हे नाते जन्मांतरी चे भाग 21

He nate janmantri che is story of minu... a happy go lucky girl. Story of her family and her friends. Some love story little suspense. Thanks for your support. Thank you Ira

  हे नाते जन्मांतरी चार भाग 21

             मागील भागात आपण पाहिलं की मीनू ला गँग बर्थडे सरप्राईज देते. अर्जुन ला शिरसाठ वकिलांकडून समजते की साक्षीदार मीनू चे बाबा आहेत.  शिरसाठ वकील मीनू च्या कॉलेज मध्ये गेस्ट म्हणून जातात आणि मीनू ला पाहून भावनिक होतात....

आता पुढे.......

          "ohh god.....  omg....  बघू बघू.....  सूर्य कुणीकडे उगवला आहे...." रिद्धी उठून पळतच गॅलरी मध्ये गेली.

             तिला अचानक काय झालं..... ती झोपेतून उठून धावपळ का करायला लागली म्हणून मीनू तिच्या मागे गॅलरी मध्ये गेली.  "काय झालं....  बरी आहेस ना....  का धावपळ करत आहे सकाळ सकाळ.... " मीनू ने काळजी ने विचारलं.

                 "सूर्य कुठून उगवला पाहत होते ग....  तू आज लवकर उठली?  माझ्या पण आधी... " रिद्धी आश्चर्यचकित होतं बोलल्याचं नाटकं करत म्हणाली. 

                 तसे मीनू ने एक हलकी चापट मारली तिच्या दंडावर....  "तू ना....  आजकाल जास्त च आगाऊ झाली आहेस....  असं नाही वाटत का तुला... माझा आज मूड होता...  अन जाग पण आली सकाळी सो उठले मी.  छान गाणी पण ऐकली माहित आहे.  " मीनू स्वतः वर च खुश होतं बोलली.

              

              "अग पण आज सुट्टी आहे....  तरी पण? असुदे आता आपण छान कॉफी घेऊ... " रिद्धी बोलत बोलत कॉफी करायला गेली. 

               ती आत गेली तसे मीनू ने गाणे सुरु केले. "गजब का है दिन....  सोचो जरा.....  ये दिवाना पण देखो जरा.... " आणि खुश होऊन स्वतः भोवती एक गिरकी घेतली. तिने पटकन अर्जुन ला gm चा मेसेज आणि एक ईमोजी पाठवले. 

                   दक्ष...  आज बराच वेळ झालं मीनू आणि त्याचे जुने चॅट वाचत होता...  त्याला आज खूपच आठवण येत होती तिची.  तो जवळ जवळ महिनाभर झालं तिच्याशी बोलला नव्हता. त्याला वाटल महिनाभर दूर राहील तर काही वाटणार नाही नंतर तिच्या बद्दल... पण ते काय क्रश थोडीच होतं तेव्हा...  तोपर्यंत त्याचा मॉडर्न असणाऱ्या सेक्रेटरी ने त्याच्या केबिन मध्ये एन्ट्री घेतली.  तसे त्याने फोन बाजूला ठेऊन दिला. 

                 "सर....  पुढची मीटिंग काही वेळातच सुरु होईल..... " ती हसत बोलली....  "खरंच सर....  मोठ्या सरांना तुमचा अभिमान वाटेल...  आज संडे असून पण तुम्ही मिटिंग ठेवली आहे.  अलीकडे तुम्ही खूपच जास्त मन लावून काम करत आहात..... " ती लालभडक लिपस्टिक लावलेले ओठ एकमेकांना कमी चिकटतील अशा बेताने हसत बोलली.  तसे दक्ष वैगातला.  चला जाऊ मीटिंग ला. 

                आज रिद्धी आणि मीनू ने निवांत फिरायचं ठरवलं होतं....  बाहेरच खायचं....  आणि रिद्धी ची शॉपिंग...  दोघी निवांत स्कुटी वर फिरत निघाल्या....  बाकी गँग त्यांना नंतर जॉईन होणार होती....  सर्वजण परिवार मध्ये आले.  त्यांनी दक्ष ला सांगितलं नव्हतं.  तेवढंच त्याला सरप्राईज...  पण त्यांना दक्ष तिथे असेल असं वाटलं नाही.  सर्वजण आत आले.  दुपारचं जेवन ते तिथेच घेणार होते.  नेहमी प्रमाणे गोंधळ सुरु होता...

                   "आपण अर्जुन सरांना बोलवायला हवं होतं ना....  " विनू बोलला.. "तेवढाच त्यांना चेंज...  किती बिझी असतात... "

                   "अरे नसते आले ते...  आम्ही 2 दिवस झालं फोन वर बोललो पण नाही..... " मीनू मोबाईल मध्ये पाहत बोलली.  ती परवाच्या दिवसाचा तिचा आणि शिरसाठ वकिलांचा फोटो पाहत बोलली. 

                      "अग बस की 2 दिवस झाला तोच फोटो पाहत आहे....  आता या वर्षी पण येणारच आहे तू 1st...  तेव्हा परत मिळेल की ट्रॉफी तुला....  अजून तू खुप यश मिळवशील ग बाई... " रिद्धी तिच्या हातातून फोन घेत बोलली. 

                   "अग तस नाही...  तू पाहिलं का?  ते किती प्रेमाने पाहत होते माझ्याकडे?  " मीनू रिद्धी कडे पाहत म्हणाली. 

                    "असं नसेल ग....  किती मोठे आहेत ते वयाने....  आणि असलं तरी त्यांना माहित नसेल ना तू द अर्जुन सूर्यवंशी ची गर्लफ्रेंड आहेस ते... " आदी पांचट जोक मारत बोलला.  तसे लक्ष्मी ने त्याच्याकडे डोळे मोठे करून पाहिलं.  नेहमी प्रमाणे. 

                 " ए बावळट.... प्रेमाने म्हणजे बाबा कसे तिच्याकडे प्रेमाने पाहतात...  तसे म्हणत आहे ती. " लक्ष्मी बोलली. 

              "असेल ग....  त्यांना तुझ्यात त्यांची मुलगी वैगरे दिसली असेल तुझ्यात... का एवढा विचार करत आहे? " विनू तिच्याकडे निरखून पाहत म्हणाला. 

                " हा तस पण असेल....  चला आपण ऑर्डर करू. " मीनू मनातले विचार झटकत म्हणाली.  ती मोबाईल पर्स मध्ये ठेवायला लागली...  तसे तिला स्कुटी ची चावी सापडली नाही...  "बहुतेक स्कुटी ला च राहिली..... "

                 "चावी स्कुटी ला राहिली बहुतेक...  मी आलेच घेऊन... " बाकीच्यांना बोलत ती बाहेर निघाली..... 

बाहेर येऊन पाहिलं ते स्कुटी च्या डिक्की ला च होती चावी.  तिने डोक्याला हात मारला. " आजकाल ना माझं लक्ष च नसतं..... " तिने चावी घेतली आणि माघे वळली...  तसे रस्त्या च्या दुसऱ्या बाजू ला तिला एक पांढरी स्कोडा दिसली आणि तिथे एक ओळखी चा चेहरा....  "ऍडव्होकेट सुनील शिरसाठ....  आणि... हे कस शक्य आहे????  बाबा? " नाही...  ते बाबा कसे असू शकतात...  आणि ते शिरसाठ सरांबरोबर कसे..." ते दोघे तो पर्यंत गाडी मध्ये बसुन निघून पण गेले. 

   

           तिने थरथरत्या हाताने पर्स मधून मोबाईल काढला...  आणि बाबा ना फोन लावला...  तसे शशिकांत रावांनी फोन उचलला.... " मीनू बाळा....  कशी आहेस..."  बाबा निवांत पणे बोलत होते...

                     "मी निवांत बाबा....  तुम्ही कुठे आहात...? " तिने जरा अडखळत विचारलं... 

                     "मी तर घरीच आहे....  आज शाळा पण नाही..  " बाबा नेहमी प्रमाणे हसत बोलले. 

                     " आई कडे द्या ना.. " मीनू ला आश्चर्य चे धक्के बसत होते. 

                     "आई शेजारी गेली आहे...  आली की फोन करायला लावतो." शशिकांत राव बोलले.

                      "ok बाबा...  नंतर बोलते बाय... " असं म्हणत तिने बाबांना काही बोलायची संधी न देताच फोन ठेवला. 

                  तिने लगेच आई ला फोन लावला....  2-3रिंग मधेच आई ने फोन उचलला. ... " हा बोल ना मीनू...  " आई  प्रसन्न पणे हसत बोलली. 

                   आई चा आवाज ऐकून मीनू ला भरून आल्या सारखं झालं....  मी अविश्वास तर करत नाही ना??  ती मनात बोलली....  "आई अग बाबा कुठे आहेत...  कधी चा फोन लावत आहे... " मीनू नॉर्मल होतं बोलली.

                      "अग...  ते..  ना....  ते जरा शाळेत गेले आहेत....  आज रविवार आहे पण मुख्याध्यापकांनी जरा मिटिंग ठेवली होती. तर सकाळी पासून तिकडेच आहेत.  म्हणून पहिला नसेल त्यांनी फोन.... " आई सुरुवातीला जरा अडखळली...  पण नंतर सावरत बोलली.  तसे मीनू  ला धक्का बसला....  आई बाबा माझ्यापासून काय लपवत आहेत??  तिला खुप वाईट वाटायला लागलं. "आई ठेवते...  रिद्धी बोलवत आहे...  "असे म्हणत तिने लगेच फोन ठेवला.  तिला आता खुप रडायला आले.  तिने डोळे पुसले व खाली बघत निघाली.  तरी पण तिच्या डोळ्यातून पाणी गळतच होतं.  तीच लक्ष समोर नव्हतं ती आत जाताना अचानक कोणावर तरी आदळली. 

                  "सॉरी सॉरी... "ती डोळे पुसत वर पाहत बोलली.  तर समोर दक्ष ला पाहून तिला अजूनच रडायला यायला लागलं.  तिने दक्ष ला घट्ट मिठी मारली आणि हुंदके देत रडायला लागली. 

                  मीनू ला असं समोर रडताना पाहून दक्ष ला काहीच सुचलं नाही.  त्याने तिच्या डोक्यावर हात फिरवून तिला काही मिनिट रडू दिल.  "काय झालं मीनू?  शांत हो...  रडत का आहेस... " तो तिला विचारायला लागला.  दक्ष तिथला बॉस आहे आणि मीनू ला तस त्याच्या जवळ पाहून जाणारे येणार लोकं थांबून पाहायला लागले. मीनू जरा शांत झाली.  ती दक्ष पासून बाजूला झाली आणि आजूबाजूला सर्व लोकं आपल्याकडेच पाहत आहेत ते पाहून तिला खुप लाजल्या सारखं झालं. 

               "सॉरी दक्ष....  ते चुकून झालं... " ती इकडे तिकडे   पाहत बोलली.  मी जाते आत."  मीनू घाई ने निघाली.

                 "थांब मीनू....  " दक्ष त्याच्या सेक्रेटरी कडे पाहत बोलला.  "मिटिंग संपली आहे तर तुम्ही आज जाऊ शकता.  तसे पण आज संडे आहे.  " असे त्याची सेक्रेटरी मीनू कडे पाहत डोळे फिरवत गेली. 

          ती शांतपणे खाली मान घालून डोळे पुसत होती. दक्ष तिच्याकडे वळला....  "काय झालं तुला...  एवढी का रडत आहे?  " दक्ष ने हळुवार पणे विचारलं. "आणि तू एकटीच इथे काय करत आहे?  बाकी कुठे आहेत? "  त्याने प्रश्नांचा भडीमार च सुरु केला. 

                " मला काही नाही झालं.... ते असच जरा....  डोकं दुखत होतं...  हा माझं डोकं दुखायला लागलं अचानक.... "  मीनू कारण शोधात बोलली. 

                   ती खोटं बोलत आहे हे त्याचा लगेच लक्षात आल.  पण त्याने जास्त खोलात जाऊन विचारायला नको असं ठरवलं. " तू एकटी इकडे काय करते?  काही काम होतं का?  मला फोन करायचा मग.... "

                   "अरे एकटी नाही....  बाकी सर्व आहेत आत मध्ये....    माझी स्कुटी ची चावी राहिली स्कुटी ला च राहिली.  चल ना तू पण... " ती दक्ष ला सावरत बोलली. 

               दोघे आत निघाले...  मीनू नक्कीच आत्ता खुप च नाराज आहे.  तिला बहुतेक कशचतरी बेक्कार हर्ट झालं आहे.  पण ती सांगणार नाही.  अर्जुन ला माहित असेल का?   दक्ष मनातच विचार करत तिच्या सोबत निघाला.  ते दोघे त्याच्या टेबल वर गेले तसे विनू  आणि आदी उभे राहिले.  त्यांनी दक्ष ला हाय फाय केल. पण लक्ष्मी च लक्ष मीनू च्या चेहऱ्याकडे गेलंच. 

                     "मीने....  काय झालं....  तू रडली आहे का?" तिने चौकशी करत विचारलं.  "दक्ष तुमचं काही भांडण झालं का?  तिचा चेहरा किती लाल झाला आहे."

                 "अग मी काही नाही केल....  मी तर मिटिंग आटोपून जात होतो बाहेर तर ही चालली होती डोळे पुसत येत होती ती मला धडकली....." त्याने पुढचं सांगायचं टाळलं. 

                     तसे सगळे मीनू भोवती गोळा झाले.  तिला परत रडायला आलं.  रिद्धी ने तीच तोंड नीट पुसलं.  "काय झालं मीनू....  का रडत होती?  आता तू सगळं नीट सांगशील....  खुप दिवसापासून डिस्टर्ब वाटत आहे.  आता काही नाही वैगरे असले कारण सांगू नको." रिद्धी जरा कडक शब्दात बोलली.

                   "अग खरंच असं काही ना..... " मीनू बोलतच होती की रिद्धी ने मोठे डोळे करून पाहिलं....  तसे मीनू ने पुढचे शब्द गिळूनच टाकले.  आणि शांत बसुन राहिली.

                    "सांगणार आहेस का आता काय झालं ते? " आदी हाताची घडी घालून तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला.  आता मीनू ला काय बोलाव ते सुचत नव्हतं.  ती बसली.  आणि शांतपणे तिने डोकं टेबल वर ठेवलं.  तिच्या खांद्यावर एक हात पडला.  तसे तिने चमकून वर पाहिलं....  दक्ष....  एवढं प्रेमाने तिच्याकडे पाहत होता...  तो स्वतः ला तिला शकत परिस्थिती मध्ये पाहू शकत नव्हता.  पण तो जास्त काही करूच शकत नव्हता.  तो तिच्या समोर चेअर घेऊन बसला...  तिचे दोन्ही हात हातात पकडले आणि तिच्या डोळ्यात पाहत बोलला "मीनू.... काय झालं सांगशील का?  आम्ही सर्व तुझे फ्रेंड्स आहोत...  आणि मी तर एकवेळ अजून नवीन आहे तुमच्यात...  पण हे बाकी....  यांच्याकडे बघ....  तुला असं वाटत नाही का की ते तुझे खुप छान मित्र आहेत...  तुझ्या साठी काही पण करतात...  तू जेव्हा दुःखात असशील तेव्हा ते तुझ्या बरोबर असतात....  तुझे मूड स्विंग्स हॅन्डल करतात...  बर्थडे साठी तुला एवढा दूर येऊन सरप्राईज देतात....  हे बघ मीनू....  ते डिझर्व करतात तू कोणत्या प्रॉब्लेम मध्ये आहे ते माहित करून घेणं...  मी जातो....  तुमचं झालं की सांगा... आपण बरोबर जेवण करू ok. " तो हळुवार तिच्या गालावर थोपटत उठला.

             तसे तिने त्याचा हात पकडला,  "तू पण बेस्टफ्रेंड आहेस दक्ष...  थांब तू पण...  " ती हसत सगळ्यांकडे पाहत बोलली....  "मला काहीतरी सांगायचं आहे तुम्हाला......  तुमची मदत पण लागेल... "

                   "येह हुई ना बात....  तू फक्त बोल ग....  दोस्ती साठी जान पण कुर्बान..... " विनू उत्साहाने बोलला.

                    सर्व पटापट गोळा होऊन मीनू भोवती बसले. दक्ष ने पटकन कोल्ड्रिंक्स मागवले आणि इकडे कोणाला पाठवू नका हे आवर्जून सांगितले. 

                     मीनू ने सांगायला सुरुवात केली.... " फ्रेंड्स...  मागच्या उन्हाळ्यात मी घरी होते...  आपला रिझल्ट लागला होता....  तेव्हा...  मला जरा शंका येत होती की आई बाबा माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत .  पण मी जास्त लक्ष दिल नाही.  पण रिझल्ट च्या दिवशी   मी बाबा ना विचारलं च...  तर बाबा बोलले..... " मीनू ने जे काही झालं ते सांगितले....  "मग त्या नंतर मी नेहमीच खुप काळजी घेत आले आहे...  मी तुम्हाला 6 महिने झालं तरी सांगितले नाही.  "

               "मग तू अर्जुन ला सांगितलं का?  " दक्ष जरा उसळून बोलला.. तिच्या फॅमिली ला धमक्या मिळत आहेत...  आणि मीनू असुरक्षित आहे या गोष्टी मुळे दक्ष जरा हादरला होता.

                " नाही सांगितलं....  बाबा म्हणाले की तू काही सांगू नको...  काही करू नको....  तुझ्यावर लक्ष नको जायला त्या लोकांचं.." मीनू खाली पाहत बोलली.

                  "पण मग आत्ता काय....  आता का रडत होतीस...  अचानक.. " रिद्धी ने विचारलं.  आपण एका रूम मध्ये राहून पण मीनू एवढ्यात त्रासातून जात आहे हे समजू शकलो नाही याचा तिला गिल्ट आला होता.

                    "अग आत्ता मी स्कुटी ची चावी पाहायला गेले होते....  तर रोड च्या पलीकडे जी बिल्डिंग आहे...  तिथून ते शिरसाठ वकील बाहेर पडले...  परवा कॉलेज ला आलेले...  आणि मला वाटलं की बाबा आहेत त्यांच्या बरोबर...  वाटलं कस...  बाबा च होते ते.  तर मी बाबा ना कॉल केला तर ते बोलले की ते घरी आहेत आणि आई शेजारी गेली आहे.   मग मी आई ला कॉल केला तर आई बोलली की बाबा शाळेत गेलेत सकाळ पासून ती घरी आहे.... " असे बोलत तिने आलेला हुंदका परतवला....  "काहीतरी लपवत आहेत ते माझ्यापासून....  खोटं बोलत आहेत....  किती दिवसापासून खोटं बोलत आहेत काय माहित?  काय एवढं लपवत आहेत काय माहित....  शिरसाठ वकील?  ती बिल्डिंग पाहिली?  किती मोठी?  कसले ऑफिस असेल त्यांचे?  बाबा त्यांची मदत घेत आहेत?  पण एवढे पैसे.... कस शक्य आहे?  एवढे पैसे बाबांकडे असणे शक्य तरी आहे  का? "  ती हतबल झाल्या सारखी बोलतच सुटली.  तिची तशी अवस्था पाहून कोणाला काय बोलाव समजत च नव्हतं.  सर्व शांतपणे मीनू शांत होयची वाट पाहत होते.  तिचा रडण्याचा भर ओसरला तस तिने टेबल वरचा ग्लास घेतला आणि घटाघट पाणी पिलं.  रुमालाने चेहरा पुसला.  आणि सगळ्यांकडे पाहायला लागली. 

                 " मला वाटत आपण हे अर्जुन सरांना सांगावं....  आफ्टरऑल ते एवढे मोठे ऑफिसर आहेत..  आणि तेच हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकतात. " आधी निश्चयाने बोलला. 

                   " मला पण आदी च म्हणणं पटत आहे मीनू....  अर्जुन ला सांगू....  मला सांग...  बाबांनी कोणाच्या विरोधात साक्ष दिली होती?  "  दक्ष ने हळुवार पने विचारले. 

                    "माहित नाही....  बाबांनी नाव नाही सांगितलं.  " मीनू नाक ओढत बोलली. 

                 " जर त्या माणसाचं नाव च माहित नाही तर आपण काय करू शकतो..... आधी आपण त्या माणसाचं नाव पत्ता शोधायला हवा... " विनू काहीतरी प्लॅनिंग बनवत असल्या सारखं बोलला.

                  "नाही guys....  बाबा बोलतात त्या वरून तर तो व्यक्ती खुप च मोठा अपराधी वाटत आहे.  मला तुम्हला या सर्वात नाही इन्व्हॉल्व्ह करायच.  मी तर अर्जुन सरांना पण नाही सांगणार काही.  बाबा बोलले होते की ते करतील सर्व ठीक....  मला त्यामुळे नाही रडायला आलं...  जास्त वाईट याच वाटलं की आई बाबा काय लपवत आहेत. " मीनू पॅनिक होतं बोलली. 

                   "अच्छा हे तू ठरवणार का?  हे बघ मीनू....  एका चा प्रॉब्लेम तो पूर्ण गँग चा प्रॉब्लेम......  परत असलं बोलायचं नाही..... असलं परत कोणी ऐकून पण घेणार नाही. " लक्ष्मी रागवत बोलली. 

              " हे बघा.....  मला वाटत बाबा बरोबर बोलत आहेत...  या मध्ये तुम्ही कोणीच इन्व्हॉल्व्ह होऊ नका....  मीनू तू पण.....  आणि जर काका शिरसाठ वकिलांकडे गेले असतील तर मात्र एक आहे....  तो व्यक्ती खरंच मुरलेला गुन्हेगार आहे... तो तुम्हाला नुकसान करू शकतो.  आणि मी स्वतः शिरसाठ काका ना ओळखतो...  मी बोलेल त्यांच्याशी हवं तर...  निश्चिन्त राहा...  आणि अर्जुन ला एवढ्यात नको सांगायला.  काका बोलत आहेत तर नकोच.  त्यांनी नक्की काहीतरी विचार केला असेल.  " दक्ष सर्वाना समजावत बोलला.  "आणि मीनू....... ते तुझे आई बाबा आहेत....  तुझ्यावर किती प्रेम करतात हे तू स्वतः जाणतेच....  तरी त्यांच्यावर अविश्वास केला?  तू खुप समजूतदार आहेस....  तुझ्याकडून अशी अपेक्षा नाही....  तू उगीचच आई बाबा बद्दल मनात शंका घेऊ नको.  " तो तिच्याकडे पाहत आश्वासक हसत बोलला.  तसे मीनू ने पण होकारार्थी मान हलवली. 

              "चला जेऊ....  भयंकर भूक लागली आहे.... पटकन ऑर्डर द्या."  त्याने वेटर ला बोलवलं सर्वांनी पटपट ऑर्डर सांगितल्या. 

                "तू संडे ला पण  काम करतो? " खात खात विनू ने दक्ष ला विचारलं.

                  " नाही रे बाबा....  आज मिटिंग होती...  " दक्ष हसत बोलला.

                  "तू आम्हाला जाताना कसा दिसला नाही? " आदी चा प्रश्न.

                   "अरे कॉन्फरेन्स हॉल ला जायला मागून एक रस्ता आहे...  तोच वापरतो मी....  म्हणून.... 

                  सर्वजण मुद्दाम वेगवेगळे विषय काढून त्यावर चर्चा करत होते.  जेणेकरून मीनू च्या मनातून ते विचार निघून जातील.  त्यांचे ते एवढं समजुतीने वागण पाहून मीनू ला खुप आधार वाटला...  आज एवढ्या दिवसांनंतर तिला रिलॅक्स वाटत होतं... पण आई बाबा खरंच काही लपवत आहेत का? 

                   चार आठ दिवस निवांत गेले.....  मीनू पण हळू हळू नॉर्मल होतं होती.  लेक्चर संपलं होतं.  गँग रमत गमत निवांत निघाली होती...  तर सामोरं नोटीसबोर्ड समोर गर्दी पाहून सर्व तिकडे पळतच निघाले....  तिथे जाऊन पाहिलं तर 2 आठवड्याने त्यांची ट्रिप एका जवळच्याच गडावर आणि त्या शेजारी असणाऱ्या हिलस्टेशन वर जाणार होती.  ते पाहून सर्वजण एकत्रच ओरडले "yehhhh"

                                         क्रमश :

पुढील भाग 13 तारखेला पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल. 

तुमच्या प्रतिसाद साठी खुप खुप आभारी आहे. 

                   

               

🎭 Series Post

View all