो आहे मला, नुसत विशाल च नाव मी घेतल तर काय झाल एवढ?, मी नाही बोलणार त्याच्याशी, नुसती भीती वाटते त्याची, मला घरी जायच आहे, ती रडत होती, आई बाबा आजी टिना....

जरा वेळ ती तिथे बसुन होती, जेवणाची वेळ झाली, ती बाहेर आली, जास्त वेळ इथे थांबले तर नाहीतर बाथरूम ची कडी तोडतील ते, अजिबात करमत नव्हत इथे, रिया विचार करत होती, एका महिन्यापूर्वी या वेळी मी किती छान माझ्या घरी होती, आई बाबा टीना आजी यांच्या सोबत, मस्त कॉलेज ला जायच विशालला भेटायच, आई च्या हातच जेवण, आराम एवढ आयुष्य होत, आता हे अस आयुष्य, मला कोंडून ठेवल या रोहितने, सारख रागवतो, काहीही बोलायची भीती वाटते,

मी आता रोहित समोर गप्प बसेन उगीच मारल तर मला, इथून बाहेर पडायची सोय नाही, किती दिवस मी अशी राहणार आहे इथे , फोन नाही, कोणी नाही आजुबाजुला, पण रोहित डेंजर आहे, त्याने मला बरोबर इथे आणून कोंडल, आणि लग्नाच्या दिवशी ही किती जोरात मारल होत मला, दोन दिवस गाल दुखत होता, किती लाल झाला होता , तिने गालाला हात लावला, मी कधी भेटेन आई बाबांना, की कधीच नाही, आशेवर रहाव लागेल मला,

तिने टीव्ही लावला, काहीही नव्हत टीव्ही वर, काय करू खालून पेपर तरी आणला असता वाचायला

कोण जाईल खाली, तिथे रोहित बसला असेल , मला आज जेवायची इच्छा नाही राहिली,

जरा वेळाने रोहित वरती आला, रिया सोफ्यावर बसली होती, रडून रडून चेहरा सुकला होता तिचा, तो तिच्या जवळ येवून बसला, रिया खाली बघत होती,... उलट उत्तर द्यायच नाही या रोहितला आणि विशालच नाव काढायचा नाही याच्या समोर, मी लक्ष्यात ठेवेन, विचार करून बोलेल, पण आता का आला हा?.

"बोल रियु काय म्हणत होती तू?",.. रोहित

रिया गप्प होती,... काय बोलणार सारख, सांगितल एकदा की बाबांना सोडवून आणा, तरी लक्ष्यात नाही का यांच्या

"सांग.. तू माझ्याशी बोलत होती ना तेव्हा",.. रोहित

"काही नाही",.. रिया कसबस बोलली

"तुझ्या बाबांना सोडवू का मी जेल मधुन ",.. रोहित

रिया मानेने हो बोलली, गप्प बरी मी.. उगीच काही बोलल जाईल यांना, फटके बसतील परत मला,

"उद्या सकाळी जातो मी पोलिस स्टेशन ला, करतो सुटका तुझ्या बाबांची, पण हे तुझ्यावर अवलंबून आहे ",.. रोहित

म्हणजे?

"तुझ्या बाबांना पाच मिनिटात सोडवेन मी, पण तू होकार दे मला आधी, माझ्या सोबत रहायला ये खाली रूम मध्ये, माझी बायको म्हणून",... रोहित

रिया घाबरली, तो काय म्हणतोय तिला समजल, तिने उत्तर दिल नाही,

" समजतय ना रिया मी काय म्हणतोय ते, होकार दे मला, मग मी तू म्हणशील ते करेन मी ",... रोहित

रोहित तिथे बसुन मोबाईल मध्ये काहीतरी काम करत होता, रिया च्या अंगावर विचार करून काटा आला होता, मला नाही रहायच रोहित सोबत, ती विचार करत होती, काय करू आता, खरच बाबा आहेत का पोलिसांच्या ताब्यात? ,

पण याला होकार देण म्हणजे ते शक्य नाही, मला तर पाच मिनिट यांच्या समोर बसावस वाटत नाही, कायम सोबत कस राहणार? आणि माहिती नाही काय होईल, रोहित काय करेल, नको मी नकार देईन

मला तर वाटत हे खोट बोलत असतील, बाबा घरी असतिल, मी होकार देणार नाही, मला नाही राहायच इथे,

"जेवण तयार आहे साहेब",..

"टेबल वर ठेवा आणि तुम्ही जा",... रोहित

चल रियु जेवायला..

"मला नाही जेवायच" ,... रिया

"तू नको जेवूस मला तर वाढून देशील ना" ,... रोहित

रियाला खूप राग आला होता,... "याचे काम मी करायचे का आता,..

रोहित रिया खाली आले, रिया ने रोहितच ताट केल, आतून पाणी आणल

" तुझ ताट कुठे आहे",.. रोहित

"मला नाही जेवायच ",.. रिया

का?

" मला भूक नाहिये, मी जावू का रूम मध्ये ",.. रिया

रोहित उठला, रिया घाबरली, तिच्या हातातून चमचा खाली पडला," I am sorry रियु, राग सोड, चल जेवण कर, बस इथे, मी करतो तुझ ताट",..

"नाही मला रूम मध्ये जायच आहे",.. रिया

थोड खा...

"नको मला काही",.. रिया रडत होती

"काय झालं? किती त्रास करून घेणार रियु? ",.. रोहित

" माझ्या बाबांना सोडवून आणा ना प्लीज",.. रिया

"होकार दे मला रियु, मी ऐकेन तुझ, रडून उपयोग नाही",..रोहित

" चल जेव, काहीही झाल तरी इथुन तुझी सुटका नाही आरामात रहा भरपूर खा ",.. रिया

जेवण झाल

तुला वाटत असेल काही नसतील तुझे बाबा लॉक अप मध्ये, मी मुद्दाम खोट सांगत असेल तुझ्या जवळ यायला, त्या साठी मला खोट बोलायची गरज नाही, माझ घर आहे , तू माझी बायको आहेस, काहीही करू शकतो मी तुला, पण मला बळजबरी आवडत नाही, तू होकार दे, मनापासून मला स्विकार

रिया खाली बघत होती

रोहितने एक फोटो रियाला दाखवला, त्यात तिचे बाबा लॉक अप मध्ये उभे होते, रियाच्या डोळ्यात एकदम पाणी आल, बापरे बाबा असे काय दिसता आहेत,

ती रूम मध्ये निघून गेली, ती रडत होती, तिच्या मागे रोहित आत आला, तो रिया जवळ काॅटवर बसला, रिया पटकन तिकडे सरकली, उठून बसली ती,

रियु कश्याला त्रास करून घेते, इतक नको रडू, तुला फक्त एक काम करायच आहे मला होकार द्यायचा आहे, मग मी तुला काहीही त्रास होवु देणार नाही, काका काकू टिना सगळ्यांना सांभाळेल मी, काय हव अजून तुला तुझ्या मामा ला मदत करेन, तुला पुढे शिकायच आहे का, परदेशात फिरायला घेवून जाईल, काय हव तुला सांग मला, शॉपिंग करायची का, तू फक्त सांग रियु,
रोहीत रिया जवळ आला, रियु ऐक जरा,
रिया उठून बाथरूम मध्ये निघून गेली, तो तिथे बसली होती बर्‍याच वेळ,

रोहित तिची वाट बघत होता, जरा वेळाने तो त्याच्या रूम मध्ये निघून गेला,

खरच बाबा पोलिसांच्या ताब्यात आहेत, विशाल मुळे का? कोणी पकडल त्यांना, रोहित ला मी हवी आहे, माझ काही खरं नाही, मुद्दाम करतोय रोहित माझ्या साठी तर नसेल ना त्याने बाबांना पकडल, ठीक आहे नाहीतरी खरच इथून सुटका नाही, जर बाबांना काही झाल तर? त्या पेक्षा माझ जे व्हायच ते होवू दे मी होकार देते रोहितला, उद्या सकाळी सांगेन मी

एकदा याला होकार दिला तर विशाल शी संबंध संपला, मला अस नाही करता येणार, रिया परत रडत होती

तिला रात्री केव्हा तरी झोप लागली

सकाळी रोहित आत आला, रिया झोपलेली होती,..
"रियु उठ, चल चहा नाश्ता दे, मला उशीर होतो आहे",.

अरे मग उशीर होतो तर करावा ना नाश्ता, खाली किती लोक आहेत कामाला, जाव ना याने ऑफिसला.. माझ्या मागे काय आहे?, मी नाही उठणार, याच काम नाही करणार मी, मला का सांगतो हा, एक तर किती डोक दुखतय माझ रडून रडुन,

रिया अजूनही झोपून होती, रोहित परत आत आला,..." चांगल्या शब्दात समजत ना रियु? की येवू तिकडे, मला उशीर होतो आहे" ,

रिया पटकन उठली, ती फ्रेश होवुन आली, खाली जावुन किचन मधुन तिने नाश्ता आणला रोहित ला दिला, चहा ठेवला,

रोहित नाश्ता करतांना तिच्या कडे बघत होता, देईल का ही होकार मला?, बहुतेक देईल खूप त्रासली आहे ती इथे, कंटाळली आहे, जवळ जवळ कोंडून ठेवल आपण हिला, दिवसातून 2-3 तास तरी रडते ही, हट्टी किती आहे, मी इतका तरी ती इतकी आहे

"काय ठरवल मग रियु?",...रोहित

"मला उत्तर द्यायला वेळ हवा आहे ",.. रिया

"ठीक आहे, मी थांबेन, पण पोलिस थांबणार नाही एवढे , जावू दे मला काय, तू घे तुझा वेळ मी निघतो, संध्याकाळी येईन अजिबात गडबड नको, जेवून घे दुपारी, काळजी करू नकोस, रूम बाहेर जायच नाही" ,.. रोहित

" रोहित प्लीज बाबांना सोडवा ना ",.. रिया

" होकार दे आधी रियु",. रोहित

" प्लीज मला वेळ द्या, हे सगळ नवीन आहे माझ्या साठी, मला खूप एकट वाटत इथे ",.. रिया

" मी आहे ना तुझ्या साठी, आपण राहू सोबत , होकार दे, माझ्या सोबत राह्यलाय ये रियु",.. रोहित

" प्लीज बाबांना मदत करा, त्यांची तब्येत अशी काय झाली ",.. रिया

" तुझ्या मुळे रियु, तू काय कमी त्रास देते का सगळ्यांना, मला काहीही सांगू नको, मी मदत करणार नाही, आधी होकार दे",.. रोहित ऑफिस मध्ये निघून गेला

कसा काय होकार देणार? मला नाही आवडत हा, ओळख नाही आमची, मला भिती वाटते याची, तो माझ्या जवळ येईल ही कल्पना ही सहन होत नाही मला, पण आता इलाज नाही, रिया तिच्या रूम मध्ये बसुन होती,

इथून बाहेर पडायचे सगळे मार्ग बंद आहेत, सगळे करून बघितल, इथून पळायचं म्हटलं तर फार्महाऊस इतका मोठा आहे दोन गेट आहेत, आणि ते बॉडी गार्ड भयानक आहेत, कस उचलल होत मला त्या दिवशी त्या एकाने, त्या बाईजवळ चिठ्ठी दिली की बाहेर जावुन फोन कर तर ती सिक्युरिटी गार्ड ला सापडली, केवढा चिडला होता तेव्हा रोहित, फोन करायचा म्हटलं तर ती ऑपरेटर बाई लगेच रोहितला सांगून देते, करू तरी काय मी? मला नाही वाटत अशी माझ्यासारखी शिक्षा कुणाला मिळत असेल,

शिक्षा कशामुळे तर माझं प्रेम आहे दुसऱ्यावर, सगळे म्हणतात विशाल चांगला नाही, पण माझ्या मनाचा विचार कोण करणार? बाबा म्हणत होते की तो मला विकणार होता, पण याआधी एक वर्षभर मी त्याला भेटत होती जर त्याला असं काही करायचं असतं तर कधीच केलं असतं, विशाल दिसायला फक्त गुंडा सारखा आहे कोण सांगेन सगळ्यांना

" काय करणार आहे मी दिवसभर, अस किती दिवस इथे रहायच आहे मला, की कायमच, omg",.. रिया रडवेली झाली होती

रिया खाली आली, तिच्या मागे राधा होती, रियाने पेपर घेतला, एक दोन पुस्तकं घेतले, ती रूम मध्ये येऊन बसली, बराच वेळ वाचनात गेला, दुपारी जेवून घेतलं तिने

रोहित ऑफिसमध्ये कामात होता, शरद रावांचा फोन आला, ते घरी होते,.. "कशी आहे रिया रुळली का तिकडे?",

"नाही रुळली अजून, तुमची आठवण काढते ती रोज",.. रोहित

"काय झालं तो मुलगा अजून आहे ना पोलिसांच्या ताब्यात",.. शरद राव

"हो मला कालच इन्स्पेक्टर साहेबांचा फोन आला होता, सोडलं नाही त्याला, शिक्षा होईल त्याला, तुम्ही सगळे कसे आहात",... रोहित

" आम्हाला रिया ची खुप आठवण येते, एकदा बोलता येईल का तिच्याशी ",.. शरद राव

" थोडे दिवस थांबा, काळजी करू नका, ठीक आहे रिया, अजून धोका आहे त्या गँगचा, तुम्ही काळजी घ्या ",.. रोहित

संध्याकाळी रिया जरा वेळ खाली आली, ती बागेत फिरत होती, रिया शांत असल्यामुळे बॉडीगार्ड राधा हि जरा बाजूला एका खुर्चीवर बसली होती, आज खाली आल्यामुळे रियाला जरा बरं वाटत होतं, तिथे जरा वेळ झाडाखाली बसली

" तू कुठे राहतेस राधा ",.. रिया

" मी गावाला रहाते",.. राधा

" तू आमच्याकडे राहते का चोवीस तास",.. रिया

" हो माझी ड्युटी आहे ही",.. राधा

"तुला घरच्यांची आठवण नाही येत का",.. रिया

" येते पण गरज आहे नोकरीची",.. राधा

" कोण आहे तुझ्या घरी",.. रिया

" आई-वडील बहिण-भाऊ",.. राधा

" फोन येतो का त्यांचा रोज",.. रिया

" हो रोज येतो फोन",.. राधा

"तुझा फोन कुठे आहे",.. रिया

" गेट वर जमा करावा लागतो फोन आत मध्ये आणू देत नाही साहेब ",.. राधा

रियाच्या डोळ्यात पाणी होतं तिने ते पटकन पुसलं, आई बाबा आजी टिना कधी होईल आपली भेट,

ती तिच्या रूम मध्ये निघून गेली, खाली एक डायरी पेन मिळाला तिला, चला रोज लिहीत जावू यात, रिया थोडी तरी खुश होती,

जरा वेळाने खाली गाडीचा आवाज आला, आला वाटतं रोहित, सोडलं असेल का बाबांना? नसेल सोडलं, एवढी दया दाखवणार नाही ते माझ्यावर, जोपर्यंत मी होकार देत नाही तोपर्यंत नाही सोडणार बाबांना, काय करावं समजत नाही? बाबांसाठी एक वेळ वाटतं होकार द्यावा पण माझं मनच नाही रोहित सोबत राहण्यासाठी, ते घरी नसले की छान वाटतं आता उद्या सकाळ पर्यंत कटकटच आहे

जरा वेळाने राधानी निरोप दिला,.. "खाली बोलवलं आहे",

रिया उठली तिने आवरलं ती खाली गेली

हॉल मध्ये अभिजीत रोहित बसलेला होता, हाच तो रोहित चा त्यादिवशीच मित्र आहे याच्या समोरच लग्न झालं, ऑफिस मध्ये आहे कि काय हा?

ये रीयु,...

रिया जाऊन रोहित जवळ बसली, हा माझा मित्र आहे अभिजीत, माझ्याबरोबर ऑफिस मध्ये काम करतो.. ही रिया माझी बायको, रिया फक्त हसली,

ते दोघ ऑफिस बद्दल बोलत होते

रिया किचनमध्ये गेली चहा करायला सांगितला, चहा बिस्कीट घेऊन ती बाहेर आली, जरा वेळ बसली होती ती या दोघांसोबत, जरा वेळाने अभिजीत गेला, रोहित त्याचं काम करत होता, काय करू बोलू का याच्याशी? नको जावू दे,

रिया जरा वेळ तिथे बसली, ती रूम मध्ये येत होती

रियु.... रोहित ने हाक मारली,.. "काय केलं आज दिवसभर",

"काही नाही पुस्तक वाचलं",.. रिया

कोणतं..

रियाने नाव सांगितलं

"तुम्ही गेले होते का आज पोलीस स्टेशन ला? ",.. रिया

"नाही माझं काय काम आहे तिकडे",.. रोहित

" बाबांना सोडलं का",.. रिया

" नाही तुझे बाबा अजून लॉकअपमध्ये आहेत",.. रोहित

"सोडलं का नाही त्यांना अजून, काय केल त्यांनी ",... रिया

" कोण मदत करणार त्यांना? पोलीस इन्स्पेक्टर ऐकत नाही कोणाचं",.. रोहित

" तुमचं तर ऐकतात ना ते ",.. रिया

हो

" मग तुम्ही का नाही सांगत आहात",.. रोहित

" किती वेळा सांगू तुला रियु, जोपर्यंत तू होकार देत नाही तोपर्यंत मी काहीही करणार नाही, तुला वाटत असेल तुझ्या बाबांची काळजी तर हो बोल, नाहीतरी ठीक आहे",... रोहित

रिया गप्प बसलेली होती, ती रूम मध्ये निघून गेली,

काय करू मी समजत नाही, माझ्या बाबतीत का अस पण, मला नाही द्यायचा होकार, पण बाबा... ठीक आहे देते खरच होकार

रिया जेवायला खाली आली, रोहित फोन वर बोलत होता, तो कुठे तरी निघून गेला, रोहित... रोहित....
काय आता कुठे गेले हे?, सांगितल ही नाही , काय झाल असेल , रिया ने थोड खाल्ल, ती रूम मध्ये गेली, रात्री उशीरा पर्यंत रोहित आला नव्हता, कुठे गेला असेल काय माहिती?

रोहित पोलीस स्टेशनला गेला होता, आज पहिल्यांदा तो विशाल ला बघत होता, विशाल ला पोलीस इन्स्पेक्टर खूप मारत होते, तुझ्या गॅंग च्या लोकांची नाव सांग, दोन दिवस झाले होते विशालला उपाशी ठेवलं होतं, रोहीत लांबून सगळं बघत होता,

"त्या गँग च्या लोकांचे नाव घ्या आणि सगळ्यांना अटक करा, अशी वाईट काम करणारे लोक या जगात राहून उपयोग नाही, या लोकांना सपोर्ट ही खूप असतो आणि थोडं काही झालं की परदेशात पळून जातात",.. रोहित

हो साहेब..

विशाल ने नाव दिले,

" लगेच अटक करा बाकीच्या लोकांना, डेंजर आहेत हे लोक", ... रोहित

अजिबात अक्कल नाही रियू ला, कसल्या लोकांच्या जाळ्यात अडकली होती ती, तरी तिला हेच लोक आवडतात, मी नको आहे तिला, अजूनही थोडा हि हात लावू देत नाही ती मला, पण मी ही कमी नाही सोडणार नाही तिला, बघतो घरी जावून, झोपली असेल आता ती, बराच उशीर झाला आहे.... रियू माझी रियू

🎭 Series Post

View all