हे प्रेम आहे की काय?... भाग 12

रिया काळजी करू नकोस, वेड्या सारखं डिसिजन घेवू नको, विश्वास ठेव माझ्यावर आपण खूप खुश राहू सोबत, तुझ्या वडलांची तीच इच्छा आहे आपल लग्न व्हाव अस


हे प्रेम आहे की काय?... भाग 12

©️®️शिल्पा सुतार
........

पोहे चहा झाला, अण्णा शरद राव छान बोलत होते, रोहित पिंकी कडे बघत होता, पिंकी उठली,.. "आई अण्णा.. दादा आणि रियाला बोलू द्या थोड, त्यांना समजल पाहिजे एकमेकां बद्दल" ,

"हो रिया जा बेटा रोहितशी बोलायला" ,... शारदा ताई

मामांना हे आवडल नव्हत पण मुला कडचे बोलले त्या मुळे त्यांच्या नाईलाज झाला, पिंकी रोहित सोबत निघाली, टीना रिया सोबत होत्या , ते वरच्या रूम मध्ये आले

रोहित समोर बसला, रिया उभी होती,

" बस वहिनी",.. पिंकी बोलली, तस रिया चिडली,

" I am sorry रिया, पिंकी तू जा खाली" ,.. रोहित

पिंकी जायला तयार नव्हती, पिंकी जा.. रोहित खुणावत होता, पिंकी उठली,.. "मी बाजूच्या खोलीत आहे दादा",... टिना गेली बाहेर

रोहित रिया कडे बघत होता, फोटो पेक्षा अशी अजुन सुंदर दिसते आहे ही ,पण खूप घाबरलेली आहे, का अस? , ती गप्प खाली बघत होती

" काय झालं आहे रियु, काही प्रॉब्लेम आहे का?",.. रोहित

नाही.. रिया ने मानेने सांगितल

"मला वाटल तू बोलकी असशील, तू एकदम गप्प निघाली, मला खूप बोलायला लागत" ,... रोहित

"झाली का परीक्षा तुझी, कधी आहे रिजल्ट? पुढे शिकायच आहे का तुला?",.. रोहित

रिया काही बोलली नाही

" स्वयंपाक येतो का तुला? तुझी आवड काय काय आहे ",.. रोहित

एकाही प्रश्‍नाच उत्तर रियाने दिल नाही

रोहित तिच्या कडे बघत होता,

" काय झालं आहे? नाही येत का स्वयंपाक, काही हरकत नाही, आपल्याकडे कूक आहे",.. रोहित

रिया इकडे तिकडे बघत होती, ती बैचेन झाली होती

" काही बोलायच आहे का?",.. रोहित

हो... मानेने रिया बोलली

" सांग मला जे असेल ते मनात मी कोणाला सांगणार नाही",.. रोहित

"पण मी जे बोलेल ते तुम्ही माझ्या घरच्यांना सांगितल तर माझ काही खरं नाही",.. रिया

"मी नाही सांगणार कोणाला, काय झाल?",.. रोहित

"मला हे लग्न नाही करायच, माझ दुसर्‍या मुलावर प्रेम आहे, घरचे धमकी देता आहेत, मला मारतील ते",... रिया

रोहितला धक्का बसला, त्याला समजत नव्हत रिया काय बोलते आहे ते , हे शक्य नाही, माझ प्रेम आहे हिच्यावर, ही माझी आहे, मला हीच बायको हवी, त्याला राग आला होता, कोण आहे तो मुलगा? सोडणार नाही मी त्याला,

" तुम्ही ऐकताय ना मी काय सांगते ते ",.. रिया

हो बोल..

"मला दुसरा मुलगा आवडतो",.. रिया

"मग तू इथे काय करतेस माझ्या समोर? , आधीच नकार का नाही दिला, हे तुझ प्रेम प्रकरण मला सांगण्या पेक्षा तुझ्या आई बाबांना सांग , हा दाखवायचा कार्यक्रम का केला मग तू",.. रोहित चिडला होता

"घरचे ऐकत नाही, मला खूप धमकी दिली त्यांनी, मी सांगितल होत त्यांना, तुम्ही मला नकार द्या",.. रिया

" मला शक्य नाही ते",.. रोहित

" का अस करताय तुम्ही? ",.. रिया

" कारण माझ तुझ्यावर... रोहित गप्प बसला,.. माझे घरचे खूप आनंदात आहेत ते दुखी होतील ",. रोहित

" माझ मन नाही या लग्नात",.. रिया

"याला काय अर्थ आहे, का करते तू अस ",.. रोहित

" प्लीज मला मदत करा ",.. रिया

" ठीक आहे पण हे तु आधीच घरी बोलायला हव होत रिया, मी नकार देतो तुला, कारण काय सांगू ",.. रोहित

" काहीही सांगा की आमचे विचार जुळले नाही ",..रिया

" तु एकदा नीट विचार कर रिया ",... रोहित

" माझ ठरल आहे मला हे लग्न नाही करायच ",.. रिया

रिया उठून बाहेर निघून गेली

रोहित एकदम गप्प झाला, काय करू आता मी? , तो तिथे बसुन होता, डोळ्यात एकदम पाणी आल त्याच्या, मला रिया हवी आहे, पण ती दुसर्‍या वर प्रेम करते, कोण आहे तो मुलगा, दोन मिनिटात त्याला शोधेल मी, बरबाद करेन, जावू दे, पण हे लोक का अस करता आहेत? तो विचार करत होता, तो खाली जायला निघाला, शरद राव आत आले, रोहित उठून उभा राहिला,

"झाल का बोलण? पसंत आहे का रिया?" ,.. शरद राव

"तुम्ही एकदा रिया शी बोलून घ्या" ,.. रोहित

शरद राव समजून गेले काय झालं असेल इथे ते... "तुम्ही लग्नाला होकार द्या रोहित",..

काय?..

"प्लीज तुम्ही लग्नाला होकार द्या आणि रिया ला घेवून जा इथून ",.. शरद राव

"नाही तुमची मुलगी दुसर्‍या मुलावर प्रेम करते, तुम्ही तीच तिच्या मनाप्रमाणे लग्न लावून द्या ",.. रोहित

शरद राव एकदम दार लोटून घेतल

"काय करताय तुम्ही? ",.. रोहित

" मला बोलायच आहे तुमच्याशी, मग तुम्ही ठरवा होकार द्यायचा की नकार",.. शरद राव थरथर कापत होते

" काका तुम्ही बसा आधी पाणी घ्या हे ",.. रोहित

सावकाश बोला...

शरद रावांनी रोहितला सगळ सांगितल विशाल बद्दल,.. "कसं विशाल फसवतो आहे रिया ला, किती धोका आहे त्याच्या पासून, कितीही सांगितलं तरी रिया ऐकत नाही, तिच्या डोळ्यावर विशाल च्या प्रेमाची पट्टी आहे, ती सेफ राहावी म्हणून बळजबरीने तिचं लग्न करावं लागतं आहे, तुम्ही रिया शी लग्न करा तिला वाचवा ",..

" पण हे असं ठीक आहे का? तुम्हाला वाटत आहे का काका असं बळजबरी लग्न करून रिया मला होकार देईल, तुम्ही रियाला नीट समजावून सांगा त्या मुलाबद्दल",.. रोहित

" सगळ्यांनी समजून सांगितलं, उपयोग नाही, तिला तुमच्यासारखाच डॅशिंग चांगला नवरा हवा जो तीला सांभाळू शकेल आणि विशाल पासून तिचं रक्षण करू शकेल, तुम्ही माझ्यावर दया करा, रीयाचा स्वीकार करा लग्नाला होकार द्या ",.. शरद राव

ते रडायला लागले एकदम त्यांनी रोहितला हात जोडले

"काका काय करता आहात काका, काका तुम्ही मोठे आहात हात नका जोडू" ,.. रोहितला समजत नव्हतं काय करावं

"तुम्ही आधी होकार द्या त्याशिवाय मी ऐकणार नाही",... शरद राव

" ठीक आहे मी करतो लग्न रिया शी",.. रोहित

वचन द्या..

"हो मी वचन देतो तुम्हाला.. रियाला कधी अंतर देणार नाही, कुठल्याही परिस्थितीत मी तिचा रक्षण करेन, पण रिया मला स्विकारेल का",.. रोहित

"हो ती भोळी आहे थोडा वेळ लागेल, पण नीट संसार करेल ती ",.. शरद राव

रोहितला काहीच सुचत नव्हतं, एकीकडे रिया ही त्याला आवडत होती, दुसरीकडे विशालच्या सोबत प्रेम प्रकरण समजलं होतं, नक्की काय आहे हे?, रिया आणि विशाल कितपत जवळ आले आहेत?, माझ्या माहितीप्रमाणे हे अशी गुंड मुलं मुलींना विकणार असतील तर तिला हात लावत नाहीत, मी हा काय विचार करतो आहे , रिया ला मी मनापासून आपलं मानलं आहे आता जे होईल ते होईल मी रिया शी लग्न करेल",..

"आपण या आठवडय़ात करू लग्न",.. शरद राव

ठीक आहे

रोहित खाली आला तो त्याच्या आई अण्णांशी बोलत होता

रिया रूम मध्ये बसली होती, बर झालं सांगितल त्या मुलाला मी विशाल बद्दल , आता तो नकार देईल , उद्या आम्ही घरी जावू, परवा विशाल सोबत मी निघून जाईन, ही साडी ही ना, कंटाळा आला आहे, मामा ही किती रागवतो आहे मला कालपासून, आज जर हे पाहुणे आले नसते तर त्याने मला कालच फटके मारले असते, मी आता परत मामाच्या घरी येणार नाही, मी त्याच्याशी बोलणार नाही,

रियाला खाली बोलवलं, आता काय आहे, जाता आहेत तर जाव ना त्या लोकांनी पटकन, तो मुलगा कसा बघतो आहे माझ्याकडे केव्हाचा , मला अजिबात आवडल नाही, मला नाही जायच खाली, भीती वाटते आहे त्याची

रिया चल लवकर

तिने साडी नीट केली, ती टीना सोबत खाली गेली, सगळे हॉल मध्ये बसले होते बोलत होते, रोहित गप्प होता, रिया समोर बसली होती

"तुम्हाला मुलगी पसंत आहे का?",.. मामा रोहितला विचारात होते

रोहित रिया कडे बघत होता, ती खाली बघत होती, शरद राव आशेने रोहित कडे बघत होते, आता कुठल्या क्षणी रोहित नकार देईल आणि आपली इथून सुटका होईल म्हणून रिया खुश होती

"हो मला रिया पसंत आहे" ,.. रोहित

रिया आश्चर्याने रोहित कडे बघत होती, सगळ्यांना आनंद झाला होता

मामा रिया कडे आले, रियाला घेवून ते रोहित जवळ आले, तिला त्याच्या जवळ बसवल

"रिया ला रोहित पसंत आहे का पण?",.. शारदा ताई विचारात होत्या

सगळे गप्प झाले, मामा, शरद राव, रोहित रिया कडे बघत होते

रिया बोल बेटा

मामा रिया जवळ गेले,.. "रिया बोल पटकन मला सांग" ,

रिया गप्प..

"रिया काय विचारताय सगळे" ,.. ती लाजते आहे,

रिया शरद राव कडे बघत होती, त्यांच्या चेहर्‍यावर टेंशन होत, त्यांना घाम आला होता, बाबा...

रिया मानेने हो बोलली,.. "चला ठीक आहे आता, दोघांची पसंती झाली महत्वाची",

"लगेच मुहूर्त आहे लग्नाचा येत्या पंधरा दिवसात ",.. मामा सगळ्यांशी बोलत होते

रोहितने मामांना थांबवलं,.." नाही मला एका आठवडय़ात लग्न करायचा आहे, नंतर मला थोडे ऑफिसचे काम आहे",..

रोहित बोलत होता, रिया त्याच्याकडे रागाने बघत होती, लगेच एका आठवड्यात लग्न मला अजिबात मान्य नाही, हा मुलगा का अस करतो आहे ? मी एवढं सांगितलं तरी त्याने कस काय होकार दिला? हा का अस करतो आहे? मुद्दाम लग्न करतो माझ्याशी, काहीतरी गडबड आहे,

" तुमच्या काही मागण्या असतिल तर सांगा ",.. मामा

" काही नाही आमच्या मुलाने लग्नाला होकार दिला हेच खूप आहे, मग ठरलं ना",.. शारदा ताई

"हो,...

" थोड साखरपुडा सारखं कार्यक्रम करून घेवू आपण ",.. शारदा ताई अण्णांकडे बघत होत्या

शारदा ताईंनी अंगठी रोहित कडे दिली, त्या तयारीनेच आल्या होत्या, रोहित अंगठी घालायला थांबला होता, रिया गप्प होती ती हात पुढे करत नव्हती,

मला नाही करायचं आहे लग्न काय करू? हा मुलगा किती मूर्ख आहे, कशाला होकार दिला,

सगळ्यांना वाटल रिया लाजते आहे, पिंकीने तिचा हात पुढे केला, रोहितने तिच्या बोटात अंगठी घातली

मामांनी रिया कडे अंगठी दिली, रिया घेत नव्हती, त्यांनी रागाने बघितल, रियाने अंगठी रोहितच्या बोटात घातली, रोहित रिया कडे बघत होता, रिया एकदम रडवेली झाली होती, पेढे वाटले, दोघ पाया पडायला वाकले, रिया आत निघून येत होती पण रोहित ने तिला जाऊ दिलं नाही, त्याने तिचा हात धरून ठेवला, एवढ्या गर्दीत ती काही बोलू शकत नव्हती, तिने खूप हात सोडायचा प्रयत्न केला, पण ते शक्य नव्हत रोहित ची स्ट्रॉंग पकड तिच्याभोवती झाली होती, आता यातून रिया सुटणं शक्य नव्हतं, तिला रोहित सोबत थांबव लागल,

"मला फ्रेश वाहायच आहे",.. रोहित ला माहिती होत रिया सोबत येईल आत, तिच्याशी बोलता येईल थोड

"रिया आत ने रोहित रावांना",.. रोहित रिया सोबत आत आला

रिया ने रागाने हात सोडवून घेतला, ती बाजूला जाऊन उभी राहिली, हात खूप दुखत होता, ती दुसऱ्या हाताने तिचा हात दाबत होती, रोहित तिच्या मागे आला, रिया दचकली, ती अजून मागे सरकली, रोहित हसून तिच्याकडे बघत होता, किती घाबरतेस तू, मी काय करणार आहे तुला?, मोकळ रहा, तू आज छान दिसतेस रियु

" तुम्ही होकार का दिला लग्नाला?, मला हे लग्न नाही करायच मी आधी सांगितलं होतं ना तुम्हाला ",.. रिया

"चिडू नको बापरे जोरात ही बोलता येत तुला रियु",.. रोहित

"शट अप मला हे लग्न मान्य नाही, तुम्ही माझ्या कडे अस बघु नका, आधी आता खाली जावून नकार द्या",.. रिया

"अस बघु नका म्हणजे कस रियु? , नको चिडूस, आज आपल लग्न ठरलं ना, तुला नकार देण शक्य नाही, काहीही झाल तरी मला तुझ्याशी लग्न करायच आहे रियु, आणि तू ही मला होकार दिला की ",.. रोहित

" ते मला खाली काही बोलता आल नाही सगळ्यां समोर , का करताय तुम्ही अस?, या पुढे मला हात लावला तर बघा ",... रिया अजून हाता कडे बघत होती

रोहित रिया कडे बघत होता,.." हात दुखतोय का? ",.

रिया काही बोलली नाही

" माझ प्रेम आहे तुझ्यावर रिया, खरं सांगतो आहे, मला तुझ्याशी लग्न करायच आहे ",.. रोहित तिच्या कडे येत होता

रिया एकदम गोंधळली, आपण आज पहिल्यांदाच भेटलो आहोत कधी झाल हे प्रेम? काहीही बोलू नका, ती खाली जात होती, रोहित ने तिला अडवल,.. "रियु प्लीज सोड ना सगळ, हो बोल, मी खूप सुखात ठेवेल तुला ",.

" मला जावू द्या, मला नाही करायच हे लग्न",.. रिया

" ठीक आहे मग मामां ना बोलवू का मी, सांगू का तू काय म्हणतेस ",.. रोहित ने बघितल होत मामा रियाला सारख रागवत होते

"नको प्लीज, तुम्ही नकार द्या ना, मी रिक्वेस्ट करते",.. रिया

"मला तू पसंत आहे रियु मला काही प्रॉब्लेम नाही लग्न करायला ",.. रोहित

" तुमच्या होकार मुळे किती गोंधळ झाला आहे, काय करू मी",.. रिया रडत होती, तुम्ही बाजूला सरका मला जावू द्या ,

रोहित एकदम घाबरला तो रुमाल कुठे आहे ते बघत होता,..." मोठे काय सांगता ते ऐकायच असत रियु, त्यात आपल चांगल असत, हाच विचार कर तू, तुझ चांगल झालेल हव आहे तुझ्या घरच्यांना, मला होकार दे रियु, सुखाने संसार करू आपण",..

" नाही मला अजिबात लग्न करायचं नाही हे मला घरी जायचं आहे",.. रिया

"प्लीज रियु... माझ्या सोबत तुझ आयुष्य छान असेल, विचार कर, तू म्हणशील तस करेन मी",... रोहित

नाही...

पिंकी आत आली, तिने बघितल रिया रडत होती, रोहित तिच्या जवळ उभ राहून तिच्याशी बोलत होता,...." काय चाललय हे? वहिनी काय झालं? दादा काय केल तू हिला? का रडतेस वहिनी? ",

" गप्प बस लाऊड स्पीकर, तू जा बर इथून, मी काय केल म्हणजे काय? डोक आहे का तुला पिंकी, आताशी लग्न जमल आमच, इथे ही होकार देत नाही काय करणार आहे मी हिला, तिला सासरी जायच या विचाराने रडू येत",.. रोहित

" आई बोलवते आहे खाली, दादा चल लवकर, वहिनी तू काळजी करू नकोस, आमचा दादा कंटाळा येइ पर्यंत तुझ्या मागे मागे करेन, तुझ्यावर खूप प्रेम करेन तो",... पिंकी

" पुरे पिंकी तू जा बर इथून ",.. रोहित

" रिया काळजी करू नकोस, वेड्या सारखं डिसिजन घेवू नको, विश्वास ठेव माझ्यावर आपण खूप खुश राहू सोबत, तुझ्या वडलांची तीच इच्छा आहे आपल लग्न व्हाव अस, हा माझा फोन नंबर, मला फोन कर, तुझा नंबर आहे माझ्या कडे ",.. रोहित

रिया काही बोलली नाही

रोहित रिया खाली आले

सगळे निघाले, रोहित शरद रावांना येवून भेटला

" तुमचे खूप उपकार झाले ",.. शरद राव

काहीही काय काका,... त्याने त्यांच्या पाया पडल्या, बाबांनी एकदम त्याला मिठी मारली,

" काळजी घ्या रियाची अजून आठ दिवस आहेत, अजिबात एकट सोडू नका तिला, तिच्या मनात अजूनही तो मुलगा आहे",... रोहित

"हो बघतो मी",.. शरद राव

" बोलू नका काही तिला",.. रोहित

ठीक आहे..

रोहित गाडीत बसला, तो रिया कडे बघत होता, रिया पुढे जात नव्हती, बाबा रिया ला घेवून आले,... येतो मी रिया, सगळे रोहित काय बोलतो तिकडे बघत होते, रिया गप्प होती...


🎭 Series Post

View all