हे नाते जन्मांतरी चे भाग 24

This is 24th part of He nate janmantri che. This is story of minu. A happy go lucky girl. Her family, her friends. Love story, little suspense. Thank you so much guys for your support and love. Thank you Ira

हे नाते जन्मांतरी चे भाग 24....

मागील भागात आपण पाहिलं की मीनू ला मोटेवार किडन्याप करतो आणि तीच खरं नाव मृण्मयी दीक्षित आहे असं सांगतो या धक्क्या ने मीनू बेशुद्ध पडते.  तिला गिफ्ट केलेल्या अँकलेट मध्ये असणाऱ्या ट्रॅकर ने अर्जुन तिला शोधायचा प्रयत्न करतो.  आणि तिला जिथे ठेवलं होतं तिथे तो पोहचतो,  तेव्हा त्याला तिथे शिरसाठ वकील दिसतात.

   आता पुढे....

             "mr.  शिरसाठ....  तुम्ही इथे योगा योगाने तर नक्कीच आलेले नाही आहात.... " अर्जुन त्यांच्याकडे पाहत...  गन हातात घेत बोलला. 

            त्याचा बोलायचा  रोख कळला तसे शिरसाठ गडबडले......  "अर्जुन...  असा विचार पण करू नको. " ते बोलत असताना च त्याच्या गाडीतून एक तरुण उतरतो आणि त्याने हातात गन घेतलेली असते. 

            "हा कुमार....  यालाच मी आणि शशिकांत देसाई ने मीनू वर लक्ष ठेवायला सांगितलं होतं.  पण त्या लोकांनी याला आधीच ओळखलं होतं.  याला मारहाण करून बांधून ठेवलं आणि मग ते मीनू ला घेऊन गेले.  याने स्वतः ला सोडवलं आणि मला संपर्क केला.  मोटेवार मीनू ला इथेच आणेल हे मला माहित होतं.  तो तिला लगेच काही करणार नाही...  पण मला भीती वाटत आहे.  " शिरसाठ शेवटचं वाक्य अगतिक होऊन बोलले.  त्यांची छकुली आत्ता तर भेटली होती त्यांना. 

                  त्यांच्या ऐकून झटकन अर्जुन गन खाली करत बोलला...  " ती इथे नाही...  इथे कोणी नाही...  मोटेवार तिला कुठेतरी घेऊन जात आहे.... त्याला नक्कीच समजलं आहे काहीतरी. क्विक... मीनू ला काही होता कामा नये..." अर्जुन  गाडी चा दरवाजा उघडत आत बसला.  त्याला असं अस्वस्थ झालेलं पाहून साळुंखे आणि शिरसाठ ला सर्व समजतं होतं. 

                 अर्जुन ने मोबाईल शिरसाठ समोर पकडला.  आणि ड्राइव्ह करत त्यांना विचारलं... " हा कुठं चाललं आहे नेमका....  लोकेशन शहरा बाहेर जात आहे.  "

              "त्याला सगळंच समजलं...  बहुतेक.  तो शहरा बाहेर जात आहे...  माझी छकुली.... " शिरसाठ आता खुप अस्वस्थ वाटत होते.  त्यांना मीनू ची काळजी वाटतं होती. 

"तो अजय दीक्षित च्या घरी चलला आहे अर्जुन...  " तसे अर्जुन ने चमूकन पाहिलं.  दीक्षित च्या घरी पण का? 

              मोटेवार ड्राइवर च्या शेजारी बसुन त्याला सूचना देत होता.  त्याचा माणूसच ड्राइव्ह करत होता.  हे सर्व खुप कॉम्प्लिकेटेड आहे आणि तो दुसऱ्या कोणावरच विश्वास ठेऊ शकत नव्हता.  मागे मीनू होती.  ती अजून पण ग्लानीत च होती बंद डोळ्या समोर तिला तिचे आई बाबा दिसत होते...  कस तिला लहानाचे मोठे केले.  त्या ग्लानी मध्ये पण तिला हुंदके फुटत होते.  तिला आई ची खुप आठवण येत होती.... 

               अर्जुन ठराविक अंतर राखून त्यांचा पाठलाग करत होता.  तो सतत फोन वर लोकेशन सांगत होता. पण पोलिसांना सांगत नाही दुसऱ्या कोणाला तरी सांगत आहे हे साळुंखे च्या लक्षात येत होते. साहेबांचं नेमक चाललं काय आहे. 

                 साधारण तासाभरात मोटेवार मीनू ला घेऊन एका आलिशान बंगल्यासमोर थांबला.  किती तरी  दिवसापासून तो बंगला बंद च आहे हे लगेच पाहून लक्षात येत होतं.  पण त्याची स्वच्छता आणि काळजी वेळो वेळी घेतली जात होती.  गाडी थांबली तस मोटेवार चा माणूस खाली उतरला.  आणि त्याने मीनू ला मागच्या सीट वरून दंडा ला पकडून खाली ओढलं.  तिला दुखलं.  "आई ग... " ती हळू आवाजात विव्हळली.  त्याने तिला बाहेर ओढलं तस मोटेवार ने येऊन तिच्या चेहऱ्यावर पाणी मारलं.  ती बऱ्या पैकी शुद्धीत आली.  तो वेगळा आणि आसपास चा नवीन परिसर पाहून तिला भरून आल.  तिला आता रडायला यायला लागलं होतं. "बाबा sss.... अर्जुन sss..... कोणीतरी या प्लिज.....  मला खुप भीती वाटतं आहे....  प्लिज कोणीतरी या.... " मी मनातून आक्रोश करत होती.

             तसे शशिकांतराव दचकले.  "मीनू... " ते मोठ्याने ओरडलेच.  तसे सुनीता ताई गडबडल्या....  "अहो असं काय करताय....  असेल आपली मीनू ठीक....  सुनील गेला आहे ना.  आपण ही पोहचू लवकरच जरा धीर धरा... " सुनीता ताई धीराने बोलत होत्या खरं.  पण त्यांच्या डोळ्यातून पाणी सतत वाहत होतं.  त्यांना सुनील शिरसाठ चा फोन येऊन तास दीड तास झाला होता.  सर्व काम सोडून ते तसेच निघाले होते.  2 च सेकंद  शशिकांत रावांनी डोळे मिटले तसे त्यांना मीनू ने आवाज दिला....  अगदी पोट तिडकीने....  माझी मीनू....  एवढे खंबीर शशिकांत राव आज पूर्ण ढासळून गेले होते.  मात्र नेहमी हळव्या वाटणाऱ्या सुनीता ताईंनी आज आघाडी सांभाळली होती. 

                अर्जुन ची अवस्था अजून च अस्वस्थ होतं होती.  तो सतत मोबाईल च्या स्क्रीन वर लक्ष ठेऊन होता जस की मीनू त्याला कॉल करणर आहे.  पण तिचा फोन तर त्याला तिच्या रूम वर मिळाला होता.  शिरसाठ मात्र कोणाच्या लक्षात येणार नाही या पद्धतीने हळू च चोरून डोळे पुसत  होते.  पण ते सर्वांच्याच लक्षात येत होते.  साळूंखे नी मनातल्या मनात सर्व देवांना नवस केले...  मीनू सहीसलामत असू दे. 

              मोतेवार ने तिला ओढतच आत नेलं...  ते आत जाताना मीनू आजूबाजूला भारावलेल्या नजरेने पाहत होती.  गाडी गेट मधून आत आलेली.  बंगला जिथे सुरु होतो तेथून गेट चांगल 200 मिटर लांब आहे.  तिथे आधी गार्डन असणार नक्की.  पायऱ्या चढत तो तिला घेऊन आत गेला.  आणि दरवाजाच्या की होल वर गन ने शूट केल तस ते खटकन उघडलं.  सायलेंसर लावल्या मुळे गन चा आवाज नाही झाला पण मीनू डोळे विस्फारून ते पाहत होती.  कोणाचातरी घर याने गन ने लॉक तोडून उघडल.  ते आत आले तसे तिला धूळ युक्त वास आला.  समोर मोठा हॉल होता...  आणि त्याला एका कोपऱ्यातुन गोलालकर जिना.  कलात्मक होतं घर.  सर्व फर्निचर झाकून ठेवलं होतं.  मध्ये मध्ये नक्कीच कोणी येऊन घराची काळजी घेत असणार.  ती सुटण्याचा काही मार्ग आहे का आजूबाजूला ते पाहत होती.  पण आपण यातून नक्की बाहेर पडू का?  हा प्रश्न तिला पडत होता. 

            मोटेवार तिला त्या गोलाकार जिन्यावरून घेऊन जात होता. आता मीनू रडत पण नव्हती...  सुन्न नजरेने ती आजूबाजूला पाहत होती.  तिला तिथे सुरक्षित वाटत होतं.  एक आपुलकी ची भावना त्या वातावरणात वाटत होती.  जिन्यावरून जात असताना एका फ्रेम वर तीच लक्ष गेलं...  लक्ष जाण्या सारखी च फ्रेम होती.  5 फूट उंच....  आणि त्या फ्रेंड मध्ये एक देखणी बाई...  आणि एक पुरुष उभा होता.  त्या बाई चे डोळे विशेष चमकदार होते.  त्या पुरुषाचे कुरुळे केस चोपून बसवसायचा प्रयत्न केल्या सारखं वाटत होतं.  त्याच्या हातात साधारण 1 वर्षा च बाळ होतं आणि त्या बाळाचे डोळे खुप सुंदर होते.  फ्रेम जुनी झाल्यामुळे फिक्कट वाटत होती.  जरा धूळ पण होती.  तो फोटो पाहून मीनू च्या हृदयात बारीक कळ उठली.  का ते माहित नाही.  मोटेवार तिला पुढे ओढत होता पण ती मात्र मागे वळून वळून त्या त्या फोटो ला च पाहत होती.  तो तिला ओढत एका रूम मध्ये घेऊन आला.  गुलाबी रंग असणार बहुतेक त्या रूम चा.  जुना झाल्यामुळे पुसट झाला होता.  लहान मुलीची रूम वाटत होती ती. तो छोटा गोल बेड..  बाजूलाच असणारा झोका...  ते फाटलेले पण नक्षीदार पडदे. आणि बाजूलाच एक बाल्कनी आणि त्याला काचेचं दार...  त्यामुळे तिथे भरपूर प्रकाश होता.  तिला घेऊन तो एका कपाटा जवळ गेला. सुंदर डिझाईन असणार कपाट त्याने उघडलं...  आतलं सामान त्याने एका हाताने बाहेर फेकलं.  त्या कपाटाच्या मागच्या बाजूलाच एक छोटस बटन होतं.  नीट पाहिल्याशिवाय ते दिसत नव्हतं.  ते बटण त्याने दाबलं तस तिथे छोटा खट्टा आवाज झाला. तस मोटेवार च्या चेहऱ्यावर क्रूर हसू आलं..... तो लाकडाच्या कपाटाचा तुकडा बाजूला होऊन तिथे एक बॉक्स दिसत होता...  आणि त्यावर बोट ठेवायला काचेची जागा होती.  त्याने खसकन मीनू ला ओढलं...  आणि तिची अनामिका जोरात त्या मशीन वर दाबली. ..  त्या वेदने ची एक सणक मीनू च्या मेंदूत गेली आणि ती कळवळली... "आह्ह... "

                  मोटेवार च्या पाठोपाठ च अर्जुन आणि शिरसाठ पोहचले.  तिथे एक च गाडी लावलेली पाहून अर्जुन चक्रावला.  त्याने गाडी दिसणार नाही अशी पार्क केली आणि तो आणि साळुंखे उतरला .  तसे तिथे अजून एक जीप सारखी गाडी आली.  त्यातून काळे युनिफॉर्म घातलेले 3 लोकं उतरले.  त्यांनी अर्जुन ला कडक सॅल्यूट केला.     
           
                "ऑफिसर...  सर्व बाजू नी घेरलं आहे....  आणि हे तुमचं आवडीचं पिस्तूल...  "अर्जुन ने ते झडप मारून घेतल्या गत उचलल.  ते एक अद्यावत पिस्तूल होतं.  साळूंखे ते पाहत होते.हे नक्की  पोलीस डिपार्टमेंट च नाही आणि अर्जुन पण नाही हे त्यांनी हेरलं होतं. 

                अर्जुन ने एक ब्लूटूथ कानाला लावला.  "ok boys टेक पोझिशन...  आणि plz mr. शिरसाठ तुम्ही गाडीतच थांबा.... " अर्जुन आवाजात जरब आणत अधिकारवाणीने बोलला. 

               "नाही अर्जुन...  मी तूझ्या बरोबर येणार...  माझी छकुली आत आहे. " ते सुद्धा हट्टाने बोलले. 

               "ok then...  तुम्हाला शूट करता येत? " अर्जुन ने विचारलं...  पण शिरसाठ चा चेहऱ्यावर त्याला समजलं.  "कुमार....  तू शिरसाठ यांना कव्हर कर. " कुमार ला ऑर्डर देत यो बोलला.  त्याने बोटाने इशारा केला तस सर्व लोकं पांगले.  "ok boys...  मिशन स्टॅच्यू... जय हिंद.. "

              "जय हिंद स sss....  " बाकी सर्व एकदम शिस्तीत बोलले. 

                अर्जुन,  साळुंखें,  शिरसाठ आणि कुमार आत निघाले...  अगदी सावकाश लपत...  कसला ही आवाज होऊ न देता....  आणि अर्जुन....  अर्जुन तर यात माहिर होता....  सावकाश चालत तो दरवाजा पर्यत आला.  त्याने हळूच सूचना केली तसे कुमार आणि शिरसाठ बंगल्या च्या मागच्या बाजूने गेले. 

                     काही वेळातच शशिकांत राव आणि सुनीता ताई तिथे पोहचल्या.  गाडी लावून त्या बाहेर आल्या तसे त्यांच्या अंगातून एक शिरशिरी गेली.  18 वर्षा ने आज आल्या होत्या त्या तिथे. त्यांनी आजूबाजूला पाहिलं तस काळ्या युनिफॉर्म मधल्या माणसाने त्यांना आवडलं. 

                "सर....  बाहेर 2 व्यक्ती आहेत...  ते व्हिक्टिम चे आई वडील आहेत असं म्हणणं आहे त्यांच." अर्जुन चा माणूस शशिकांत व सुनीता ला गन पाईंट वर ठेवत अर्जुन ला बोलला.  "त्यांना अजिबात आत पाठवू नका.  mr. शशिकांत यांना कव्हर करा. " अर्जुन ने आतून सूचना दिली. 

               तसे देसाई हादरले...  एकतर मीनू आत...  वरून हे लोकं आत जाऊ देत नाहीत... आणि हे पोलीस पण  वाटत नाहीत. आज शशिकांत देसाई पूर्ण हतबल झाला होता.  त्याला आता काहीच सुचत नव्हतं.  माझी मीनू....  एव्हडं च त्याच्या डोक्यात होतं.  ते दोघ गाडी बसून मूकपणे अश्रू ढाळत होते. 

               एवढं मोठं घर होतं...  त्यांना मोटेवार आणि मीनू ला शोधायला वेळ लागत होता.  अर्जुन आणि साळूंखे घरातल्या सगळ्या खोल्या पाहत होते.  तर कुमार आणि शिरसाठ घराच्या मागच्या बाजूने घुसले होते. मागून दरवाजा नुस्ताच लावलेला होता.  स्टोर रूम आणि इतर गोष्टी तपासत होते.  ते स्टोर रूम मध्ये गेले तसे तिथे गपकन एक कुबट वास त्यांच्या नाकात गेला.  त्यांना एक बाई आणि एक पुरुष यांचे शरीर पडलेलं दिसलें.  त्यांनी नाकाला रुमाल लावला.  आणि तिथे मीनू नाही हे पाहून पुढे निघाले.  कुमार तर या गोष्टी मध्ये निर्वाढलेला होता.  शिरसाठानी असल्या केसेस पाहिल्यामुळे त्यांना जास्त काही वाटलं नाही.  पण त्या दोघांना त्यांनी ओळखलं होतं. 

               "आह्ह.... " एक कळवळलेला आवाज साळूंखे आणि अर्जुन च्या कानावर पडला.  ते दोघे जिन्यात च होते. अर्जुन आणि साळूंखे नी एकमेकांकडे पाहिलं.  अर्जुन ने आपल्या पिस्तूल वर पकड घट्ट केली आणि ते दबक्या पाउलांनी भरभर आवाजाच्या दिशेने निघाले.  दोघे पण त्या रूम जवळ आले आणि लपून आत काय चाललं आहे ते पाहू लागले.   तिचे फिंगरप्रिंट मॅच झाल्या मुळे तो बॉक्स पूर्ण उघडला होता.  त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेले ते हसू...  अर्जुन च्या डोळ्यात खुपत होतं.  त्याने एका हाताने तो बॉक्स पकडला.  दुसऱ्या हाताने त्याने मीनू ला पकडलं होतं. त्याने तिला बाजूला ढकलून दिल आणि दोन्ही हातानी बॉक्स ला पकडलं. जणू काही त्याला एखादा अनमोल खजाना च मिळाला आहे.

              "बॉस...  पोरीला मारायच का इथेच....  " त्यांच्या माणसाने विचारलं. 

            त्याच बोलण ऐकून खाली पडलेली मीनू भीती ने थरथरायला लागली.  एव्हड्या वेळात पहिल्यांदा तिच्या तोंडातून शब्द निघाले..... " बाबा....  आई....  अर्जुन....  प्लिज वाचवा मला...  " ती  जीव तोडून ओरडली.  तिला माहित होतं की हा बंगला एकांती आहे...  इथे आसपास कोणी नाही.  तिला आता सर्व आठवत होतं...  बाबा,  आई,  अर्जुन,  दक्ष,  गँग,  कॉलेज....  माझं एवढं सुंदर आयुष्य...  ती आता मुसमुसत रडायला लागली. 

                  तिची किंकाळी ऐकून अर्जुन च्या डोळ्यातून पाणी आल...  अर्जुन तिला वाचवेल...  तिच्या या विश्वासाने त्याला भरून आल. तिची किंकाळी ऐकून शिरसाठ जागी च थिजले.  त्यांच्या डोळ्यातून पाणी वाहायला लागलं.  कुमार ने त्यांना भानावर आणलं तस दोघे हॉल मध्ये यायला पळाले. 

                 "थांब त्या शिरसाठ ला आधी सांगू दे....फडतूस वकील माझ्याशी पंगा घेतो?  या भुजंग मोटेवार शी.... " अहंकारा  ने हसत त्याने शिरसाठ ला फोन लावला. आणि शिरसाठ चा फोन जिन्यात च खनकला....  फोन इथेच वाजत आहे ते ऐकून मोटेवार सावध झाला.  त्याने पटकन फोन कट केला आणि बॉक्स हातात घेतला. 

               "नाऊ.... " अर्जुन ने हळूच सूचना केली तसे कोणीतरी धाडकन बाल्कनी चा काचेचा दरवाजा फोडून आत आल...  काळ्या कपड्या वाल्या व्यक्ती ने मीनू ला कव्हर केल.  अर्जुन ने धपकन जाऊन मोटेवार वर झडप घातली.  साळुंखे नी मोटेवार च्या माणसाच्या हातावर हल्ला केला तसे त्याची गन खाली पडली.  सर्व गोष्टी एकच वेळी झाल्यामुळे मोटेवार आणि त्यांच्या माणसाला काही सुचलं च नाही.  मोटेवार ने तेवढ्या गडबडीत पण खिशातल्या डिव्हाईस च एक बटण दाबलं...

              तो पर्यंत कुमार आणि शिरसाठ आत आले.  कुमार ने मोटेवार च्या माणसावर गन ताणली.  अर्जुन ने मोटेवार ला गन पॉईंट वर ठेवलं. मीनू ने हे सर्व पाहिलं तस तिच्या चेहऱ्यावर मंद हसू आल.  तिच्याकडे अर्जुन ने डोळेभरून पाहिलं.  विस्कटलेले केस.... उतरलेला चेहरा....  रडून लाल झालेले डोळे...  मृत्यू ला एवढे जवळ गेलेली त्याची मीनू.  तिला तश्या अवस्थेत पाहून त्यांच्या हृदयात बारीक कळ गेली.  तसे त्याला देसाई आठवले. "mr. शशिकांत देसाई ना आत पाठवा." त्याने ब्लूटूथ वर सूचना दिली.  बाबांचा नाव ऐकलं तस तिच्या चेहऱ्यावर एक हसू आलं. 

                  "खाली घ्या यांना....  " अर्जुन ने मोटेवार ला त्याच्या माणसाकडे सोपवले आणि तो बॉक्स घेतला.  सर्व रूम च्या बाहेर निघाले.  मीनू आणि अर्जुन तिथेच होते.  अर्जुन मी तिला घट्ट मिठीत घेतलं.  "मी खुप घाबरलो होतो मीनू....." तो भरल्या आवाजात बोलला.

              ती अजूनच बिलगत बोलली...  "मी पण.....  मला वाटलं...  मी कोणालाच पाहणार नाही परत... " ती मुसमुसायला लागली. 

              "असं नसत बोलायचं कधीच.....  मी आहे ना....  बाबा आहेत.... " तो बाबा बोलला तसे तिला मोटेवार जे बोलला ते सर्व आठवलं...  तस ती झटकन त्याच्या पासून दूर झाली.

              " मला बाबांना भेटायचंय.... " ती अचानक एवढी भावना रहित बोलली.  तसे अर्जुन दचकलाच. ते दोघे खाली निघाले.

               आत जा म्हणल्या बरोबर शशिकांत राव आणि सुनीता ताई पळतच आत निघाल्या.  ते असे चालले होते जसे त्यांच्या नेहमीच येन जान आहे इथे.  ते दोघे पळतच हॉल मध्ये आले.  तिथे मोटेवार आणि त्यांच्या माणसाला त्यांनी पाहिलं.  त्यांनी वर पाहिलं तर मीनू आणि अर्जुन जिन्यातून खाली येत होते.  मीनू च्या चेहऱ्यावर ते शून्य भाव पाहून शशिकांत राव काय  समजायचे ते समजले.  मोटेवार ने डाव साधला होता.  त्याने रागाने मोटेवार कडे पाहिलं तस मोटेवार ओठात क्रूर हसला. 

                 "मीनू sss... " सुनीता ताई पळत गेल्या आणि तिला मिठीत घेतलं...  काय अवस्था झाली होती त्यांच्या लाडक्या लेकी ची.  पण मीनू ची एवढी थंड प्रतिक्रिया पाहून त्या हादरल्या....  "मीनू अग...  मी आई....  " त्या तिचे केस नीट करत तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत बोलल्या.  " तुला काही केल नाही ना बाळा यांनी....."

                मीनू त्यांच्या पासून जरा बाजूला झाली....  "मी ठीक आहे आई ...." ती आई शब्दावर जोर देत बोलली आणि तिने थंड नजरेने शशिकांत रावांकडे पाहिलं.  तीच तस वागन पाहून त्यांनी आधाराला शशिकांत रावांकडे पाहिलं...  त्यांनी डोळ्यांनी च सुनीता ताई ना धीर दिला.

               सर्वजण जमा झाले.  सुनील,  शशिकांत,  सुनीता यांच्या भावना शब्दात वर्णन करण्या च्या पलीकडे होत्या.  आज ते 18 वर्षा नंतर असे एकत्र आणि ते पण या घरी होते.  अर्जुन ने तो बॉक्स ओपन करायचा प्रयत्न केला. त्याला तो ओपन झाला नाही.  तो का उघडत नाही याचा मोटेवार पण विचार करत होता.  तसे सुनील शिरसाठ आणि शशिकांत राव दोघे बरोबर च बोलले... "असा नाही उघडत तो.... " आणि दोघे एकमेकांकडे पाहून हसले. 

                  "छकुली इकडे ये....  " शिरसाठ मिनूकडे पाहून आपुलकीने बोलले.  तसे ती जरा हिचकिचत त्यांच्याकडे गेली.  त्यांनी तो बॉक्स उचलला आणि मीनू च्या चेहऱ्यावर पकडला.  तसे त्यातुन निळसर किरण बाहेर पडले..  आणि ते मीनू च्या डोळ्यावर फिरले.  जणू काही ते डोळे स्कॅन करत आहे.  बॉक्स क्लीक असा बारीक आवाज करत उघडला.

            "रेटायना स्कॅन केला का आत्ता याने? " अर्जुन डोळे विस्फारून पाहत बोलला.  एवढे जुने...  तरी एवढी टेक्नॉलॉजि...  तो शॉक होऊन पाहत बोलला.

              "हो...  अजय च डोकं असल्यात खुप पुढ होतं...." शिरसाठ किंचित हसत बोलले.  तो बॉक्स त्यांनी अर्जुन कडे दिला.  "हे पुरावे अर्जुन....  तुला मानलं मी...  खुप ब्रेव्ह आहेस....  आणि खुप प्रामाणिक पण. " त्यांनी त्याच मनापासून कौतुक केल.

               अर्जुन ने धसमुसळे पणा ने तो बॉक्स उघडला. आत पाहिलं.  तर आत मध्ये काही कागदपत्र गुंडाळी करून ठेवले होते.  अर्जुन ने ते उलगडले आणि 5 मिनिटात त्यावर नजर टाकली.  तो जसे जसे पुढे पाहत होता तसे त्याला आनन्द होतं होता. 

                 "काय आहे..... " मीनू ने विचारलं.  ज्या साठी एवढं सगळं झालं ते काय आहे ते माहित करून घ्यायचं होतं तिला. 

               तसे सर्व अर्जुन कडे पाहायला लागले.  सर्वाना माहित करून घ्यायचं होतं.  तसे सर्वांकडे नजर फिरवून तो बोलाला....  "ऑपेरेशन स्टॅचू.....  मागील 20-25 वर्षात आपल्या देशातील जुन्या -प्राचीन मूर्ती.....  भांडी....  अगदी देवांच्या मूर्ती सुद्धा....  जगाच्या काळ्या बाजारात विकल्या जात आहे.  पैशांसाठी.  ती आपल्या देशाची संस्कृती आहे...  संपत्ती आहे...  ते काय शोभेच्या वास्तू नाही आहेत.  हो ना मोटेवार.... " अर्जुन मोटेवार कडे रोखून पाहत बोलला.  त्याच्या नजरेत जरब होती.  पण मोटेवार मात्र बेफिकीर पणे त्याच्या डोळ्यांत डोळे घालून पाहत होता.  त्याला जणू या गोष्टी च काही काही गांभीर्य नव्हतंच.  जसं की तो पकडला गेला असला तरी कधी पण बाजी पलटू शकतो. 

             त्याला तस पाहून अर्जुन च्या डोक्यात तिडीक जात होती.  "हा मोटेवार सापडत नव्हता....  कारण त्याचा हा बिझनेस तो करतो हे काही च मोजक्या लोकांना माहित.  नंतर अजय दीक्षित....  यांना त्याने बिझनेस पार्टनरशिप ची ऑफर दिली.  पण ज्याच्याशी बिझनेस करायचा तो कसा आहे ते पाहायला त्याने अचानक त्यांच्या एका गोडाऊन ला भेट दिली...  आणि त्याला बरच काही समजलं.  हा लगेच सावध होऊ नये म्हणून त्यांनी आधी फक्त ड्रग्स चा आरोप केला.  यामुळे चिडलेल्या मोटेवार ने त्यांचा अपघात घडवून आणला.  त्यात दीक्षित दाम्पत्य मृत्युमुखी पडले....... "

          आता सुनीता ताईंच्या तोंडातून हुंदका फुटला.  त्यांना शशिकांत राव डोळे पुसत होते तर मीनू च्या डोळ्यातून पाणी येत होतं...  "म्हणजे मी या दीक्षित ची मुलगी आहे का??  त्याच्यामुळे च हा माणूस जेल मध्ये गेला... माझे खरे आई बाबा जगात च नाहीत.... " तीच डोकं सुन्न झालं.  साळूंखे ला  सगळं समजलं होतं.  पोलिसी डोकं आहे त्यांच्या आफ्टर ऑल.  त्यांनी मिनुच्या डोक्यावरून हात फिरवला.  तसे तिला अजून रडायला यायला लागलं. 

               "रडू नको बाळा....  रडू नको.... " साळूंखे मीनू ला बोलले.  या पेक्षा जास्त ते बोलणार तरी काय. शिरसाठ तर शून्यात पाहत बसले होते.  साळुंखें नी शशिकांत रावांकडे पाहिलं...  तसं शशिकांत राव मीनू जवळ जाऊन उभे राहिले.  तिने डबडबणाऱ्या डोळ्यांनी वर शशिकांत कडे पाहिलं.  "तुला सर्व सांगेल बाळा....  ही वेळ नाही ती... " त्यांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवला.  आणि तिला मिठीत घेतलं. 

                  "वा वा वा......  बघा....  माझ्या मुळे आज किती मोठा योग घडून आला....  नकळत का होईना एवढं पुण्य तर केल मी.  " मोटेवार छद्मी हसत बोलला.  "अर्जुन सूर्यवंशी....  तुला काय वाटलं....  एवढा सहजा सहजी हातात सापडेल मी???  अरे बॉस चा उजवा हात आहे मी...  माझ्या पर्यंत पोहचन सोप्प नाही.  असले किती पोलीस पाहिले मी.  जरा बाहेर बघ...  माझ्या लोकांनी हा बंगला घेरला आहे.  इथून कोणीच जिवंत जाणार नाही तुमच्या पैकी. " तो हसत बोलला.  त्याचा चेहरा पराकोटी चा क्रूर वाटत होता.

            आता अर्जुन हसला....  "तुझी माणसं?  तुला काय मी दूध पिणारा पोरगा वाटलो का? " त्याने विचारलं.... "बॉईझ....  बाहेर काय पोझिशन..." आणि त्याने डिव्हाईस चा स्पीकर on केला. 

                 "सर.....  17 लोकं आले होते 8 गेले....  9 ताब्यात आहे सर.... " समोरून उत्तर आल.

                तस मोटेवार चिडला....  त्याने कुमार च्या हातातून गन हिसकावून घेतली...आणि त्याने फायर केल..   तसे मीनू जोरात ओरडली....  "बाबा.... " तिने जोरात शशिकांत रावांना बाजूला ढकलले.  शशिकांत राव बाजूला जाऊन पडले....  "शशि...... " सुनीता ताई ओरडल्या....  "दादा..... " शिरसाठ पळत त्यांच्या जवळ आले.  अर्जुन ने गन मोटेवार वर रोखली.  धाड धाड धाड !!!.. त्याने 3 वेळा फायर केल.  तस मोटेवार कोसळला.

               साळूंखे नी शॉक होऊन अर्जुन कडे पाहिलं...  "मला परमिशन आहे... " अर्जुन त्यांच्याकडे पाहत बोलला. 

               तस त्याचा लक्ष मागे गेलं.  सर्व शशिकांत शेजारी बसले होते मीनू आणि आई च रडणं थांबत नव्हतं....  आणि शशिकांत ची डावी बाजू पूर्ण रक्ताने भरली होती.....

                              क्रमश :

बापरे हे लिहायला मला खुप अवघड गेलं आहे. आशा आहे की तुम्हाला आवडेल.  आजचा भाग कसा वाटला ते plz कॉमेंट करून सांगा.  थँक यू. 

                    

                

🎭 Series Post

View all