हे नाते जन्मांतरी चे भाग 4

Here is story of meenu. A girl who love her family, her friend and her group. Enjoying collages days. This story contains friendship, family, lovestories and some suspense. Sty tuned.

नाते जन्मांतरीचे भाग-4


          मागील भागात आपण पाहिलं की मिनू रिद्धी चा वाढदिवस साजरा करते व त्यांना लक्ष्मी आदित्य आणि विनायक हे फ्रेंड्स पण मिळतात यांचा पाच जणांचा छान ग्रुप होतो. इकडे आईंना घरात आवरताना एक फाईल मिळते आणि त्या डिस्टर्ब होतात.  
  
  आता पुढे. 

         शशिधर आत येतात. शेजारच्या टिपॉयवर चहाचा ट्रे ठेवतात. आणि हळूच सुनीताताईंच्या खांद्यावर हात ठेवतात. तसे ताईंनी डोळे पुसले. 

 "ते असेच हो..... जुने दिवस आठवले. किती छान होतं ना आपला आयुष्य."
       सुनिताताई म्हणाल्या." काही घटना घडल्या नसत्या तर किती बरं झालं असतं ना?"
       परत डोळ्यात आलेलं पाणी त्यांनी पदराने पुसले. 
     "चल चहा पिऊन घेऊ नाहीतर थंड होईल. "

          बाबा जरा हसत म्हणाले. त्यांना पण भरून आलं होतं पण आईसमोर ते व्यक्त होऊ शकत नव्हते.  

       " तुम्ही एवढे खंबीर कसे हो?"  सुनीताताई बोलल्या.  

         "राहावं लागतं सुनीता. आणि त्याला पर्यायही नाही."

         असेच काही दिवस निघून गेले.

       आता काही दिवसांनी days  सुरू होणार होते. कॉलेजमध्ये गॅदरिंगची हवा वाहू लागली होती. मुलं-मुली नवीन चैतन्याने हे सोनेरी दिवस जगत होते, या पाच जणांचा ग्रुप धुमाकूळ करत होता. मिनू त्यांची boss होती. तिच्या राउडी लूकमुळे  तसे पण तिला ग्रुपमध्ये सर्व मिनू दादा म्हणून चिडवायचे. तेव्हा तिला बाबांची आठवण यायची ती एक दोन वेळा जाऊन पण आली होती घरी. आता कॉलेज करायचे आणि इतिहासात संशोधन करायचे हे तिने पक्के ठरवले होते. आणि ती कॉलेज लाईफ मध्ये बिझी झाली होती.

        सुरुवात ट्रॅडिशनल डे पासून होते. आणि ऑफ कोर्स रिद्धी ने दोन आठवड्यापासून शॉपिंग करून रूम शॉपिंग bags गच्च करून टाकली होती. 

       "रिद्धी प्लीज आता झोपायला तरी थोडी जागा ठेव ग माझी आई."

        हात जोडत हतबल झाले ची ॲक्टिंग करत मिनू तिला बोलली. 

        "बेडवर बॅग्स आणि इतर साहित्य येणार नाही याची मी काळजी घेत आहे मिनू ब्रो.  सो तू तुझी कुंभकरण झोप काढू शकतेस."

         रिद्धी ऐटीत खुर्चीवर बसत म्हणाली.
      तोपर्यंत तिला विनायक चा मेसेज आला.
         " चल dude  जायचं ना कॉफीशॉपमध्ये विनू चा मेसेज आलाय." रिद्धी  म्हणाली.

        "Ohh विनायक वरून विनू good good.  चांगली प्रोग्रेस आहे."   
          तशी रिद्धी जरा गोरीमोरी झाली. 

          "लक्ष्मी आणि आदित्य पण येणार आहेत चल ना ग मिनू आपण प्लॅनिंग करू days च."

          असे म्हणत रिद्धीने वेळ मारून नेली.
 
         मग कटकट करत मीनू तयार झाली एकतर हे days & all मध्ये साडी आणि makeup एवढेच असते असे त्यांचे स्पष्ट म्हणणं होतं. पण तिला मित्रांचं मन दुखवायचं नव्हतं तिला तिचा ग्रुप फार प्रिय होता. सर्वजण कॉफी शॉप वर पोहोचले. लक्ष्मी आदित्य आणि विनायक त्यांची वाटच पाहत होते.

   " काय यार,  किती लेट?? "लक्ष्मी म्हणाली.

    " मग काय आज काल रिद्धी ला  मेकअप करायला जास्तच वेळ लागतो." 

            मिनू मुद्दाम हसत म्हणाली. 

          " मेकअप करायची काय गरज आहे? अशी पण छान दिसते."

          विनायक पटकन बोलून गेला.
 त्याने पटकन जीभ चावली. पण तोपर्यंत सर्वांच्या लक्षात आले होते. त्याचा चेहरा एकदम लाल  झाला. त्याची उडणारी तारांबळ पाहूनरिद्धी  खुदकन हसली.

        घसा खाकरत आदी  म्हणाला,  चला पटकन order करूयात. आज संडे आहे तुमच्या दोघांची मेस बंद असेल. मिनू,रिद्धी ला  आज मेस नसते हे त्यांच्या नेहमी लक्षात असतं असं पाहून दोघींना खुप बरं वाटतं. बाकी तिघांची घरपण तिथेच होते. आदित्य आणि लक्ष्मी तर शाळेपासून सोबत होते. 
आज मी देणार होती डब्बा तुमच्यासाठी पण तिला कार्यक्रमासाठी बाहेर जावं लागलं. लक्ष्मी म्हणाली.

        " आई म्हणत होती तू काहीतरी बनवून नाही पण...."

       आदि  मधेच बोलला, " पण तुम्हा दोघींना असं वाटलं असतं की मॅगी खाऊन झोपलेले बरे त्यापेक्षा,  पण लक्ष्मीचा डब्बा नको."

              असे म्हणून सर्व हसू लागले. लक्ष्मी पण त्यात सामील झाली.

         "थँक्स यार तुम्ही आहात तर असे वाटत पण नाही आम्ही घरापासून दूर आहोत." मीनू म्हणाली. 
  
      "झाल आभार प्रदर्शन?" विनू बोलला. 

        "मीनू  ब्रो तुला असले सेंटी डायलॉग सूट करत नाहीत."

        असे हसी मजाक करत त्यांचे खाणे उरकते  व ते बाहेर निघतात. मिनू व रिद्धी  रिक्षासाठी उभे राहतात मग बाकी तिघे पण त्यांना सोबत करतात. 

        "मी ना बाबांना स्कूटी घ्यायला लावणार आहे.  आता अठरा कंप्लेंट आहे मी." 
       मीनू म्हणाली. 

          तोपर्यंत एक बाईक त्यांच्या समोरून गेले. ही बाईक जास्त वेळा पाहिल्याचे मीनूला वाटले. पण ती लक्ष देत नाही. व दोघी घरी येतात. आई-बाबांना फोनवर बोलून नंतर दोघी बोलत बसतात. 

     अजून दोन दिवसांनी त्यांना ट्रॅडिशनल वेशभूषे मध्ये कॉलेजला जायचे असते.  त्याचा विचार करून दोघेही झोपी जातात. 

                                  क्रमश :

🎭 Series Post

View all