हे प्रेम आहे की काय?... भाग 14

सगळी कडे रियाचे फोटो दिसत होते गावात, हॉटेल वर काम करणारा मुलाने ते फोटो बघितले , मी बघितल या मुलीला त्याने पोलिसांना फोन केला, पोलिसांनी रोहित ला कळवल,


हे प्रेम आहे की काय?... भाग 14

©️®️शिल्पा सुतार
........

रोहित ऑफिस मध्ये मीटिंग मध्ये होता, शरद रावांनी त्याला फोन केला,

" काही अर्जंट आहे का काका? ",.. रोहित

हो.. शरद राव टेंशन मध्ये होते

"काय झालं? मी करतो पाच मिनिटात फोन",.. रोहित

ठीक आहे..

"काय म्हटले रोहित",.. मामा

"ते बिझी आहेत, मला भिती वाटते काय म्हणतील ते? मदत करतील की नाही? रियाच्या किती चुका पोटात घालतील ते",.. शरद राव

मामा शहरात जायची तयारी करत होते,... "मी टिनाला घेवून जातो तिकडे, तिला माहिती आहे कुठे रहातो तो मुलगा, काही तरी माहिती मिळेल तिकडे, तुम्ही लोक इथे शोधा तिला",

रोहितचा फोन आला,.." बोला काका काय झालं? ",

" रिया घरातून निघून गेली ",.. शरद राव

" काय.... अशी कशी निघून गेली? काय झाल नक्की?, तुम्ही मला सांगितल का नाही आधी ",.. रोहित

"सकाळ पर्यंत ठीक होत सगळ, आज इथे मेहंदीचा प्रोग्राम होता, सगळे त्यात बिझी होते, समजल नाही काही, ती मागच्या दारातून निघून गेली ",.. शरद राव

" ठीक आहे... केव्हा गेली ती ",.. रोहित

" आता अर्धा तास झाला",.. शरद राव

" तुम्ही प्लीज मदत करणार का रोहित रियाला शोधायला",.. शरद राव

रोहित खूप चिडला होता,.. "मला तुम्ही यात घेवू नका आता काका, काय चाललय हे? तुम्ही आग्रह केला म्हणून मी रियाला होकार दिला, दोन दिवसावर लग्न आल, सगळी तयारी झाली होती , माझ्या घरचे किती खुश आहेत, आता काय सांगणार मी त्यांना की नवरी पळून गेली लग्नातून अस? , तुम्ही या पुढे मला फोन करू नका, तुम्ही मुलगी आणि तुम्ही या पुढे काहीही करा, मला काही सांगू नका " ,

"मदत करा आम्हाला रोहित, रिया संकटात आहे, तुमच्या ओळखी आहेत, ऐका मदत करा , तुमची माफी मागतो मी ",.. शरद राव

" तुम्ही कशाला मागतात माफी? , काय केल आहे तुम्ही? , मला तुमचा त्रास समजतो, रियाला नाही समजत का हे, कस वागते ती ",.. रोहित

" नाही ना तिला एवढ समजल असत तर काय झाल असत, मला मदत करा रोहित ",.. शरद राव

" ते शक्य नाही काका, तुम्ही मला आता काहीही सांगू नका",.. रोहित ने फोन ठेवून दिला, तो डोक धरून बसला होता , काय झालं हे? का अशी वागते ही रिया? अजिबात आवडल नाही मला हे , मी त्या रियाला सोडणार नाही , तो कोण तीच मित्र तो कसा आला गावत? , काय आहे हे, त्या दिवशी लग्न करून घ्यायला हव होत मी रियूशी, आठ दिवस का दिले तिला मी, आता काय माहिती कुठे असेल ती?, परत सापडेल की नाही ही रियु? , तो मुलगा काही करणार तर नाही ना तिला, काय करू मी, इतका राग येतो ना, रिया शी नीट शब्दात बोलायला नको होत मी, तिला चांगली भाषा चांगले लोक समजत नाही, भेटू दे अशी शिक्षा करेन मी तिला, मला विचारल्या शिवाय घराच्या बाहेर पाउल टाकणार नाही ती, आणि तो तिचा मित्र त्याला सोडणार नाही मी माझ्याशी गाठ आहे,

रोहित ने पटापट फोन फिरवले, रिया ची माहिती दिली पोलिस स्टेशन मध्ये , पटापट रस्ते ब्लॉक करा इंस्पेक्टर साहेब एक ही गाडी न बघता पुढे गेली तर बघा, मला मिनटा मिनिटाचा रीपोर्ट हवा, रिया या गावा बाहेर नको जायला, कामात हयगय नको मला, नाही तर माझ्याहून कोणी वाईट नाही,

अभिजीत त्याच्या मॅनेजर ही मित्र ही आत आला, "अभिजित हा रिया चा फोटो, लोक पाठव सगळीकडे शोधायला, बारीक, ड्रेस घातलेला, सुंदर मुलगी ",..

"काय झालं नक्की रोहित",.. अभिजीत

"हिला बघायला गेलो होतो मी माझ लग्न होत हिच्याशी",.. रोहित

"मग आता ",.. अभिजीत

"पळून गेली ही",.. रोहित

"कोणासोबत म्हणजे सॉरी",.. अभिजीत

"कशाला टेंशन घेतो, अरे तीच प्रेम आहे एका वर, पण तो मुलगा चांगला नाही, हिला माहिती नाही ते, शोधा हिला मला हवी आहे ही",.. रोहित

ठीक आहे..

आता मी आहे आणि ती रिया आहे, नाही तिला शोधून तिच्याशी लग्न केल तर बघ म्हणा , रोज रडेल ती, एवढा त्रास देईल मी तिला, पळून जायची हौस आहे का, हे गाव माझ आहे माझ्या मना विरूद्ध इथून कोणी बाहेर जात नाही, हे माहिती नसेल रियुला ,

शहरातील पोलिस, गावाचे पोलिस कामाला लागले, सगळीकडे रियाचे फोटो पाठवून दिले,

कुठे पर्यंत गेली असेल रिया, तो मुलगा कुठे रहातो, ती नक्की त्याच्या घरी जायचा मूर्खपणा करणार नाही, शहरात जात नाही तो पर्यंत सेफ आहे ती, मूर्ख मुलगी आहे, त्याने परत पोलिस स्टेशन मध्ये फोन लावला

" सुरू झाल का काम इन्स्पेक्टर साहेब",.. रोहित

"हो साहेब केले रस्ते ब्लॉक, सुरू आहे शोध आता पर्यंत मॅडम इथून गेल्या नाही, पोलिस चार तासापासून इथे आहेत",.. इंस्पेक्टर

"ठीक आहे म्हणजे गावात आहे रियु, एकदा सापडू दे मग माझ्याशी गाठ आहे" ,.. रोहित प्रचंड चिडला होता, त्याने हातातला पेपर वेट समोर खिडकीवर फेकून मारला, मोठा आवाज झाला, सगळीकडे काचा झाल्या, काम करणारे काका पळत आले, रोहित ने त्यांना हाताने जायला सांगितल

रोहितने शरद रावांना फोन केला,.." रिया चे फोटो शहरातल्या पोलिसांकडे आणि गावातल्या पोलिसांकडे दिले आहेत, ते तपास करत आहेत, हाय वे वर पण पोलीस उभे आहेत, तुम्ही काळजी करू नका, सापडेल रिया, तुम्ही तब्येत सांभाळा, काही लागला तर मला केव्हाही कॉल करा",

शरद राव रडत होते,

"काका काळजी करू नका",.. रोहित

" मामा शहरात जात आहे टिनाला घेऊन",.. शरद राव

" नका असं नका करू, काही उपयोग होणार नाही रिया शहरात जायचा मूर्खपणा लगेच करणार नाही, ती त्याच गावात आहे, त्या मुलाचा आहे का फोन नंबर द्या मला",..

तो नंबर टिनाला माहिती होता तिने तो नंबर सांगितला तो नंबर रोहित ने पोलिसांना दिला दोघांचे नंबर स्विच ऑफ़ येत होते

" दोघ नंबर सारखे ट्रेस करा ",.. रोहित ने पोलिसांनी सूचना दिल्या

एक दिवस होऊन गेला तरी रीयाचा पत्ता लागला नाही

ती आणि विशाल त्या घरात लपुन बसले होते, चुकलं आपलं तेव्हा लगेच गावा बाहेर पडता आल असत, आता किती पोलिस बंदोबस्त आहे इथे, दोन तीन वेळा विशाल हाय वे पर्यंत जावून आला होता,

रिया खूप घाबरलेली होती, रोहित नक्की मला सोडणार नाही, विशालला हे समजत नाही किती डेंजर आहे तो, त्याच माझ्यावर प्रेम आहे, श्रीमंत आहे तो ओळखी खूप, तो नक्की मला शोधत असेल, रिया तिच्या हाता कडे बघत होती, मेहंदी खूप रंगली होती, रोहितच नाव होत तिच्या हातावर,

"विशाल आपण कधी करणार लग्न? इथून कधी जाणार? तु एकटा त्या खोलीत राहतो मला तिकडे येवू देत नाही काय चाललय" ,... रिया

"रिया आपण जावू एक दोन दिवसात इथून धीर धर",.. विशाल

अशी वाट बघत राहिलो तर रोहित तो पर्यंत मला घेवून जाईल इथून, काय करू मी? विशालला समजत नाही काही, रोहित च्या हातात सापडली मी तर काही खरं नाही माझ, किती जोरात हात धरला होता त्याने माझा, तो काहीही करू शकतो कश्याला घाबरत नाही तो, मी त्याच्या समोर पाच मिनिट बोलू शकत नाही, मला इथून जायच आहे, रिया रोहितच्या विचाराने घाबरली होती

रोहित कडे लग्नाची तयारी जोरात सुरू होती, रोहित बाहेरून आला, शारदा ताई त्याला हाक मारत होत्या तो काहीही न बोलता रूम मध्ये निघून गेला, एकदम गप्प गप्प वाटत होता तो,

हॉटेल मधुन फोन आला, अण्णांनी फोन उचलला,.. "बूकिंग कॅन्सल केल ते कन्फर्म आहे का सर",..

"नाही, कोणी केल कॅन्सल",.. अण्णा

"रोहित साहेबांनी कॅन्सल केल",..

"मी करतो तुम्हाला 10 मिनिटात फोन",.. अण्णा

रोहित त्याच्या रूम मध्ये बसला होता, त्याने इंस्पेक्टर साहेबांना फोन लावला

पिंकी आत आली, ती मजा करायच्या मूड मध्ये होती, रोहित फोन वर बोलत होता, तो एकदम गप्प बसला, ती त्याच्या जवळ आली,.. काय झालं आहे दादा?

"पिंकी तू जा इथून ",.. रोहित

" काय झालं दादा? काही टेंशन आहे का? तू पोलिसांना का फोन केला" ,... पिंकी

"पिंकी मला महत्वाच काम आहे समजत नाही का जा इथून",.. रोहित

पिंकीने जाऊन शारदा ताईंना बोलावून आणलं, अण्णा काळजीत होते, ते आले सोबत

" काय झालं आहे रोहित?",.. शारदा ताई

रोहित गप्पच होता

"काही प्रॉब्लेम आहे का",.. तोपर्यंत आजी पण वरती आली

" काय झालं आहे रोहित?, पोलिसांना का फोन केला, हॉटेल बूकिंग का कॅन्सल केल तू ",.. अण्णा जोरजोरात विचारत होते

" काय होणार आहे.. काही झालं नाही झाल, लग्न कॅन्सल झाल, रिया घरातुन पळून गेली, तिला हे लग्न करायचं नव्हतं",... रोहित

"कोणा बरोबर पळून गेली ती? म्हणजे काय? बापरे त्या दिवशी होकार दिला होता ना तिने तुला",.. अण्णा

"तिच्या मित्राबरोबर पळून गेली ",.. रोहित

"बाप रे काय प्रकार आहे हा? काही समजतं का या मुलीला, कधी पासून सुरू होत हे, दिसायला फार सुंदर आहे ती मुलगी आणि हे असं वागते, त्या लोकांनी आपल्या पासुन हे प्रेम प्रकरण लपवून ठेवल ",... शारदा ताई

" नाही लपवल, नाही मला माहिती होत त्यांनी सांगितल होत, तो मुलगा रियाला फसवतो आहे, ती जाळ्यात सापडली आहे",.. रोहित

रोहित सगळ सांगत होता, घरचे शॉक मध्ये होते,... आता काय पुढे रोहित?

" मी मदत करतो आहे त्या लोकांना तिला शोधायला",.. रोहित

" ती सापडली तर? काय ठरवल आहे तू रोहित ",.. अण्णा

" मी करणार आहे तिच्याशी लग्न, तुम्हाला काही अडचण नाही ना आई अण्णा",.. रोहित

" ते काही बोलले नाही" ,...

" पण कश्यावरुन ती परत पळून जाणार नाही रोहित, काय मुलगी आहे ही, तीच तुझ्यावर प्रेम नाही तर कश्याला मागे लागतोस",.. अण्णा

"मी नाही जावू देणार तिला, मला तिच्याशी लग्न करायच आहे ",.. रोहित

"ठीक आहे तू बघ काय करायच ते" ,... अण्णा

शारदा ताईंना राग आलेला होता, "रिया च हे प्रेम प्रकरण तुला हे माहिती होत रोहित आधी? ",..

"हो तिच्या वडलांनी सांगितल मला सगळ त्या दिवशी ",.. रोहित

" तरी का होकार दिला तू तिला?, आम्हाला का नाही सांगितल, बघितल का हो कसे करतात हे लोक, आता पासून आपल्या मुलाला त्यांच्या बाजूला घेवून सगळ सांगून त्याच्या होकार घेवून मोकळे झाले हे लोक, आणि आपल्याला या गोष्टीचा पत्ता नाही, तू ही आम्हाला काही सांगितल नाही रोहित हे ठीक केल का तू? ",.. शारदा ताई

" आई ऐक ना, अस काही नाही, मला रिया शी लग्न करायच आहे, आणि ती संकटात आहे, तिचे वडील मला रिक्वेस्ट करत होते, मला नाही म्हणता आल नाही ",.. रोहित

" कुठे कुठे फिरली ती त्या मुला सोबत, काय काय केल असेल काय माहिती? आता तर काय पळून गेली, तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधली त्या पोरीने, जगात काय बाकीच्या मुली नाहीत का रोहित? हे लग्न आता होणार नाही, अशी पोरगी या घरची सून होणार नाही",.. शारदा ताई

"आई नको ना अस करु, अग खरच चांगली मुलगी आहे ती, संकटात आहे ती, अग तिचे वडील खूप टेंशन घेतात, आणि तुला वाटतय अस काही नाही तीच, समजावेन मी तिला ",.. रोहित

" काही गरज नाही त्याची, माझ ठरलं आहे, ती पोरगी आता या घरची सून होणार नाही, रहा बाई म्हणा जिथे रहायच तिथे, कोणा ही सोबत रहा, पळून जा, आपल्याला काही घेण नाही तिच्याशी, तीच तोंड बघायच नाही मला",... शारदा ताई खाली चाललय गेल्या,

" अण्णा सांगा ना आईला, रिया चांगली आहे हो, मी तिच्याशी लग्न करणार आहे",.. रोहित

"तू तुझ बघ काय करायच ते मी येतो ",.. अण्णा

आजी पिंकी रोहित जवळ होत्या,.. दादा सांभाळ स्वतःला, त्या खाली आल्या

" उगीच सांगितल या लोकांना, काय करू मी? ",.. रोहित ने परत इंस्पेक्टर साहेबांनी फोन लावला

" काय चाललय काही समजल का? ",..

" हाय वे वर पूर्ण गस्त आहे, इथून नाही गेले ते दोघ गावत आहेत अजून",..

"घर न घर शोधा, जरा लवकर करा, किती पैसे लागताय ते सांगा, मला उद्या पर्यंत रिजल्ट हवा आहे",.. रोहित

हो साहेब..

"फोन ट्रेस झाले का त्यांचे",.. रोहित

नाही स्विच ऑफ़ आहेत..

" नविन कोणी भाडे करु आले का ते बघा कोणा कडे ",... रोहित

रोहित मामाच्या घराजवळ आला, शरद राव मामा बाहेर आले..... आत या रोहित

" नाही मी ठीक आहे इथे, काही समजल का",... रोहित

"नाही काही नाही",.. शरद राव

" एक काम करा गाव लहान आहे, सगळीकडे शोध सुरू करा लगेच, ओळखीच्या दोन चार लोकांना घ्या, गुपचूप करा हे काम, हॉटेल मध्ये चौकशी करा, ओळखीच्या लोकांना विचार",.. रोहित

सगळे कामात होते, काहीही पत्ता लागत नव्हता, रोहित इन्स्पेक्टर साहेबां बरोबर बोलत होता,... "गावातल्या केबल टीव्ही वर फोटो पाठवा आता, पत्ता सांगितला तर एक लाख रुपये मिळतील अस सांगा",

सगळी कडे रियाचे फोटो दिसत होते गावात, हॉटेल वर काम करणारा मुलाने ते फोटो बघितले , मी बघितल या मुलीला त्याने पोलिसांना फोन केला, पोलिसांनी रोहित ला कळवल,

विशाल रिया घरात होते, मी थोड्या वेळ बाहेर जावुन येतो, जेवण घेवून येतो, बघतो पोलिस दिसता आहेत का हाय वे

लवकर ये विशाल... रिया काळजीत होती, तिने दार नीट लावून घेतल, कधी जाणार आहोत आम्ही इथून, मामा च घर बाजूच्या गल्लीत आहे, ते लोक शोधत असतिल मला, काय करू काय प्रॉब्लेम आहे हा, मला वाटल सहज पळून जावू आपण, इथे अजून अडकली मी, सापडली तर हे लोक रोहित शी माझ लग्न करतील, विशाल कधीच दिसणार नाही नंतर मला, कठिण आहे परिस्थिती.

विशाल ला बाहेर कोणी ओळखत नव्हत, तो दोन तीन दा हाय वे पर्यंत जावून बघून आला, पोलिस उभे होते, चेकिंग सुरू होत, एक ही रस्ता सोडला नव्हता त्यांनी, घरात गप्प बसव लागेल थोडे दिवस....

🎭 Series Post

View all