हे प्रेम आहे की काय?... भाग 11

मामा ओळख करून देत होते, रिया त्यांच्या पाया पडत होती, ती रोहित च्या आजी आई जवळ बसली होती, आई तिच्याशी बोलत होती, पिंकी रोहित कडे बघत होती, डोळ्याने विचारात होती कशी आहे रिया, रोहित लाजलाहे प्रेम आहे की काय?... भाग 11

©️®️शिल्पा सुतार
........

टीना रिया सुरेखाताई या लग्न घरी पोहचल्या, खूप मजा येत होती लग्नात, बरं झालं आपण इकडे आलो, खुपच छान वाटत आहे, लग्न धामधुमीत पार पडलं, शरद राव लग्नाला आले होते, आजी आली होती, ते लग्नाच्या दिवशी परस्पर कार्यालयात आले होते, त्यानंतर एक-दोन दिवस ते थांबणार होते कारण त्यांना रोहितला भेटायचं होतं, रविवारचा कार्यक्रम ठरला आहे बघायचा हे फक्त शरद राव आणि सुरेखाताई यांनाच माहिती होत, रियाला वाटत होतं की आता आपण एक दोन दिवसात घरी जाऊ

सगळे लग्नाच्या ठिकाणाहून मामांच्या घरी परत आले, रिया विशालला फोन लावून बघत होती, फोनच लागत नव्हता, इथे रेंज नसते गावाकडे असं तिला वाटलं, नंतर थोडं फिरायला गेलं की बघू बाहेर जाऊन फोन लावु

शरद रावांनी मामाला सगळं सांगितलं रिया बद्दल,... "आपल्याला हे लग्न करायच आहे काहीही झाल तरी",

" तुम्ही काळजी करू नका, आपण रिया चं लगेच लग्न करून टाकू, तिला आता तुम्ही इथून घेऊन जाऊ नका, मी आहे तुमच्या सोबत",.. मामा

"ती ऐकत नाही खूप हट्टी आहे",.. शरद राव

"आपण दोन हट्टी आहोत मग, तिचं चांगलंच करून सोडू" ,.... मामा

हो..

"अजून तिला माहिती नाही ना उद्या पाहुणे येणार आहेत ते",.. मामा

" नाही तिला नाही माहिती, कस काय सांगावं समजत नाही ",.. शरद राव

" हे सांगावं लागेल उगाच उद्या पाहुण्यांसमोर गोंधळ नको" ,.. मामा

"काय करू मी",.. शरद राव

" तुम्ही बोलून बघा तिच्याशी आता ",.. मामा

रिया बाहेर बसलेल्या होती, शरद राव तिच्या जवळ जाऊन बसले,.." रिया मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे",..

"बोला ना बाबा",.. रिया

"मी जे सांगतो ते तुझ्या फायद्याच आहे, ऐकणार का तू माझ",.. शरद राव

"काय झालं आहे बाबा",.. रिया

" मामाच्या ओळखीचा एक मुलगा आहे लग्नाचा, तो उद्या इथे तुला बघायला येणार आहे",.. शरद राव

रियाला धक्का बसला, काय बोलता आहेत बाबा, अजिबात नाही, मी कोणासमोर अशी तयार होवुन जाणार नाही ,.. "बाबा आपण उद्या घरी जाणार आहोत ना",..

" नाही बेटा उद्या कार्यक्रम आहे ना",.. शरद राव

" बाबा पण मला हे मान्य नाही, मला कधीचं तुमच्याशी बोलायचं आहे, मला दुसरा मुलगा आवडतो",.. रिया

" माहीती आहे मला बेटा पण विशाल चांगला मुलगा नाही, तो गुंड आहे",.. शरद राव

" नाही बाबा तो फक्त दिसतो तसा, तुम्ही त्याला भेटले नाही बाबा तर कस काय ठरवता, लोकांनी काहीही सांगितलेलं तुम्ही ऐकत आहात",.. रिया

"नाही बेटा मी स्वतः देखील चौकशी केली आहे, तो विशाल तुला फसवतो आहे, तो तुझ्याशी लग्न करणार नव्हता, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना रिया? ",.. शरद राव

" हो बाबा माझा विश्वास आहे, पण तुम्ही सुद्धा मी काय म्हणते आहे ते ऐका, विशाल नाही फसवत मला, तो तसा दिसतो तो मनाने खूप चांगला आहे, मला विशाल शी लग्न करायचं आहे",.. रिया

"ते शक्य नाही बेटा, कदाचित तुला कल्पना नसेल विशाल काय उद्योग करतो, तुला कस सांगू मी, तुला माहिती आहे की नाही तो तुझा सौदा करणार होता, मला तुझा भविष्य धोक्यात टाकता येणार नाही, तो मुलगा अजिबात चांगला नाही, त्याचे तुझ्या बाबतीत विचार चांगले नाही, त्याच्याशी लग्न केलं तर तुझं काही खरं नाही, पहिली गोष्ट तो लग्न करणार नाही तुझ्याशी ",.. शरद राव

" नाही बाबा असा नाही तो विशाल, चांगला आहे, तुम्ही कोणाकडे गेली त्याची चौकशी, मला का नाही सांगितलं, मी तुम्ही सगळं सांगितलेलं ऐकत आहे, माझं तुम्ही ऐकत नाही, आणि का करेल विशाल अस, मी खूप दिवसा पासुन ओळखते त्याला ",.. रिया

" नाही रिया असं नाही, आता तरी डोळे उघड, मी जे तुझ्यासाठी करतो आहे ते चांगलं करतो आहे ",.. शरद राव

" मी ज्या गोष्टीत खुश आहे ते तुम्ही करत नाही बाबा, माझी खुशी विशाल सोबत आहे, मी उद्या घरी जाणार मला इथे दाखवण्याचा कार्यक्रम करायचं नाही ",.. रिया

" तू माझं ऐकणार नाही का ",.. शरद राव

" तुम्ही मला इथे मावशी कडच्या लग्नासाठी घेऊन आले आणि आता माझं लग्न ठरवण्याची खटपट करत आहेत याला काय अर्थ आहे ",.. रिया

" तुला तुझ आयुष्य खराब करून घ्यायच आहे का रिया, समजत नाही का तुला, मूर्ख मुलगी, अस मी नीट बोलतो तुझ्याशी म्हणून तू अस करतेस",.. शरद राव चिडले होते

" कारण मला महिती आहे बाबा विशाल चांगला आहे पण तुम्हाला माझ लग्न तुमच्या मनाप्रमाणे करायच आहे तुम्ही हे मुद्दाम करता आहात ",.. रिया भांडत होती

ते दोघ बोलत असताना शरदरावांना खूप घाम आला, एकदम चक्कर आल्यासारखी झाली, ते बोलता बोलता एकदम खाली बसले,

बाबा... बाबा.. रिया पटकन पळत आत गेली, पाणी घेऊन आली, सगळे बाहेर पळत आली, रिया ने त्यांना साखर पाणी दिलं, शरद राव टेन्शनमध्ये होते,

सगळे रियाला रागवत होते,.. काय बोलली तू बाबांना? त्यांची तब्येत कशी खराब झाली? समजत नाही का तुला कसं वागावं ते? कोण महत्त्वाचा आहे तुझ्यासाठी तो मुलगा की तुझे वडील? इतके सगळे सांगत आहे की तो मुलगा खराब आहे तर तुला समजत नाही का? तुला तुझ्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा आहे का? , तुला तुझ्या वडिलांना कायमचं गमवायचं आहे का?, सुरेखा ताई रडत होत्या, टिना आई जवळ होती,

" रिया बाबांजवळ जाऊन बसली, बाबा कसे आहात तुम्ही? तुम्ही प्लीज माझा कुठल्याही गोष्टीच टेन्शन घेऊ नका, तुम्ही जे म्हणाल तेच मी करेल, यापुढे तुम्हाला त्रास होईल असं मी काहीही करणार नाही",..

सुरेखाताई शरद राव यांच्या कडे बघत होत्या, रिया आत मध्ये चालली गेली, ती आज जाऊन खूप रडत होती, टिना तिच्या जवळ जाऊन बसली,

"मी काहीच नाही बोलली टीना बाबांना, खरंच मला बाबांना काही व्हायला नको आहे, तेच चिडले होते ",...रिया

" काही नाही होणार ताई बाबांना मला माहिती आहे तू किती चांगली आहे",.. टिना

" तुला माहिती आहे का टिना, उद्या मला बघायला एक मुलगा येणार आहे, या लोकांनी मला कसं खोटं सांगून इकडे घेऊन आले, तुझं कधी कोणावर प्रेम नाही अजून म्हणून तुला नाही समजत आहे हे, पण हे मला सहन होत नाही, ह्या लोकांनी मला फसवल आहे",.. रिया

" काय करणार आहे मग तू ताई आता ",.. टिना

" माझी इथून सुटका नाही आणि बाबांची तब्येत ठीक नाही मला या लोकांचा ऐकावच लागेल, बघू घरी गेल्यावर मी बाबांशी शांतपणे बोलून बघेल ",.. रिया

टीना रिया झोपल्या, रिया विचार करत होती आता सगळं त्या मुलाला सांगावं लागेल, त्याला सांगू कि मला नकार दे, असंच काहीतरी करावं लागेल, इथे सगळ्यांशी गोड बोलून घरी निघून जाऊ आणि मग विशाल कडे जाऊ, हा विशाल ही का फोन उचलत नाही, त्याचे वेगळच आहे एक एक, मी नक्की बरोबर करते आहे ना? पण बाबा का अस बोलले विशाल बद्दल

आज बरोबर तीन-चार दिवस झाले रियाचा फोन लागत नाही, विशाल विचार करत होता, मंगेश भाईचा दोन तीनदा फोन येऊन गेला तो सारखा विचारत होता रिया कुठे आहे? काय कराव आता? त्याने तिच्या घराकडे जाऊन पाहिलं, घराला कुलूप होतं,

शेजारच्या एक दोन जणांना विचारलं कुठे गेले आहेत हे लोक? , त्यांनी सांगितलं ते गावी गेले आहेत, काय आहे गावाचं नाव, त्यांनी गावाचे नाव सांगितलं,

विशाल वापस गॅरेज वर आला आता मला त्या गावाला जाऊन रिया ला शोधाव लागेल, त्याने गावाला जायची तयारी सुरू केली
......

रोहित रूम मध्ये आला तो प्रचंड खुष होता, उद्या आपल्याला रियाच्या घरी जायचं आहे, खाली सगळी तयारी सुरू होती, आई आजी सगळं ठरवत होत्या, उद्या कोण कोण जाणार कुठल्या गाडीने जायचं सगळं ठरलं होतं,

रियाला द्यायला दागिने साडी आणून ठेवली होती, पिंकी हि खुप मदत करत होती, तिने रोहित साठी चांगले कपडे ठरवले होते पिंकी मदत करणार होती रिया शी बोलायला, तसं तिचा आणि रोहित ठरलं होतं,

रोहित ने परत एकदा मोबाईल मध्ये रियाचा फोटो बघितला, तो खूपच खूश होता, सगळं ठरलं तर पंधरा दिवसात लग्न होईल, नंतर लग्नाचे मुहूर्त नव्हते, म्हणजे जर लग्न झालं तर पंधरा दिवसांनी माझ्या सोबत या वेळी रियु या रूममध्ये असेल, हा विचार करूनच त्याला खूप खुश वाटत होतं,

काय बोलणार आहे मी उद्या रियु शी? की तिच्याकडे फक्त बघत बसेल, खूपच सुंदर आहे ही, काय होणार आहे माझं पुढे? हिला बघितलं की काहीही काम सुचत नाही, कस असेल माझं आणि रियुच आयुष्य, रियु माझ पाहिल प्रेम आहे , कधी जावू तिकडे अस झाल होत त्याला
....

रिया रडत होती तिला झोप येत नव्हती, जरा वेळाने बाबा आत आले, ते रियाच्या डोक्यावरुन हात फिरवत होते, रियाने त्यांच्या कडे बघितल नाही, जरा वेळाने ते निघून गेले, मामाने मेन दरवाजा लॉक केला, कुलूप लावून तो तिथे झोपला

दुसर्‍या दिवशी सकाळी पासून घर आवरल जात होत, येणार्‍या पाहुण्यां साठी चहा नाश्ताची तयारी सुरु होती रिया तिच्या रूम मध्ये नुसती बसली होती, टीना सगळ्यांना मदत करत होती, शरद राव दोन दा येवून रिया ला बघून गेले होते, रिया बोलली नव्हती त्यांच्याशी,

सुरेखा ताई आत आल्या, त्या रियाचे केस विंचरून देत होत्या,... "रिया राग सोड तुझे बाबा चांगल करतील तुझ",

"आई मला घरी जायचं आहे, मला नाही करायच हे लग्न, मला एक मुलगा आवडतो, तो माझी वाट बघत असेल",..रिया

ती अस बोलली तेवढ्यात मामा आत आला, तो रागाने रिया कडे बघत होता,.. "आज बोललीस या पुढे इथे अस वेड वाकड बोलली ना रिया तू तर माझ्या हून कोणी वाईट नाही, मी तुझ्या बाबा सारखा नाही, कडक शिस्तीचा आहे मी, पटापट आटोप ग ताई हीच आणि पाहुण्यां समोर अजिबात शहाणपण नको मला रिया , नाही तर नंतर काय होईल ते सांगू शकत नाही, काल कानाखाली वाजवणार होतो मी हिला, पण आज पाहुणे येतील म्हणून गप्प आहे मी , तोंड फोडल असत हीच, तमाशा नको म्हणून सोडल, आज गडबड केली रिया तर बघ, गुपचुप सगळे सांगतील त्या मुला शी लग्न करायच, ताई चल तू बाहेर, कोणी बोलू नका हिच्याशी, ती करेन तिची तिची तयारी ",.. मामा चिडले होते

सुरेखा ताई बाहेर आल्या

रिया आत थरथर कापत होती, तिला खूप रडू येत होत, समोर साडी पडलेली होती थोड्या वेळाने टीना आणि तिच्या मामे बहिणी ने रियाला तयार केल, रिया ने विरोध केला नाही,

रोहितच्या घरी सकाळ पासून सगळे तयार होते, आई आजी खूप उत्साह आवरत होत्या, रोहित तयार झाला, ब्लॅक पँट व्हाइट शर्ट, घातल होत त्याने, कुर्ता घालायला त्याने नकार दिला होता, सगळे समजवून थकले, जावू दे त्याला कंफर्टेबल वाटेल असे कपडे घालू दे

सगळे निघाले, रोहितला समजत नव्हत काय कराव, पिंकी त्याला चिडवत होती, आई आजी अण्णा आनंदात होते

मामा च घर आल, बरेच लोक होते घरात, बापरे येवढ्या लोकं मध्ये रिया कुठे भेटेल? बोलता तरी येईल का तिच्याशी?

मामा, शरद राव स्वागताला पुढे आले, रोहितची पर्सनॅलिटी बघून सगळे भारावून गेले होते, जरा जास्त हॅन्डसम दिसत होता तो, त्यात श्रीमंत डॅशिंग असा तो बोलण्यावर कमांड, सगळे त्याच्या कडे बघत होते, तो खाली बघत होता, सगळे मोठ्या हॉल मध्ये येवून बसले,

मामांनी ओळख करून दिली, सगळे बोलत बसले, शारदा ताई आजी पिंकी आत गेल्या, घर बघून आल्या, तिकडे सगळ्यांची ओळख झाली, आता सगळे बाहेर येवून बसले,

रिया ला बोलवा,

रोहित ला धड धड होत होती, जिला आता पर्यंत फक्त फोटोत बघितल अशी माझी राणी रियु कशी असेल प्रत्यक्षात? , केव्हा येइल ती? नक्की खूप हसरी बोलकी अशी असेल, ती बोलेन का माझ्याशी, का तिला ही आजच टेंशन असेल, एवढ्या लोकांना बघून ती गडबडून जाईल नक्की,

" रिया ला घेवून ये" ,... शरद राव सुरेखा ताईं कडे बघत होते, त्या आत जात होत्या,

"ताई तू बस मी जातो आत" ,... मामा

मामा आत गेले, रिया तयार होवुन बसली होती,... "चल रिया बाहेर, सांगितल ते लक्ष्यात ठेव, गेल्यावर पाया पड सगळ्यांच्या, विचारलेले प्रश्नांची नीट उत्तर दे, उगीच उलट बोललीस, काही सांगितल, नकार दिला तर मी तुला इथून जावू देणार नाही, मग माझ्याशी गाठ आहे" ,

रिया गप्प होती, विशालचा चेहरा डोळ्यासमोर येत होता, मी काहीही करून सटकेल इथून, मी कोणाच ऐकणार नाही,... ती मनात विचार करत होती

रिया मामां सोबत बाहेर गेली, सगळे हॉल मधले तिच्या कडे बघत होते, अतिशय सुंदर दिसत होती, ती निळी साडी नेसलेली होती, जास्त तयारी नाही, साधी दिसत होती रिया, एक वेणी जास्त ज्वेलरी नाही, रोहित तिच्या कडे बघत होता, पण ही उदास वाटते आहे, काय झालं असेल हिला? आम्ही आलो म्हणून घाबरली की अजून काही? , जबरदस्ती लग्न तर करत नसतील ना हीच? , विचारू नंतर, पण खूप गोड आहे रियु,

मामा ओळख करून देत होते, रिया त्यांच्या पाया पडत होती, ती रोहित च्या आजी आई जवळ बसली होती, आई तिच्याशी बोलत होती, पिंकी रोहित कडे बघत होती, डोळ्याने विचारात होती कशी आहे रिया, रोहित लाजला,

पोहे आले आतून, रिया पोहे दे सगळ्यांना, रिया उठली, तिला काही सुचत नव्हत, मामा होते मदतीला, ते रिया कडे डिश देत होते, साडी सांभाळून चालण त्यात हातात डिश अवघड होत, ती पडता पडता राहिली, एकदम रोहित उठला त्याने रिया च्या हातून ट्रे घेतला, रिया त्याच्या कडे बघत होती, हा आहे का मुलगा? , तिला एकदम धडकी भरली, रोहित तिच्या कडे बघत होता, तिने दुसरी बघितल, मुलगा एकदम हीरो सारखा आहे हा,

"तुम्ही बसा रोहित.. रिया देईल पोहे" ,.. मामा

रिया जिथे जिथे जाईल तिथे रोहित तिच्या कडे बघत होता, तो खूप खुश होता, शरद राव समजून गेले पसंती झाली आहे मुलाची, हे लग्न झालं तर बर होईल, अण्णा समोर बसले होते ते रिया शी थोड बोलले, खूप चांगले वाटले तिला ते लोक

चांगले आहेत, पण मला काय? मला नाही करायच हे लग्न, इथे राहणार नाही मी, मला किती रागवल, मारल तरी पळून जाईल मी, विशाल तू कुठे आहेस विशाल.....

🎭 Series Post

View all