हे प्रेम आहे की काय?... भाग 3

बर वाटत का रियु, चल जेवून घे मग आराम कर",.. रिया रोहित सोबत खाली आली , दोघांना सूप दिल आधी, रियु हे पी आधी, त्रास नाही झाला तर जेव



हे प्रेम आहे की काय?... भाग 3

©️®️शिल्पा सुतार
........

जेवण झाल, रोहित सोफ्यावर बसून टीव्ही बघत बसला होता , रिया समोर बसलेली होती

"रियु इकडे ये" ,... रोहितच्या हातात एक बॅग होती

"यात काही ड्रेस आहेत तुझ्या मापाचे ",.. रोहित

रियाने बॅग घेतली, हा कुठे राहणार आहे आता, की माझ्या सोबत राहील हा ? ओह माय गॉड आज पहिली रात्र, काही करणार तर नाही ना हा मला, काही सांगता येत नाही रोहितच, विचार करून रियाचे हात थरथरत होते, ती बॅग घेवून तिथे उभी होती

" इकडे ये रियु बस इथे, मला बोलायच आहे तुझ्याशी, नंतर जा रूम मध्ये ",.. रोहित

ती जावून रोहित समोर बसली

"मला माहिती आहे तुझ्या मनात खूप प्रश्न आहेत, काय चाललय हे सगळ, पण तुला सगळ्या प्रश्नांचे उत्तर वेळेवर मिळतील, आता मी काही जरी सांगितल तरी तुझा विश्वास बसणार नाही, फक्त एवढ सांगतो तुला माझ्या पासून काही धोका नाही आणि मला तुझ्यावर कसली जबरदस्ती करायची नाही, तू जो पर्यंत हो बोलत नाही मी तुला हात लावणार नाही, पण याचा अर्थ असा नाही की इथून पळून जायच किवा मला त्रास द्यायचा, चुकीच वागली तू तर मी आता तुला दिलेल वचन तोडून टाकेन आणि तुला माहिती आहे मी काहीही करू शकतो",.. रोहित

रियाला एका गोष्टीच समाधान होत की चला रोहित पासून भीती नाही आपल्याला

" मी कुठे झोपू",.. रिया

" वरच्या बेडरूम मधे झोप ",.. रोहित

ठीक आहे.. मी जाते

रिया वरती गेली, तिने दार लावून घेतल, एकदा खात्री केली नीट बंद आहे ना दार

ती ड्रेस घेवून बाथरूम मध्ये गेली, आता ती रूम नीट बघत होती, किती मोठ बाथरूम होत अगदी आपल्या घरापेक्षा मोठ बाथटब कॅन्डल सगळ, खूप छान अगदी फाईव्ह स्टार हॉटेल पेक्षा जास्त, तिने दुसरा ड्रेस घातला, ती आवरुन बाहेर आली,

तिला आता बर वाटत होत, चला मला आता धोका नाही, हळु हळु विचारेल मी रोहितला की विशाल कुठे आहे? आई बाबा टिना काय करत असतिल? मी धोका दिला त्यांना, पळून तर मी विशाल सोबत गेली होती, आता मी रोहित सोबत आहे, मध्ये काय झाल अस? विचार करता करता रिया झोपली,

रिया सकाळी उठली, ती आत बसली होती दारावर टकटक झाली, रियाने दार उघडाल, रोहित आला होता तो ऑफिस ला जायला तयार होता, ब्लॅक पँट व्हाइट शर्ट ब्लेझर कोट मध्ये तो अतिशय हॅन्डसम दिसत होता, रिया दोन मिनीट त्याच्या कडे बघत बसली

"माझी कॉफी बनव रियु, मला उशीर होतो ऑफिसला जायला",.. रोहित

"किचन मधे जाव लागेल का? ",.. रिया

हो..

रिया बाहेर आली डायनिंग टेबलच्या बाजूला काल ती बाई गेली होती त्या बाजूला किचन होत, ती बरोबर आत गेली दोन तीन बायका स्वयंपाक घरात काम करत होत्या,

कॉफी बनवायची आहे मला" ,.. त्या बाईनी सगळ सामान काढून दिला रियाने कॉफी तयार केली, ती कॉफी घेवून बाहेर आली, त्या बाईनी नाश्ता वाढला, रोहित फोन मध्ये बघत नाश्ता करत होता,

"आधी खावून घ्या ना नीट, नंतर काम करा",.. रिया

रोहित रिया कडे बघत होता, त्याने फोन बाजूला ठेवला, तू बोललीस ना बास मग, अजून काही रियु..

"नाही... सॉरी म्हणजे माझी आई बोलते अस" ,.. रिया

"मी ऑफिसला जातो आहे घराबाहेर जाण्याचा प्रयत्न करू नकोस, नाहीतर माझ्याहून कोणी वाईट नाही, चूक झाली तर, काल जी मी तुला सुट दिली ती विसरून जाईल मी, Ok so be good girl चूक करू नकोस, मी येतो लवकर काही लागल तर या बाई आहेत त्यांना सांग उगीच माहिती विचारू नकोस",.. रोहित

रिया रोहित कडे अपेक्षेने बघत होती

" काही हव आहे का तुला रियु? ",.. रोहित

" मला एक फोन करायचा होता, पाच मिनिट मोबाईल मिळाला असता तर बर झाल असत",.. रिया

" कोणाला करायचा फोन? ",.. रोहित

" माझ्या घरी, आई बाबांना",.. रिया

" त्यांची एवढी काळजी असती तर तू अशी घरातून पळाली नसती, त्यांना त्रास दिला नसता असा , आता काय करणार बोलून त्यांच्याशी ",.. रोहित

" प्लीज माझे आई बाबा काळजीत असतिल, एकदा बोलू द्या फोन वर प्लीज ",.. रिया

"नाही काही गरज नाही ",.. रोहित

रोहित ऑफिसला निघून गेला, रियाच्या डोळ्यात पाणी होत, ती तिथे बसली विचार करत

बापरे म्हणजे याला माझी पूर्ण माहिती आहे तर, नक्की काय सुरु आहे समजत नाही, लग्न ठरल्यावर ही आम्ही विशेष बोललो नव्हतो तेव्हा, मग हे कस समजल?

आई बाबांना माहिती असेल का मी रोहित सोबत आहे ते? काय करू आता, मी जर या घराबाहेर गेली तर माझ काही खर नाही, मग इथे बसुन कस समजेन की काय झाल नक्की? , किती मोठ फार्म हाऊस आहे हे, बाहेर जायला दोन तीन गेट आहेत आणि ते सिक्युरिटी गार्ड खूप डेंजर आहेत

ती तिच्या खोलीत आली, आता तिला खूप रडायला येत होत, आई बाबा मला माफ करा, काय कमी केल होत त्यांनी मला तर मी हे अस वागली त्यांच्याशी, किती वेळा ते बोलत होते विशाल चांगला मुलगा नाही, म्हणून मी घर सोडलं पण आता हे नवीन संकट उभ राहिली आहे, आई बाबा मला घरी यायच आहे

रियाने आंघोळ केली, ती बाल्कनीत येवून बसली काहीच करमत नव्हत, टीव्ही बघु का? काय करू? फोन नाही, माझा मोबाईल कुठे आहे काय माहिती , तिला लॅण्ड लाइन दिसला होता हॉल मध्ये, काय करू एकदा लावून बघू का बाबांना फोन, रोहितला समजल मी फोन वापरला तर तो सोडणार नाही मला, अशी सुटका नाही माझी, बघते फोन करून,

ती बाहेर आली, हॉल मध्ये कोणी नव्हत , ती फोन जवळ गेली, बाबाचा नंबर तिला पाठ होता, फोन हातात घेतला तर डायल टोन नव्हती, समोरून एक ऑपरेटरने फोन उचलला, हॅलो बोला,

"मला फोन लावायचा होता",.. रिया

"सॉरी मॅडम ते शक्य नाही मला रोहित सरांना विचाराव लागेल",...

"एक मिनिट, नका विचारू त्यांना, सांगू नका मी फोन वापरला ते, सॉरी",.. रिया घाबरली होती, उगीच हात लावला फोन ला

रिया हॉल मध्ये उभी होती, मस्त आहे घर याच, एका बाजूला रोहितचे फोटो होते, काही फोटोत तो फॅमिली सोबत होता, कुठे आहे त्याच्या घरचे? इथे कोणी नाही, मला मुद्दाम फार्म हाऊस वर ठेवल की काय त्याने, की तो इथे रहातो, फॅक्टरी ऑफिस कुठे आहे, जावू दे पण कोणाला विचारणार, काहीही केल की शिक्षा मिळते इथे,

ती बेड रूम मध्ये गेली, एक बाई आत आल्या,.. तुमचा फोन आहे मॅडम

रिया प्रचंड घाबरली, काही खरं नाही आता, रोहितचा फोन असेल, नक्की त्या ऑपरेट ने माझ नाव सांगितल असेल, ती बाहेर गेली तिने फोन उचलला

"रियु मी सांगितल होत तुला चुका करू नको, कोणाला फोन लावायचा होता तुला, मी आल्यावर बघतो तुझ्या कडे जरा ",.. रोहित

"सॉरी एक चान्स द्या, मी परत चूक करणार नाही, मी उगीच फोन उचलून बघितला होता",.. रिया

"तुला चांगल सांगून समजत नाही का? , उगीच फोन ला हात लावणारी एवढी साधी आहेस का तू? ",.. रोहित

रिया गप्प होती..

" या पुढे जर फोन ला हात लावला तर बघ, आणि या चुकीची तुला काय शिक्षा द्यायची याचा विचार करून ठेव, कारण मी माझ डोक वापरल तर तू गेली समज, मला जास्त चिडायला लावू नको, रूम च्या बाहेर जावू नकोस",... रोहितने रागाने फोन ठेवला

रियाने फोन ठेवला ती रूम मध्ये येवून बसली, तिचे हात थरथरत होते, रोहित खूप चिडला आहे आज नक्की तो मला काहीतरी करेन, मला नाही जगायचं, मी नाही रहाणार इथे ती रडत होती, तिने रूमच दार घट्ट लावून घेतल, दुपार झाली बाई जेवण घेवून आली, ती रियाच दार वाजवत होती रिया ने दार उघडल नाही, त्या बाईने सिक्युरिटी गार्डला सांगितल, त्याने रोहितला फोन केला,

"काय प्रॉब्लेम आहे एक एक, दार तोडा ते मी आलोच जरावेळाने , थोड काम आहे",.. रोहित

सिक्युरिटी गार्ड दार तोडत होते,

थांबा..... रिया ने दार उघडल,.. काय प्रॉब्लेम आहे, थोड शांत राहू देत नाही

"मॅडम तुम्ही दार उघडत नव्हता" ,...

" leave me alone",.. रिया ओरडली

"मॅडम तुम्हाला दार लावता येणार नाही सर नाही बोलले",..

वैताग आला आहे सगळ्या गोष्टीचा, मला जगायचं नाही, तिने बघितल होत मागच्या बाजूने एक स्विमिंग पूल होत, रिया पुढे पळत होती सिक्युरिटी गार्ड मागे होते, तिने पळत जावून पाण्यात उडी मारली, ती गटांगळ्या खात होती, तेवढ्यात एक धिप्पाड मुलीने स्विमिंग पूल मध्ये उडी घेतली, रियाला बाहेर काढल, रियाच्या नका तोंडात पाणी गेल होत, ती अस्वस्थ झाली होती, घरातले सगळे घाबरून गेले होते, त्या मुलीने रोहितला फोन केला, मॅडमने स्विमिंग पूल मध्ये उडी मारली

"कशी आहे रिया, ओह माय गॉड, तुम्ही सगळे एवढे बॉडी गार्ड काय करता घरात, डॉक्टरांना बोलव लगेच, पाच मिनिट रियाला एकट सोडू नका",.. रोहित

रोहित लगेच घरी यायला निघाला, स्विमिंग पूलच्या बाजूच्या रूम मध्ये रिया पालथी झोपली होती, एक डॉक्टर आलेले होते , ते रियाला तपासात होते, ती रडत होती,

रोहित आला, रिया कुठे आहे,

डॉक्टर येवून भेटले,... " ठीक आहे मॅडम काहीही झाल नाही, इंजेक्शन द्याव लागेल एक" ,

ती मुलगी अजून रिया जवळ होती, रोहित आला तशी ती मुलगी बाहेर गेली, रोहितने रियाला उचलल बेडरूम मध्ये घेवून आला,

मला सोडा... रिया ओरडत होती,

"शांत रहा रियु, काय करते तू अस? " ,... रोहित

रिया तिथे उभी होती

" जा आधी हे ओले कपडे बदल, रिया तू ठीक आहेस ना, अस नाही करायच, काय झालं मला सांग",... रोहित

रिया काही बोलली नाही

"आटोप काढ ते ओले कपडे, दार लावू नको मी नाही येणार आत",.. रोहित

एक बाई कपडे घेवून आल्या

रिया ने ड्रेस बदलला, ती तिथे कॉट वर बसली होती रोहितच्या रूम मध्ये, रोहित आत आला, डॉक्टर सोबत होते,

डॉक्टरांनी एक इंजेक्शन दिल, don\"t worry मॅडम आराम करा, अर्धा तासाने सूप वगैरे काही द्या यांना, नंतर हलका आहार घ्या, ते निघून गेले,

रोहित रिया जवळ बसला, रिया उठत होती,.. झोप रियु इथे ,

"नाही मला जायच आहे माझ्या रूम मध्ये",.. रिया

"थांब इथे मी काही करणार नाही तुला, झोप थोडी" ,.. रोहित

" मला घरी जायचं आहे" ,... रिया रडत होती,

रोहित तिच्या जवळ आला, त्याने तिला मिठी मारली, पुरे आता हट्ट रियु काय हे, त्याने त्याच्या फोन दिला रियाला... हे घे बोल तुझ्या बाबांशी

रियाने नकार दिला, मला नाही करायचा फोन, मला कोणाशी बोलायच नाही,

रिया तिथे झोपली जरा वेळ, रोहित बाजूला बसुन ऑफिसच काम करत होता, त्याने बघितल रियुचे केस खुप ओले होते, रोहित टॉवेल घेवून आला, तिचे केस तो पुसत होता,

रिया उठली ती झटकन मागे झाली, ती पटकन टॉवेल घेवून तिच्या रूम मध्ये निघून गेली,

"अजिबात सुटका नाही माझी इथून, ती मुलगी कोण आहे जिने मला पाण्यातून बाहेर काढल? आता तिला ठेवल का माझ्यावर लक्ष् द्यायला" ,... रिया चिडली होती

थोड्या वेळाने एक माणूस आत आला, त्याने रियाच्या रूमची कडी काढून टाकली,

"काय करता आहेत तुम्ही? कडी का तोडताय प्लीज अस नका करू, तुम्ही जा इथुन",.. रिया

तो माणूस त्याच काम करत होता, दोघी तिघी लॉक त्याने तोडून टाकले,

रिया बाहेर आली, रोहित त्याच्या रूम मध्ये लॅपटॉप वर काहीतरी करत होता,

"हे बघा आता अति होत आहे, माझ्या रूमची कडी का काढून टाकली तुम्ही? ",.. रिया

रोहित गप्प होता,

" प्लीज बोला, थांबवा हे काम",.. रिया

"तुझ्या सिक्युरिटी साठी, नको कडी, म्हणजे तू दार लावून आत बसणार नाही, आम्हाला काळजी वाटते" ,.. रोहित

काम करणारे काका खाली आले,.. झाल काम साहेब

" बाथरूमची कडी तोडली का काका ",.. रोहित

नाही साहेब..

"नका तोडू, प्लीज राहू द्या ती कडी.. रोहित प्लीज, मी या पुढे अस दार लावून नाही बसणार ",... रिया

काका रोहित कडे बघत होते, राहू द्या काका ती कडी, तुम्ही जा, आज पहिल्यांद माझ्या रियूने माझ नाव घेतल रोहित अस, तीच ऐकाव लागेल मला,

रिया रागाने रूम मध्ये आली, काय कटकट आहे, काय रियू रियू करतो हा, असा राग येतो रियु ऐकल की, आता कडी नाही दाराला, omg, रात्री झोपेत रोहित आत आला तर? , विचार करून तिला धस्स झाल तिला, झोपायची शांती नाही आता इथे, ती जरा वेळ पडली, खूप थकली होती ती

रोहित आत आला, त्याने बघितल रिया झोपलेली होती, तो तिथे सोफ्यावर बसुन काम करत होता, जरा वेळाने रिया उठली, रोहित ला बघून ती दचकली, हे अस होईल आता, हा का आला माझ्या रूम मध्ये

"बर वाटत का रियु, चल जेवून घे मग आराम कर",.. रिया रोहित सोबत खाली आली , दोघांना सूप दिल आधी, रियु हे पी आधी, त्रास नाही झाला तर जेव

रिया ने सूप पिल, थोडी खिचडी खाल्ली,

दोघ सोफ्यावर बसले होते, ती धिप्पाड मुलगी समोर उभी होती,

" राधा इकडे ये, रियु ही राधा तुझी बॉडी गार्ड, राधा लक्ष दे मॅडम कडे, एक मिनिट तिला एकट सोडु नकोस, काही प्रॉब्लेम असला तर मला फोन कर, तुझ्या कडे आहे ना माझा नंबर" ,... रोहित

रिया ऐकत होती सगळ, किती बोर आता ही राधा मागे मागे येईल का माझ्या , जगू देत नाही मरू देत नाही, राधा मला इथून पळून जावू देणार नाही,

रिया रूम मध्ये आली, ती कॉट वर बसली होती, रोहित आत आला मी ऑफिस ला जातो तू आराम कर, या घराबाहेर जायचा विचार करू नको, उपयोग नाही काही, आजुबाजूला सगळ आपल फार्म आहे, सिक्युरिटी आहे सगळीकडे, चूक करू नको, रोहित गेला,

रिया ने कॉटवर अंग टाकल, आता ती खूप रडत होती, विशाल.... विशाल.... आई... बाबा...

🎭 Series Post

View all