हे नाते जन्मांतरी चे भाग 23

He nate janmantri che bhag 23. Thank you so much friends for your support and love. This is story of minu... a happy go lucky girl. And her family and friends. Some love story some suspense. Thank u again. Thank you Ira.

हे नाते जन्मांतरी चे भाग 23

             मागील भागात आपण पाहील की,  मीनू आई बाबा मुळे नाराज असते तर अर्जुन तिला समजावून सांगतो.  त्यांच्या कॉलेज ची ट्रिप जाते... सर्वजण छान एन्जॉय करतात. अचानक कोणीतरी गन घेऊन मीनू च्या रूम वर येते.  आता पाहू पुढे....

     
              अर्धा पाऊण तास झालं असेल मीनू त्या आलिशान कार मध्ये बसली होती.  निघताना त्या लोकांनी तिच्या डोळ्यावर पट्टी बांधली होती.  त्यामुळे नेमकं आपण कुठं चाललो आहे ते तिला समजत नव्हतं.  तिचा मोबाईल पण रूम वरच राहिला होता. ती रडत असल्यामुळे तिच्या डोळ्यावरची पट्टी ओली झाली होती.  तिचे हात मागे बांधले होते.  तिने बराच वेळा विचारून झालं होतं की तिला कुठं चालवलं आहे पण ते लोकं काहीच बोलत नव्हते.  ती आता शांतपणे पुढे काय होईल याचा विचार करत बसली.

                 "नक्कीच मला किडनॅप करून बाबांकडून बदला घ्यायचा असणार या लोकांना.... देवा प्लिज आई ला सांभाळ..... तिला हे कळलं तर तिची काय हालत होईल... " मीनू मनातल्या मनात देवा ला प्रार्थना करत होती.

                  "मी हे अर्जुन ला सांगायला हवं होतं....  मी का ऐकलं बाबांचं?  काय करू समजत नाही...  मोबाईल पण रूम वर आहे...  नाहीतरी काहीतरी करून अर्जुन सरांना किंवा कोणाला तरी मदत मागितली असती...  ठीक आहे मीनू बी ब्रेव्ह...  तुला बाबा आणि अर्जुन सर नेहमी ब्रेव्ह म्हणतात...  तू ब्रेव्ह आहेस...  तू या परिस्थिती मधून नक्की बाहेर पडशील.  या लोकांनी किती ही टॉर्चर केल तरी सहन करशील..... " ती स्वतः ला च धीर देत होती....  पण तिला खरं तर खुप जास्त भीती वाटत होती.

                 अचानक ती गाडी थांबली तशी तिच्या विचाराची तंद्री भंगली.  अचानक कोणीतरी तिला हाताला पकडून जवळ जवळ ओढून च गाडी च्या बाहेर काढलं.  आणि तिला ढकलत चालवलं.  जरा वेळ चालल्या नंतर तिला एक रूम मध्ये आणल्या सारखं वाटल.  त्या व्यक्ती ने तिला एका बऱ्यापैकी आरामदायी खुर्ची वर बसवलं.  आणि मागे बांधलेले हात खुर्ची च्या हाताला बांधले.  धसमुसळे पणाने डोळ्यावरची पट्टी सोडली.  तिचे केस त्या मुळे जोरात ओढले जात होते...  आणि त्याचा वेदना तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होत्या.

               अचानक डोळ्यांवर प्रकाश पडल्याने तीने डोळे काही क्षण बंद केले. आणि मग सावकाश उघडले.  एक मोठं बंद पडलेलं गोडाऊन वैगरे.... मध्ये मला आणलं असेल असं तिला वाटत होतं.  पण समोर तर एक सुंदर,  व्यवस्थित, नीटनेटक्या रीतीने सजवलेला हॉल होता. लाईट्स...  एसी आणि बाकी सोयी पण होत्या. ती काही क्षण तर सगळं निरखून पाहत राहिली.  तसे तिच्या बरोबर च्या माणसाने फोन कानाला लावला.. "बॉस....  काम झालाय... " समोरून तो माणूस काहीतरी बोलला फोन वर. 

                  "ok बॉस...  ठेवतो लक्ष...  " असे म्हणत त्याने फोन ठेवला.

                  मीनू च लक्ष त्याच्याकडे गेलं.  ती त्याला नीट पाहत होती.  बाकी चे गुंडा सारखे दिसणारे ते दोघे आत्ता तर नव्हते रूम मध्ये.  पण माणूस मात्र काही गुंड वाटत नाही.  गळ्यात मोठी सोन्याची साखळी...  हातात अंगठ्या...  दाढी वाढलेली पण व्यवस्थित ट्रिम केलेली.  आणि डोळ्यावर चष्मा.  चांगला धिप्पाड आहे हा.  याला चकवून येथून बाहेर पडणं अवघड आहे.  जर बंगल्यात आणलं असेल मला तर आजूबाजूला ला पण लोकं वस्ती असेल.  मी ओरडू का?  मीनू मनातच विचार करत बोलली.

               अचानक ती जोरात ओरडायला लागली.

               "help....  help....  प्लिज मला कोणीतरी इथून सोडवा. " ती अचानक ओरडायला लागल्यामुळे तो माणूस गडबडला आणि त्याचा फोन त्याच्या हातातून पडला.  तसा तो चिडला आणि तिच्या जवळ आला.  तिचे केस जोरात ओढले.  "ए पोरे....  ओरडायला काय झालं?  मूर्ख कुठली?  इथे कोण ऐकणार नाही...  पण बॉस ने ऐकलं तर तुझं काही खरं नाही...  गॅप बसायचं हा.... " तो जरा दम देण्याच्या भाषेत बोललं. 

               तस ती मुसमुसत रडायला लागली.  "प्लिज मला सोडा...मी काही केलेलं नाही...  मी तर स्टुडन्ट आहे इथे.  प्लिज मला जाऊद्या... " तसे तो माणूस वैतागला.  काय कटकट आहे असा लूक तिच्याकडे टाकून त्याने मागच्या सोफ्यावर बसकन मारली आणि मोबाईल मध्ये पाहू लागला. त्याचा एवढं निवांत वागणूक पाहून तिला कहिच समजलं नाही.   
            "याने तर बाबा ना फोन पण केला नाही.  अरे देवा.... बाबा ना माहीतच झालं नाही मी इथे आहे ते तर???  काय करणार आहेत नेमक हे लोकं? " तिच्या मनातले विचार जात च नव्हते. 
          
            तेव्हड्यात धाड करून दरवाजा उघडून कोणीतरी आत आले.....  रुंद चेहरा...  मागे वळवलेले केस...  त्यात चंदेरी छटा...  मोठे नाक...  बारीक मिशी आणि घारे डोळे...  भुजंग मोटेवार.....  त्याने आल्या आल्या तो माणूस उठून उभा राहिला.. आणि त्याने आदराने त्याच्याकडे पाहिलं तस भुजंग मोटेवार त्याच्या जवळ गेला आणि सट्टाक...  एक सणसणीत कानाखाली मारली त्या माणसाच्या. 

                 "कोण आहेत या माहित आहे का तुला????  बांधून ठेवतो असे त्यांना??? " त्याच्याकडे त्या घाऱ्या डोळ्यांनी रोखून बघत मोटेवार बोलला....

                "मिस मृण्मयी  दीक्षित...... प्रवासात काही त्रास तर नाही ना झाला....  " मोटेवार त्याच्या चेहऱ्यावर मधाळ हसू आणत...  आणि बोलण तर अगदी साखरेत घोळवत बोलला.

                 "मृण्मयी दीक्षित???  म्हणजे यांनी नक्कीच मला दुसरं कोणीतरी समजलं आहे...." त्याचा बोलण ऐकून तिला हायस वाटलं....

                  सकाळचे 10 वाजत आलेले....  अर्जुन ने अजून सकाळी पासून मोबाईल पण पाहिला नव्हता.  आज काल त्याला जरा पण वेळ मिळत नव्हता...  आज तर तो सकाळी 7 वाजताच पोलीस स्टेशन ला आला होता.  शशिकांत रावांशी बोलल्या पासून त्याला खुप नावे क्लू मिळाले होते.  आता केस लवकरच सॉल्व होईल हे त्याला माहित होतं.  साडे दहा वाजत आले होते तसे साळुंखे कॉफी चा कप त्याच्या टेबल वर ठेवला. 

                      "साहेब....  कॉफी... " खाली पाहून काम करणाऱ्या अर्जुन कडे पाहत कॉफी टेबल वर ठेवत साळूंखे बोलले.  तरी अर्जुन ने वर पाहिलं नाही.  तसे त्यांनी टेबल वर टकटक वाजवलं बोटाने....

                    "साळुंखे....  अहो ऐकलं मी....  एवढी काळजी तर माझे बाबा पण नाही करत...  एवढी तुम्ही करता.. " अर्जुन ने हसत वर पाहिलं.  तसे साळुंखे च्या चेहऱ्यावर हसू आल.  या केस मुळे त्या दोघांचं एक छान बॉण्डिंग झालं होतं. 

                   " तस नाही सर.... भल्या सकाळी पासून काम करत आहात...  तेवढंच कॉफी ने फ्रेश वाटेल... "  साळूंखे मनापासून बोलले.  तसे अर्जुन ने इकडे तिकडे पाहत साळूंखे ना इशारा केला.  तसे त्यांनी तिथल्या एका हवालदार ला काहीतरी कारण देऊन बाहेर पाठवलं.  आणि साळुंखे परत अर्जुन जवळ येऊन उभा राहिले. 

                    "साळुंखे बसा...  "अर्जुन ने त्याचं लॅपटॉप मध्ये काहीतरी करत बोलला.

                 साळुंखे बसले...  तसे अर्जुन ने लॅपटॉप ची स्क्रीन त्यांच्याकडे केली.  स्क्रीन पाहून साळुंखे चे डोळे मोठे झाले.  "हे मीनू चे बाबा आहेत....  एवढ्या मोठ्या प्रकरणात...  मीनू कशी आहे...  तुम्ही का आधी सांगितलं नाही?  मी स्वतः तिला प्रोटेक्शन दिल असत. " साळुंखे पॅनिक होतं बोलले. 

                   "साळुंखे...  पहिला नियम...  अजिबात भावनिक व्हायच नाही... आणि तिची व्यवस्था मी केली आहे. " अर्जुन जरा नजर चुकवत बोललं. 
      
                त्याच ते बोलण साळुंखे ना अजिबात आवडलं नाही.  इतरांच्य बाबतीत ठीक आहे पण मीनू च्या बाबतीत पण भावनिक नाही व्हायचं  म्हणजे?  "अर्जुन ही  केस सॉल्व करण्या साठी तर नाही ना मीनू चा वापर करत... " साळूंखे च्या मनात शंका आली. 

                "हे बघा...  आपल्याकडे आत्ता काय काय आहे? " अर्जुन ने पुढ सुरु केल...  त्याला लक्षात आलं होतं की साळुंखे ला त्याच बोलण नाही आवडलं ते.  पण त्याने दुर्लक्ष केल.  "भुजंग मोटेवार....  मला शंका होती की तो...  कशाचीतरी तस्करी करत आहे...  पण कशाची?  ते समजत नव्हतं...  मग त्याची जुनी केस...  ड्रुग्स ची...  ती मी पहिली..  तर त्याच्या वर ड्रुग्स चा आरोप केला होता mr.अजय दीक्षित यांनी...  पण खरा मुद्दा इथे आहे..  दीक्षित यांच्याकडे फक्त ड्रुग्स च नाही तर अजून कशाचे तरी पुरावे होते आणि ते मोटेवार ला समजलं.  तर त्याने दीक्षित दाम्पत्य आणि त्यांची 2 वर्षा ची मुलगी यांचा मृत्यू घडवून आणला.  कार अकॅसिडेन्ट...  बॉडी पूर्ण राख झालेल्या...  काहीच मिळाला नाही...  पण दीक्षित यांनी लपवलेले पुरावे काही मोटेवार च्या माणसाना सापडले नाहीत.  नंतर मोटेवार ला चांगल्या वागणुकी मुळे लवकरच सुटका मिळाली पण त्याने त्याचा काम थांबवलं नव्हतं.  दीक्षित बरोबर अजून एक व्यक्ती होते.  प्रोफेसर.....  शशिकांत देसाई..... " अर्जुन जसे जसे पुढे सांगत गेलं तसे साळूंखे चे डोळे मोठे होतं गेले. 

              "बापरे.... तो धूर्त घाऱ्या डोळ्याचा मोटेवार.... जर का मीनू ला काही झालं...  " साळुंखे चिडत बोलले..  पण अर्जुन कडे पाहून शांत बसले.  "साहेब...  आपण त्याला पुरावा नाही तर आत पण टाकू शकत नाही...  हे खुप च त्रासदायक वाटत आहे मला...  " ते स्वतः ला सावरत अर्जुनकडे पाहत म्हणाले. 

              "साळुंखे...  आपण नक्की त्याला आत टाकू...  मला तुमची मदत लागेल...  मी जास्त लोकांना यात इन्व्हॉल्व्ह नाही करू शकत हे लक्षात घ्या.  कमीत कमी लोकांमध्ये हे मिशन पूर्ण झालं पाहिजे. " अर्जुन अधिकार वाणीने बोलला.  तसे साळूंखे नी मन हलवली. 

              "चालतंय  या मग...." अर्जुन साळूंखे कडे हसत पाहत बोलला आणि परत लॅपटॉप मध्ये पाहायला लागला.

              साळूंखे त्याच्याकडे पाहत काही क्षण उभा राहिले आणि मग आपल्या टेबल वर गेले.

              "मृण्मयी दीक्षित? काका तुमचा काहीतरी गोंधळ झाला आहे...  मी मीनल देसाई...  तुम्ही प्लिज मला सोडा...  मी ती नाही जिला तुम्ही शोधात आहात.  " मीनू डोळ्यात आर्जव आणत बोलली.  तसे मोटेवार क्रूरपणे ओठात हसला.

              "नाही....  मी बरोबर च आहे...  तुम्ही नाव चुकीचं सांगत आहात... किंवा मग असं बोलूयात की तुम्हाला तुमचं नाव माहित नाही... " तो खोटं खोटं गोड हसत बोलला.  ते हसू खोटं आहे हे कोणी पण सांगू शकलं असत. 

            तो चालत तिच्या जवळ यायला लागला...  तशी मीनू थरथरायला लागली.  "नाही ओ...  मी खोटं नाही बोलत...  मी खरं सांगत आहे....  मी  मीनल शशिकांत देसाई...  आई च नाव सुनीता देसाई...  प्लिज मला जाऊद्या हो काका...  प्लिज...  मी तुमचं काहीच नुकसान केलेलं नाही...  " आता ती रडायला लागली.

              " बेटा....  मी कधी म्हणलं की तू खोटं बोलत आहेस.... " त्याने कृत्रिम प्रेमाने तिच्या केसांवरून हात फिरवला...  "अजिबात नाही....  तू तर खुप निष्पाप आहेस....  अगदी एका फुला सारखी... खोटं तर तुझ्याशी शशिकांत देसाई बोलला आहे....  आणि हो...  तो अर्जुन सूर्यवंशी पण.... " आता भुजंग मोटेवार च्या डोळ्यामध्ये पराकोटी चा आनंद ओसंडून वाहत होता.  त्याने मीनू ला सगळं खरं सांगितले आणि ते मीनू ला अजिबात माहित नव्हतं हे पाहून त्याला खुप च छान वाटल...  देसाई आणि सूर्यवंशी यांना भावनिक हानी पोहचवल्याचं सुख त्याला मिळत होतं.

              "हे खोटं आहे....  माझे बाबा आणि अर्जुन सर...  कोणीही माझ्याशी खोटं बोललेलं नाही...  तू खोटारडा आहे...माझ्या बाबा मुळे तू जेल मध्ये गेलास म्हणून तू त्याचा बदला घ्यायला असे बोलत आहेस....  " मीनू आता ओरडत बोलली. 

              तसे मोटेवार क्रूर पणे हसला....  " हो तुझ्या बापामुळे....  तुझा बाप च...  अजय दीक्षित....  " तो अजून च मोठ्याने हसू लागला..  तिला एवढं चिडलेली आणि असहाय पाहून त्याला खुप आंनद होतं होता... 

             " मला काहीही सांगू नको म्हाताऱ्या.....  मी जीव घेईल तुझा....  माझे बाबा कोणीही दीक्षित नाही आहे....  माझे बाबा आहेत...  माझे बाबा..... " बोलता बोलता मीनू ला ग्लानी आली आणि तिने मान टाकली.  तसे मोटेवार ने त्याच्या माणसाकडे पाहिलं...  "हिला उठाव...  तस मेली तरी चालेल पण मला त्या देसाई, शिरसाठ आणि सूर्यवंशी च तोंड पाहायचं आहे तिला त्रास होताना पाहून....  परत कोणी वाटेला गेलं नाही पाहिजे...  खायला पण दे हिला...  आपल्याला निघावं लागेल. "

                  साधारण 12:30 ला अर्जुन ने फोन हातात घेतला.  मीनू चा सकाळ चा मेसेज त्याने पहिला होता..  पण सकाळी त्याला रिप्लाय करायला पण वेळ मिळाला नाही. त्याने फोन तसाच बाजूला ठेवला होता.  दुपारी निवांत मीनू बरोबर लन्च करायच असं त्याने आधीच ठरवलं होतं.  तिला अजिबात नको मेसेज कॉल करायला.  डायरेक्ट रूम वर जातो.  तेवढं च सरप्राईज तिला.  असा विचार करत त्याने गाडी ची चावी घेतली आणि तिच्याकडे निघाला.  गाडी स्टार्ट केली तसे तिने दिलेले ते छोटे गणपती च्या किचन कडे त्याच लक्ष गेलं.  ते मीनू  ने त्याला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट केल होतं.  ते तेव्हा पासून ते त्याच्याबरोबर च आहे. 

                 त्याने गाडी सुरु केली... "आता काही दिवसातच माझी केस संपेल मग....  मीनू कसे रिऍक्ट करेल?  तशी ती खुप समजूतदार आहे.... घेईल समजून... " त्याच्या समोर तिचे ते बोलके डोळे आणि तिचा प्रसन्न चेहरा आला.  तसे एक छान हसू त्याच्या चेहऱ्यावर आले.  "वाटलं पण नव्हतं की मी परत एवढा आनंदी असेल....  पण आहे ....  त्याच बरोबर दुःखी पण.... " त्याने विचारला ब्रेक मारला आणि गाडी ला पण...  समोर च्या  दुकानातून त्याने तिच्या साठी चॉकलेट घेतले.  आणि अर्ध्या तासात तिच्या रूम समोर गाडी लावली.  पण समोर दरवाजा उघडाच?  तो अंदाज घेत निघाला...  आणि आत आला तसे तो घाबरलाच...  ज्याची भीती होती तेच झालं होतं....  सर्व घरात उलथापालथ झाली होती.  घर अस्ताव्यस्त होते...  पुस्तके सर्व घरात पसरली होती....  मीनू.....  मीनू...  तो हळू हळू ओठातल्या ओठात पुटपुटत तिला सगळीकडे शोधत होता.  पण ती घरात कुठेच नव्हती...  "मीनू.....  "तो जोराने ओरडला.  पळतच तो घराबाहेर आला आणि त्याने धाडकन गाडी चा दरवाजा उघडला.  सुसाट वेगाने त्याने गाडी पळवायला सुरु केल.. सोबत कॉल केला...

               "साळूंखे रेडी राहा....  मीनू नाही घरी... " त्याचा आवाज रडावलेला वाटत होता.  त्याचा ऐकून साळुंखें त्याचा लॅपटॉप घेऊन पळतच पोलीस स्टेशन च्या बाहेर येऊन उभे राहिले.  अर्जुन आला तसे त्यांनी गाडी च दार उघडलं आणि आत बसले... 

                    "साहेब काय झालं?"

                     "मी घेलो आत्ता घरी तिच्याकडे... ती नाही तिथे...  तिला घेऊन गेला बहुतेक मोटेवार... " अर्जुन जोरजोरात श्वास घेत बोलला.  तो खुप रागात आहे हे लगेच  कळत होतं.  त्याने पटकन मोबाईल मध्ये कसलं तरी ट्रेकिंग डिव्हाईस सुरु केल.  तर त्याने लगेच एक मॅप दाखवला. 

                "काय?  कस शक्य आहे?  मोटेवार तिला घरी घेऊन गेला आहे?  स्वतः च्या?  काय प्लॅनिंग आहे नेमक याच...." तो गाडी सुरु करत बोलला. 

                 साळूंखे आपल्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत आहे. "अं...  मी ट्रेक कस करत आहे?  मी तिला अँकलेट गिफ्ट केल होतं एक... नंतर  त्यातच ट्रेकिंग डिव्हाईस बसवलं.  तिचा या केस शी संबंध आहे हे लक्षात आल्यावर. " तो गाडी चालवत पुढे पाहतच बोलत होता.  त्याचा लक्ष समोर फोन कडे होतं... मध्ये मध्ये तो फोन करून कोणालातरी सूचना देत होता. ते तिथे पोहचणार च तेवढयात मीनू च लोकेशन बदलायला लागलं.  तो नेमक काय करत आहे ते समजत नव्हतं. तीच लोकेशन शहराच्या बाहेर दाखवायला लागलं. 

                     ते दोघे मोटेवार च्या बंगल्या पाशी पोहचले...  त्यांनी पटकन खाली उतरून पोझिशन घेत आत जायला सुरु केल.  भले ही तीच लोकेशन दुरीकडे असेल आत्ता पण हा प्लॅन पण असू शकतो...  कदाचित ती इथे असेल हा वेडा विश्वास पण होता अर्जुन चा.  ते दोघे सावकाश आत आले तर काही नाही...  थोडी पण सुरक्षा नाही...  ना तर इथे कोणाला किडनॅप केलय याच काही निशाण....  ते परत माघारी आले आणि समोर पाहून आश्चर्य चकित झाले... 

                  "mr. शिरसाठ....  तुम्ही इथे योगा योगाने तर नक्कीच आलेला नाहीत ना? " अर्जुन त्या मध्यमवयीन वकिलांकडे संशयाने पाहत.... खिशातून रिव्हॉल्वर काढत बोलला....

 
                                    क्रमश :

सॉरी उशीर झाल्या बद्दल...  माझं काल च लिखाण पूर्ण झालेलं.मी काल रात्री पोस्ट पण करणार होते.  शेवट च चेक करायचय बाकी होतं फक्त . पण ते राहून गेलं काल.  कारण....  कारण काल दुपारी मला 2 छोटीशी मांजर सापडली रस्त्यावर....त्यांना  सोडून  दिल आहे हे लगेच लक्षात येत होतं.  खुप छोटी आहेत.  त्यांना घरी घेऊन आले...  2 मांजर .  मग त्यांच्या पाहण्यात वेळ गेला.  यात मी माझं कौतुक करा नाही आहे की मी रस्त्यावर चे मांजर आणलं आहे.  सांगायचं मुद्दा असा की plz plz plz एवढे छोटे जीव असे रस्त्यावर सोडू नका...  एवढा पाऊस...  एवढे वाहने रस्त्यावर...  ते मरतात...  पाऊसात भिजतात...  आजारी पडतात.  एखाद्या विकृत व्यक्ती च्या अनैसर्गिक गोष्टी चे बळी होतात.  किती छोटे असतात ते.  माझे जवळ जवळ 60 हजार वाचक आहेत इथे.  तुम्हाला सर्वाना माझी एक छोटीशी विंनती आहे.  प्लिज प्राणी बाहेर सोडू नका.  त्यांना द्या कोणाला तरी.  आणि प्राणी जसं की dog आणि कॅट विकत घेण्यापेक्षा रस्त्यावर चे आणि लोकल प्राणी ऍडॉप्ट करा.  मी माझी पोस्ट फेसबुक ला आली की तिथे मांजरांचा फोटो कमेंट करेल.

             माझी विनंती वाचल्या बद्दल मी तुम्हा सर्वांची खुप आभारी आहे.  thank you. 

🎭 Series Post

View all