हे प्रेम आहे की काय?... भाग 15

रिया ने सही केलेला पेपर रोहित ने पोलिसात दिला , खर तर तिचे बाबा नव्हते लॉक अप मध्ये, विशाल ला शिक्षा होण्या साठी रिया ची सही महत्वाची होती,


हे प्रेम आहे की काय?... भाग 15

©️®️शिल्पा सुतार
........

हॉटेल मधुन येतांना विशाल जेवण घेवून आला, बिल मध्ये गडबड होती, तो हॉटेल मधला मुलगा मागे आला

विशाल घरी आला, रियाने दार उघडल तेव्हा त्याने रिया ला बघितल होत, तो मुलगा पैसे घेवुन गेला,...
हे त्या मुलाला आठवल,

इंस्पेक्टर लवकर करा, बरेच पोलीस मदतीला आले, सगळे विशाल रिया लपले होते तिकडे आले

"विशाल अस किती दिवस आपण लपून राहणार आहोत? आपण लग्न कधी करणार आहोत? , जेव्हापासून मी इथे आली आहे तू एकदाही माझ्याशी नीट बोलला नाही की मला जवळ घेतलं नाही, मला तुझ्या आधाराची गरज आहे विशाल, मला खूप काळजी वाटते आहे",.. रिया

"मी टेन्शन मध्ये आहे रिया, बाहेर बघितलं का किती पोलीस आहेत, तुझा मामा कोणी मोठा माणूस आहे का? ",.. विशाल

" माझा मामा शेतकरी आहे, पण ज्याच्या सोबत माझं लग्न ठरलं आहे तो मुलगा हे सगळं करतो आहे, नक्की त्याच्या म्हणण्याप्रमाणे हे होत असेल, काय करायचं आता, विशाल मला भिती वाटते आहे, मला तुझ्या सोबत रहायच आहे , तो रोहित मला घेवून जाईल इथून ",... रिया

" एवढ काय घाबरते तू त्याला रिया, मी आहे ना",... विशाल

" तू त्या रोहित ला भेटला नाही म्हणून अस बोलतो आहेस, आपण जावू ना इथून विशाल ",.. रिया

" थोडं वेशांतर करून पळाव लागेल",.. विशाल

विशालच्या दुसऱ्या फोनवर मंगेश भाईचा फोन आला होता, तो उठून बाजूच्या रूममध्ये चालला गेला, रिया जेवणाची तयारी करत होती

" किती दिवस लागणार आहे तुला इकडे यायला विशाल? किती दिवस वाट बघायची मी अजून? कशी आहे रिया?",.. मंगेश

" आम्ही दोघं सुखरूप आहोत, पण इथुन बाहेर पडायचं चान्सच नाही, मी आत्ताच हायवे पर्यंत जाऊन आलो, पोलीस एकूण एक गाडी चेक करत आहेत, इथे पोलिसांची गस्त वाढतच आहे मंगेश भाई, काय सांगाव घरापर्यंत पोलीस आले तर काय करायचं? ",... विशाल

" तुम्ही लोकं निघा आज रात्रीची इकडे यायला",.. मंगेश

" कसं पण? काय करणार आम्ही? ",.. विशाल

" माझे दोन तीन लोक आले आहेत तिकडे त्या गावात, ते करतील मदत, भाजी च्या गाडीतुन या, मी लगेच आजच रात्री रिया ला घेऊन परदेशात निघून जाईल, फार महत्त्वाच आहे आज तुमच्या तिकडुन निघण",... मंगेश

" पण रिया ऐकेल का? ती मला सोडणार नाही",.. विशाल

"तू ते औषध आणलं आहे ना सोबत",.. मंगेश

हो..

" ते रीयाला दे, तिला डायरेक्ट उद्या समजेल ती कुठे आहे, तोपर्यंत तर आम्ही बरेच पुढे निघून जावू ",... मंगेश

" ठीक आहे चालेल भाई, कुठे आहेत ते तुमचे मदत करणारे लोक ",... विशाल

" ते येतीलच एक तासात, भाजीच्या पोत्यात बसुन या ",.... मंगेश

विशाल फोनवर बोलून बाहेर आला, रिया जेवणाचे ताट वाढत होती

" कोणाचा फोन होता विशाल? ",.. रिया

" माझ्या मित्राचा फोन होता, इथून कसं निघायचं ते बोलत होतो, रिया जरा पाणी घेऊन ये ",... विशाल

" काय ठरलं मग",.. रिया

" आपण इथून निघू लग्न करु",... विशाल

" मग लग्न झालं की संध्याकाळी माझ्या घरी येवून आई बाबांना भेटू, चालेल ना विशाल? मला त्याच्या पासून काही लपवायच नाही ",.. रिया

" हो चालेल तू म्हणशील तस",.. विशाल

रिया आत मध्ये गेली पाणी आणायला, विशालने तिच्या जेवणात गुंगीचे औषध टाकलं, दोघ जेवायला बसले, विशाल प्रेमाने रियाकडे बघत होता, रिया खुशीने जेवत होती, ती पाच मिनिटात झोपून गेली, विशालने पटापट आवरलं, त्याची बॅग भरली, ते लोक कुठे आहे त्यांना फोन केला

तोपर्यंत रोहित, शरद राव, मामा पोलीस सगळेच विशाल च्या घराच्या आसपास होते, सगळ्या बाजूने घराला घेराव घातला, हॉटेल मधल्या मुलाने पुढे येऊन दार वाजवलं, सगळ्यांनी बाजूला सरका त्याच्याकडे पिस्तूल असला तर

विशालने दार हळुच उघडले, त्याने बघितला हॉटेल मधला मुलगा आला आहे,.. "काय काम आहे? ",..

"हे तुमचं बिल चुकीच आहे",..

"अरे किती वेळा गोंधळ घालत आहे तुम्ही लोक?",.. विशाल रिलॅक्स होता

तेवढ्यात सगळ्या बाजूने पोलिसांनी त्याच्यावर हल्ला केला, विशालला प्रतिकार करायला चान्स दिला नाही, त्याला खाली दाबून बेड्या घातल्या, पोलीस त्याला घेवून गेले

सगळे आत आले, आतल्या खोलीत गादीवर रिया झोपली होती, रोहितने बघितलं.. काका ही बेशुद्ध आहे, तिचा मोबाईल बाजूला पडला होता तो, रोहित ने फोन खिश्यात घातला,

"घ्या काका रिया ला, घरी घेवून जा, तिची काळजी घ्या या पुढे, मी वचन पूर्ण केल",.. रोहित

"तुम्ही हिला घेवून जा रोहित तुमच्या सोबत , इथे तिला धोका आहे" ,... शरद राव

" पकडला गेला तो मुलगा",... रोहित

"त्याची गँग आहे, सुटला तर विशाल जेल मधुन",.. शरद राव

"मी रिया शी लग्न नाही करू शकत, आमच्या घरून नकार आहे, आता माझी आई नाही म्हणते आहे, मला ऐकाव लागेल तीच, तुम्ही समजून घ्या, घरी सगळे खूप चिडलेले आहेत ",... रोहित

" रिया पळून गेली म्हणून तुम्ही अस म्हणताय, समजत मला, पण तीच तस काही नाही, गुंडाच्या तावडीत सापडली होती ती, बघितल ना आता ही बेशुद्ध आहे, प्लीज एकदा विचार करा, रिया शी लग्न करा ",... शरद राव

रोहित काही बोलला नाही....

" जावू द्या दाजी चूक आपल्या पोरीची आहे त्यांच बरोबर आहे, कोणी स्विकारायला तयार होणार नाही अस केल तर, जास्त बळजबरी करण्यात अर्थ नाही, त्यांनी रिया ला शोधायला मदत केली हेच खूप आहे, मी सांभाळेल रिया ला, हिला घरी घेवून जावु",.. मामा

रोहित विचार करत होता काय करू? हे काका बोलता आहेत ते ही खर आहे, रियुची काय अवस्था झाली इथे, तरी तिला समजत नाही, पण हिच्याशी लग्न केल तर आईच काय? , आई खूप चिडली आहे, ती नाही म्हणते आहे, कश्या वरून रियु परत पळून जाणार नाही, ऐकी कडे रियु.. ऐकी कडे आई, आता काय करू मी? , मला रियु हवी आहे,

शरद राव अजून आशेने रोहित कडे बघत होते, त्यांना माहिती होत रोहित ला रिया आवडली आहे, आपल्या मुलीच चांगल होईल याच्या सोबत,

"रिया ला मी सोबत घेवून जातो, माझ्या सोबत फार्महाऊसवर , आमच्या घरी नाही घेऊन जाऊ शकत, माझ्या आईला आता हे लग्न मान्य नाही, मी लग्न करतो हिच्याशी, चालेल ना तुम्हाला",.. रोहित

ठीक आहे... शरद राव, मामा खुश होते

"हिला सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे ती माझ्या सोबत आहे अस, उद्या लग्न करतो हिच्याशी , पाठवणार नाही थोडे दिवस माहेरी हिला, फोन वर बोलता येणार नाही हिच्याशी थोडे दिवस, पूर्ण वेळ माझ्या ताब्यात राहील ही, तुम्हाला ही येता येणार नाही तिकडे, चालेल ना ",.. रोहित

" हो चालेल, राहू द्या तिकडे सेफ आहे ती, काळजी घ्या हिची, लग्नाचे फोटो पाठवा",.. शरद राव रिया जवळ आले, त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला, काळजी घ्या हिची थोडी हट्टी आहे, पण समजवल तर ऐकते, अजिबात शुद्ध नाही हिला, काय झालं हिला? अशी बेशुद्ध का आहे,

" तुम्ही काळजी करू नका काका मी बोलवतो डॉक्टरांना, घरी सांगून द्या आणि तुम्ही काळजी घ्या थोडे दिवस शहरात जावु नका, टिनाची काळजी घ्या डेंजर आहेत हे लोक, काही वाटल तर मला फोन करा",.. रोहित

हो..

रोहित ने रियाला उचलल कार मध्ये झोपवल, पोलिसांची गाडी सोबत होती, ते फार्म हाऊसवर आले

रियाला वरच्या रूम मध्ये झोपवल, रोहित रिया कडे बघत होता, अगदी लहान मुली सारखी झोपली आहे ही, किती छान दिसते पण किती आगावू आहे, राग खूप येतो हिचा पण करणार काय, रागवता येत नाही हिला, खूप समजून सांगाव लागेल हिला, बेशुद्ध आहे ही, त्याने डॉक्टरांना बोलावलं, लेडी डॉक्टर हवी

डॉक्टर आल्या त्यांनी रियाला चेक केल,.. "काही प्रॉब्लेम नाही येईल पाच सहा तासात शुद्धीवर",

"हिला किडनॅप केल होत, सगळ ठीक आहे ना एकदा बघा" ,.. रोहित

डॉक्टर आत गेल्या,... "हो ठीक आहे ती, बळजबरी झाली असेल असे लक्षण नाहीत, ठीक आहे मुलगी" ,

डॉक्टर गेले, आता रोहितला वाईट वाटत होत, उगीच नंतरचा प्रश्न विचारला डॉक्टरला, असू दे पण आता मनात शंका नाही, आणि जरी काही असत तरी स्विकार केला असत मी हिचा,

अरे आपण स्वतःला चांगल समजून रिया वर उपकार केले अस करतो आहे, हे चुकीच आहे, सॉरी रियु लव यू

रोहित तिच्या जवळ बसला, मला खरं वाटत नाही ही रियु माझ्या घरात आहे, छान आहे ही, उद्या लग्न करेन मी हिच्याशी, खूप हट्टी आहे, उठल्यावर काय करेल काय माहिती? , काही खरं नाही माझ, समजावेल मी हिला

त्याने घरची सिक्युरिटी टाईट केली, रिया ची रूम लॉक केली बाहेरून

मला घरी जाव लागेल, माझ ऑफिसच सामान घेवून येतो, लग्नाची तयारी करावी लागेल, त्याने अभिजीत ला फोन करून लग्नाची तयारी करायला सांगितली,

रोहित ने रस्त्यातून पोलिस स्टेशन वर फोन केला,.. "काहीही झाल तरी त्या विशाल ला सोडू नका, किती वरून फोन आले तरी मला सांगा आधी, मी बघतो",..

हो साहेब...

शरद राव, मामा घरी आले, सुरेखा ताई, मामी, टीना खूप काळजीत होत्या

" काय झालं सापडली का रिया?",.. सुरेखा ताई

"हो सापडली, पण मी काय सांगतोय ते कोणाला सांगू नका, रोहित घेवून गेले तिला तिकडे, राहील ती त्यांच्या सोबत, तेच बर आहे तिच्या साठी आणि तुम्ही कोणी घरा बाहेर उगीच निघू नका, त्या गुंडांचा धोका अजून कमी झाला नाही",.. शरद राव

" हो पण लग्नाच काय",.. सुरेखा ताई

"उद्या आहे लग्न",.. शरद राव

" आपण जाणार आहोत का? ",.. सुरेखा ताई

" नाही आता थोडे दिवस विसरा रियाला, तिला तिथे राहू द्या, ती तिकडे सेफ आहे ",.. शरद राव

ठीक आहे...

रोहित रात्री उशिरा घरी आला, शारदा ताई वाट बघत होत्या,..." किती वाजले रोहित काही अंदाज?, कुठे होता एवढा वेळ?",..

"आई थोड काम होत ",..रोहित

"त्या मुलीच्या मागे नव्हता ना फिरत, मी आधीच सांगून ठेवते तुला मला अजिबात आवडल नाही तिने जे केल ते, तू लांब थांब त्या लोकां पासुन",.. शारदा ताई

रोहित ला टेंशन आल होत आई ला जर समजल तर काय होईल?

" चल जेवून घे रोहित ",... शारदा ताई

रियू बेशुद्ध आहे उपाशी आहे, किती दिवस काही खाल्लं की नाही तिने काय माहिती,... नको मी नाही खात काही

" नको आई खाण झाल आहे माझ बाहेर, आई मी फार्म हाऊस वर जातो आता , तिथून ऑफिस जवळ पडत ",.. रोहित

"ठीक आहे, पण आता कशाला एवढ्या रात्री उद्या सकाळी जा",.. शारदा ताई

हो...

शारदा ताई काळजीत होत्या, का वागतो रोहित अस? कुठे जातो कुठून येतो काहीही माहिती नाही, नक्की त्या मुलीच्या मागे असेल हा, त्याच्या मॅनेजरला विचारायला हव, पण आज तो नव्हता सोबत,

रोहितने त्याची बॅग पॅक केली, सकाळी सकाळी तो फार्म हाऊस वर निघून आला,

रिया उठलेली होती, तिला रोहित ला बघून शॉक बसला, रोहित ने काहीही ऐकल नाही, त्याने रिया शी लग्न केल, लग्नाचे फोटो शरद राव यांना पाठवून दिले, रोहित ने घरी लग्न झाल हि बातमी लपवुन ठेवली

....
रिया ला सगळ आठवत होत, ती रूम मध्ये नुसती बसलेली होती, आज बाबाची खूप आठवण येते आहे, पेपर वर सही केली मी आज बाबां साठी, बाबांना सोडल असेल ना पोलिसांनी? माहिती नाही रोहित आले की विचारू त्यांना

रिया ने सही केलेला पेपर रोहित ने पोलिसात दिला , खर तर तिचे बाबा नव्हते लॉक अप मध्ये, विशाल ला शिक्षा होण्या साठी रिया ची सही महत्वाची होती,

संध्याकाळी ती रोहित यायची वाट बघत होती, बाबा कसे असतिल? पोलिसांनी सोडले असेल का त्यांना? , इथे माझ्या कडे फोन ही नाही, एकदा बोलली असती आई बाबांशी, आज अजून का आला नाही हा रोहित,

ती बाल्कनीत बसलेली होती, समोरुन कार येतांना दिसली, रोहित थोडा उशिरा आला घरी, रिया वाट बघत होती तो वरती येतो का माझ्याशी बोलायला, पण रोहित वरती आला नाही, रिया शेवटी रूम बाहेर आली

राधा बाहेर बसली होती,.. "कुठे जायचं आहे तुम्हाला मॅडम?, प्लीज रूम मध्ये वापस जा, मॅडम ऐका",

रिया खाली उतरून आली, ती सरळ रोहिचा रूम मध्ये गेली, रोहित कपडे बदलत होता, समोर रिया ला बघून तो गडबडून गेला, रिया पटकन मागे वळली

"काय आहे रिया तू काय करते आहे इथे? दार वाजवून आत यायचं ना",.. रोहित

"सॉरी.. मी हॉल मध्ये बसली आहे, मला थोडं बोलायचं आहे तुमच्याशी",.. रिया

रोहितला माहिती होतं केली रिया ला तिच्या बाबां बद्दल विचारायचं असेल, रोहित आवरून बाहेर आला, रिया समोर बसून पेपर वाचत होती, रोहित समोर बसला, रियु छान दिसते आहे आज, हा ड्रेस मस्त दिसतो तिला,

" नवऱ्याला काही चहापाणी विचारायची पद्धत माहिती आहे की नाही ",... रोहित

रिया पटकन उठली, किचन मध्ये जाउन तिने पाणी आणलं, तिथल्या बाईंना चहा ठेवायला सांगितला,... तुम्ही चहा तयार करा मी येते घ्यायला,

रोहित बघत होता, आता बरीच शांत झाली आहे रिया, तिने पाणी दिलं,

"मला बोलायचं होतं थोडं",. रिया

"बोल ना",.. रोहित

" बाबांना सोडलं का पोलिसांनी?",.. रिया

" नाही ते अजून पोलिसांच्या ताब्यात आहेत",.. रोहित

रिया एकदम धस्स झालं,.. "मी तर पेपर वर सही करून दिली होती ना तुम्हाला, तुम्ही नाही दिला का तो पेपर पोलिसांना",..

"दिला होता पण उशीर झाला आज, कालपासून सांगतोय तुला, तू सही करत नव्हती",.रोहित

"आता काय ? माझ्या बाबांना कधी सोडतील? , त्यांना खूप टेंशन येत, प्लीज तुम्ही मदत करा ना रोहित",.. रिया

" मी काय मदत करणार रियु, मी आधीच सांगितला होत तुला, तू ऐकत नाही माझ, आणि आता बरी काळजी वाटते आहे तुला तुझ्या बाबांची, चुकीच वाचतांना काही वाटल नाही का तुला? ",.. रोहित

" मी आधी बोलले होते बाबांशी, ते जावू द्या, प्लीज मदत करा, उद्या सकाळी सोडतील का बाबांना?, मी ऐकेन तुम्ही काय म्हणताय ते ",.. रिया

माहिती नाही मला रियु..

आतल्या बाई चहा घेवून आल्या, रोहितला चहा दिला, त्याने उठून टीव्ही लावला, रिया अजून त्याच्या कडे बघत होती,

" काही बोलायच आहे का अजून रियु",.. रोहित

" तुम्ही माझ्या बाबांना सोडायला मदत करा ना प्लीज, मी बाबांसाठी पेपर वर सही केली, नाही तर मी विशालला शिक्षा होवू दे अश्या पेपर वर सही का केली असती? , माझ्या विशालला मी का अस करेन? ",.. रिया

रिया अशी बोलली, रोहित जागेवरून उठला, खूप चिडला होता तो, रिया घाबरली, ती तिथून जात होती, रोहित ने पुढे होवुन तिचा हात धरला, रिया घाबरली

" काय म्हटलीस तू आता रियु, सांग एकदा" ,.. रोहित

" काही नाही ते बाबांना सोडा ",.. रिया

" त्याच्या नंतर ",.. रोहित

" काही नाही",.. रिया घाबरली, काही चूक झाली का?,

"तुझ्या विशाल ला तू अस का करेन, तुझा विशाल का? ",..रोहित

रिया गप्प होती, तिला लक्ष्यात आल नाही नेमक काय बोलली ती, काही खरं नाही आता माझ, कोण वाचवेल आता मला काय माहिती

" किती वेळा सांगितल तुला रियु माझ्या समोर त्या पोराच नाव घ्यायच नाही, समजत नाही का? , इथून पुढे सांगणार नाही मी, सरळ एक वाजवून देईल तुला, तू माझी बायको आहेस, इथून पुढे त्या पोराच नाव मला या घरात ऐकायला यायला नको , I am serious रियु, जेव्हढ प्रेम करतो ना मी तुझ्यावर तेवढ त्रास ही देवू शकतो",... रोहित

रोहित ने तिचा हात सोडला, रिया पळत रूम मध्ये निघून गेली... खूप रडत होती ती...

🎭 Series Post

View all