हे प्रेम आहे की काय?... भाग 4

रिया कॉटवर जावून बसली, बघु थोडा वेळ वाट, नाही तर बाथरूमच पाणी पिऊ, आता रियाला रडायला येत होत, एवढ अस कोणी वागल नाही माझ्याशी कधी


हे प्रेम आहे की काय?... भाग 4

©️®️शिल्पा सुतार
........

रिया विचार करत होती कस करून माझी माहिती विशाल पर्यंत द्यायला हवी, की मी इथे फार्म हाऊसवर आहे, पण कस? , मला इथे राहायच नाही, हे लोक काही सुचू देत नाही, रोहित बरोबर कंट्रोल ठेवून आहेत सगळीकडे, माझ इथून निघण अवघड झाल आहे, मला कधी वाटल नव्हत माझ्या सोबत अस होईल, मला वाटायच माझ आयुष्य आहे मी हव तस जगेन, नाही पण अस नसत, कधी काय होईल काही सांगता येत नाही, ती खाली आली,

राधा मागे होती,.. "मॅडम काय हवय? , मॅडम प्लीज रूम मध्ये जा",

रियाने तिच्या कडे दुर्लक्ष केल, ती पेपर पेन शोधत होती, ती रोहितच्या रूम मध्ये आली, राधा बाहेर थांबली

बर झालं म्हणजे ती राधा इथे येत नाही आत, तिने पेपर पेन दिसतो का ते बघितल, पेपर होता, त्यावर एक चिठ्ठी लिहिली

help me.....
मी संकटात सापडली आहे, मला मदत करा, या दोन नंबर वर संपर्क करा, रिया फार्म हाऊस वर आहे अस सांगा ,
गाव कोणत आहे हे.. काय माहिती..
खाली तिच्या वडलांचा फोन नंबर... विशालचा नंबर लिहिला होता,

किचन मधल्या ताईंना देवू का ही चिठ्ठी? की बाहेर जावुन या नंबर वर फोन करून सांगा, इथला पत्ता, हो हे योग्य राहील

पण त्या करतील का मदत? काय करू? हे रोहितला समजल तर? करू दे त्याला राग राग, तो मला काही करत नाही, खूप प्रेम करतो तो माझ्यावर, तो चिडला तरी मी काही तरी नाटक करेन, आता मी फोन केला त्याची शिक्षा त्याने मला दिली नाही, थोडी स्विमिंग पूल मध्ये उडी मारली तर, तस काहीतर करू, आता तिची हिम्मत वाढली होती , ती रूम बाहेर आली,

राधा होती मागे,... काय हव मॅडम?

ती राधाशी बोलली नाही, रिया किचन कडे जात होती

"मॅडम रूम मध्ये जा, प्लीज मॅडम नका जावू तिकडे, मला सरांना फोन करावा लागेल",.. राधा

"कर फोन राधा... मी घाबरत नाही, आणि माझा पिछा करायचा नाही सांगून ठेवते" ,... रिया,

राधा घाबरली थोडी,

रिया तरी किचन मधे गेली, कोणी नव्हत तिथे, कुठे गेल्या आता या बायका? काय यार नेमक आपल्यात काम असल की कोणी भेटत नाही, ती रूम मध्ये येवून बसली, राधा बाहेर बसली होती,

संध्याकाळी नक्की आल्या असतील त्या बायका, किचनमध्ये त्यांना काम असतं, रिया बाहेर आली, राधा बसलेली होती बाहेर, रियाला बघून ती अलर्ट झाली, रिया किचन मध्ये गेली, दोन बायका तिथे काहीतरी काम करत होत्या, राधा येऊन किचनच्या दारात उभी राहिली

" मला चहा करायचा आहे",.. रिया

" तुम्ही रूम मध्ये जा मॅडम, मी करून आणते चहा",.. एक बाई बोलली

"नाही मला माझ्या हातचा चहा हवा आहे",.. रिया

"मॅडम प्लीज चला आत मला सर ओरडतील, ताई तुम्ही चहा करून आणा, चला रूम मध्ये मॅडम",.. राधा

तरी रिया किचन मध्ये उभी होती

"मॅडम प्लीज रूम मध्ये चला नाहीतर मला तुम्हाला उचलून घेऊन जावं लागेल, I am serious ",.. राधा

रिया रागाने राधा कडे बघत होती, ती रूम मध्ये आली सोफ्यावर बसली होती, एक बाई चहा घेऊन आली, आज दुसरी बाई होती, जरा हसरी होती , दरवाजा बंद होता, रियाने तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला,.." कुठे राहता तुम्ही? ",

" इथे बाजूच्या गावत ",..

" मला एक काम होतं तुमच्याशी कोणाला सांगू नका तुम्ही मला मदत करणार का",.. रिया

ती बाई काहीही बोलली नाही..

" हे बघा तुम्ही घाबरू नका, मला मदत करा, मी लहान बहिण आहे तुमची, मी संकटात आहे मला मदत करा",.. रिया रडत होती,

त्या बाईने आजूबाजूला बघितलं, बोला काय काम आहे मॅडम, तुम्ही रडू नका होईल नीट सगळ

" तुम्ही या बंगल्याबाहेर जाता का? ",.. रिया

" हो जाते ना कधीतरी संध्याकाळी",..

" आज काहीतरी काम करून बाहेर जा आणि ह्या चिठ्ठी वर फोन नंबर दिला आहे तिथे फोन करा आणि सांगा मी इथे फार्म हाऊसवर आहे",.. रिया

ती बाई विचार करत होती काय करायचं,

"ताई प्लीज मदत करा मला घरी जायचं आहे, हा नंबर माझ्या वडिलांचा आहे ",.. रियाने तिच्या हातातली एक सोन्याची बांगडी काढून त्या बाईला दिली, प्लीज मदत करा, त्या बाईने ती सोन्याची बांगडी आणि चिठ्ठी घेतली, ती पटकन बाहेर निघून गेली

जरावेळ काहीच आवाज आला नाही, म्हणजे राधाने त्या बाईला चेक केलं नाही, चला आता ती बाहेर गेली म्हणजे ती घरच्यांना फोन करेल, विशाल कुठे आहे काय माहिती? माझी इथून सुटका होत नाही तो पर्यंत काही समजणार नाही, रिया खुश होती , ती बाई एवढ्याच बंगल्याबाहेर गेली असेल कारण थोड्या वेळापूर्वी तिने किचनमध्ये जाऊन बघितलं होतं तर ती बाई नव्हती

संध्याकाळी रोहित ऑफिस होऊन आला, बाहेर हॉलमध्ये बसून रिया पुस्तक वाचत होती, राधा समोर बसली होती, रोहित आला तरी तिचं लक्ष नव्हतं, आज छान वाटत होत तिला

रोहितने समोर येऊन तिच्या पुस्तकावर सोन्याची बांगडी ठेवली, ती तीच बांगडी होती जि तिने त्या बाईला दिली होती

रिया दचकली, तिला समजून गेलं काय समजायचं ते, म्हणजे नक्कीच रोहितला माझी चिठ्ठी सापडली असेल, बरं झालं जास्त लिहित नव्हत त्यात, तिने वरती बघितलं रोहित समोर उभा होता, आता काही खरं नाही माझं, काय होईल?

रोहितने रियाचा हात धरला त्यात तिची बांगडी तिला घालून दिली, समोर राधा बसलेली होती, त्या बाजूला रोहितचा बॉडीगार्ड उभा होता, किचन मधली बाई रोहित साठी पाणी घेऊन आली होती, रिया स्वतः रोहित काय बोलतो त्याकडे बघत होती

रोहितने इशारा केला, त्याचा बॉडीगार्ड बाहेर चालला गेला, राधा बाहेर जाऊन बसली, किचन मधल्या बाई आत चालली गेल्या, आता हॉलमध्ये ती आणि रोहित होते, रोहित रिया कडे रागाने बघत होता, रिया गप्प होती

रोहित पुढे आला रिया जवळ बसला, रिया गप्प होती, त्याने हाताने विचारल तिला काय हे? , रिया घाबरून गेली होती,

"मी सांगितल होत रियु अस करु नको, काय करू या आता तुझ? , किती मोठी चूक केली आहेस तू माहिती आहे का तुला? , एक तर तुला तुझ चांगल वाईट समजत नाही, त्यात तू हट्टी आहेस, किती चुका करणार आहेस रोज? मी तुला सांगतो अस करु नकोस, मी किती चांगल वागणार तुझ्याशी, आज सकाळ पासून तू किती त्रास दिला आहेस मला, तू विचार कर हे योग्य आहे का? , काल मी तुला सांगितल होत तू नीट नाही वागली तर मी दिलेल वचन मोडेल, तूच सांग आता काय करायचं? ",... रोहित तिच्या कडे बघत होता

रियाच्या हातातुन पुस्तक खाली पडल, ती काही बोलली नाही

रोहितने रियाला उचलला तो तिला बेडरूममध्ये घेऊन आला, रिया प्रचंड घाबरलेली होती, रोहितने रूम लॉक केली ,

एवढी मोठी चूक झाली, आता काय होईल काय माहिती? काय शिक्षा होते आता, कोणत ही कारण चालणार नाही, माझ काही खर नाही, ती बाई किती मूर्ख आहे तिला नुसतं नीट बाहेर जाता आलं नाही,.. रिया विचार करत होती ,

रोहित तिच्या कडे येत होता,

"रोहित मला बोलायच आहे, एक मिनिट, माझ म्हणण ऐकुन घ्या प्लीज" , ... रिया

"बोल रियु आता काय म्हणण आहे तुझ" ,.. रोहित

"मला नाही राहायच इथे मला घरी जायचं आहे, तुम्ही का अश्या मुली सोबत राहताय जिला प्रेम नाही तुमच्या वर " ,... रिया

" काही उपयोग नाही आता हे बोलून रियू, तू माझी बायको आहेस, मनापासून तुला आपल मानतो मी" ,.. रोहित

" हे नात एका बाजूने आहे तुम्ही अस नाही करू शकत माझ्या सोबत ",.. रिया

" तू काहीही बोलल तरी मला फरक पडत नाही रियु, काय प्रकार आहे हा? का केल तू अस? तुला काहीही वाटु दे तुला माझ्या सोबत राहायच आहे आता या पुढे, तुला भीती नाही वाटली का माझी असे उद्योग करतांना ? , कारण मी तुझ्याशी फार प्रेमाने वागतो आहे, माझ्या चांगुलपणाचा तू जास्त फायदा घेत आहेस, आज नाही सोडणार मी तुला, चांगला धडा शिकवणार आहे, परत या घरा बाहेर पडायची तुझी हिम्मत होणार नाही",... रोहित

"माझ मन नाही या लग्नात मला आई कडे सोडून द्या प्लीज",... रिया

"ते शक्य नाही रियु तू हो म्हण की नाही आता आपण एकत्र राहणार आज पासून",... रोहित

रिया घाबरून रोहित कडे बघत होती, रोहित पुढे आला, त्याने तिला कॉटवर ठकलल, रिया खाली पडली, ती मागे सरकत होती, रोहित समोर उभा होता, प्रचंड भिती रियाच्या डोळ्यात होती, काय होईल आता, ती उठून पळत होती रोहितने तिचा हात धरून ठेवला, प्लीज मला जावू द्या,

"शांत हो रियु, किती ही धडपड केली तरी मी ऐकणार नाही",.. रोहित

रोहितचा फोन वाजत होता, आधी रोहितने लक्ष दिल नाही फोन कडे, परत दुसर्‍यांदा फोन वाजला, रोहितने बघितल घरून फोन होता, रिया या कॉट वरून उठली तर बघ मी पाच मिनिटात फोन घेवून येतो,

रोहित फोन घेवून बाहेर निघून गेला, रिया तिथे बसुन होती तिची हिम्मत नव्हती आता उठायची, पळून पळून तरी कुठे जाणार, तिच्या रूमला कडी नव्हती, बाहेर दोन बॉडी गार्ड होते, सगळे लोक रोहितच्या इशाऱ्यावर नाचतात, काय शिक्षा मिळेल मला? बापरे कठिण आहे, मला रोहित नको आहे जवळ आलेला,

थोड रडते म्हणजे रोहित काही करणार नाही, नाही तर आज माझ काही खर नाही,

रोहितने फोन उचलला,.. "बोल आई",

"काय करतो आहेस रोहित? दोन तीन दिवस झाले फोन नाही तुझा",..

"आई अग बिझी होतो मी",.. रोहित

"तू ठीक आहेस ना? लग्न मोडल्यावर लगेच निघून गेला तू घरातून, कामात आहेस का जास्त?",..

हो आई..

"बाबा कसे आहेत? आजी कशी आहे? पिंकी कशी आहे?",.. रोहित

"सगळे ठीक आहेत, दुःखी आहेत",..

" तुम्ही का दुःखी होतात, ठीक आहे मी ",.. रोहित

" घरी कधी येतोस ",..

" हो येईन लवकर, आई मी जरा कामात आहे मी करतो फोन नंतर ",.. रोहित

ठीक आहे...

रोहितने रियाशी इकडे लग्न झाल ही बातमी लपवून ठेवली,

फोन वर बोलून रोहित आता आला, रिया कॉटवर बसूनच होती तिचे डोळे रडून रडून लाल झालेल्या होते, रोहित तिच्या जवळ आला, तिने प्रतिकार केला नाही, ती खाली मान घालून रडत होती ती , रोहितला वाईट वाटले, रियु काय हे किती त्रास करून घेतेस,

भोळी आहे ही तिला काय माहिती तो विशाल कसा आहे, आता सांगून उपयोग नाही म्हणून ती इथून सुटकेचा प्रयत्न करते आहे, जावू दे हिच्यावर जबरदस्ती करून उपयोग नाही, ती हट्टी आहे, तिला प्रेमाने जिंकेन मी तिला, त्याने रियाचा हात धरला तिच्या ओढणीने तिचे हात कॉटला बांधले बस आता इथेच तुला जेवण पाणी मिळणार नाही इथुन उठायचं नाही, तुला सगळी कडे जायची सूट दिली तर तू जास्त करते

रोहित बाहेर निघून गेला तो बाहेर आल्यामुळे राधा आणि स्वयंपाक घरातल्या ताई बाहेर आल्या,... "मी सांगितल्याशिवाय रूम मध्ये जेवण आणि पाणी द्यायचं नाही",..

"राधा इकडे ये या रूमच्या दाराशी बस, इथे अजिबातच कोणालाच आत सोडू नको, रिया कडे लक्ष ठेव, तिने एवढी चिठ्ठी पाठवली, तू काय करत होती घरात? कशाला ठेवला आहे तुला इथे कामाला? नुसती दिवसभर बसलेली असते तू",.. रियाचा राग रोहितने आता असा काढला होता

अर्धा एक तास झाला , कुणी आलं नव्हतं रूम मध्ये, थोडसं रडल्या मुळे आता रीयाला तहान लागली होती, तिचे हात बांधलेले होते, ते ही सहज काढू शकत होती पण नेमका रोहित आला तर काय करणार तो ओरडेन खूप, तो जवळ येण्यापेक्षा हे अस बांधलेले बर, बराच वेळ झाला होता ती तशी बसुन होती, आज जेवण नाही वाटत? बाथरूमला जायच आहे, रोहित कुठे आहे, काय माहिती

रोहित हॉल मध्ये बसुन होता, काय कराव म्हणजे रिया ऐकेल थोड तरी, तो नाराज होता, घरचे घरी बोलवत आहेत, इकडे रियाला एकट सोडून जाता येणार नाही, किती उपद्व्याप करते ही, माझ ही ऐकत नाही, त्यांना सांगितल नाही अजून लग्नाच, काय करू, रियाला बांधल आहे आपण, तिला भूक लागली असेल, जावू दे लागु दे, आज सोडायच नाही,

"साहेब जेवायला वाढू का?",..

"नको मावशी जा तुम्ही आराम करा",.. रोहित

मॅडम...

"तिला नाही द्यायच काही",.. रोहित

"पण मॅडमला सात वाजता भूक लागली होती, मी त्यांना खायला देणार तेवढ्यात तुम्ही आले तेव्हा, थोड तरी द्या त्यांना काही तरी खायला",..

रोहित त्या बाईं कडे बघत होता

" म्हणजे माफ करा",.. ती आत चालली गेली, तिने डायनिंग टेबल वर जेवण झाकून ठेवल

रोहित उठला आत आला रिया गप्प बसली होती तिचे हात अजून बांधलेले होते, रोहित ला बघून ती नीट बसली, मला बाथरूम ला जायच आहे प्लीज, मला पाच मिनिट सोडा,

रोहितने तिचे हात सोडले ती फ्रेश होवुन आली, पाणी नव्हत रूम मध्ये, खूप तहान लागली होती, रोहित सोफ्यावर बसला होता, पाणी हव आहे

"नाही आहे पाणी",.. रोहित

"प्लीज खूप तहान लागली आहे",.. रिया

"मी काय करू मग",.. रोहित

रिया कॉटवर जावून बसली, बघु थोडा वेळ वाट, नाही तर बाथरूमच पाणी पिऊ, आता रियाला रडायला येत होत, एवढ अस कोणी वागल नाही माझ्याशी कधी, आई बाबा आजी टिना, विशाल, कॉलेजचे मित्र मैत्रीणी किती कौतुक होत माझ सगळीकडे

थोड्या वेळाने ती तशी बसली, रोहित अजून टीव्ही बघत होता, रिया उठली तिने रूम बाहेर जाण्याचा प्रयत्न केला, रूम लॉक होती,... "रियु काॅटवर वर बस उठू नको तिथून",

"मला पाणी हव आहे",.. रिया

रियु मला राग येतो आहे

"मला कसतरी होत, प्लीज मला पाणी द्या" ,.. रिया

"बर झाल आठवल एक काम आहे तुला पाणी जेवण हव का रियु?",..रोहित

हो.. रिया आशेने बघत होती..

🎭 Series Post

View all