हे नाते जन्मांतरी चे भाग 19

He nate janmantri che is story of minu. A happy go lukcy girl. Story about her family and her friends. Some love story some suspense. Thank for your support. Thanks Ira

हे नाते जन्मांतरी चे भाग 19

मागील भागात आपण पाहिलं की मोटेवार मीनू पर्यंत पोहचायचा प्रयत्न करत आहे...  तर अर्जुन ने शिरसाठ वकिलांची भेट घेतली.  मीनू आणि गँग लक्ष्मी च्या दीदी ची एंगेजमेंट एन्जॉय करतात आणि तिथे दक्ष आणि अर्जुन पण आले होते... अर्जुन  मीनू ला एक अँकलेट गिफ्ट करतो आणि ते कधीच स्वतः पासून दूर करायचय नाही हे सांगतो....

आता पुढे.....

         "10 वाजले तरी पोरगी लोळत आहे....  कधी उठणार आहे मीनू.....  लहान आहेस का?  आज उद्या लग्न होईल....  सासरी पण अशीच वागणार का? " आई ने सकाळ सकाळ जनरली सर्व पोरींच्या आया बोलतात तसे बोल मीनू ला लावले....

             तसे मीनू ने कटकट करत ब्लॅंकेट बाजू ला केल...  आणि मोबाईल हातात घेतला....  इंटरनेट ऑन केल तसे धाड धाड नोटिफिकेशन पडल्या...  तिने व्हाट्सअप ओपन करून निवडून अर्जुन चा मेसेज उघडला... 

          "गुड मॉर्निंग मीनू..." आणि एक गुलाबाचं फुल आणि किस करणार ईमोजी..

          तशी ती छान गालात हसली... "गुड मॉर्निंग  अर्जुन..... सर..." आणि एक स्माईल करणारी ईमोजी.

           अर्जुन पोलीस स्टेशन मध्ये होता...  काही गोष्टी हाती लागल्यामुळे तो जरा रिलॅक्स होता...  मीनू ला 4-5 दिवस झाले होते गावी जाऊन...  त्याने तिला नेहमी प्रमाणे  रेल्वे स्टेशन ला सोडल होतं आणि आवर्जून पोहचल्यावर फोन करायला सांगितलं होतं.  त्याला आजकाल मीनू ची जरा काळजी च वाटत होती... किती खुश आहे माझ्या बरोबर...  तसे त्याला नोटिफिकेशन पडले.

            मीनू चा मेसेज पाहून आपसूकच त्याच्या चेहऱ्यावर छान हसू आल....

            "उठलीस का... 10 वाजले ना आता... आणि चॅटवर तरी अर्जुन बोल...  असे अर्जुन वेगळं आणि सर वेगळं लिहिण्यापेक्षा सोप्प पडेल... " आणि जीभ बाहेर काढलेली ईमोजी.

             त्याचा मेसेज वाचून तिला हसायला आल... " उठले जस्ट....  आई  ने किती डोस दिला माहित आहे...  आणि मला आवडत सर बोलायला...."

         अचानक आठवल्या प्रमाणे तिने परत मेसेज केला.. " तुम्ही किती वाजता उठता.. "

              "माहित आहे...  एवढा लेट उठली तर आई बोलणारच ना...  माझा वर्कआउट होतो सकाळी 5 वाजता... त्या नंतर योगा आणि मेडिटेशन... " त्याने परत जीभ बाहेर काढलेले ईमोजी पाठवून तिला चिडवलं..

              "मला नाही जमणार हा एवढा लवकर उठायला.. "  आणि तिने मेसेज सेंड केला...  अरे देवा हे काय पाठवलं.... तिने पटकन डिलीट केला..  पण तो पर्यंत अर्जुन ने मेसेज वाचला...  तसे त्याला हसू आलं आणि...  थोडं वाईट पण वाटलं...

              "वेडी आहेस.....  आवर आता..  bye..  पोलीस स्टेशन ला आहे... " असा मेसेज पाठवून त्याने फोन बाजू ला ठेवला..  आणि खुर्ची वर मागे रेलून शांत डोळे बंद केले... " मी जरा जास्त च इन्व्हॉल होतोय का मीनू मध्ये....."  " हा.....  आता प्रेम करतोस तर इन्व्हॉल होणारच ना......  काय लहान मुलांसारखे प्रश्न  पडतात तुला अर्जुन? " अर्थात दुसरे मन... आपला गोंधळ जेव्हा जास्त उडतो ना...  आणि काहीच सुचत नाही...  किंवा अशी एक बाजू आपण घेऊ शकत नाही...  तेव्हा हे दुसरं मन अजून जास्त गोंधळ घालायला लागत.  " खरं तर.....  मी आई ला पण भेटून किती दिवस झाले....  मी कोणा मित्रा ला पण भेटत नाही....  मी तो नाही आहे...  मी कोणाला च वेळ दिला नाही आजपर्यंत...  रिया...रिया  बरोबर पण शेवटच्या क्षणी नव्हतो मी....  मी मीनू वर किती ही प्रेम करत असलो तरी मी.....  तिच्या.........  "   

              "सर..... सर...." हवालदार साळूंखे ने जरा जोरात आवाज दिला तसे अर्जुन च्या मनातल्या द्वंद्वां ला ब्रेक लागला... 

              "सर ठीक आहे ना तब्येत.... " कारण अर्जुन कधीच असा पोलीस स्टेशन मध्ये बसत नाही म्हणून साळुंखेंनी जरा काळजी ने विचारलं...  "ठीक आहे...  बोला.."

                   "कमिशनर साहेबांचा फोन... "

तसे त्याने पटकन फोन हातात घेतला वर उभे राहत बोलला "जय हिंद सर...  गुड मॉर्निंग.. "

            "गुड मॉर्निंग अर्जुन...  तु पाठवलेले रिपोर्ट पाहिले मी...  तू योग्य मार्गा वर आहेस...  पण नेहमी लवकर केस सॉल्व करणारा अर्जुन....  जरा जास्त वेळ घेत आहे... चंद्रपूर जास्त च आवडलेल दिसतंय... " साहेब जरा हसत बोलले.

       "असं काही नाही सर...  मी लवकरच ही केस पूर्ण करेल....  आणि तुम्हाला रिपोर्टींग करेल. " अर्जुन एकदम करारी आवाजात बोलला.  त्याचा तो धीर गंभीर आवाज मीनू ने ऐकलं असता तर तो अर्जुनच आहे का असा प्रश्न तिला पडला असता

            "गुड... तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे... म्हणून तर तुला तिथं पाठवलं आहे....  आपल्याला जास्त वेळ घालवून  नाही चालणार."

                "yes सर....  " अर्जुन कणखर आवाजात बोलला. साहेबांनी फोन ठेवला तसे अर्जुन चेअर वर बसला.  साळूंखे ना कॉफी सांगून त्याने कामा ला सुरुवात केली. 
सुनील शिरसाठ कडून जी माहिती मिळावी त्या मुळे अर्जुन ला अजून मोठे क्लू मिळाले होते.  या मुळे त्याचा केस ला नवीन दिशा मिळाली होती.  ज्या व्यक्ती ने मोटेवार च्या विरोधात साक्ष दिली होती त्या व्यक्ती च नाव वाचून अर्जुन मात्र हादरला होता.  पण त्या व्यक्ती बरोबर शिरसाठ वकील त्याला बोलायला अजून पण परवानगी देत नव्हते. 

                मीनू ने आजचा पूर्ण दिवस फिरण्यात घालवला...  तिच्या नेहमीच्या महादेवा च्या मंदिरात आली तसे तिला दक्ष ची आठवण आली..... तिने तिथे बसुन सर्वाना एक विडिओ कॉल केला...  सर्वांनी भरपूर्ण गप्पा मारल्या...  उद्या दिवाळी होती....  पोरी एकमेकींना शॉपिंग दाखवण्यात बिझी होत्या...  अर्थात आदी विनू ला बोलायला काही स्कोप नव्हता...  तर दक्ष ने काम आहे असं सांगून कल्टी मारली...  मीनू ने सगळ्यांना मंदिर आणि तिथला परिसर फोन वर दाखवला....  तासभर गप्पा मारून मीनू घरी निघाली.

                दिवाळी ची सकाळ उगवली तशी मीनू आणि आई ची लगबग सुरु झाली..  मीनू किती पण आळशी असली तरी तिला सण वैगरे साजरे करणं खुप आवडते...  आज तिने छान रांगोळी घरात सामोरं काढली होती... सर्व घर दिव्यांच्या प्रकाशात लखलखत होते...  तिची चाललेली सजावट पाहून आई ने हळूच डोळे पुसले....  तसे बाबा नी भुवया उंचावून.... "काय झालं? " असं विचारलं....

                "पोरगी घरची लक्ष्मी असते हो...  बघा ना तिच्या नुसत्या असण्याने घर उजळून निघत....  माझी मीनू नेहमी सुखी राहू दे.... " त्या भरल्या कंठाने बोलल्या...  बाबा नी पण आवंढा गिळला.  ते ज्या परिस्थिती मधून जात होते त्याची मीनू ला जरा पण कल्पना नव्हती.  तिच लक्ष अचानक आई बाबांकडे गेलं.....  त्यांना असं भावनिक झालेलं पाहून तिला समजलं की हे काय विचार करत असतील.

         ती त्यांच्या जवळ येत आई च्या गळ्यात पडली... " आई तू काय ग सतत असे रडत असते...  माझी आई आहे असं वाटतच नाही... " आणि ती मोठ्याने हसली.

               "आई नाही वाटत म्हणजे... " आई डोळे पुसत बोलली... 

                " तू आधी कशी एकदम चार्मिंग होतीस....  आणि आजकाल बघ...  काकूबाई झाली आहे...  सतत डोळे पुसत असते.. ... "  ती आई ला चिडवत बोलली.  "आता काय कारण होतं....  का गंगा जमुना वाहत होत्या तुझ्या???  "

  

              "तुला नाही समजायचं...  आई झाली की कळेल... " आई ने नेहमी चा डायलॉग मारला.  तसे मीनू ने डोक्याला हात मारला.

  

               "तुला काही च उत्तर नाही सापडलं की असं बोलायच का आई?  काही पण हा... " ती बोलत च होती की तिला अर्जुन चा कॉल आला.....  स्क्रीन वर अर्जुन सर..  असं नाव पाहून तिचा चेहरा उजाळा ते आई बाबांच्या नजरेतून सुटलं नाही...

                रात्री चे पाऊणे 12 वाजत आले होते...  आणि अचानक मीनू चा फोन वाजायला लागला...  तसे ती खडबडून जागी झाली रिद्धी चा कॉल होता तिने कॉल उचला... " हॅपी बर्थडे ब्रो...." ती ओरडली...  "तू झोपली होती ना...  आजतरी थांबायचं ना मीनू...  बर्थडे दिवशी कोण झोपत का...  "

                   "थँक्स रिद्धी...  आणि बर्थडे उद्या आहे ग...  मला झोप आली मग झोपले मी....  आता या साठी जाग राहत का कोणी... काय तुम्ही पण..."  ती हसत बोलली.  तसे सर्व हसले.  15 मिनिट त्यांनी गोंधळ घातला तसे तिला अर्जुन चा कॉल वेटिंग ला पडला...  "ऐका ना guys...  अर्जुन सर कॉल करत आहेत...  बोलते नंतर... "

                 " हो ना.....  आता नाही झोप येणार हिला... " आदी चिडवत बोलला तसे तिला सर्व चिडवायला लागले.  "आता मी ठेवते बाय....  " असे बोलत तिने गालातच हसत फोन ठेवला. 

                "hello...सर.. "  तिने फोन उचलला.

                 "हॅपी बर्थडे डिअर मीनू... "अर्जुन ने तिला wish केल.  " तू खुप खुश रहा...  आनंदी रहा....  जगातील सगळी सुख तुला मिळू दे.. "

                   " थँक यू अर्जुन....  माझ्याकडे आई बाबा आहेत...  तुम्ही आहात...  माझे फ्रेंड्स आहेत...  मी ऑलरेडी जगातील सर्वात सुखी मुलगी आहे.... " ती मनापासून बोलली. 

   

                     तसे अर्जुन चा चेहरा उजळला... आज ती पहिल्यांदा फक्त अर्जुन बोलली होती..  एवढं मनापासून बोलली.   किती जवळच मानते ही मला...  "मग उद्या चा काय प्लॅनिंग?  "

                   "अजून काही फिक्स नाही...  माझ्या महादेवा ला जाणार एवढं फिक्स आहे मात्र... " ती हसत बोलली..

                  "मी आलो तर मला घेऊन जाशील का ग तिकडे? " अर्जुन ने हसत विचारलं... 

                 " हो...  जाऊ की आपण...  खुप छान आहे...  "  आता झोपू मी सर...  झोप आली.. "

               "हो झोप की... पण.....  एकदा अर्जुन बोल ना... सर नको..."

               "मी नाही बोलणार....  मला झोप आली... gn " तिने पटकन फोन ठेवला.

            

               "माझं लाजाळू च झाड...." अर्जुन ला पण हसायला आले.

             दक्ष असेच व्हाट्सअप चाळत पडलेला असतो...  त्याला अजिबात च झोप येत नव्हती..  तसे त्याने विनू आणि आदी चा स्टेटस पहिला...  "हॅपी बर्थडे मीनू...." आणि मीनू चा फोटो. त्याला तिला फोन करून शुभेच्छा द्यायची खुप इच्छा झाली पण लक्ष्मी च्या दीदी चा साखरपुडा मध्ये अर्जुन आणि त्याचा बोलणं झालं त्या नंतर तो मीनू शी बोललाच नव्हता...  त्याने कस बस स्वतः ला कंट्रोल केल आणि "हॅपी बर्थडे मीनल.. " आणि केक च ईमोजी..  एवढाच एक छोटा मेसेज पाठवला आणि तो तिने वाचला आहे को नाही हे सुद्धा परत पाहिलं नाही.  तिला असे इग्नोर करणं त्याला अजिबात जमत नव्हतं पण अर्जुन माझा बेस्ट फ्रेंड आहे आणि ते दोघे एकमेकांवर प्रेम करतात ही गोष्ट तो स्वतः च्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करत होता. 

            मीनू सकाळी 8 वाजता उठली...

आज तिचा बर्थडे असून पण तिला आई ने जर कुरकुर करत उठवले ते पाहून तिला जरा आश्चर्य वाटलं. "उठ ना बाई....  मीनू...  वाढदिवसाला तरी लवकर उठ.. "

             तशी ती आज लगेच उठली...  उगीच आई ला नको वैतागायला लावायला.  असं म्हणून अंघोळ करून बाबांच्या आणि आई च्या पाया पडली.  "आई... आज इडली नाही केली तू?  सकाळी सकाळी स्वयंपाक का करत आहे?" तसे आई ने बाबांकडे पाहिलं.

              "काय खुणावा खुणावी चालली आहे तुमची दोघांची? " तिने हसत विचारलं. 

               " ते मीनू बाळ अग हे तुझं गिफ्ट..." बाबांनी एक छान गिफ्ट चा बॉक्स तिच्या हातात दिला. तसे तिने जवळ जवळ उड्या मारतच तो बॉक्स त्यांच्याकडून घेतला.

               "वॉव....  थँक यू....  " तिने तो बॉक्स ओपन केला तर त्यात एक सुंदर आणि डिझायनर अनारकली ड्रेस होता...  तो सुंदर ड्रेस पाहून ती हरखून गेली...  " खुप सुंदर आहे..  थँक यू बाबा,  आई. " ती ड्रेस अंगाला लावत गोल फिरत बोलली. " पण स्वयंपाक का एवढा लवकर?  कोण येणार आहे का?  "

              " हो...... अग ते जगदाळे काका नाहीत का.. माझा मित्र?  तो येणार आहे...  त्याचा पुतण्या आला आहे अमेरिका वरून काही दिवस सुट्टी साठी.  त्याला पण घेऊन येत आहेत. " बाबा तिचा चेहरा निरखत बोलले. "तुला पाहायला येत आहेत..... बाकी काही नाही... " शेवटचं वाक्य घाईत पटकन उरकलं त्यांनी... आणि बॉम्ब पडायची वाट पाहायला लागले. 

                  "काही पण बाबा......  उगीच मस्करी करू नका. " सांगा ना कोण येणार आहे?  ती त्यांच्या जवळ लाड घालत बोलली. 

                    "बरोबर सांगत आहेत बाबा....  जा पटकन...  आवर येतील ते लोक तासाभरात... " आई समजावत बोलली. 

                     "काय?  असं कस करू शकता तुम्ही....  तुम्हाला माहित आहे...  माझं शिक्षण...  phd...  सगळं राहून जाईल...  का घाई करत आहात? " ती रागाने फुसफुसत बोलली.

                    "अग...  तू ऐकून तर घे...  जगदाळे खुप जवळचा मित्र आहे ग माझा....  त्याचा पुतण्या च आहे तो चांगला आहे...  सेटल आहे...  आणि आपल्याला कुठे करायच आहे लग्न. ते असेच येत आहेत...  जमेल न जमेल पुढचा प्रश्न...  आता तो मला असे म्हणाला तर मला नाही म्हणता नाही आलं ग.... " बाबा समजावत बोलले.  तसे मीनू गाल फुगवून बसली..

                   "माझा नकार आहे हा बाबा... आधीच सांगत आहे...  मला नाही आत्ता लग्न करायच..." तिचे गाल रागाने लाल झाले होते.  तिला नेमका राग तरी कसा काढावा हे पण समजत नव्हतं.  तिला हे सर्व अनपेक्षित होतं. 

                    "अग नको करू....  तुला कोण कर म्हणत आहे...  आम्हाला पण नाही घाई.... " बाबा बोलत होते तसे आई ने खुणावलं.... " पण म्हणजे....  आता पाहायला हवं ना...  मुलगा चांगला असेल तर काय हरकत आहे... " तस मीनू ने चिडून आई कडे पाहिलं...

                     " तू चिडू नको...  आत जा....  आणि आवरून घे....  सारखं काय तुझं च खरं?  जा आवर...  आता जे समोर आहे ते बघू...  पुढचं पुढ बघू... " आई जरा रागवत बोलली.

           तसे मीनू धाड धाड पाय आपटत रूम मध्ये गेली.  तिला रडायला येत होतं.  तिने अर्जुन ला कॉल लावला...  पूर्ण रिंग वाजली तरी त्याने फोन उचलला नाही.  तिने परत केला.....  तर निम्मी रिंग वाजली अन फोन कट झाला.  तसे तिने चिडून अजून एकदा फोन केला तर त्याचा फोन बंद येत होता.... यात च त्याचा अर्धा तास गेला.... तसे घराची बेल वाजवल्याचा आवाज आला.... आणि त्या आवाजांनी ती दचकली च...

                                    क्रमश :

तुम्ही कथे ला एवढा भरभरून प्रतिसाद देत आहात त्या बद्दल धन्यवाद. मला माहित आहे मी भाग पोस्ट करायला उशीर करत आहे. तरी देखील तुम्ही आतुरतेने नवीन भागाची वाट पाहता त्या साठी थँक्स.  अर्जुन मीनू आणि दक्ष ला तुमचे प्रेम असेच मिळत राहो. 
आजचा भाग कसा वाटला ते आवर्जून कमेंट करून सांगा.

    

           

🎭 Series Post

View all