हे प्रेम आहे की काय?... भाग 5

दुपारनंतर रोहित घरी आला, तो काळजीत होता, रिया काल पासुन जेवली नाही, काय करत असेल? ,चक्कर येत असतिल तिला,



हे प्रेम आहे की काय?... भाग 5

©️®️शिल्पा सुतार
........

रोहित बाहेर गेला येतांना त्याच्या हातात पाण्याची बॉटल होती,.. "पाणी हवा आहे का रियु?",

हो... रिया बोलली, त्याने पाणी बाजूला ठेवलं पेपर पुढे केले..." सही कर याच्यावर",

" काय आहे हे?",. रिया

" मी आज माझ्या वकीलांना भेटलो होतो, त्यांनी तुझी सही मागितली आहे पेपर वर, घरी आल्यावर तू गोंधळ घालून ठेवला होता आधीच, त्या मुळे मी विसरून गेलो होतो ",.. रोहित

"काय लिहिल आहे यावर",.. रिया

"मी या घरातून पळून जाणार नाही, मी माझ्या मनाने रोहितशी लग्न केलं आहे आणि विशालला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी असं लिहिलेलं आहे यात ",.. रोहित

" विशालला शिक्षा म्हणजे? कुठे आहे विशाल?",.. रियाने विचारलं

" पोलिसांच्या ताब्यात आहे तो बदमाश ",.. रोहित

" का? काय केलं त्याने? तुम्हीच दिला असेल त्याला पोलिसात ",.. रिया चिडली होती

" हो बरोबर आहे, त्याच्या वर केस सुरू आहे, आपल्याला हा पेपर सबमिट करायचा आहे ",.. रोहित

" हे का केलं तुम्ही असं",.. रिया चिडली होती

" कारण विशाल चांगला मुलगा नाही",.. रोहित

"कोणी सांगितलं? मी एक वर्षापासून त्याला ओळखते विशाल चांगला मुलगा आहे, त्याला शिक्षा होण्यासाठी मी सही करणार नाही, तुम्ही मला प्लिज घरी जाऊ द्या मला विशाल सोबत राहायचं आहे",... रिया

" कोणी तुझ्या डोक्यात भरला आहे त्या विशालचा खूळ? अजिबात चांगला मुलगा नाही तो विशाल, मूर्खपणा करू नको, खूप मोठ्या संकटातून तू वाचली आहेस, त्याला शिक्षा होण हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने चांगल आहे",.... रोहित

"काय केल त्याने",.. रिया

"तुला पळवून नेल",.. रोहित

"नाही मी स्वतः गेली होती त्याच्या सोबत",.. रिया

"तो मोठा गुंड आहे",.. रोहित

"नाही तो दिसतो तसा, पण खूप चांगला आहे",.. रिया

"अग मूर्ख मुली तो विकणार होता तुला",.. रोहित

"नाही तो चांगला आहे, गम्मत करायचा तो नेहमी अस",.. रिया

"आता तू तुझ्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवली आहेस तू, सांगेन तुला नंतर, आता सांगितल तरी पटणार नाही तुला, नाही करायची का सही पेपर वर ",.. रोहित चिडला होता

" नाही, कारण विशाल वाईट नाही, मी सही करणार नाही विशाल चांगला आहे, तुम्ही काहीही सांगितल तरी मला पटणार नाही",.. रिया

रोहित पाणी घेऊन वापस गेला, त्याने रियाला तिच्या रूम मध्ये नेलं,.." इथे थांब तुझी तुझी , घरात कुठे फिरतांना दिसली तर बघ",.

राधा येवून तिच्या रूम मध्ये थांबली, या रूम मध्ये चहा नाष्टा पाणी काहीच द्यायच नाही, मूर्ख रियाला बसू दे अस, चांगल वाईट समजत नाही तिला,

रियाला झोप येत नव्हती, खूप भूक लागली होती, तहान ही खूप लागली, काय करू आज जेवण मिळणार नाही बहुतेक, तिला आठवल आईने डब्बा दिला तरी ती बर्‍याच वेळा तो डबा खात नसे, कोणत्याच भाज्या आवडत नव्हत्या तिला, कित्येक वेळा भरल्या ताट वरून उठली होती ती, आता देव देतो आहे मला शिक्षा, आई किती रागवायची , आत समजली अन्नाची किम्मत, नुसत सहा तास अन्न मिळालं नाही तर हे हाल आहेत, ज्यांना कायमच जेवण मिळत नाही किंवा जेवण मिळवण्यासाठी खूप काम करावं लागतं त्यांचं कसं होत असेल,

जावून बघु का गुपचुप किचन मधे, नको तो रोहित बाहेर असेल तो जीव घेईल माझा, आणि तो काय सांगत होता विशाल बद्दल, किती खोट ठरवतो तो विशालला, जस काही मला समजत नाही अस करतो, पोलिसांनी मारल नसेल ना विशालला, रोहित डेंजर आहे, पैसे आहेत पॉवर आहे, तो नक्की काही तरी करेन विशालला, रियाच्या डोळ्यात पाणी आलं , काय करू मी? इथून बाहेर पडायला चान्स नाही, ती बाल्कनीत येवून बसली,

रात्री केव्हातरी तिला झोप लागली, सकाळी ती उठली तर रूम मध्ये राधा नव्हती, कुठे गेली ही? किती वाजले? तिने पटकन रूम मध्ये कुठे पाणी आहे का ते बघितलं, रूम मध्ये कुठेच पाणी नव्हतं, खाली जावून पाणी पिऊन येवू का, दरवाजा उघडायचा प्रयत्न केला तर दरवाजा लॉक होता म्हणजे आता मला इथे कोंडल आहे, रूमची कडी आतून तोडली होती, बाहेरून ठीक होती रूम जवळ पायांचा आवाज आला, प्रिया पटकन जाऊन तिच्या काॅटवर बसली

रोहित आला होता.. "good morning रियु, भूक लागली का? गरम नाश्ता तयार आहे, येणार का खाली",..

रिया खुश होती, ती निघाली खाली जायला

"पेपर वर सही कर, मग चल खाली",.. रोहित

"प्लीज अस करु नका, मी सही करणार नाही" ,.. रिया

"ठीक आहे मी जातो ऑफिसला",.. रोहित

"मला खूप भूक लागली आहे, पाणी हव आहे, प्लीज",.. रिया

" सगळ मिळेल, तू म्हणशील तस करेन मी, आधी सही कर आणि मला होकार दे ",.. रोहित

नाही

" आता विचार झाला तुझा सही न करायचा तर संध्याकाळ शिवाय मी येणार नाही, जेवण पाणी मिळणार नाही, ठीक आहे ना ",.. रोहित

"मला नको जेवण",.. रिया

रोहित खाली आला, जर कोणी चुकून रियाला जेवायला दिलं तर माझ्याहून कोणी वाईट नाही, राधा इथे बस, त्याने रियाची रूम बाहेरून लॉक केली, रोहित चावी घेऊन ऑफिसला निघून गेला,

रियाला खूप भूक लागली होती, त्यात विशालच्या आठवणीने तिला आता रडायला येतं होत, पाणी नाही जेवायला नाही तरी चालेल विशालला जास्तीत जास्त शिक्षा करा या पेपर मी सही करणार नाही, रिया एकटीच खोलीत बसली होती आता बारा तासाच्या वर होऊन गेले होते तिने काहीच खाल्लं नव्हतं, खूप कसंतरी होत होतं, बाथरूम मधलं पाणी प्यावं का? काय करू स्वयंपाक वाल्या मावशी चांगल्या आहेत त्यांच्याशी गोड बोलून घेवु का थोड जेवायला? , तिने रूमचा दरवाजा उघडायचा प्रयत्न केला, लॉक होतं बाहेरून, ती परत आत येऊन बसली, काही खरं नाही रोहित रूम लॉक करून गेला, रिया रडत होती

थोड्या वेळानंतर तिला काहीतरी टकटक आवाज आला, कुठून येतो आहे हा आवाज, तिने बाहेर येऊन बघितलं सगळं बंद होतं, बाथरूम मध्ये आवाज येत होता, ती बाथरूममध्ये गेली, मोठी खिडकी होती तिथे, स्वयंपाक वाल्या मावशींनी तिच्यासाठी पाणी आणि पोळी भाजी आणली होती , त्या खाली उभ्या दिसत होत्या, रूम वरती होती, मॅडम खाऊन घ्या,

"नको ताई तुम्ही जा इथून तुमची नौकरी जाईल",.. रिया

"नाही ताई पटकन घ्या",..

पण कस?.. रिया

"ओढणी फेका तुमची, एक टोक वरती राहू द्या",..

"तुम्ही कशाला एवढा त्रास घेत आहात, रोहितला समजलं तर तुमची नोकरी जाईल",.. रिया

" जाऊ द्या गेली तर तुम्हाला काल संध्याकाळपासून भूक लागली आहे, खाऊन घ्या मग, माझं नाव नका सांगू, साहेब सहा वाजता घरी येतात मी पाच वाजता तुम्हाला परत खायला आणून देते, पाणी आणून देते" ,...

"नको तुम्ही मला काही आणून देऊ नका, मला भीती वाटते, आता मी खाते पाणी पिते बाटली बाहेर फेकते",.. रिया

त्यांनी ओढणी मध्ये जेवण पाणी बांधले रियाने हळूच जेवण वर घेतल, सीमाने भरपूर पाणी पिल, पोळी भाजी खाल्ली, न जाणो रोहित लवकर घरी आला तर आहे ते खायला मिळणार नाही, आता तिला बरं वाटत होतं, थोडंसं पाणी तिने दुपार साठी ठेवलं, बाटली बाथरूम मध्ये झाडांमागे लपवून ठेवली, आंघोळ केली आवरून बसुन राहिली

खरच विशाल पोलिसांच्या ताब्यात आहे का?, तो खराब आहे का? आधी पण सगळे असंच म्हणत होते, नक्की काय आहे सत्यता? एकदा बघायला हव, रोहित ही चांगला मुलगा वाटतो आहे, एवढं झालं तरी एकदाही हात लावला नाही मला , विचार करतांना तिने गळ्याला हात लावला, गळ्यात मंगळसूत्र होतं, कसं दिसत आहे मला मंगळसूत्र? आरसा कुठे आहे, तीने उठून आरशात स्वतःला बघितलं, मंगळसूत्र खूपच सुंदर दिसत होत तिला, पिवळ धम्म सोन त्यात काळे मणी, खरंतर किती आनंदाची गोष्ट आहे ही की माझ लग्न झाल आहे, पण विशाल सोबत लग्नाचे स्वप्न बघितले मी आणि मी दुसऱ्याच कोणाच्या तरी बेडरूम मध्ये आहे आता त्याची बायको म्हणून मंगळसूत्र गळ्यात घातल आहे, नक्की काय खर ते समजत नाही, रिया परत आत मध्ये येऊन बसली

दुपारनंतर रोहित घरी आला, तो काळजीत होता, रिया काल पासुन जेवली नाही, काय करत असेल? ,चक्कर येत असतिल तिला, तो रियाच्या बेडरूम मधे आला, रिया आरामात बसुन टीव्ही बघत होती, भूक तहान अजिबात नव्हती तिच्या चेहर्‍यावर, फ्रेश दिसत होती, नक्की रिया जेवलेली आहे, रोहित तिच्या बाजूला जावून बसला, काय चाललय रियु? , झाल मग जेवण? , कोणी दिल जेवण? ,

रिया गप्प होती.. काय कटकट आहे, हा संध्याकाळी येणार होता ना, आता काय याच मध्येच

"तुला काय वाटल मला समजणार नाही, बोल कोणी दिल जेवण? रूम लॉक होती चावी माझ्या कडे होती, इथे तू जेवली नाही म्हणून मी कालपासून काही खाल्लं नाही, तू इथे आरामात खाऊन पिऊन टीव्ही बघते आहे",.. रोहित

"का नाही खाल्ल मग तुम्ही? , मला झाली ना शिक्षा, तुम्ही का उपाशी आहात ",.. रिया

" प्रेम नावाची काही तरी गोष्ट ऐकली आहेस का तू कधी रियु? तेच करतो मी तुझ्यावर, तुझी सदोदित काळजी वाटते मला",... रोहित रिया कडे बघत होता, रिया ने एकदम खाली बघितल,

"मला समजून घे रियु, मी जे काही करतो तुझ चांगल होण्या साठी आहे, विश्वास ठेव माझ्यावर",... रोहित ,

रिया ऐकत होती,

" कोणी केली मदत माझ्या बायकोला? , कोणी दिल जेवण? बोल पटपट, नाही तरी तुझा गोड चेहरा बघून हे होणार होत मला माहिती होत" ,... रोहित

"माहिती नाही, कोणी तरी बाल्कनीत जेवण आणि पाणी ठेवल होत" ,.. रियाने मुद्दाम त्या ताईंच नाव सांगितल नाही

"झाल मग खावून ",.. रोहित

हो..

" पाणी कुठे आहे?",.. रोहित

" बाथरुम मध्ये लपवल ",.. रिया

" भीती नाही वाटली माझी ",.. रोहित

" वाटली होती, पण भूक लागली होती ",... रिया

" ठीक आहे, सही करणार का? ",.. रोहित

नाही..

"रियु तुझ्या एका सहीने अनेक मुली वाचू शकतील, माझ्यावर विश्वास ठेव, खरच" ,.. रोहित

"मी सही करणार नाही",.. रिया

रोहित गप्प बसला होता बाजूला,.." ठीक आहे रियु नको करू सही, पण मग तुझ्या बाबांच काय होईल हे मी सांगू शकत नाही ",..

"म्हणजे काय? काय झालं बाबांना? काय करणार तुम्ही बाबां सोबत? का करताय तुम्ही अस? त्यांच वय तर बघा",... रिया

"मी नाही ते पोलिस पकडतील त्यांना, तू सही करत नाही, पोलिस आता विशालला सोडतील, आणि खोटा आरोप केला म्हणून पोलिस तुझ्या वडलांना पकडतील, तुझ्या वडलांनी विशाल बद्दल कंप्लेंट केली होती पोलिसात ",.. रोहित

खर का?

हो...

" आता काय करू या बाबांना काही व्हायला नको ",.. रोहित

रिया विचारात होती, काय करू? एकीकडे वडील.. एकीकडे विशाल, दोघ तितके प्रिय, बाबांना काही झाल तर? पोलिस कसे वागतील त्यांच्या सोबत माहिती नाही, विशाल थोड सहन करू शकतो लॉक अप मध्ये रहाण, बाबा नाही सहन करणार, बाबा किती प्रेम करतात माझ्या वर, माझे प्रिय बाबा... रियाच्या डोळ्यात पाणी होत

"मी सही करते, मला केस काय आहे ते सांगा आधी",.. रिया

"तेवढा वेळ नाही, लवकर सही दे, आल्यावर सांगतो, तुझ्या बाबांना घेवून जाता आहेत पोलिस स्टेशनमध्ये",.. रोहित

मी येवू का?... रिया

नको..

"मला आई बाबांना भेटायच एकदा",.. रिया

"जावू आपण नंतर",.. रोहित

रियाने भरल्या डोळ्यांनी सही केली... I am sorry विशाल

रोहितचा फोन वाजत होता,.. " मी येतो जावून", ,....

" जेवून घ्या", ... रिया

रोहित तिच्या कडे हसून बघत होता.... तो बाहेर निघून गेला

काय झालं आहे नक्की? विशाल असा मुलगा नाहिये, रिया रडत होती, राधा आत आली, रिया बाथरुम मध्ये निघून गेली
.........

रियाला जूने दिवस आठवत होते, तेव्हा तिला घरच्यांची अजिबात किम्मत नव्हती, आई बाबांनी अगदी फुलासारखे जपल होत तिला, पण तेव्हा तिला तोच जाच आहे अस वाटत होत

आई कडे असतांना....
बाबांची लाडकी रिया आठ वाजले तरी उठली नव्हती, आजी देवपूजा करत होती, आई स्वयंपाक करत होती, बाबा ऑफिसला जायचं होतं, टीनाची सकाळची शाळा होती, ती शाळेत गेली होती, रिया कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होती, तिलाही नऊ वाजेपर्यंत कॉलेजला जावं लागायचं

" इथे कामाची एवढी धावपळ आहे आणि रिया तू काय झोपली आहे लवकर उठ",.. आजी ओरडत होती

रियाने अजून कानावर उशी ठेवून झोपून घेतलं,.. पाच मिनिट

"मी तुला सांगते आहे ना सुरेखा तू आज हिचा स्वयंपाकच करू नको खूप लाडवली आहे ही , हिची अशी सेवा केली तर डोक्यावर मिरे वाटेल ही सासूच्या, रियाच पुढच्या वर्षी लग्न करावं लागेल, अजून काही काम येत नाही हिला, मी म्हणते हिची कंप्लेंट येणार आहे, आणि तुम्ही लोकांनी हिला अति लाडावून ठेवलं आहे",.. आजीची बडबड ऐकून रिया उठली

" आजी तुला देवपूजा करताना या सगळ्या गोष्टी का आठवतात? , जरा देवा कडे लक्ष दे ना ",.. रिया

" मला देवाकडे लक्ष दे सांगण्यापेक्षा तू जरा घर कामात लक्ष दे, थोडं काम करून कॉलेजला जात जा, तुझ्या सगळ्या गोष्टी तशाच पडलेले असतात, तुला आयता चहा नाष्टा हातात लागतो, पोरीच्या जातीला हे बर आहे का?, तुझ्या आईची किती धावपळ होते समजत नाही का तुला? ",.. आजी

" सारखं सारखं काही ग आजी तेच, बाबा प्लीज सांगा ना आजीला ",.. रिया अंघोळीला गेली

बाबा कौतुकाने रोजच बोलण ऐकत होते

" हसा तुम्ही लोक हसा एक दिवस हीची कंप्लेन आली ना तेव्हा तुम्हाला माझ्या म्हातारीचा बोलणं खरं वाटेल, पण इथे माझं कोण ऐकत आहे, सांगितलं दोन मुलींच्या पाठीवर एक मुलगा होऊ द्या ऐकलं नाही तेव्हा, आजीची बडबड सुरू होती व सोबत देवपूजा सुरू होती, रोजच होत हे घरात",..

🎭 Series Post

View all