हे प्रेम आहे की काय?... भाग 10

रोहित नाश्ता करत होता, त्याचं सगळं लक्ष आई काय बोलतेय तिकडे होतं, रविवार म्हणजे आज पासून दोन-तीन दिवस


हे प्रेम आहे की काय?... भाग 10

©️®️शिल्पा सुतार
........

आजी रोहित च्या जवळ येवून बसली,... "आवडली का यातली एखादी मुलगी? , चांगले आहेत स्थळ" ,

नाही... रोहितने मुद्दाम नाही सांगितलं

"नसेल आवडली तर ते सगळे फोटो दे इकडे, तुझ्या आईने खाली फोटो वापस मागितले आहे, ते तिकडे विवाहसंस्थेत फोटो वापस द्यायचे आहेत" ,... आजीने खाली पडलेले दोन फोटो उचलले, एनवलप मध्ये टाकले, तिसरा फोटो रोहितच्या उशी खाली होता

"इकडे दे तो फोटो रोहित",.. आजी

"कुठे आहे फोटो आजी ",.. रोहित

" तो तुझ्या उशी खाली ",.. आजी

रोहितने फोटो बाहेर काढला,.." हा फोटो असू दे आजी",

आजीच्या चेहऱ्यावर हसू होतं, ती रोहित जवळ बसली,.. "काय झाले आहे रोहित? आवडली का ही मुलगी? मोकळ सांग, लग्न तर प्रत्येकाला कराव लागत लाजतो काय असा ",..

रोहित गप्प होता..

"सुंदर आयुष्य तुझ वाट बघत आहे रोहित, काम तर काय सुरु असतात, देवाच्या कृपेने सगळं काही चांगलं आहे आपलं, लवकर लग्न करून घे, तुझ्या आईची पण तिच इच्छा आहे, सांग ना आवडली का तुला ही मुलगी, छान आहे बघ किती",.. आजी

हो... रोहित बोलला, मोठ्या मोठ्या डील आणि मिटिंग क्रॅक करणारा, एवढ्या मोठ्या ऑफिसचा बॉस रोहित अचानकच होकार देताना गडबडून गेला होता, आजीला तेव्हाच समजलं मुलगी आवडली आहे याला , याचा होकार दिसतोय,

" दे तो फोटो इकडे रोहित ",.. आजी

रोहित फोटो देतच नव्हता,

"अरे तुझ्या आईला सांगावं लागेल की ही मुलगी तुला पसंत आहे, पुढे बोलणी कशी होणार तू फोटो दिला नाही तर ",.. आजी

रोहितने मोबाईल मध्ये त्या फोटोचे फोटो काढून घेतले, मागच्या माहितीचा फोटो काढला आणि फोटो आजीकडे दिला, आजी समाधानाने खाली गेली, हा फोटो... ही रिया आवडला आहे रोहितला

आई आजी खुश होत्या,.. खर ना आई

" अग हो रोहित फोटो देत नव्हता, लपवून ठेवला होता उशीखाली",.. आजी

"मी लगेच फोन लावते तिकडे विवाहसंस्थेत, आई तुम्ही माझ्या रूम मध्ये या ना",.. शारदा ताई

आई आजीला नुसता उत्साह वाटत होता,

शारदा ताईंनी फोन करून पसंती कळवली

रोहित चहा साठी खाली आला, त्याला समजल आईने विवाह संस्था फोन केला,.. " काय घाई असते तुम्हाला मला तेच समजत नाही ",..

" पसंत नाही का तुला मुलगी? ठीक आहे नकार सांगू का मग",.. आई हसत होती

"नको असू दे आता",.. रोहित

पिंकी आली होती कॉलेजमधून, ती जेवत होती, रियाचा फोटो तिच्या हातात होता, खूपच सुंदर आहे मुलगी, सहाजिकच दादाची विकेट पडणारच, रिया नाव आहे, रोहित रिया छान आहे जोडीच नाव,

" पिंकी तू जरा गप्प बसणार का, आई माझ्या आधीच हीच लग्न करून टाक, तू सकाळी बरोबर बोलत होतीस, हिच्या साठी स्थळ बघा आता",.. रोहित

"एका मुलाकडे रियाचा फोटो नाही तर त्याला जिवावर येत आहे",.. पिंकी

"थांब जरा बघतो मी तुझ्याकडे पिंकी",.. रोहित

"भांडू नका तुम्ही दोघं" ,... आजी मध्ये पडली, आजी तू पिंकी ला काही सांग

" रियाचा फोटो जरा वेळ दे ग रोहितकडे, पुरे झाल पिंकी, केव्हाच तूच बघते आहे फोटो, बघू दे त्याला जरा वेळ",...
आई आजी हसत होत्या

" तुम्ही दोघी मला त्रास देण बंद करा",.. रोहित रागाने बाहेर चालला गेला

जेवण झालं, रोहित रूम मध्ये येऊन बसला, मोबाईल मधून तो रियाचा फोटो बघत होता, जेवढा तो फोटो बघत होता तेवढा तो तिच्या जास्तच प्रेमात पडत होता, अजून काय होईल माहिती नाही जास्त आहारी नको जायला हिच्या, तरीसुद्धा तो स्वतःला तर फोटो बघण्यापासून थांबू शकत नव्हता, खरच हिच्या बरोबर आयुष्य कस असेल, हिच्या शी लग्न झालं तर हिला खूप सुखात ठेवेन मी... माझी रियु,

शरद राव नुकतेच ऑफिस मधुन आलेले होते, त्यांना विवाह संस्थेतून फोन आला.. तुमच्या मुलीचं स्थळ एका ठिकाणी पसंत पडलं आहे

" कोण आहे मुलगा काही डिटेल्स मिळतील का?",.. शरद राव

त्यांनी रोहितचे डिटेल शरद राव यांना पाठवून दिले, स्थळ खूप चांगलं आहे मुलगा खूप श्रीमंत आहे, एक बहीण आहे त्याला, इंडस्ट्रि आहेत त्यांच्या, घरात कामाला भरपूर लोक, कसली काळजी नाही, मेन म्हणजे त्यांनी रियाला पसंत केल आहे, तिकडुन पसंती झाली आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या, म्हणजे पुढचे कार्यक्रम ठरवता येतील

ठीक आहे...

सुरेखा ताईंना खूप आनंद झाला होता,

"सुरेखा आता काही बोलू नको घरात अजून, दोन दिवसांनी परीक्षा संपेल रियाची, तू तिला घेऊन तुझ्या भावाकडे निघून जा गावी, तुझ्या मावस बहिणीकडे लग्न आहे त्या लग्नाला जातो आहे असं सांग, लगेच येऊ लग्न झालं की एक दोन दिवसात असं सांगा, तरच रिया येईल सोबत",.. शरद राव

" ठीक आहे, तुम्ही येणार ना पण नंतर",.. सुरेखा ताई

" हो बघण्याचा कार्यक्रम असेल तेव्हा मी येईल",.. शरद राव

आज रिया चा शेवटचा पेपर होता, चांगले गेले होते तिला पेपर, रिया खूप खुश होती, मी आज जाऊन विशालला भेटणार आहे, परीक्षा झाली, ती सगळ्या मित्र-मैत्रिणींबरोबर कॅन्टीनमध्ये बसलेली होती, कधी एकदा इथुन निघू आणि विशालला भेटू असं झालं होतं तिला,

ती तिथून निघून गॅरेजला आली, विशाल गॅरेज वर नव्हता तो कुठेतरी बाहेर गेलेला होता, रॉकी काम करत होता,

"रॉकी कुठे गेला आहे विशाल",.. रिया

"तू फोन करून बघ ना त्याला रिया, मी काही सांगितलं तर तुझा विश्वास नाही, कशाला आली आहे इथे ",... रॉकी

"विशाल चा फोन लागत नाही",.. रिया

"तो दोन-तीन दिवसांनी येईल, तो गावाला गेला आहे",.. रॉकी

" असा कसा गेला तो मला न सांगता",.. रिया

"हेच तर समजत नाही तुला रिया, विशाल तुला अजिबात महत्त्व देत नाही तूच त्याच्या मागेपुढे करून जीव धोक्यात टाकते आहे, किती वेळा सांगितल आहे मी तुला इथे नको येत जाऊ",.. रॉकी

रिया रागाने तिथून निघून गेली, खरं तर विशाल गावाला गेलेला नव्हता, तो थोड्यावेळाने येणार होता गॅरेजमध्ये, पण रॉकीने खोटं सांगितलं रियाला, रिया तिथून पटकन चालली गेली हे बरं झालं,

रिया घरी आली, तिने झोपून घेतलं

" काय झालं आहे रिया पेपर कसा गेला",.. सुरेखा ताई

" चांगला गेला आई",.. रिया

"तुला गावाला कोणते कपडे हवे आहेत ते काढून दे, मी बॅग भरते आहे",.. सुरेखा ताई

"कधी जातो आहोत आपण गावाला का बरं लगेच",.. रिया

"उद्या सकाळी जातो आहोत आपण गावाला, लगेच येऊ एक दोन दिवसात",.. सुरेखा ताई

"कशासाठी एवढी धावपळ मग, माझी आणि टीना ची आत्ताच परीक्षा संपली आहे, एक दोन दिवसांनी जावू ना",.. रिया

" अगं मावशीकडे लग्न आहे त्यासाठी जातो आहोत आपण, येऊ लगेच वापस, मग इथे राहू या सुट्टीत, कुठे जायचं नाही",... सुरेखा ताई

रिया विचार करत होती नाहीतरी विशाल ही गावाला गेला आहे, तो माझा फोन उचलत नाही, तो येईल दोन-तीन दिवसात आपणही जाऊन येऊ तोपर्यंत, नाही म्हटलं तरी आई ऐकणार नाही, ती आणि टीना जाईल, मला उगाच आजी सोबत राहाव लागेल, आजी खूप काम करून घेते माझ्याकडून आणि मला बोलते ही खूप,

रिया उठली तिने कपाटातुन तिचे ड्रेस शोधून टिना कडे दिले, टीना इस्त्री करत होती, उत्साहाचं वातावरण होत, ती टिना छान तयार व्हायच ठरवत होत्या

बाबा येताना खाऊ घेऊन आले, ते मुलींचा खूप लाड करत होते, आज बहुतेक रियाचा या घरातला शेवटचा दिवस असेल, तिकडे तिचं लग्न करून पाठवून देऊ, म्हणून ते भाऊक झाले होते, पण हेच रिया या साठी चांगला आहे

" झाली का बॅग भरून? अजून काही म्हटली नाही ना रिया?",.. शरद राव

"नाही ती काहीच म्हटली नाही, तिने कपडे आणून दिले बॅगमध्ये भरायला",.. सुरेखा ताई

"उद्या सकाळी सकाळी निघा तुम्ही, कुठला चान्स द्यायचा नाही मला आता",.. शरद राव

टिना सगळं ऐकत होती,

"टिना मला तुझ्याकडे एक काम आहे",.. शरद राव

" बोला बाबा",..

" माझी मदत करणार का",.. शरद राव

" हो बाबा",.. टिना

" काहीही करून ताईचा फोन मधून विशाल चा नंबर आधी ब्लॉक कर नंतर एडिट कर, एक दोन आकडे बदलून टाक",.. शरद राव

" हो बाबा मी करते",.. टिना

" हे बघ मी हे असं का सांगतो आहे कारण ते रिया साठी चांगला आहे, नंतर सांगतो तुला सगळं",.. शरद राव

"मला माहिती आहे बाबा विशाल चांगला मुलगा नाही",..टीना

जेवण झालं रियाचा फोन सारखा तिच्या हातात होता, एक दोनदा टिनाने प्रयत्न केला त्याला हात लावायचा, पण उपयोग झाला नाही, बहुतेक रिया विशालच्या फोनची वाट बघत होती, जरा वेळाने ती फोन चार्जिंगला लावून आईच्या मदतीला गेली, बाबांनी इशारा केला, ते किचनमध्ये रिया शी बोलत होते, टिनाने पटकन विशाल चा नंबर ब्लॉक केला आणि आहे त्या नंबर मध्ये एक दोन आकडे बदलले, फोन होता तसा ठेवून दिला, ती नंतर पुढे येऊन बसली,

विशाल जरा वेळाने गॅरेजवर आला, रियाने सांगितलं त्याप्रमाणे आज तिची परीक्षा संपणार होती, काहीतरी प्लॅन करायला पाहिजे, त्याने रियाला फोन लावला, तिचा फोन लागत नव्हता, काय झालं असेल? झोपली असेल का ती? थोडा उशीर झाला आहे फोन करायला, उद्या सकाळी करून बघतो फोन, तिला भेटायला बोलवतो उद्या

सकाळी गाडीने रिया टीना आई निघाल्या, त्या आधी मामाच्या घरी आल्या, खूप छान वाटत होतं तिकडे गावी, सुरेखा ताई तर खूप खुश होत्या

शरद राव यांनी विवाह संस्थेला फोन केला, या एक-दोन दिवसात पाहण्याचा कार्यक्रम करून टाकू, तुम्ही त्या लोकांना सांगून द्या,

जरा वेळाने विवाह संस्थेतून फोन आला त्यांनी शारदा ताईंचा नंबर दिला, शरद रावांनी त्यांना फोन केला, गावाकडचं लग्न झाल्यावर बरोबर दुसऱ्या दिवशी पाहण्याचा कार्यक्रम ठेवला

रिया मधून मधून विशाल ला फोन लावून बघत होती, त्याचा फोनच लागत नव्हता, काहीतरी रॉंग नंबर येत होता, काय गडबड आहे काही कळत नाही, तो गावाला का गेला आहे, काहीही सांगितलं नाही त्यांने, अस करतो आता हल्ली विशाल, रियाला राग आला होता

सकाळी शारदाताई फोनवर बोलत होत्या,... ठीक आहे चालेल आम्हाला रविवार आहे ना, हो आम्ही येवू, हो तुम्ही पत्ता द्या,

रोहित नाश्ता करत होता, त्याचं सगळं लक्ष आई काय बोलतेय तिकडे होतं, रविवार म्हणजे आज पासून दोन-तीन दिवस, खूप खुश होता तो, शारदा ताईंचा फोन झाला, आजी बाजूला बसली होती, त्या आजीला सांगत होत्या की रविवारी आपल्याला मुलगी बघायला जायचं आहे , रिया तिकडे मामाकडे आलेली आहे,

पिंकी बाजूलाच बसली होती, ती सारखी रोहित कडे हसून बघत होती, एका मुलाची मजा आहे, रोहितने तिच्या तोंडावर नॅपकिन फेकून मारला, काम नाहीत का पिंकी काही, कॉलेज ला जा,

"दादा तू किती जरी मला मारलं तरी तुझा चेहरा कसा झाला आहे हे एकदा आरशात बघ" ,... पिंकी पुढे आणि रोहित मागे पळत होते

अण्णा खाली आले, सगळे रोहित वेगळंच रूप बघत होते, काय चाललं आहे हे?

"काही नाही आपल्याला रविवारी मुलगी बघायला जायचं आहे रोहित साठी, मी तुम्हाला सांगितलं ना काल तेच स्थळ, रोहित ला मुलगी पसंत आहे, आत्ता विवाह संस्थेतून फोन आला होता, तेच पिंकी त्याला चिडवत आहे",... शारदा ताई

अण्णा खुश होते बऱ्याच दिवसांनी या घरात मंगल कार्य होणार होत, ते आणि शारदाताई ठरवत होते काय करायचं? एवढा चांगला मुलगा आहे आपला, श्रीमंती खूप, कसलीही कमी नाही घरी, मुलीकडून नकार यायचा संबंधच नव्हता, त्यामुळे हे लग्न होईलच असं ते मानत होते, पसंती रोहितच्या साईडने झाली होती, किती दिवस त्यालाच मुलगी पसंत होत नव्हती, आता तो तयार आहे म्हणजे ठरल्या सारखंच आहे हे लग्न,

पिंकी रोहित डायनिंग टेबल वर येऊन बसले, आई आजी काहीतरी कार्यक्रमाचे ठरवत होत्या,

"पिंकी मला तुझ्याशी थोडं काम आहे",.. रोहित

"बोल दादा",.. पिंकी

"जेव्हा आपण रविवारी रिया कडे जाऊन तेव्हा तू मला सपोर्ट करशील का? ",.. रोहित

"म्हणजे काय करायचं आहे",.. पिंकी

" रिया आणि मला जर बोलायला कुणी आग्रह केला नाही तर तू आईला सांगायचं की यांना दोघांना बोलू द्या",.. रोहित

"पण तुला तर मी आवडत नाही ना दादा, तू मला नेहमी मारत असतो, आत्ताही तु तोंडावर नॅपकिन मारला",.. पिंकी

" सॉरी पिंकी चूक झाली माझी, प्लीज सांग ना मदत करशील का, कारण एक तर गावाकडे बघायचं कार्यक्रम आहे, तिथे जर मुला-मुलीला बोलू दिलं नाही तर, मला लग्न करण्याआधी रिया शी बोलायचं आहे ",... रोहित

" ते तर माझ्यासाठी इझी आहे तुला मदत करण, पण मग मला काय मिळेल? ",.. पिंकी

म्हणजे?

" तुला मदत केली दादा तर मला काय मिळेल? ",.. पिंकी

" काहीही मिळणार नाही तुला पिंकी ",.. रोहित

" ठीक आहे मग तू तुझं बोल रिया शी मला काही सांगू नको ",.. पिंकी

पिंकी उठून आत जात होती, पिंकी थांब, अपेक्षितच होतं पिंकीला दादा हाक मारेल लगेच

" काय काम आहे दादा लवकर सांग मला अभ्यास आहे",.. पिंकी

" एवढी बिझी आहेस का तु",.. रोहित

" जाऊदे तू मला वाटेल तसं बोलतो आहेस",.. पिंकी

"बरं बाई सॉरी काय हव आहे तुला लवकर सांग",.. रोहित

" क्रेडिट कार्ड दे",.. पिंकी

"कशाला लागत आहे तुला ते",.. रोहित

" शॉपिंग करायची आहे",.. पिंकी

" हे बघ पिंकी क्रेडिट कार्डवर जास्त लिमिट आहे, तुला किती ची शॉपिंग करायची आहे, काय घ्यायचं आहे",.. रोहित

" मग कॅश दे ",.. पिंकी

किती??

दहा हजार..

"हे जास्त होत आहेत काही करू नको मदत ",.. रोहित

" अरे दादा असं करू नको, मी तुला रिया वहिनी सोबत भेट घडवून देईन, तुला छान बोलता येईल तिच्याशी, तुला किती आवडते रिया ",... पिंकी

" ठीक आहे जास्त बोलू नकोस ",.. रोहित हसत होता

मग सात हजार..

नाही..

"ठीक आहे पाच हजार, आता यापेक्षा खाली मी येणार नाही दादा ",.. पिंकी

" ठीक आहे पाच हजाराची शॉपिंग कर",... रोहित ने पाकिटातुन पैसे पिंकीला दिले, पिंकी ने त्याच्या पाकिटातुन अजून हजार रुपये काढून घेतले, ती रूम मध्ये पळून गेली

रोहित डोक्याला हात लावून बसला, जाऊदे रियु भेटणार असेल तर हेही चालेल मला, त्याने फोनमध्ये परत एकदा रियाचा फोटो बघितला... रियु माझी रियु अजून दोन दिवस....

🎭 Series Post

View all