हे नाते जन्मांतरी चे भाग 18

He nate janmantri che part 18. This is story of minu. A happy go lucky girl. Her friends and her family. Some love some suspense. Thanks for your support. Thank you ira

हे नाते जन्मांतरी चे भाग 18

मागील भागात आपण पाहिलं की शशिकांत राव कोणाला तरी भेटतात.  मीनू अर्जुन चा  सरप्राईज बर्थडे सेलिब्रेट करते.  आणि अर्जुन मीनू ला सांगतो की तो तिच्यावर प्रेम करत आहे.

      आता पुढे......

            "आम्ही लक्ष ठेवतो तिच्यावर....  पण तिच्या बरोबर नेहमी तो पोलीस ऑफिसर अर्जुन सूर्यवंशी असतो....  नाहीतर दक्ष....  दक्ष नाईक....  नाहीतर कॉलेज चे पोर....  ती एकटी नसते....  आणि अर्जुन सूर्यवंशी आणि दक्ष मुळे तिला काही लगेच आपण करू शकत नाही बॉस.....  आपल्याला फुल्ल प्लॅनिंग करावी लागेल..... " एक टक्कल पडलेला,  मोठ्या मिशा असणारा माणूस बोलला.  त्याचं हातात बऱ्याच अंगठ्या होत्या.  गळ्यात जड साखळी,  हातात कडे,  तो एक मवाली-गुंड आहे हे लगेच ओळखून येत होतं. 

              "पण आपल्याला ती पोरगी हवी च आहे....  तो शशिकांत त्या शिवाय जाग्यावर  येणार नाही.  त्याचा जरा जास्त च जीव आहे त्या पोरीवर....  पण आता आम्हाला जे माहित आहे  त्या मुळे ती पोरगी स्वतः च आपल्या बापा पासून दूर होईल.....  "असे बोलत भुजंग मोटेवार क्रूर पणे  हसला. अर्जुन समोर गोड बोलणारा मोटेवार आता मात्र क्रूरतेचा देवा चा पुतळा वाटत होता.  "आता मी एका दगडात 2 पक्षी मारणार.....  शशिकांत देसाई....  आणि अर्जुन सूर्यवंशी....  आता सापडली दोघांची पण कमजोरी आपल्याला."

              अर्जुन च्या बर्थडे ला आता 2 महिने होतं आलेले.  दिवाळी पण जवळ आलेली.  आणि कॉलेज ची 1st सेमिस्टर पण.  सर्व गँग मन लावून अभ्यास करत होती...  पण लक्ष्मी आणि आदी जरा डिस्टरब होते.  बाकीच्यांना ते लक्षात येत होतं.. पण...  ते स्वतः जो पर्यंत काही बोलत नाही तो पर्यंत नको आपण काही बोलायला.  दोघांच्या मध्ये ते जोपर्यंत बोलत नाही तो पर्यत पडायचं नाही असे त्यांनी ठरवले होते.  गँग च एवढं बर होतं.  ते प्रेत्येकाला  त्याची स्पेस द्यायचे.  किती पण गाढ मैत्री असली तरी ही गोष्ट आवश्यक च आहे. पण कधी नाही ते आदी  काहीच तक्रार न करता अभ्यास करत आहे.  यावरून प्रकरण जरा गंभीर आहे हे लक्षात येत होतं.  PL चालू होत्या त्यामुळे एक्साम चा स्टडी मीनू आणि रिद्धी च्या रूम वर च होत होता.  संध्याकाळी चे 5 वाजले तसे रिद्धी उठली.  तिने सर्वांसाठी चहा बनवला .  विनू ने सर्वांसाठी बाहेरून वडापाव मागवले   खायला आलं तसआदी त्यावर तुटून पडला.  सर्व त्याला अस पाहून शॉक झाले

         

  लक्ष्मी तर त्याच्याकडं पाहत पण नव्हती.  ती चहा चा कप घेऊन गॅलरी मध्ये जाऊन चहा प्यायला लागली.  तसे  मीनू ने रिद्धी ला खुणावले.  तसे दोघी हळू हळू तिच्या मागे  गेल्या.  तर लक्ष्मी तिथे डोळे पुसत बाहेर पाहत उभी होती.  तसे तिला मागे चाहूल लागली.  तिने पटकन तोंड पुसून काही झालं नाही अशा पद्धतीने मागे पाहिलं.... "किती हळू आलात....  मी घाबरले ना.....  " ती उसने हसू आणत बोलली. 

           "हो ना...  आम्ही पण घाबरलो...  म्हणजे आमची एवढी डॅशिंग आणि स्ट्रॉंग मैत्रीण असे गुपचूप रडत आहे म्हणून आम्ही पण घाबरलो." मीनू तिच्या गळ्यात हात टाकत बोलली.  तसे लक्ष्मी ला रडू यायला लागलं.

            तिला जरा रडू दिल्या नंतर रिद्धी बोलली.... " हे बघ....  तू रडून प्रॉब्लेम सॉल्व होणार असेल तर तू रड....  होणार आहे का रडून प्रॉब्लेम सॉल्व? " तीने शांतपणे विचारलं.  तसे रडतच लक्ष्मी ने नाही असे म्हणत मान हलवली.  "हो ना....  मग आम्हाला सांग....  कदाचित आम्ही काही मदत करू शकू.  " रिद्धी तिचे डोळे पुसत बोलली. 

               तसे लक्ष्मी जरा शांत झाली.  " आई बाबा दीदी च लग्न जमवत आहेत....  तुम्हाला माहित आहे बाबा किती स्ट्रिक्ट आहेत....  " ती बोलली.

              "अग पण मग तू आता पासूनच रडत आहेस का....  तास ही दीदी च लग्न होणारच आहे ना... "

             मीनू बोलत होती तसे तीच बोलण मध्ये तोडत लक्ष्मी बोलली.....  "ते माझं पण लग्न दीदी बरोबर करायच बोलत आहेत.... " आणि हुंदके देऊन रडू लागली तशा या दोघी दचकल्याच. 

               "अग पण का?  अजून तर तुझं एजुकेशन बाकी आहे....  काकू काय म्हणत आहेत?  " रिद्धी पॅनिक होतं बोलली. 

                " मम्मी म्हणत आहे होऊ द्या शिक्षण पूर्ण...  पण पप्पा म्हणत आहेत की एकावेळी दोन्ही लग्न उरकून टाकू....  मला नाही करायच ग करायच लग्न लगेच.....  आदी??? मी अजून त्याला हो पण नाही बोलले.....  पण माझं प्रेम आहे ग त्याच्यावर....  आणि तो पण डिस्टर्ब आहे माझ्यामुळे.  पाहिलं ना कसे बळेच अभ्यास करायचा प्रयत्न करत आहे..... " लक्ष्मी रिद्धी च्या गळ्यात पडून रडायला लागली. 

              तस पाठीमागे पाउलांचा आवाज आला तसे त्यांनी मागे पाहिलं...  तर विनू आणि आदी त्यांच्या मागे उभा होते.  विनू च्या चेहऱ्यावर दुःख होतं पण आदी मात्र डोळे पुसत होता. " तू आत्ता काय बोलली....  ओह्ह गॉड...  माझा विश्वास च बसत नाही....  तू खरंच माझ्यावर प्रेम करते?" तो पटकन पुढे आला आणि त्याने लक्ष्मी चा हात पकडत विचारलं....

               "हो... " लक्ष्मी हुंदके देत रडत बोलली....

              " रडू नको....  मी आहे ना...  वेडी आहे का...  एवढं का टेन्शन घेत आहेत....  मला सांगितलं पण नाही...  अचानक बोलायचं बंद केल.... मला तू आवडत नाही आणि किती काय काय बोललीस?  एकदा सांगायचं ना लक्ष्मी???  असं करत का कोण?  " तो तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलला.  त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवेल.  "इकडे बघ लक्ष्मी..... " तो तिला आत्मविश्वासाने बोलला.... तसे लक्ष्मी ने डबडबणाऱ्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं.... " हे बघ....  तू आज घरी गेलीस ना....  की बाबा ना आत्मविश्वासाने बोलायचं की मला पुढे शिकायचं आहे....  करिअर करायच आहे....  आता मला एवढ्यात लग्न करायच नाही....  जरी तू त्यांना घाबरत असली तरी ते तुझे बाबा आहेत.... ते किती पण कडक असले तरी तुझ्यावर खुप प्रेम करतात...  तू बोल....  तू असे रडत राहिली तर अवघड होईल....  आणि मी हे सगळं माझ्यासाठी नाही सांगत.....  तू हुशार आहेस....  तू काहीतरी भारी करशील लाईफ मध्ये मला विश्वास आहे....  म्हणून सांगत आहे मी....  करशील ना एवढं?  बोलशील बाबांशी? " 

            लक्ष्मी आणि बाकी सर्व तर त्याच्याकडे भारावल्यागत पाहत राहिले.  सर्वाना आदी  अल्लड वाटायचा...  आपण तो किती समजूतदार आहे हे त्यांच्या आता लक्षात आल...  " हो...  आदी....  बोलेल मी पप्पांबरोबर... " ती हसत बोलली.  तसे त्याने हसत तिचे डोळे पुसले.... " वेडी कुठली....  असे मोठे डोळे करून तू फक्त मला च धाकात ठेवते का?  इतर ठिकाणी पण असे खंबीर वागत जा.  असे रडू नको.." तो बोलला. 

             तसे ती हसली....  सगळ्यांना खुप भारी वाटत होतं आज.....  "चला चला वडापाव थंड होतील...." रिद्धी म्हणाली तसे सर्व हॉल मध्ये आले आणि खायला लागले.  "

           "थँक्स...  मीनू आणि  रिद्धी....आणि तुम्ही सर्व...  मी नसते बोलले तर कदाचित हे कधी च सॉल्व नसते झाले.  मला आता खुप हलक वाटत आहे... " लक्ष्मी बाकीच्यांकडे पाहत बोलली.

                " झालं आभार प्रदर्शन????  चला आता अभ्यास करू...  मला चांगले मार्क्स मिळवून....  चांगला जॉब मिळवून इम्प्रेस करावं लागेल माझ्या सासर्यांना....  ते खुप कडक आहेत बाबा स्वभावाने..... " आदी सिरीयस झाल्याचं नाटकं करत बोलला.  तसे सर्व हसले...  लक्ष्मी ने नेहमी प्रमाणे त्याच्या दंडावर चापट मारली.  "असेच राहा लक्ष्मी.....  " तिच्या कडे डोळे भरून पाहत आदी बोलला. 

                 अर्जुन ऍडव्होकेट सुनील शिरसाठ ला भेटायला जातो...  त्याने बराच वेळा प्रयत्न केल्या नंतर कुठे वकिलांनी त्याला भेटायला वेळ दिली होती.  त्यामुळे एकतर अर्जुन वैतागून गेला होता.  तो रुबाबदार पाऊले टाकत शिरसाठ च्या ऑफिस मध्ये पोहचला.  रिसेप्शनिस्ट ने त्याला ऑफिस दाखवले.  तसे तो आत गेला.  समोर 45-47 वयाचे प्रसन्न चेहरा असलेले वकील त्यांच्या टेबल वर बसुन काहीतरी काम करत होते...  अर्जुन आल्याची चाहूल लागताच त्यांनी वर पाहून एक तिरसट हास्य केल.  तसे अर्जुन चक्रावला....  बहुतेक यांना पोलीस आवडत नाहीत वाटत...  या वृद्ध वकिलांचा मूड सांभाळणे अवघड असते.  मानातच बोलत त्याने त्यांच्या समोर उभा राहुन त्यांना नमस्कार केला.... 

           "नमस्कार mr.शिरसाठ.... " तो प्रसन्न हसत बोलला. 

             "नमस्कार...  अर्जुन...  ये बस... " ते अर्जुन ला बोलले तसे अर्जुन समोरच्या खुर्ची वर बसला.  त्याने आजूबाजूला निरीक्षण करायला सुरुवात केली.  प्रसन्न केबिन....  उदबत्ती चा सुवास येत होता.  कोपऱ्यात देवा सामोरं लावली होती...  भिंती वर महापुरुषांचे फोटो आणि काही ट्रॉफीझ. शिरसाठांच्या टेबल वर तिरकी करून एक छोटी फोटो फ्रेम होती.  त्यात ब्लॅक and व्हाईट फोटो होता 3 लोकांचा. चांगला 20-25 वर्ष जुना वाटत होता तो फोटो. 


            

" बोल अर्जुन...  का एवढा मागे लागला आहेस माझ्या.... " ते मिश्किल हसत बोलले. 

               तसे अर्जुन जरा हसला. "एक काम होतं सर.... " "हा ते माहित आहे रे....  काम काय सांग.... "  

              "सर....  मागे साधारण 18 वर्षा पूर्वी.....  तुम्ही एक केस लढलेला...  mr. दीक्षितांच्या बाजू ने....  मोटेवार विरुद्ध....  तर......  मला त्या केस बद्दल अजून माहिती हवी आहे... "

             शिरसाठ जरा विचलित झाले.... पण चेहऱ्यावर बेफीरी आणत बोलले.... " एवढे जुने कोण लक्षात ठेवणार....  मी रेकॉर्ड चेक करतो...  तुम्ही पुढच्या आठवड्यात या... " अर्जुन चा प्रश्न ऐकून शिरसाठ त्याला जवळजवळ हाकलतच बोलले... 

              तसे  अर्जुन चिडला च...  आधीच तो शिरसाठ भेटायला वेळ देत नाहीत म्हणून वैतागला होता त्यात त्यांच्या असं वागणं....  " mr.  शिरसाठ....  प्लिज....  मी तुम्हाला रिक्वेस्ट करत आहे....  मोटेवार बाहेर आला आहे आणि त्याच्या हालचाली वाढल्या आहेत....  त्याला रोखायला हवं....  माझ्याकडे काहीच पुरावे नाहीत....  आणि तुम्हाला नाही वाटत का mr. and mrs. दीक्षित यांच्या खुन्याला शिक्षा व्हावी.... " त्याच्या शेवटच्या वाक्याने शिरसाठ जरा शॉक झाले....  "हो.... मला माहित आहे तुम्ही त्यांचे पर्सनल वकील होतात ते... " आता अर्जुन च्या चेहऱ्यावर विजयी हसू होतं.... 

            "अर्जुन......  माफ कर.... पण फाईल मधले कागद गहाळ करणाऱ्या पोलिसांवर मी तरी कसा विश्वास ठेऊ????  तसं  पाहिलं तर फक्त मोटेवार च नाही तर बाकी लोक पण आहेत माझ्या मित्राचे हत्यारे. " ते एक धारधार नजर अर्जुन वर रोखत बोलले.  त्यांच्या त्या नजरेत मित्राला गमवायच दुःख,  हतबल पणा आणि राग पण होता.  2 मिनिट साठी अर्जुन ला खुप च अपराधी वाटले.  कारण आतून कोणी मदत केल्या शिवाय फाईल मध्ये घोळ होणार नाही हे त्याला पक्क माहित आहे. 

          " सॉरी mr.शिरसाठ....  मी जे झालं ते बदलू नाही शकत.  पण विश्वस ठेवा... आपण मिळून त्याला योग्य ती शिक्षा नक्की च देऊ शकतो. मला तुमच्या मदतीची गरज आहे सर... " अर्जुन शांतपणे पण स्पष्ट बोलला.

              तसे शिरसाठ पण जरा शांत झाले.  " तू प्रामाणिक आहेस अर्जुन....  तुला उशिरा भेटण्याची वेळ दिली त्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो.... पण आधी तुझ्या बद्दल माहिती काढली....  तू योग्य आहेस.... म्हणून तुला भेटायला तयार झालो मी.... ठीक आहे तर आपण केस सुरु करूयात. " शिरसाठ समाधानाने बोलले.  तसे अर्जुन पण हसला. 

             "आधी जरा चहा घेऊयात.... " असे म्हणत शिरसाठ फोन उचलून 2 चहा सांगतात.  " तर असं आहे....  अजय दीक्षित......  एक उत्कृष्ट बिझनेसमन....  तरुण....  आणि कमालीचा हुशार मनुष्य ....  त्याने नवीन बिजनेस सुरु केला....  त्या क्षेत्रात तो नवीन  असून पण त्याने खुप छान जम  बसवला... अगदी विदेशात पण त्याचे प्रॉडक्ट जात....  काही वर्ष असेच छान गेले...  जसं जशी अजय ची प्रगती झाली तसं तसे त्याचे खुप कॉन्टॅक्टस पण वाढले....  त्यातच एक होता....  भुजंग मोटेवार........... " 

            गँग चा उद्या लास्ट पेपर होता...  त्या दिवशी पासून आदी जरा जास्त सिरीयस पणे वागत होता.  लक्ष्मी पण ठीक च दिसत होती...  ती बाबांशी बोलली एवढेच बाकीच्यांना माहित होते...  पण बाबा काय बोलले हे माहित नव्हतं.  पण ती कॉन्फेर्टेबल आहे हे पाहून सर्व ठीक आहे असे वाटत आहे.  उद्या चा पेपर झाला की आपण निवांत.....  हा विचार करत मीनू भरभर रिविजन करत होती.  त्यात पण मध्ये मध्ये ती रिद्धी चे डाउट क्लीअर करत होती....  आज 20 दिवस होतं आले ती आणि अर्जुन बोलले नव्हते. पण ती स्वतः च्या अभ्यासाबाबत खुप स्ट्रिक्ट आहे आणि अर्जुन पण.....  त्याने आधीच तिला अभ्यास म्हणजे अभ्यास च करायला असे सांगितलं होतं.  त्यामुळे तिला उद्याची ओढ होती.  कधी एकदा पेपर संपतो असे झाले होते तिला. 

          दुपारी 1 वाजता पेपर सुटला तसे सर्व गँग चिवचिवाट करत च बाहेर आली.....  सर्वाना सर्व पेपर छान गेले होते.  नेहमी प्रमाणे कॅन्टीन मध्ये चहा समोसे हादडायचं काम चालू होतं. 

          रिद्धी न मीनू च तू बोलणार का मी बोलू असे डोळ्यातून खुणवा खुणावी चालू होती.  मीनू बोलली.... " लक्ष्मी.....  तू बोललीस बाबांबरोबर? " तिने जरा थांबत थांबत विचारलं... जर बाबा नाही म्हणाले असतील तर उगीच तिला हर्ट होणार हा विचार करत. 

           "अग हो....  बोलले मी... " ती एक्सायटेड होऊन बोलली...  " तुम्हाला माहित आहे guys.....  बाबा नि माझं ऐकलं आहे...  थँक्स आदी...  तू सांगितले तस आत्मविश्वासाने बोलले....  तर बाबा पण माझं एज्युकेश संपे पर्यंत थांबायला तयार झाले.  आणि परवा दीदी ची एंगेजमेंट आहे सो तुम्हाला सर्वाना यायच च आहे.  ok....  " ती बोलली तसे सर yehhhh करून ओरडले  आणि अजूनच गोंधळ घालायला लागले.... आज सर्व आनंदी होते.  लक्ष्मी आणि आदित्य तर खुप च जास्त.....

           "सो.....  उद्या आपण शॉपिंग करणार आहोत.....  yehh" रिद्धी बोलली तसे लक्ष्मी आणि मीनू अजूनच चिवचिवायला लागल्या.  " आणि तुम्ही दोघे यायचं आहे आमच्या बरोबर...  जरा ठीक ठाक कपडे घाला....  दीदी चा साखरपुडा आहे... " रिद्धी म्हणाली....

          या शॉपिंग च्या चर्चे पासून अनाभिज्ञ  असणारे विनू आणि आदी जागेवरच उडाले....  "नाही नाही.....  आम्ही ठीक आहोत...  आम्हाला नवे कपडे पण नको....  या पोरी त्या दुकानदाराला वेड लावतात पण यांना काही आवडत नाही...  "आदी गयावया करत बोलला. 

              "मी पण आद्या शी सहमत आहे...  हवं तर आम्ही आमची शॉपिंग करू....  पण प्लिज तुमच्या बरोबर नको....  ही रिद्धी तर भयानक आहे तिला या डिजाईन मध्ये दुसरा कलर हवा असतो किंवा या कलर मध्ये दुसरे डिजाईन.....  नको तो गोंधळ च नको..... " विनू सुद्धा अंग झटकत बोलला. 

          पण रिद्धी च नाक लाल झालं......  " मी भयानक आहे?????" ती ओरडतच विनू ला बोलली तसे सर्व शांत बसले.  आता विनू च काही खरं नाही हे सर्वाना कळून चुकलं...  आदी ने तर सहानुभूती पूर्वक मान हलवत विनू च्या खांद्यावर हात ठेऊन त्याला आधार दिला. 

             "अग तस नव्हतं म्हणायचं मला.....  मी फक्त शॉपिंग च बोलत होतो....." विनू त्याची बाजू सावरत बोलला....  बाकी सर्व तोंडावर हात ठेऊन हसू दाबत विनू ची मज्जा पाहत होते.....

           संध्याकाळी बाबा आणि आई चा फोन आला....  मीनू ने नेहमी प्रमाणे अपडेट दिले....  "बाबा मला वाटत आपण उगीच काळजी करत आहोत.....  परत काहीच हालचाल नाही त्या लोकांची.... " ती बोलली....

            " नाही मीनू....  आपल्याला सावध राहायला लागेल...  तू तुझी काळजी घेत राहा....  आणि सांगितलेलं लक्षात ठेव..... " 

          "कोणावर विश्वास ठेऊ नको....." मीनू हसत बोलली...  "हो बाबा...  काळजी करू नका.... "

          तसे शशिकांत मंद हसले.  त्यांनी तिच्या सुरक्षतेची जेवढी होता होईल तेवढी काळजी घेतली होती....

         " बाबा....  परवा लक्ष्मी च्या दीदी चा साखरपुडा आहे...  मग मी त्या नंतर च घरी येईल...  आणि मी शॉपिंग ला जाऊ का हो??? "  

            "हो जा की....  विचारते काय....  मी पाठवतो पैसे...  आणि मीनू छान ड्रेस घे...."

            बाबांनी फोन स्पीकर वर ठेवला होता..  तशी आई बोलली ... "अग मीनू....  कपडे घेणार आहे का फंक्शन ला?   भारी घे हा...  थोडा स्काय ब्लू घे....  तुला तो कलर खुप छान दिसतो...  बाबा ना पैसे पाठवायला सांगते..... ते ना...  शिवाजी चौकात मोठे दुकान आहे बघ....  MM ड्रेसेस...  तिथून घे... छान लेहंगा घे...  मला फोटो पाठव...."

              " अग आई श्वास तरी घेते की नाही बोलताना.... " आणि ती हसली....  पण आठवल्या सारखं बोलली.... " तुला बर माहित ग एवढं सगळं चंद्रपूर मधलं... " तिने शॉक झाल्याच नाटकं करत विचार...

            तसे आई बाबा दोघे चपापले...  बाबा नि जरा रागाने आई कडे पाहिलं... काय गरज ना काही पण बोलायची....  " "अग तिला कसलं माहित....  FM वर जाहिराती ऐकून सांगते....  तसे पण.... एवढ्यात जाहिराती असतात की जाहिराती च पाठ होतात.... "बाबा हसत बोलले.

             तसे मीनू पण हसली.  हे तर खरं आहे म्हणा.... असे म्हणत तिने फोन ठेवला... 

         7 वाजत आले.. तिने अर्जुन ला व्हाट्सअप hi एवढाच मेसेज पाठवला...  "त्यांना माहित आहे...  आज माझे पेपर संपणार आहेत....  मी ऐकलं ना...  मग एक मेसेज तरी स्वतः हुन करावा ना...  पण नाही....  अर्जुन सूर्यवंशी.... मला तर वाटत आहे की हे विसरले बहुतेक मला..." स्वतः शीच हसत ती नेहमी प्रमाणे गॅलरी मध्ये जाऊन बसली...  कानात हेडफोन घातले...  आणि निवांत गाणे ऐकत बसली....  छान रोमँटिक गाण्यांमुळे तिला खरं तर अर्जुनची अजूनच आठवण यायला लागली....  तिला अर्जुन ने प्रपोज केले तो दिवस आठवला...  किती आनंदी होते तेव्हा ते...  देवा त्यांना नेहमी आंनदी ठेव...  आणि मला त्यांच्या सोबत ठेव...  मी पण आनंदी.... " गालातल्या गालात हसत ती बाहेर पाहत होती...  तसे तिला बाहेरचा नेहमीचा भिकारी दिसला....  तो अलीकडं महिना 2 महिना पासून तिथे भीक मागायचा.  मीनू आणि रिद्धी त्याला येता जाता काही देत पण असत खायला.  ती नेहमी प्रमाणे किचन मधून काही खायला घेऊन त्याला द्यायला निघते....  च बाहेर येऊन त्याला देते.  त्याने नेहमी प्रमाणे कृतज्ञता पूर्वक ते घेतलं.  एक मंद हसू त्याच्या चेहऱ्यावर आलं. 

             दुसरा दिवस रिद्धी आणि लक्ष्मी ने शॉपिंग मध्ये च घालवला....  परवा च्या भांडणा मुळे आदी आणि विनू ला यावंच लागलं शॉपिंग ला. लक्ष्मी ला येता आलं नाही...  कारण घरी खुप तयारी करायची होती...  या चौघांनी शॉपिंग करून बाहेरच खाऊन घेतलं...  मीनू आणि रिद्धी ने MM मधूनच शॉपिंग केली.  रिद्धी ने रेड कलर चा अनारकली घेतला तर मीनू ने स्काय ब्लु कलर चा.  आता त्यांना उद्याची घाई होती... 

               दुसऱ्या दिवशी दोघी च फायनली एकदाच आवरलं....  आदी न विनू हॉल मध्ये बसुन पेंगायला लागले होते... " तुला सांगतो विन्या.....  जर उशीर झाला ना.....  तर लक्ष्मी मला फाडून खाईल....  खुप डेंजर रागाने पहाते रे ती...." आदी हवालदिल झाल्यासारखा बोलला....

          " अरे रिद्धी ला आवर म्हणलं तर ती...... "तसे या दोघी बाहेर आल्या...  तिच्या कडे पाहत विनू पुढे पटकन बोलला.. "तर ती लगेच आवरेल....  तिला गरज काय आवरायची...  तिचे लांब केस....  ते डोळे.....  गोरा रंग.... नाजूक नाक....  ते लाल ओठ..... " विनू मंत्रमुग्ध झाल्या सारखा तिच्याकडे चालत येत तिला पाहत बोलत आहे हे त्याला लक्षात पण नाही आल....  पण रिद्धी ची मात्र जाम तारांबळ उडाली... 

            तसे त्याला आदी ने माग  ओढलं.... " काय करतो yar???  वेडा झाला का? "

            तसे विनू केसात हात फिरवत इकडेतिकडे पाहायला लागला.  त्याचा चेहरा लाल झाला होता...  आणि  बाकी तिघे त्याला गालातल्या गालात हसत होते.  "ते..... मला तहान लागली..."   असे म्हणत तो पटकन किचन मध्ये गेला....  तो आत गेला तसे बाकी तिघे मोठ्याने हसले.

               अर्धा पाऊण तासात चौघे हॉल वर पोहचले.  विनू ने कार आणली होती म्हणून चौघे बरोबर च आले....  आल्या आल्या आधी त्यांनी लक्ष्मी ला शोधलं...  अपेक्षे प्रमाणे तिने त्यांना उशिरा आल्या बद्दल झापलं.

            "चला 15 मिनिटात होईल पण  एंगेजमेंट....  आपण बसुन घेऊन चेअर्स वर...  लक्ष्मी बोलली... " आज तिने छान पिंक कलर ची नेट ची साडी घालती होती....  आज तिघी पण सुंदर दिसत होत्या....

           लक्ष्मी सारखी च गेट कडे पाहत होती. "तू कोणाला पाहत आहेस मी इथे असताना.....  बाय द वे...  खुप छान दिसत आहेस.... " आदी तिला हळूच बोलतो...तशी ती छान हसते... 

              " आले बघ हे दोघे...." तिने गेट कडे डोळ्यांनी च इशारा केला...  तसे बाकीच्यांनी पण पुढे पाहिलं.... समोरून अर्जुन आणि  दक्ष येत होते...  निवांत...  गप्पा मारत....  अर्जुन ने साधा च व्हाईट शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती.  त्यात तो खुप छान दिसत होता.  आणि दक्ष ने मात्र जरा डिझायनर ड्रेस घातला होता आणि सोबत त्याची चार्मिंग स्माईल.  खुप भारी दिसत होता.  तुला दोघांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं....  सर्व उठून त्यांच्या कडे गेले....  दक्ष..विनू आणि आदी त्याला हाय फाय देत बोलले.  त्यांनी अर्जुन ला शेकहॅण्ड केले.  तर अर्जुन अन  दक्ष दोघे पण मीनू कडे पाहत होते...  स्काय ब्लु कलर चा ड्रेस.... पफ पडलेले कुरुळे केस खांद्यावर रुळत होते...  चमकदार डोळे...ओठांवर छान पिंकीश लिसप्टीक..  आणि एका बाजूने घेतलेली ओढणी...  ती पटकन पुढे येऊन बोलली...

              " hello अर्जुन सर.... hi दक्ष... " तिने पण दक्ष ला हाय फाय केल.

              तसे अर्जुन ला लक्षात आलं...  " माझी चुक आहे...  मी तिला साधा रिप्लाय पण केला नाही.  " तो मनातच बोलला... " आता मानवावं लागणार... " तो गालात हसला...  आणि तिच्याकडे पाहून ओठांच्या कोपऱ्यात हसत भुवया उंचावल्या....तसा तिचा  चेहरा blush झाला आणि त्याला इग्नोर करायचा प्लॅन तिथेच फेल झाला... सर्वजण आत आले अर्जुन आणि दक्ष बरोबर बसले होते...  त्यांच्याच बाजू ला...  मीनू आणि बाकी सर्व.... अर्जुन च लक्ष सारखं मीनू कडे च जात होतं...  आणि तीच पण...  आफ्टर ऑल ते जवळ जवळ 1 महिन्यानेएकमेकांना पाहत होते.  दक्ष ला मात्र कष्टाने आपली नजर मीनू वरून हटवावी लागत होती....

           " तू बोललास का तिला?" दक्ष अर्जुन ला म्हणाला...

        " कोणाला? काय? " अर्जुन न कळल्या सारखं बोलला...

           " अरे एवढे नको नाटक करू...  असशील पोलीस ऑफिसर बाकी जागा साठी...  माझ्या साठी तू आज पण AJ आहेस कळलं...  नाटकं नको करू...  मीनू बद्दल बोलत आहे मी... " 

         तसे अर्जुन चा चेहरा जरा blush झाला... " छान आहे ना ती...  म्हणजे जरा युनिक आहे...  स्ट्रॉंग आहे...  आणि माहित आहे....  तिचे डोळे.... "  

             "रिया सारखे आहेत.... " दक्ष बोलला...  तसे अर्जुन च लक्ष त्याच्या कडे गेले.  तो एकटक मीनू ला पाहत होता...  तीच लक्ष पण नव्हतं...  पोरींचा वेगळेच काहीतरी चालू होतं...

               " हो ना.... " अर्जुन त्याच्याकडे पाहत बोलला.  तसे दक्ष ला लक्षात आलं की त्याने मला मिनूकडे पाहताना पकडलं...  तसे त्याचा चेहरा पडला.

            "दक्ष....  इकडे बघ....  माझ्याकडे... " तो त्याला बोलला... 

            " हे बघ अर्जुन......"

              तो बोलायला लागला तसे अर्जुन बोलला... "तुला आवडते का ती?  "   


          

  "हे.....  काहीपण काय....  मीनू???  आणि मी???  काही पण....  तुला माझा  चॉईस माहित नाही का?  " दक्ष जरा जास्त च दात दाखवत बोलला.

                 तसे अर्जुन ने त्याला एक लुक दिला ...  तसे हसणारा दक्ष चा चेहरा जरा दुःखी झाला....  " मित्रा...  प्रश्न हा नाही की मला ती आवडते...  प्रश्न हा आहे की तिला कोण आवडत....  मी तिचा फक्त मित्र आहे....  आणि मित्र च राहील... " तो डोळ्यात आलेलं पाणी परतवत बोलला,  "तिला तू आवडतोस....  ती तुझ्यावर प्रेम करते....  माझ्याकडून चुकून झालं.....ते ट्रेकिंग च्या वेळी पडताना मी तिला सावरले तेव्हा...  मला नव्हतं माहित ती.... " त्याला पुढे काय बोलाव समजलं च नाही... "

              दक्ष रिलॅक्स....  प्लिज... " अर्जुन त्याच्या हातावर हात ठेवत त्याला दिलासा देत बोलला.

             " मी तुझ्यासाठी खुप आनंदी आहे...  अर्जुन... " दक्ष त्याचा हात घट्ट पकडत बोलला.  तसे अर्जुन ने त्याला hug केल.

                 दक्ष ने त्याला हसत विचारलं....  " मग सांगितलं का नाही तिला.... " तसे अर्जुन ने न बोलता हसत फक्त "हो..." म्हणत मान हलवली.  "आणि ती हो पण बोलली... खरं मला उत्तरांची अपेक्षा नव्हती.... " अर्जुन बोलला पण त्यात जरा उदासपणा ची झलक होती. पण दक्ष च लक्ष होतं कुठे....

         सर्व फंक्शन पूर्ण झाले...  सर्वांनी जेवण पण केल....  तसे अचानक अर्जुन मीनू ला खुणावू लागला.  खरं तर तो असं वागत आहे म्हणून मीनू ला हसायला येत होतं... तिला त्याला इग्नोर करायच आहे पण तिला ते पण धड जमत नव्हतं....  शेवटी तो हळूच तिच्या मागे येऊन उभा राहिला...  आणि त्याने तिच्या हाताला चिमटा काढला....  तसे ती दचकली.  तिने रागाने त्याचे कडे पाहिल....

                " माझ्या मेसेज चा रिप्लाय नाही दिला...  " त्याच्याकडे डोळ्याच्या कोपऱ्यातून पाहत ती हळूच बोलली....

                  "त्या साठी sorry... " तो पण हळूच बोलला आणि इकडे तिकडे पाहत त्याने उजव्या हाताने हळूच कान पकडला तसे तिला हसायला आले. 

              "चल ना.... जरा काम आहे... तू परत जाशील उद्या....  " तो विनवणी च्या सुरात बोलला... 

             तसे ती इकडे तिकडे पाहत बोलली... " मी यांना काय सांगू.... "

             "काहीतरी सांग...  चल लवकर... मी बाहेर आहे....  " असे सांगून तो निघाला पण.... 

           " लक्ष्मी.....  ऐक ना.....  मी ते जरा पुढे जाते....  " ती लक्ष्मी ला काय कारण द्यायचं हा विचार करत होती...

               " हो जा ना....  रिद्धी ला विनू आणि आदी सोडवतील...  आणि बाकीच्यांना नको सांगू.....  आदी तुला चिडवून हैराण करेल.... " लक्ष्मी बोलली.

            "थँक्स डिअर.... "लक्ष्मी ला hug करत मीनू जवळ जवळ पळत च निघाली.....  ती हॉल च्या बाहेर आली तशी जरा पुढे कार ला टेकून उभा राहिलेल्या अर्जुन कडे पाहत ती त्याच्याकडे निघाली.... तिला येताना पाहून अर्जुन च्या चेहऱ्यावर या कानापासून त्या कानापर्यंत मोठं हसू आल.  ती आली तसे त्याने तिच्या साठी कार च दरवाजा उघडला आणि ती आत बसली.  तो पटकन ड्राइविंग सीट वर बसला.  " थँक्स तू आली..... चल जाऊ.... "  

            "कुठे..."  

            "सरप्राईज... " त्याने गाडी सुरु केली....  ती चोरून चोरून त्याला पाहत होती...

                "कस आहे ना....  तू मला असे सरळ पण पाहू शकतेस....  असे चोरून नको पाहू... " आणि हसला तशी ती लाजली...

               "सर प्लिज...  तुम्ही असे चिडवत नका जाऊ....  " ती खाली मान घालत बोलली...  ती अशी लाजली की  अर्जुन ला खुप आवडायची...

                "अग तुला चिडवल्या नंतर तू जे लाजते ना...  ते खुप भारी वाटत... " अर्जुन अजूनच तिला चिडवत बोलला....

                    "तुम्ही तर ना....  " पण पुढे काय बोलाव ते न समजल्या मुळे ती बाहेर पाहायला लागली.

               ते जरा वेळाने एक छानशा रेस्टोरंट जवळ आले....  तिथे हिरवळी वर छान डेकोरेशन केलेलं टेबल लावले होते.  त्यातलं एक टेबल अर्जुन ने रिझर्व केलेलं होतं...  अर्जुन आणि मीनू तिथे जाताच वेटर ने एक छोटा आईस केक आणला.  आणि एक कॅण्डल....  केक वर मीनल असं लिहलं होतं....  खुप सुंदर होता केक...

                

" पण सर....  माझा बर्थडे नेक्स्ट वीक मध्ये आहे... "

              

" माहित आहे...  आपण आता करू सेलिब्रेट....  तू माझं आयुष्य एवढं सुंदर बनवलं....  तुझ्या साठी किती ही केल तरी कमी च आहे. " तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला. " हॅपी बर्थडे मीनल." तिच्याकडे पाहत अर्जुन बोलला. 

           "थँक यू सर..." ती गालात हसत बोलली.  "चल केक कट कर...." तिने केक कट केला...  त्याने एकट्यानेच हॅपी बर्थडे टू यू च गान ताला सुरात म्हणलं....  तिने केक चा तुकडा त्याला भरवला... तसे तो हसला...  "चल एक सेल्फी घेऊ....  " तसे तिने छान पैकी पोझ दिली...  दोघांनी तो केक खाल्ला व उरलेला पॅक करायला सांगितला.  तो तिच्या जवळ आला...  तिला हाताला पकडून उभा केला आणि तिथे हिरवळी वर गुढगा टेकून बसला.  ती त्याच्याकडे पाहत होती की हा नेमका करत काय आहे?  तसे त्याने सावकाश तिचा डावा पायी उचलला....  आणि त्याच्या गुढग्या वर ठेवला...

                 "सर....  काय करत आहात.... "    ती जरा अवघडत बोलली...

                   "थांब ग जरा....  " त्याने खिशातून एक छान नाजूक अँकलेट काढले आणि तिच्या पायात घातले.  आणि तिचा पाय खाली ठेवला.  उभा राहून त्याने तिचा हात हातात घेतला.... " मीनू.....  काही झालं तरी लक्षात ठेव....  माझं खुप प्रेम आहे तुझ्यावर...  आणि हे माझं पाहिलं गिफ्ट आहे....  हे कधीच तू तुझ्या पासून दूर करू नको...  " तो एवढं बोलताना इमोशनल झाला होता....

                      "थँक यू सर...  हे मी नेहमी माझ्या जवळ ठेवेल. प्रॉमिस... " ती त्याचा हात घट्ट पकडून बोलली.  दोघांनी जरा वेळ बरोबर घालवला आणि मग अर्जुन तिला सोडवायला निघाला.... 

            तिच्या रूम च्या बाहेर आल्या नंतर तिने तिची पर्स उचलली,  ती उतरणार तेवढ्यात त्याने मागच्या सीट वरून एक चॉकलेट चा बॉक्स घेऊन तिच्या समोर पकडला.  तसे ती अजूनच खुलली.

                   "क्या बात हे....  साहेबाना हे पण जमत म्हणजे....  सरप्राईज वर सरप्राईज... " ती बॉक्स घेत बोलली...

                   " hmmm मला अजून पण बरच काही जमत...  तो ओठाच्या कोपऱ्यात खट्याळ हसत तिच्या जवळ येतो.

                   " सर...  प्लिज...  मला उशीर होतोय... " तसे तो बारीक तोंड करून मागे होतो...  त्याचा तसा चेहरा पाहून तिला हसायला येत.....  ती पटकन पुढे येऊन त्याच्या गालावर ओठ टेकवते...  आणि कार मधून उतरते...  त्याला काही समजायच्या आत ती कार च्या बाहेर असते..  त्याचा चेहरा लाल झाला....  ती त्याच्या बाजूला येऊन खिडकीतून त्याला bye बोलते...

             " उद्या सकाळी मी येणार आहे तुला सोडवायला...  रेडी रहा..." तो तिला हसत बोलला आणि निघाला.....

                                 क्रमश :

टीप - या कथेतले नाव...  गाव.... आणि ही कथा  सर्व काल्पनिक आहे....

           थँक्स फ्रेंड्स....  तुम्ही कथे ला एवढा भरभरून प्रतिसाद देत आहात.  मला भाग पोस्ट करायला उशीर होतं आहे...  तरी पण तुम्ही वाट पाहता...  मला मेसेज,  कमेंट करून कथे बद्दल प्रतिक्रिया  सांगता...  त्या बद्दल खुप खुप आभारी आहे...  तुमच्या प्रतिसादा मुळे मला लिहण्याचा अजूनच जास्त हुरूप येतो...  आजचा भाग कसा वाटला ते मला नक्की सांगा. 
थँक यू

डॉ. पुजा.

    

              

🎭 Series Post

View all