हे नाते जन्मांतरी चे भाग 7

He nate janmantri che story is abou a girl, minu, and her family, her friedns her collagelife. It contains love story, suspens, thrill. For enjoying journey of meenu stay tuned. And thank you so mch for your appreciation.

हे नाते जन्मांतरी चे भाग 7 

     मागील भागात आपण पहिले कि मीनू आणि गँग पोलीस स्टेशन मध्ये गेली होती.  आणि तिथे त्यांना सूर्यवंशी sir भेटलेले. 

आता पुढे 


              इकडे मात्र सूर्यवंशी सरांची पण वेगळी कंडिशन नव्हती.  त्यांना पण मीनू चा चेहरा आठवला तसे त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. 
         
        'आवर स्वतःला अर्जुन. .. पण काही म्हण.. पोरी ने विकेट घेतली तुझी.... असे बोलत स्वतःशी च हसत  अर्जुन झोपी गेला.' 

          गॅदरिंग चा दिवस. 

          कधी नव्हे ते मीनू आज लवकर उठली होती. आवरा आवारी चालली होती. आरश्यात पाहून सूत्रसंचालन करण्याची तर तिने 100 वेळा प्रॅक्टिस केली असेल.  तेव्हड्यात तिने रिद्धी ला आवाज दिला.. 
           
          'रिद्धी,  तुला काही फोन वैगरे आला का ग पोलीस स्टेशन मधून? '

          'वेडी आहे का ग?  कोणाला आवडेल पोलीस स्टेशन ला जायला? ' रिद्धी या वेळी वैतागून म्हणते.  कारण मीनू ने प्रश्न खुप वेळा तिला विचारला होता. 
     
           'मला.' स्वतःच्यात च मग्न असणाऱ्या मीनू च्या तोंडातून शब्द बाहेर पडले. 
  
            'काय? ' तिच्या डोक्यात टपाली मारत रिद्धी बोलली.  
  
             ' म्हणजे....  अग ते असेच..... ते आपण तक्रार नाही केली.  पण कायदेशीर आहेत ना गोष्टी.  उगिच काही राहून जायला नको'  मीनू गडबडून बोलली.  
              
              'काय झालाय हिला समजत नाही. ' डोक्याला हात मारत रिद्धी बोलली.  
 
               'आणि हो ना बाजूला त्या आरश्या समोरून.  काय पाहत असते आजकाल स्वतःला एवढ देव जाणे. ' तिला बाजूला ढकलत रिद्धी बोलली आणि स्वतः च आवरायला उभी राहिली. 

          ' अग काय पाहते म्हणजे काय?.... मी सूत्रसंचालन ची प्रॅक्टिस करत आहे.' मीनू म्हणाली. 
   
          'हो का? समजत आहेत मला. आणि 4 थी वेळ आहेत तू मला पोलीस स्टेशन च्या कॉल बद्दल विचारात आहे.  काय भानगड मीने.  साळुंखे काकांवर तर क्रश नाही ना झालं तुला. आत गेली होतीस तू,  तेव्हा नेमक काय बोलले तुला ते?' असे म्हणत रिद्धी हसायला लागली.  
  
           ' तू तर ना रिद्धे,  मार खाशील.' असे म्हणत मीनू ने तिला उशी फेकून मारली व दोघी ची पळापळ सुरु झाली. 

         'बस बस मीने जाऊयात आता. लक्ष्मी आणि बाकी लोक आले आहेत खाली.'  रिद्धी म्हणाली. 
  
            त्या दिवसा पासून लक्ष्मी,  आदी आणि विनू रोज त्यांना कॉलेज ला येता जाता सोबत करत असत.  लक्ष्मी ला तर जास्त लांब पडत असते पण त्यांना सोबत म्हणून ति यांच्या बरोबर जात असते. 

           पूर्ण गँग कॉलेज मध्ये पोहचते.  गॅदरिंग मुळे तसे पण कॉलेज मधील सर्व वातावरण उत्साही असते.  आधी सर्व जण कॅन्टीन मध्ये जातात व चहा घेत घेत आजची तयारी करत असतात.  लक्ष्मी ने सिंगिंग मध्ये भाग घेतलेला असतो तर आदी आणि विनू  आणि बाकी कलसमेंट चा छान ग्रुपडान्स असतो.  रिद्धी ने मात्र कशातच भाग घेतलेला नसतो आणि मी तुम्हांला चिअर अप करणार आहेत असे तिने आधीच सांगितले असते. मीनू सूत्रसंचालन चे कागद हातात घेऊन बसलेली असते. 
        
            तसे तिला शिपाई मामा येऊन अजून काही कागद आणून देतात. 'मीनू दीदी हे पण घ्या.  अचानक ठरलं. पण याची तयारी करा. प्रिन्सिपॉल मॅम ने सांगितलं आहे.' असे म्हणत शिपाई मामा तिथून निघून गेले. 

           'अरे yar,  बघा मॅडम च काय म्हणणं आहे. एक सरप्राईज गेस्ट लेक्चर होणार आहे. आणि ते आपल्याच कॉलेज चे स्टुडन्ट आहेत जुने.'  मीनू ने सांगितलं. 

          ' yar,  सरप्राईज टेस्ट कमी होत्या का?  आता सरप्राईज गेस्ट लेक्चर पण?? ' विनू वैतागून म्हणाला.  'काय ग,  नाव काय आहेत त्या गेस्ट च bro? ' त्याने मीनू ला विचारलं. 

             'नाही लिहलं इथे काही,  मॅम स्वतःच अनाऊंस करणार आहेत.  इथे नाव पण नाही आहे. खरंच सरप्राईज वाटत आहे आता तर.  मला फक्त त्या लेक्चर मुळे बाकी कार्यक्रम मागे पुढे करण्यात आले आहेत त्याच शेड्युल दिल आहे.' मीनू कागद चाळत बोलली. 

          तेवढ्यात तिथे पोलीस व्हॅन च्या सायरन चा आवाज येतो.  तशी मीनू तटकन उभा राहत खिडकी च्या बाहेरून पाहू लागते.  तसे आदी आणि विनू एकमेकांना टाळ्या देऊन हसू लागतात.

          'एवढं का रिऍक्ट केल तू सायरन च्या आवाजाला?  ' असे विचारून लक्ष्मी तोंड दाबून हसायला लागते.  तिच्या पण लक्षात येत कि तो आवाज आदित्य च्या फोन मधून येत आहे. आदी सायरन ची ट्यून बंद करतो. सर्व आपल्याला हसत आहेत हे मीनू  च्या लक्षात आल्यावर मीनू एकदम गोरीमोरी होते व खाली बसते. 

           'तू कोणाला शोधात होती नेमकी? ' विनू हसू दाबत तिला म्हणाला. 

          'कोणाला नाही.... ते कॉलेज मध्ये गॅदरिंग आहे अन अचानक पोलिसांच्या गाडी चा आवाज,  पोलीस का आले ते पाहत होते.' मीनू नजर चोरत बोलली.  

          'ओह...  एवढ्या उत्सुकतेणे?.... ' चेहऱ्यावर आश्चर्या चे भाव आणत डोळे मोठे करत रिद्धी बोलली. 

         'अच्छा रिद्धी आता तू पण खेचनार का माझी? जाऊदे मी HOD सरांना भेटून सगळं कन्फर्म करून घेते.' असे म्हणत मीनू तिथून पटकन निघाली. कॅन्टीन मधून बाहेर आली तशी ति स्वतःशी च हसली. 'तुझं काही खर नाही.' असे स्वतःशीच बोलत ति डिपार्टमेंट कडे निघाली.  

            संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम सुरु होणार असतो. तिघी जणी छान तयार झालेल्या असतात.  मीनू ने सफेद आणि मोरपंखी रंगा चा अनारकली घातलेला होता. खड्यांचे कानातले.  हातात ब्रेसलेट,  आणि केसांना सुंदर पफ पडला होता. सिम्पल च पण कॉन्फिडन्ट. लक्ष्मी आणि रिद्धी ने पण अनारकली घातला होता.  खुप छान दिसत होत्या तिघी पण. 
     
            हळू हळू दीप प्रज्वलन झाले.  सर्व मान्यवर स्टेज वर आले.  पण प्रिन्सिपॉलमॅम चे स्पेशल गेस्ट  अजून आले नव्हते.  मीनू थोडी काळजीत पडली. पण जाऊदे मॅम पाहून घेतील.  असे म्हणत तिने सूत्रसंचालन कडे लक्ष दिले.  तिने पुढची अनाऊंसमेंट केली व ति बॅक स्टेज कडे निघाली.  तशी ति एकदम थबकली 

             'साळूंखे काका तुम्ही?'
             मनातून मात्र गँग मधल्या कोणी पाहू नये अशी अपेक्षा ति करत होती, '  नाहीतर चिडवून चिडवून हाल करतील माझे. ' सकाळ चा सिन आठवून ति स्वतःशी च बोलली. 
 
             'हो बाळा... अरे वा सूत्रसंचालन???' तिच्या हातातला माईक पाहून काका बोलले. 'छान छान. ' 
  
              ' तुम्ही इकडे कसे काय? ' पण ति बोलत असतानाच प्रिन्सिपॉल मॅम तिथे आल्या व तिच्या हातातील माईक घेत बोलल्या.. 
    
               'मिस देसाई, आपले स्पेशल गेस्ट येत आहेत.  आपल्या कॉलेज चे माजी स्टुडन्ट आहेत ते. आपला अभिमान आहेत.  मला वाटत तू त्यांचे औक्षण करून स्वागत करावं.' 

                'हो मॅम.' मीनू असे म्हणे पर्यंत शिपाई मामानी तिच्या हातात आरती चे ताट  आणून पण दिले. लक्ष्मी चा नेक्स्ट परफॉर्मन्स असल्याने ति बॅक स्टेज आली होती. पण मीनू च्या हातात आरती चे ताट पाहून ति हसतच सुटली.. 

       'काय bro? नेमका विचार काय आहेत???  स्वयंवर वैगरे आहेत का तुझे?? ' असे म्हणत ति अजून च मोठ्याने हसली.

          'अग कॉलेज चे अभिमान येणार आहेत ना.  सो त्यांच्या स्वागत. ' मीनू अजूनच वैतागत बोलली. 
   
           'काय? ...... काय बोलतेस?' लक्ष्मी म्हणाली. 

            'अग आज चे स्पेशल गेस्ट ग.' मीनू बोलली.  आणि मॅडम च्या मागे ति स्टेज वर गेली. मॅडम नि अनाउन्समेंट करायला सुरुवात केली... 

             'आज मला तुमच्या समोर मला पुढील अतिथींना बोलवताना अतिशय आनंद होत आहे. एव्हडी प्रतिभासंपन्न व्यक्ती आपल्या कॉलेज ची माजी विध्यार्थी आहेत याचा मला अभिमान आहे. ज्यांनी अतिशय मेहनत घेऊन स्वतःला या स्थाना पर्यंत पोहचवल आहे. (नेहमीचे च घीसे पिटे वाक्य.  मीनू अर्थातच मनात म्हणाली. व पुढे ऐकू लागली. ) मी स्वागत करत आहेत DSP. अर्जुन सूर्यवंशी यांचं. जे पोलीस खात्या मध्ये नेहमीच उत्तम कामगिरी करत आले आहेत.  
  
              पोलीस म्हणतातच मीनू चे कान टवकारले.  तो पर्यंत सर्व जण टाळ्या वाजवत उभे राहिले होते.  मीनू ने स्टेज च्या पाहिर्यांकडे पहिले तर सूर्यवंशी सर चालत येत होते.  

              नेव्ही ब्लू कलर ची पॅन्ट,  आणि त्याच रंगा चा कोट,  व्हाईट शर्ट आणि नेव्ही ब्लू कलर चा टाय.  मीनू एकटक पाहतच राहिली. 'युनिफॉर्म मध्ये भारी दिसतातच,  पण असे पण किती हँडसम दिसत आहेत.  केस जरा बारीक आहेत.  ह्या....  जरा मोठे असते तर फिल्म चे हिरो वाटले असते.' मीनू मनातच विचार करत त्याला निरखून पाहत होती.  

          'मी मिस मीनल देसाई यांना विनंती करते कि त्यांनी mr. अर्जुन सूर्यवंशी यांचे औंक्षण करून स्वागत करावं.' 
 
          तसे अर्जुन हाताची बाही ऍडजस्ट करत तिच्या समोर उभा राहिला व त्याने समोर पहिले तसें त्याचा एक हार्ट बीट मिस झाला.  तिला समोर पहिल्याचा आनंद त्याचा चमकणाऱ्या डोळ्यांमधून लगेच लक्षात येत होता. 

             मीनू अजून पण औक्षण करत नाही हे पाहून मॅम परत म्हणाल्या,  'मी मिस देसाई यांना विनंती करते कि त्यांनी पाहुण्यांचे  औक्षण करून स्वागत करावे. ' 

            तसे तिला लक्ष्मी स्टेज च्या कडे ला उभे राहून दोन्ही तळहात जोडून ते गोल फिरवत आरती कर असे इशाऱ्याने सांगू लागली. तसे मीनू ने पटकन अर्जुन ला गंध लावला,  थोडे तांदूळ डोक्यावर टाकले व गडबडीत त्याची आरती उतरवली.  पण मीनू चा उडालेला गोंधळ त्याचा चांगलाच लक्षात आला होता.  तो तिच्याकडे पाहून गालात हसला तसे मीनू पटकन ताट घेऊन बॅक स्टेज ला आली. 
    
           तिने पटकन खुर्ची मध्ये बसत कपाळावरचा घाम पुसला.  तसे लक्ष्मी ने पाण्याची बॉटल समोर केली.  तिने घेऊन घटाघट पाणी पिले व स्वतः ला जरा शांत केल.  लक्ष्मी मात्र तोंडावर हात ठेऊन मोठ्याने हसू नये या साठी प्रयत्न करत होती.  

           'अच्छा म्हणजे म्हणून तू सकाळी सायरन चा आवाज ऐकून गडबडली तर......  अर्जुन सूर्यवंशी का..... ' पाण्याच्या बॉटल ला झाकण  लावत लक्ष्मी तिची मुद्दाम खेचत बोलली.  तसे मीनू ने तिच्याकडे मोठे डोळे करून पाहिलं.  स्टेज वरून मॅडम चा आवाज येतो.. 
 
             'मी अर्जुन सूर्यवंशी यांना विनंती करते कि त्यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे.'
 
            तसे अर्जुन उठतो आणि माईक हातात घेतो. मीनू पळत स्टेज च्या कोपऱ्यावर जाऊन त्याच लेक्चर ऐकायला थांबते.तसा अर्जुन चा आवाज येतो. 
           
           'Good evening  everybody. मी अर्जुन सूर्यवंशी.  मॅडम नि माझ्या बद्दल सांगितले च आहे. तर मी तुम्हाला मार्गदर्शन वैगरे असे जड शब्दात काही सांगून तुमचा उत्साही मूड खराब करणार नाही.  पण मित्रत्वाच्या नात्याने काही गोष्टी नक्की च share करेल.  त्याने जरा पॉझ घेऊन सर्वांकडे एक नजर टाकली.  
        
            'मी खुप मेहनत केली म्हणजे मी अभ्यासावर खुप मेहनत घेतली. माझे आई वडील मध्यम  वर्गीय आहेत.  त्यांनी मला सर्व दिले जे आवश्यक आहे. आपण अभ्यासावर मेहनत घेणे अपेक्षित.  आपण स्वतः साठी खुप मोठा विचार करतो,  पण त्या विचारा मध्ये स्वतः ला जसे इमॅजिन करतो,  तिथपर्यंत पोहचण्या साठी जी कृती आवश्यक आहे,  ति मात्र करत नाही. थोडक्यात काय तर विचारला कृती चो जोड दया.  तरच तुम्ही life मध्ये गोल अचिव्ह करू शकता.' 

              त्याने परत एकदा थांबून सर्वांकडे पहिले.  मग बोलला,  ' दुसरी गोष्ट,  स्वतःच पोटेन्शिअल ओळखा.  स्वतःला ओळखा.  उदाहरणार्थ : एखादा मुलगा स्पोर्ट्स मध्ये चांगला आहे,  पण त्याला गणित येत नाही किंवा त्याला ते आवडतच नाही.  किंवा एखाद्याला फिजिक्स चे फॉर्मुला सर्व तोंडपाठ आहेत.  पण त्याला एकपण कविता येत नाही.  तर अशा सिचुएशिअन मध्ये जर आपण पहिल्या विध्यार्थ्याला म्हणलं कि नाही, तू गणिता मध्येच करिअर कर.  आणि दुसऱ्या विद्यार्थ्याला म्हणलं कि तू आता कविता लिही आणि कवी म्हणून करिअर कर. तर काय रिझल्ट मिळतील आपल्याला?? ' जरा थांबून तो बोलला. ' पहिला विध्यार्थी गणिताचे मध्ये आणि दुसरा तो कवी बनला आहेत तो, त्या क्षेत्रात कधीच उच्च स्तरावर जाऊ शकणार नाही.'
  
              'म्हणून माझं हे बोलण खासकरून पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी आहे....कि तुम्ही तुमचे पाल्य किंवा विध्यार्थी  यांच्यातील गुण ओळखावे व त्या पद्धतीने त्यांचा विकास घडवून आणण्यासाठी प्राधान्य द्यावे. आणि विद्यार्थ्यानी देखील आपले आपले प्लस पॉईंट्स ओळखून त्यावर काम करणे आवश्यक आहेत.' 
            तसे हॉल मध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला. 'चला आता मी थांबतो.  स्नेहसंमेलम बोरिंग लेक्चर मध्ये बदलायला नको.' असे तो म्हणताच सर्व हसले.  'धन्यवाद. ' असे म्हणत तो आपल्या जागे कडे जायला वळला.  तसे विद्यार्थ्यानी अजून टाळ्या वाजवायला सुरुवात केली.  त्याने छान मार्गदर्शन केले होते.  तो बसायला गेला तसे त्याला कोपऱ्यात त्याच्याकडे पाहत टाळ्या वाजवत असलेली मीनू दिसली.  तिला स्वतः साठी टाळ्या वाजवत असलेली पाहून त्याला अजूनच  भारी फील झालं. 

            त्याच लेक्चर संपलं तस मीनु ने येऊन लक्ष्मी च्या गाण्याची अनाउन्समेंट केली.  तो तिला सूत्रसंचालन करताना पाहत होता.  तिचे हसणे,  संवादावरची पकड, आणि सर्वात महत्वाचा तिचा आत्मविश्वास. हळू हळू सर्व कार्यक्रम संपले.  मीनू ने सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.  अर्जुन चे नाव घेतले तसे तिच्या तोंडातून त्याचे नाव ऐकून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल आली. 
      
             कार्यक्रम छान पार पडला.  लक्ष्मी ने सिंगिंग मध्ये फर्स्ट प्राईज मिळवले.  तर विनू, आदित्य आणि मुलांच्या ग्रुप डान्स चा दुसरा क्रमांक आला होता.  आणि मीनू ने सूत्रसंचालन साठी प्रिन्सिपॉल मॅम ची शाबासकी मिळवली होती. त्यामुळे सर्व ग्रुप बॅक स्टेज ला सेलेब्रेट  करत होता.  अर्जुन त्यांना पाहत तिथून जात होता तसे विनू ने त्यांना पहिले.  त्याने सर्वाना शांत बसवलं व अर्जुन ला हाक मारली, 

         'अर्जुन सर.' 
       
         'विनायक....' अर्जुन ने त्याला ओळख दिली तस त्याला छान वाटलं. 
 
         'सर,  खुप छान लेक्चर होत. ' 
          'थँक्स.  आणि तुम्ही पण छान कलाकार आहात की.  लक्ष्मी...उत्तम, खुप छान गाणे म्हणालीस.' तिच्याकडे पाहत थम्ब्स अप करत तिला म्हणला. 'Boys, डान्स मस्त च.' आदी न विनू ला तो शेकहॅण्ड करत म्हणाला.  आणि 'मिस मीनल, ' मीनू कडे पाहत बोलला तसे त्याच्या चेहऱ्यावर छान स्माईल आली.  आणि हे सर्वंनी नोटीस केल,  मीनू सोडून कारण त्याने तीच नाव घेतलं तसे ति सातव्या असमाना वर पोहचली होती. 'सूत्रसंचालन अप्रतिम,  खुप कॉन्फिडन्ट आहात तुम्ही.' मीनू छान हसत थँक you सर असे म्हणली 

          'Ok guys bye' असे म्हणत आणि मीनू कडे पाहत तो गेला.  तसे सर्व जण मोठ्याने येस्स म्हणून ओरडले.  ते खुप हैप्पी होते कारण त्यांना एवढ्या मोठ्या ऑफिसर ने appreciate केल होत.  आणि मीनू हैप्पी होती कारण आज तिला अर्जुन परत भेटला होता आणि तिला त्याच नाव पण माहित झाली होत.  तिचा चेहरा उजळून निघाला होता.  

        ' चला आपण काहीतरी खाऊयात मग या दोघीना घरी सोडवूयात.' असे म्हणत ते सर्व जेवले.  आणि घरी गेले. 
 
        घरी गेल्यावर खुप थकल्या मुळे दोघी अंथुरणावर पडल्या.  तिने मोबाईल घेतला हातात न इंटरनेट ऑन केल तसे धडाधड नोटिफिकेशन पडल्या.  त्यात आदी चे पण एक msg होता.  तिने तो ओपन केला तर फोटो.  तो फोटो पाहून मीनू चक्क लाजली कारण तिने अर्जुन ला औक्षण करताना चा फोटो होता आणि आदी चे तो क्लीक केला होता. 

       खाली अजून एक msg,  'आता तुला छान झोप लागेल bro.' आणि जीभ बाहेर काढलेली ईमोजी.. मीनू ने फोन बाजूला ठेवला आणि झोपण्याचा तयारी करू लागली. 
                                    क्रमश: 
  

🎭 Series Post

View all