हे प्रेम आहे की काय?... भाग 1

आता रियाचा धीर सुटला, ती खाली बसली, तिने लावलेल कुंकू रागाने पुसल, ती खूपच रडायला लागली, विशाल कुठे आहेस तू


हे प्रेम आहे की काय?... भाग 1

©️®️शिल्पा सुतार
........

एका बंगल्यातल्या मोठ्या आलिशान बेडरूम मध्ये रिया झोपलेली होती, म्हणजे ती बेशुद्ध होती, तिला थोड्या वेळाने जाग आली, तिने डोळे उघडले ,अचानक उठून बसली ती , डोक जड झाल होत तीच, मी कुठे आहे? , ही कोणती जागा आहे? , काय प्रकार आहे हा? ,कशी बशी ती उठून बसली, कोणी आहे का इथे? तिने आवाज दिला , कोणीही उत्तर दिल नाही, कुठे आहे मी?, विशाल कुठे आहेस तू?

रात्रीचा वेळ कसा तरी निघून गेला, विशाल कुठे गेला, मी कुठे आहे? बाजूला पाण्याची बॉटल ठेवली होती त्यातून ती पाणी पिली, भूक लागली होती खुप, काय करणार पण, रिया मध्येच उठली, फिरून तिने रूम बघितली, मोठी प्रशस्त रूम होती,

कोणाच घर आहे हे? कोणी आहे का घरात?, तिने परत आवाज दिला , अजून कोणी आत आल नाही , बाहेरून रूम लॉक होती, काय प्रकार आहे हा? , ती चिडली होती, रूम ला लागूनच एक बाल्कनी होती, ती ही ग्रिल लावून बंद केली होती,

रिया जरा वेळ बाल्कनी मध्ये जावुन उभी राहिली, आता बर्‍या पैकी उजाडल होत, बाहेरच्या गार वार्‍याने तिला फ्रेश वाटत होत, आजूबाजूचा परिसर खूप छान होता, सुरेख लाॅन, बरेच फुलझाडे दिसत होते, पण कोणीच मनुष्य नव्हता आजूबाजूला, शेत होते सगळीकडे,

मी इथे कशी आली? कोणती जागा आहे ही ? काल नेमक काय झाल? ती विचार करत होती, विशाल कुठे आहे? , माझा फोन कुठे आहे, आता तिला रडायला येत होत, रात्रभर कोणी आल नाही रूम मध्ये, सकाळी कोणीतरी रूमचा दरवाजा वाजवला, एक बाई आत मध्ये आली, तिने चहा नाष्टा रूममध्ये ठेवला,

कोण आहात तुम्ही? हे कोणते ठिकाण आहे? मी इथे कशी आली? बोला ना माझ्याशी, एक मिनिट

ती बाई काहीच बोलली नाही, मागे वळूनही बघितलं नाही तिने, ती सरळ खाली निघून गेली,

हॅलो बोला काहीतरी.. कोण आहात तुम्ही? मी इथे कशी आली?

रिया तिच्या जागेवर जाऊन बसली, काय कराव आता?, विशाल कुठे आहे, विशाल... विशाल..... कुठे बाहेर गेला का हा? काही कामानिमित्त गेला असेल , तिने तिचा फोन शोधला, फोन नव्हता जवळ, अस रूम लॉक का केली त्याने,

मी विशाल सोबत होती काल, आम्ही छान डिनरला बाहेर जाणार होतो, त्या नंतर मला काही आठवत नाही, मग मी इथे कशी? कोण आहे ही बाई? हा बंगला कोणाचा आहे? , काही प्रॉब्लेम तर नाही ना?

आता ति रडायवर आली होती , विशाल कुठे आहेस तू?, मी कुठल्या संकटात आहे का?, आई, बाबा, टिना, आजी सगळ्यांची आठवण येत होती, आज संध्याकाळी आम्ही घरी जाणार होतो दोघ आई बाबांना भेटायला, विशाल आल्यावर समजेल नेमक काय झालं काल,

खाली गाडी थांबल्या सारखा आवाज आला, विशाल आला वाटत .... रिया खुश होती, ती बाल्कनीत गेली, खाली दोन पॉश काळ्या गाड्या थांबल्या, एका गाडीतून बॉडी गार्ड उतरले, मागच्या गाडीतून एक अतिशय हॅन्डसम माणूस खाली उतरला, कोण आहे हा? चेहरा नीट दिसला नाही,ओह माय गॉड, हा तोच आहे ? रोहित... बापरे हा काय करतो आहे इथे?

माझ लग्न ठरलं होत याच्या सोबत, विशाल साठी मी लग्नातुन पळुन गेले, हा इथे काय करतो आहे? काय आहे हा प्रकार, विशालचा मित्र नाही ना हा रोहित ? , विशाल कुठे आहे, विशाल.....आता रिया घाबरली होती

तिच्या रूमचा दरवाजा वाजला , रोहित आत आला, तशी रिया उठून उभी राहिली, रोहित रिया कडे बघत होता, अतिशय सुंदर दिसत होती रिया, लग्नासाठी हाता वर काढलेली मेहंदी रंगलेली होती, खूप सुंदर दिसत होते हात, लांब केस उगीच मागे केले तिने , रोहित तिच्या जवळ येत होता, रिया घाबरली, त्याने पुढे येवून रियाला एक कानाखाली मारली, रियाच्या डोळ्यात एकदम पाणी आल ,

"तुला काय वाटल रियु तू पळून जाशील माझ्या पासून, हे शक्य नाही, तू माझी आहेस, या पुढे अशी चूक झाली तर बघ, हे काय ही हातावरची मेहेंदी माझ्या साठी काढली होती ना तू रियू, लाज नाही वाटली का पळून जातांना? खूप हुशार निघालीस तू, पण इतक लक्ष्यात ठेव तुझ्या समोर मी आहे आता, बघतो इथून कुठे पळून जातेस " ,... रोहित

" तुम्ही काय करताय इथे? मी कशी काय आली इथे? , माझा विशाल कुठे आहे? ,मला जावू द्या ",.. रिया

" रोहितच्या हातात एक बॅग होती, त्याने ती रियाला दिली यात कपडे आहेत, घालून रेडी हो, लगेच आपल लग्न आहे आता ",.. रोहित

" Excuse me मी इथे कशी आली? तुम्ही माझ्या मागे आहात का? , अस बळजबरीने नात का जोडता आहात माझ्याशी, मागे ही बोलली होती मला हे लग्न नाही करायच , काय आहे या बॅग मध्ये? विशाल कुठे आहे? , मला नाही रहायच इथे, घरी जायच आहे ",.. रिया

" बळजबरी काय असते ते चांगल दाखवणार आहे मी तुला रियु, असे खूप शेफारलेले लोक ठीक केले आहेत मी, शहाणपण नको आहे समजल ना, माझ्या पासून तुला कोणी वाचवू शकत नाही ",.. रोहित

" प्लीज मला जावू द्या, माझ प्रेम नाही तुमच्यावर, मला नाही लग्न करायच ",... रिया

रोहित काही बोलला नाही,.." दहा मिनिटात तयार हो",

" नाही मी तयार होणार नाही, मला घरी जायचं आहे, विशाल कुठे आहे? मी इथे कशी आली? ",.. रिया

" मी तुझ्या कोणत्याही प्रश्नच उत्तर देणार नाही, लवकर तयार हो, ही साडी नेस, जर दहा मिनिटात तू तयार नाही झालीस तर मी स्वतः तुला माझ्या हाताने साडी नेसून देईन, बघ काय करायच ते",... रोहित

" तुमची माझ्याही अशी बोलायची हिम्मत कशी झाली? आता मी एक मिनिट इथे थांबणार नाही, मी जाते आहे इथून ",.. रिया बाहेर जात होती

रोहितने रियाला अडवल,.." अजिबात गडबड नको मला रियु इथे, आटोप लवकर मी सांगतो ते ऐक, शहाणपणा नको करूस ",..

" मी नाही तयार होणार, कोण आहात तुम्ही मला अस सांगणारे, माझ लाइफ आहे मी हव त्याच्याशी लग्न करेन, मला घरी जायच आहे",.. रिया आता रडत होती

" मी तुझा होणारा नवरा आहे, तुला तुझ चांगल वाईट कळत नसेल तर मला डिसिजन घ्यावे लागतील",... रोहित

रोहित घड्याळ कडे बघत निघून गेला, दहा मिनिट Ok

तो गेला तस रियाने त्याने दिलेली बॅग फेकली, बॅग बाजूला जावून पडली, त्यात लाल साडी, ब्लाऊज, बांगड्या, टिकली, सगळ सामान होत, याला काय अर्थ आहे, रोहित शी मी लग्न करणार नाही, माझा साज शृंगार फक्त आणि फक्त विशाल साठी आहे, रोहित कश्याला आला मध्ये, कधीचा मागे आहे माझ्या हा, त्रासदायक, विशाल कुठे आहेस तू? ..... रिया रडत होती

काय कराव नेसावी का साडी? हा रोहित इथे काय करतो आहे तेच समजत नाही , हे रोहितच घर आहे का? , ऐकल होत खूप श्रीमंत आहे तो, मला काही देण घेण् नाही त्याच्याशी, मला घरी जायच आहे, विशाल ला काही झाल तर नसेल ना, या रोहितने नक्की काही तरी केल आहे त्याला, दहा मिनिट होवुन गेले,

रोहित आत आला, त्याने बघितल बॅग अशी खाली पडलेली होती, रिया तयार नव्हती, ती तिथे खाली बसलेली होती, तो रियाच्या जवळ आला,रिया घाबरली होती, ती उठून उभी राहिली, रोहित तिच्या जवळ येत होता, काय हवंय leave me alone I said, त्याने रियाची ओढणी ओढली, रियाने ती एका हाताने गच्च पकडून ठेवली,

"काय हवंय तुम्हाला? सोडा मला, मला हे नवरीचे कपडे नाही घालायचे, मला घरी जायचं आहे" ,... रिया

"आपल लग्न आहे आता, अटोप आता, कधीचा होता मुहूर्त आपल्या लग्नाचा, पर्वाचा ना, एक दोन दिवस लेट झाल, ठीक आहे, काही हरकत नाही",.. रोहित

"काय संबध? मी तयार नाही लग्नाला, मी आधी पण सांगितल होत, मी तुम्हाला ओळखत नाही आणि मला विशाल सोबत लग्न करायच आहे, मला जावू द्या ",.. रिया

" विशालच नाव तोंडातून बाहेर काढल तर बघ या पुढे, शिक्षा होईल तुला ",.. रोहित

" कुठे आहे माझा विशाल, ते तरी सांगा" ,... रिया

" विशाल माझ्या ताब्यात आहे ",.. रोहित

" का करताय तुम्ही अस? how dare you? काय केल तुम्ही विशाल ला?, प्लीज त्याला सोडा ",.. रिया

" जर विशाल सहीसलामत हवा असेल तर पाच मिनिटात तयार हो आपल लग्न आहे",.. रोहित

" कुठे आहे विशाल आधी सांगा? ",.. रिया

"ठीक आहे तुला अस ऐकायच नाही वाटत, मी एक फोन केला की तिकडे विशालच काय होईल सांगता येणार नाही",.. रोहित मोबाईल वर नंबर डायल करत होता

" नाही नको मी आवरते, मी होते तयार, पण विशाल ला काही होता कामा नये",... रिया

That\"s like good girl... माझी रियु

रोहित निघून गेला, रिया उठली तिने साडी उचलली, बाथरूम मध्ये जावुन तिने कपडे बदलले, दागिने घातले, तिच्या डोळ्यात एक सारख पाणी येत होत, कोण आहे हा रोहित? का आला माझ्या आयुष्यात, त्याने विशाल ला किडनॅप केलय का ? हट्टी आहे तो रोहित, माझ्याशी लग्न करायला त्याने अस केल असेल का? की मी लग्न तून पळून आली त्याची शिक्षा देतो तो मला, तिने बाल्कनीत जावून बघितल, ग्रिल पक्के होते, इथून कस पळता येईल बाथरूम ही नीट ग्रिल लावून बंद होते,

जर रोहितने लग्नानंतर मला हात लावला जर काही केल तर मी स्वतःला संपवेन, काय प्रकार आहे हा? ,अशी का पण बळजबरी, ह्या रोहित ला कोणी मुलगी आवडत असती तर केल असत का त्याने माझ्याशी लग्न, मला मात्र त्याच ऐकाव लागत

रिया तयार झाली होती, अतिशय सुंदर दिसत होती ती साडीत, रोहित आत आला रियाच लक्ष नव्हत, ती तिच्या विचारात होती, तो आत आला आहे ते तिच्या लक्ष्यात आल नाही, रोहित तिच्या कडे बघतच होता, मी हिला बघायला गेलो होतो गावत त्या पेक्षा आज अजून सुंदर दिसते आहे ही, पण अजिबात ऐकत नाही ही कोणाच , अस सरळ करेन ना मी हिला, माझ्या बाजूने वळवेन, हा दुर्गुण सोडला तर चांगली आहे रियू

समोर रोहितला बघून रिया घाबरली, हा केव्हा आत आला, रोहित इकडे असा का बघतो आहे, तिने खांद्यावरून पदर घेतला, रोहितने पुढे होवुन तिचा हात धरला,

"प्लीज अस करु नका रोहित, विशालला समजल तर तो सोडणार नाही तुम्हाला" ,.. रिया

रोहित गप्प होता

रिया खाली यायला तयार नव्हती, त्याने ओढत तिला खाली नेल, अर्धा रस्त्यात त्याने रियाला उचलून घेतल,

" सोडा मला खाली प्लीज, मी येते माझी माझी" ,.. रिया

रोहित ने तिला खाली उतरवल, ती रोहित सोबत खाली आली, खाली लग्नाची पूर्ण तयारी झाली होती, दोन सिक्युरिटी गार्ड बाजूला उभे होते सुटा बुटात, सकाळी आलेली बाई गुरुजींना सामान देत होती, आता लग्न केल्याशिवाय काही गत्यंतर नाही, रोहित चा मित्र अभिजीत बाजूला सोफ्यावर बसला होता, त्याच्या बाजूला एक वकील बसला होता, तो काही तरी फॉर्म भरत होता, इथून सुटका होण कठीण दिसतय

"रोहित माझा विशाल कुठे आहे ते सांगा त्या शिवाय मी लग्न करणार नाही" ,.. रिया

"ते तुला आता नाही समजणार, तू लग्नाला नकार दिला तर मी एक फोन फिरवेन मग विशाल कुठे हे कधीच तुला समजणार नाही, आता मी परत तुला विचारणार नाही सरळ एक्शन घेईन" ,.. रोहित

रिया लग्नासाठी उभी राहिली, सगळे तिच्या कडे बघत होते, गुरुजी मंत्र म्हणत होते, रिया ला समजत नव्हत काय होत ते, विशाल किती मूर्ख एवढा दोन तीन दिवस वेळ होता तेव्हा नाही केल त्याने माझ्या शी लग्न, आता संपल सगळ,

मंगल अष्टक झाली, रोहितने रियाच्या गळ्यात हार घातला, रिया तशी उभी होती, रोहितने तिचा हात धरून स्वतः च्या गळ्यात हार घालून घेतला, लगेच सप्तपदी झाली पुढच्या सगळ्या पूजा झाल्यावर मगासची ती बाई एका ताटात दागिने घेऊन आली, आधी रोहितने रीयाला मंगळसूत्र घातल नंतर जोडवी बांगड्या घातल्या

लग्न झालं आहे गुरुजींनी सांगितल, रोहितने समोरच्या ताटातून पेढा घेतला तो रियाच्या तोंडात कोंबला, रिया रडवेली झाली होती, रोहित रिया उठले रोहितने रियाचा हात घट्ट धरला होता, तो वकील बसले होते तिथे आले, अभिजित सरकला दोघे खाली बसले, रियाला वाटत होत अभिजीतला कुठे तरी बघितल आहे, वकीलांनी फॉर्म पुढे केले रोहितने सही केली त्याने पेन रिया कडे दिला, ती सही करत नव्हती,

"रियु गुपचूप सही कर" ,.. रोहित

"कसले पेपर आहेत हे",.. रिया

"आपल्या रजिस्टर लग्नाचे पेपर आहेत हे",.. रोहित

"हे करण गरजेच आहे का?",.. रिया

हो..

"प्लीज मला जाऊ द्या",.. रिया

"सही कर गुपचूप",. रोहित

रिया नुसती बसली होती, ती रडत होती

"माझा फोन आणा इकडे",.. एक बॉडी गार्ड फोन घेवून आला

" थांबा नका करू फोन, मी करते सही ",.. रिया

रियाने डोळे पुसले, सांगितलेले ठिकाणी सह्या केल्या,

रोहितने तिला रूम मध्ये आणून सोडलं, रियु माझी रियू रोहितने तिला मिठी मारली, खूप अभिनंदन तुझ,

"सोडा मला, या पुढे मला हात लावू नका समजल का" ,.. रिया मागे सरकली

"तू आता बायको आहेस माझी रियु, अशी का चिडतेस, बाकी आज तू खूप सुंदर दिसते आहेस",.. रोहित खाली गेला

आता रियाचा धीर सुटला, ती खाली बसली, तिने लावलेल कुंकू रागाने पुसल, ती खूपच रडायला लागली, विशाल कुठे आहेस तू? मी खूप मोठ्या संकटात आहे, काही समजत नाही काय आहे हे, आई बाबा माझी काळजी करत असतिल त्यांना वाटत असेल मी विशाल सोबत आहे, पण माझ इथे रोहितशी लग्न झाल आहे, मला जगायच नाही, पण जो पर्यंत समजत नाही विशाल कुठे आहे मला मरता येणार नाही, वाटत विशाल संकटात सापडला आहे, रोहितने काहीतरी केल आहे त्याला, कस तपास लावू आता मी, माझा फोन कुठे आहे... रिया रडत होती.


🎭 Series Post

View all